यहोवाचा दिवस जवळ येत असताना लोकांविषयी आपण कसा दृष्टिकोन बाळगावा?
यहोवाचा दिवस जवळ येत असताना लोकांविषयी आपण कसा दृष्टिकोन बाळगावा?
‘यहोवा आपल्या वचनाविषयी विलंब करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.’—२ पेत्र ३:९.
१, २. (अ) यहोवा आज लोकांना कशा दृष्टिकोनातून पाहतो? (ब) आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारू शकतो?
यहोवाच्या सेवकांना ‘सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करण्याची’ आज्ञा देण्यात आली आहे. (मत्तय २८:१९) हे आपल्याला नेमलेले कार्य पार पाडत असताना आणि ‘परमेश्वराच्या मोठ्या दिवसाची’ वाट पाहत असताना आपण लोकांना त्याच दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे ज्या दृष्टिकोनातून यहोवा त्यांना पाहतो. (सफन्या १:१४) आणि तो कोणता दृष्टिकोन आहे? प्रेषित पेत्र म्हणतो: “कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभु आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करितो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९) प्रत्येक व्यक्ती पश्चात्ताप करू शकते या दृष्टीने देव मानवांकडे पाहतो. त्याची “अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.” (१ तीमथ्य २:४) किंबहुना, ‘दुर्जनाने आपल्या मार्गावरून फिरून जगावे’ यात यहोवाला संतोष आहे.—यहेज्केल ३३:११.
२ यहोवा लोकांकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो त्याच दृष्टिकोनातून आपण त्यांच्याकडे पाहतो का? प्रत्येक जातीच्या व राष्ट्रांच्या व्यक्ती ‘त्याच्या कुरणातील कळपात’ स्तोत्र १००:३; प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) देवासारखा दृष्टिकोन असणे किती महत्त्वाचे आहे यासंबंधाने दोन उदाहरणे आपण पाहू या. दोन्ही उदाहरणांत नाश होणार होता आणि यहोवाच्या सेवकांना आगाऊ सूचना देण्यात आली होती. आपण यहोवाच्या मोठ्या दिवसाची वाट पाहात असताना ही उदाहरणे अधिकच अर्थपूर्ण आहेत.
सामील होऊ शकतात असे यहोवाप्रमाणे आपणही मानतो का? (अब्राहामाचा दृष्टिकोन यहोवासारखा होता
३. सदोम व गमोरा येथील रहिवाशांबद्दल यहोवाचा कोणता दृष्टिकोन होता?
३ पहिले उदाहरण विश्वासू कुलपिता अब्राहाम आणि सदोम व गमोराच्या दुष्ट शहरांसंबंधी आहे. “सदोम व गमोरा यांच्याविषयीची ओरड” यहोवाने ऐकली तेव्हा त्याने त्या शहरांचा व त्यातील सर्व रहिवाशांचा ताबडतोब नाश केला नाही. त्याने आधी त्या शहरांची तपासणी केली. (उत्पत्ति १८:२०, २१) तर दोन देवदूतांना सदोम शहरात पाठवण्यात आले, जेथे त्यांनी धार्मिक लोट याच्या घरी मुक्काम केला. देवदूत आले त्या रात्री, “सदोमाची माणसे, तरुणापासून ते म्हाताऱ्यापर्यंत, सगळ्या लोकांनी चोहोकडून येऊन त्या घराला गराडा घातला.” या पुरुषांना देवदूतांसोबत समलैंगिक संभोग करायचा होता. या शहराचे नीच रहिवाशी नाश होण्याच्याच लायकीचे होते यात शंका नाही. पण दूतांनी लोटाला म्हटले: “तुझे आणखी कोणी येथे आहेत काय? तुझा जावई, तुझे मुलगे, तुझ्या मुली आणि तुझे दुसरे कोणी या नगरात असेल त्यांस या स्थानातून बाहेर काढ.” यहोवाने त्या शहरातील काही रहिवाशांना बचावण्याचा मार्ग मोकळा केला पण शेवटी केवळ लोट व त्याच्या दोन कन्या त्या नाशातून वाचल्या.—उत्पत्ति १९:४, ५, १२, १६, २३-२६.
