आधी आणि नंतर बदलणारी शक्ती तिला गवसली
“देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल”
आधी आणि नंतर बदलणारी शक्ती तिला गवसली
सॅन्ड्रा नावाची मेक्सिकोतील एक स्त्री म्हणते, मी की कुटुंबाच्या नावावर एक कलंक होते. किशोरावस्थेत तिला झिडकारण्यात आल्यामुळे व प्रेम न मिळाल्यामुळे तिच्या मनावर खूप ओरखडे उठले होते. ती म्हणते: “प्रौढावस्थेत पोहंचेपर्यंत माझ्या मनात, रिक्तपणाची भावना कायम झाली होती, मी जिवंत का आहे याविषयी आणि जीवनाविषयी माझ्या मनात पुष्कळ शंका होत्या.”
उच्च शाळेत असताना सॅन्ड्रा, घरात वडिलांनी ठेवलेल्या वाईनच्या बाटलीतील वाईन पिऊ लागली. हळूहळू, ती स्वतः मद्याच्या बाटल्या विकत आणून पिऊ लागली आणि दारूच्या पूर्ण आहारी गेली. ती कबूल करते: “मला जगण्यात कसलीच इच्छा नव्हती.” निराश झाल्यामुळे सॅन्ड्रा ड्रग्ज घेऊ लागली. ती म्हणते: “माझ्या पर्समध्ये मी सतत, दारूची एक बाटली, काही गोळ्या किंवा हाशिश ठेवायचे; याच गोष्टींमुळे मी माझ्या सर्व समस्या विसरू शकत होते.”
वैद्यकीय शाळा संपवल्यानंतर सॅन्ड्रा दारूत आणखीनच बुडू लागली. तिने आपले जीवन संपवण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण ती वाचली.
सॅन्ड्रा, आध्यात्मिक मदत आणि भावनिक आधार मिळावा म्हणून पुष्कळ धर्मांकडे वळाली; पण तिथेही तिला समाधान मिळाले नाही. तिला कसलीच आशा उरली नाही, निराश होऊन तिने वारंवार देवाला कळकळून प्रार्थना केली: “तू कुठं आहेस? मला मदत का करत नाहीस?” तिच्यातील स्वाभिमानाची भावना अगदीच कमी झाली होती तेव्हा यहोवाची साक्षीदार असलेली एक भगिनी तिच्याशी बोलली. तिचा व्यक्तिगत बायबल अभ्यास सुरू झाला. “परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो” हे जेव्हा सॅन्ड्राला कळले तेव्हा ती खूप प्रभावीत झाली.—स्तोत्र ३४:१८.
सॅन्ड्राचा बायबल अभ्यास घेणाऱ्या भगिनीने तिला हे समजायला मदत केली, की, आदामाकडून वारशाने मिळालेल्या पाप आणि अपरिपूर्णतेमुळे आपण अशक्त आहोत हे यहोवा देवाला माहीत आहे. आपण देवाच्या धार्मिक दर्जांनुसार अगदी तंतोतंत जगू शकत नाही हे यहोवाला कळते, ही गोष्टही सॅन्ड्राला समजली. (स्तोत्र ५१:५; रोमकर ३:२३; ५:१२, १८) यहोवा आपले लक्ष आपल्या कमतरतांवर केंद्रित करत नाही आणि आपण जितके करू शकतो त्याच्याही पलिकडे करण्याची तो आपल्याकडून अपेक्षा करीत नाही, हे जाणून सॅन्ड्राला खूप आनंद झाला. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “हे परमेशा, तू अधर्म लक्षात आणिशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?”—स्तोत्र १३०:३.
येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाबद्दलचे बायबलमधील एक महत्त्वपूर्ण सत्य समजल्यावर तर सॅन्ड्रा खूपच हरखून गेली. या बलिदानाद्वारे यहोवा देव, अपरिपूर्ण आज्ञाधारक मानवांना, त्याच्यासमोर धार्मिक होण्याची दयाळुपणे संधी देतो. (१ योहान २:२; ४:९, १०) होय, आपल्याला आपल्या “अपराधांची क्षमा” मिळू शकते आणि आपण निरुपयोगी आहोत या भावनेवरही मात करू शकतो.—इफिसकर १:७.