४, ५. अब्राहामाने सदोमच्या रहिवाशांप्रीत्यर्थ विनवणी का केली आणि लोकांबद्दलचा त्याचा दृष्टिकोन यहोवाच्या दृष्टिकोनाच्या सामंजस्यात होता का?
४ आता आपण त्या वेळेचा विचार करू जेव्हा यहोवाने सदोम व गमोरा शहरांची पाहणी करण्याचा आपला इरादा असल्याचे जाहीर केले होते. तेव्हा अब्राहामने अशी विनवणी केली: “त्या नगरात कदाचित पन्नास नीतिमान असतील तर त्यांचा तू खरेच संहार करणार काय? त्याच्यातल्या पन्नास नीतिमानांसाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय? या प्रकारची कृति तुजपासून दूर राहो. नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल असा दुर्जनाबरोबर नीतिमानांचा वध करणे तुजपासून दूर राहो; सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?” “या प्रकारची कृति तुजपासून दूर राहो” असे अब्राहामने दोनदा म्हटले. त्याच्या अनुभवावरून अब्राहामला माहीत होते की यहोवा दुष्टांसोबत नीतिमानांचाही नाश करणार नाही. “सदोम नगरात पन्नास नीतिमान आढळले” तर आपण उत्पत्ति १८:२२-३३.
त्याचा नाश करणार नाही असे यहोवाने म्हटले तेव्हा अब्राहामने क्रमाक्रमाने ही संख्या कमी करत दहा पर्यंत आणली.—५ अब्राहामाच्या विनंत्या यहोवाच्या दृष्टिकोनाच्या सामंजस्यात नसत्या तर त्याने त्या ऐकून घेतल्या असत्या का? निश्चितच नाही. “देवाचा मित्र” असल्यामुळे अब्राहामाला देवाचा दृष्टिकोन काय हे माहीत होते व त्याचा दृष्टिकोन देखील तोच होता. (याकोब २:२३) यहोवाने आपले लक्ष सदोम व गमोराकडे वळवले तेव्हा तो अब्राहामाच्या विनंत्या विचारात घेण्यास तयार झाला. का? कारण ‘कोणाचा नाश व्हावा अशी आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.’
लोकांबदल योनाचा दृष्टिकोन —अगदी उलट
६. योनाच्या घोषणेला निनवेकरांनी कसा प्रतिसाद दिला?
६ आता दुसऱ्या एका उदाहरणाकडे लक्ष द्या. योनाचे उदाहरण. या वेळी नाशाकरता नेमलेले शहर होते निनवे. संदेष्टा योनाला सांगण्यात आले होते की या शहराची दुष्टता ‘परमेश्वरापुढे आली आहे’ असे त्याने घोषित करावे. (योना १:२) निनवे शहराची उपनगरे, व मुख्य नगर मोठे होते; “ते सगळे फिरून येण्यास तीन दिवस लागत.” शेवटी जेव्हा योनाने यहोवाच्या आज्ञेनुसार निनवे शहरात प्रवेश केला तेव्हा तो अशी घोषणा करू लागला की “चाळीस दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल.” हे ऐकून “निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेविली, त्यांनी उपास नेमिला आणि . . . सर्व गोणताट नेसले.” निनवेच्या राजाने देखील पश्चात्ताप केला.—योना ३:१-६.
७. निनवेकरांच्या पश्चात्तापी मनोवृत्तीकडे यहोवाने कोणत्या दृष्टीने पाहिले?
७ सदोमच्या रहिवाशांच्या तुलनेत ही अगदी वेगळी प्रतिक्रिया होती! पश्चात्ताप केलेल्या निनवेकरांकडे यहोवाने कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले? योना ३:१० म्हणते: “त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांजवर ते आणिले नाही.” यहोवा “अनुताप पावला” याचा अर्थ असा, की निनवेकरांनी आपला मार्ग बदलल्यामुळे त्याने देखील आपल्या कार्यवाहीत बदल केला. देवाचे स्तर बदलले नाहीत, पण निनवे शहराचे रहिवाशी पश्चात्तापी झाले हे पाहून यहोवाने आपला निर्णय बदलला.—मलाखी ३:६.
८. योना का खिन्न झाला?