प्रेषित पौलाच्या उदाहरणावरूनही सॅन्ड्रा अमूल्य धडे शिकली. आपल्या गत चुका प्रेमळपणे माफ केल्याबद्दल तसेच वारंवार घडणाऱ्या चुकांवर मात करण्यास आपल्याला साहाय्य दिल्याबद्दल त्याने देवाच्या दयेविषयी मनापासून कृतज्ञता बाळगली. (रोमकर ७:१५-२५; १ करिंथकर १५:९, १०) पौलाने आपला जीवनक्रम बदलला, देवाला संतुष्ट असलेल्या मार्गावर टिकून राहण्याकरता त्याने ‘आपले शरीर कुदलले व त्याला दास करून ठेवले.’ (१ करिंथकर ९:२७) तो आपल्या पापी प्रवृत्तींचा दास बनला नाही.
स्तोत्र ५५:२२; याकोब ४:८) देव तिच्यामध्ये व्यक्तिगत आस्था घेतो, याची तिला जाणीव झाली तेव्हा ती आपली जीवनशैली बदलू शकली. ती म्हणते: “आता मला पूर्णवेळ, इतरांना बायबल शिकवण्यास आनंद वाटतो.” इतकेच नव्हे तर सॅन्ड्राला, आपल्या थोरल्या आणि धाकट्या बहिणीला, यहोवाची ओळख करून देण्याचा सुहक्क देखील मिळाला. आता ती इतरांचे “बरे” करत असताना, यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनांत आपल्या वैद्यकीय कौशल्यांचा स्वेच्छेने उपयोग करते.—गलतीकर ६:१०.
सॅन्ड्राच्या कमतरतांमुळे तिला खूप त्रास झाला तरी ती त्यांच्याविरुद्ध लढत राहिली. त्यांच्यावर मात करण्यासाठी व देवाची दया मिळवण्यासाठी ती यहोवाला कळकळून प्रार्थना करीत राहिली. (तिला लागलेल्या सवयींचे काय? ती पूर्ण विश्वासाने म्हणते: “माझं मन आता शुद्ध आहे. मी आता दारू पीत नाही, धुम्रपान करत नाही किंवा ड्रग्जही घेत नाही. मला आता त्यांची आवश्यकता नाही. मी जे शोधत होते ते मला मिळाले आहे.”
[९ पानांवरील संक्षिप्त आशय]
“मी जे शोधत होते ते मला मिळाले आहे”
[९ पानांवरील चौकट]
बायबलची तत्त्वे कार्यात
अशुद्ध सवयींपासून स्वतःला मुक्त करण्यास मदत करणारी काही बायबल तत्त्वे पुढे देण्यात आली आहेत:
“देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.” (२ करिंथकर ७:१) सर्व अशुद्धतांपासून व गलिच्छ प्रथांपासून स्वतःला शुद्ध करणाऱ्यांना देव आशीर्वाद देतो.
“परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय.” (नीतिसूत्रे ८:१३) देवाबद्दलचे आदरयुक्त भय एखाद्या व्यक्तीला वाईट सवयींपासून तसेच मादक पदार्थांच्या गैरवापरापासून स्वतःला मुक्त करण्यास मदत करते. असे केल्याने, ती व्यक्ती यहोवाला संतुष्ट करतेच, शिवाय, भयानक आजारांपासूनही तिचे संरक्षण होते.
“सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे.” (तीत ३:१) पुष्कळ ठिकाणी, विशिष्ट ड्रग्ज स्वतःजवळ बाळगणे व त्यांचा वापर करणे, हा कायद्यानुसार एक गुन्हा आहे. खरे ख्रिस्ती बेकायदेशीर ड्रग्ज स्वतःजवळ बाळगत नाहीत किंवा त्यांचा उपयोगही करीत नाहीत.