८ निनवेचा नाश केला जाणार नाही असे योनाला दिसले तेव्हा त्याने यहोवाचा दृष्टिकोन स्वीकारला का? नाही, कारण बायबल सांगते: “योनाला ह्यावरून फार वाईट वाटले व त्याला राग आला.” योनाने मग काय केले? अहवाल सांगतो: “तो परमेश्वराला विनंति करू लागला की, हे परमेश्वरा, मी आपल्या देशात होतो तेव्हा हे माझे म्हणणे होते की नाही! म्हणूनच मी तार्शिशास पळून जाण्याची त्वरा केली. मला ठाऊक होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासंपन्न, अरिष्ट आणिल्याबद्दल अनुताप करून घेणारा असा देव आहेस.” (योना ४:१, २) योनाला यहोवाच्या गुणांविषयी माहिती होती. परंतु त्या विशिष्ट प्रसंगी हा संदेष्टा खिन्न झाला आणि त्याने पश्चात्तापी निनवेकरांविषयी देवाचा दृष्टिकोन अवलंबला नाही.
९, १०. (अ) यहोवाने योनाला कशाप्रकारे समजावले? (ब) निनवेकरांविषयी योनाने यहोवाचा दृष्टिकोन स्वीकारला असावा असे आपण का गृहीत धरू शकतो?
९ योना निनवेच्या बाहेर गेला आणि त्याने तेथे एक मांडव घालून “शहराचे काय होते ते पाहत त्याच्या छायेस बसला.” योना ४:५-११) लोकांविषयी यहोवाच्या दृष्टिकोनाबद्दल योनाला किती उत्तम धडा मिळाला!
यहोवाने तुंबीचा एक वेल उगवू दिला आणि योनाला त्याची छाया मिळावी असे केले. पण दुसऱ्या दिवशी तो वेल सुकून गेला. योनाला याचा राग आला तेव्हा यहोवाने म्हटले: “[ह्या तुंबीची] तू इतकी पर्वा करितोस! तर उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांस कळत नाही अशी एक लाख वीस हजाराहून अधिक माणसे व पुष्कळशी गुरेंढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय?” (१० निनवेच्या लोकांची पर्वा वाटण्यासंबंधी देवाने केलेल्या विधानावर योनाची काय प्रतिक्रिया होती हे बायबलमध्ये सांगितलेले नाही. तरीसुद्धा योनाने पश्चात्तापी निनवेकरांविषयी आपला दृष्टिकोन बदलला हे स्पष्ट आहे. यहोवाने हा प्रेरित अहवाल लिहिण्यासाठी त्याचा उपयोग केला यावरून आपण या निष्कर्षावर येतो.
तुमची मनोवृत्ती कशी आहे?
११. अब्राहामाने आजच्या काळातील लोकांविषयी कसा दृष्टिकोन बाळगला असता?
११ आज पुन्हा आपण नाशाच्या उंबरठ्यावर उभे आहोत; यहोवाचा मोठा दिवस येईल तेव्हा सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश होईल. (लूक १७:२६-३०; गलतीकर १:४; २ पेत्र ३:१०) लवकरच नाश होणार असलेल्या या जगातील लोकांविषयी अब्राहामाचा कसा दृष्टिकोन असता? निश्चितच ज्यांनी अद्याप ‘राज्याची सुवार्ता’ ऐकलेली नाही त्यांच्याविषयी त्याला काळजी वाटली असती. (मत्तय २४:१४) संभवतः सदोममध्ये असलेल्या धार्मिक लोकांकरता अब्राहामाने देवाकडे वारंवार याचना केली. संधी मिळाल्यास, सैतानाच्या नियंत्रणाखाली असलेल्या या जगाच्या रितीभातींचा अव्हेर करायला व देवाची सेवा करायला जे कदाचित तयार होतील अशा लोकांविषयी आपल्याला व्यक्तिगतरित्या काळजी वाटते का?—१ योहान ५:१९; प्रकटीकरण १८:२-४.
१२. सेवाकार्यात भेटणाऱ्या लोकांप्रती योनासारखी मनोवृत्ती विकसित होणे का सहज शक्य आहे आणि यासाठी आपण काय करू शकतो?
१२ दुष्टाईचा अंत होण्याची आस धरणे योग्यच आहे. (हबक्कूक १:२, ३) तरीसुद्धा, आपल्यात सहज योनासारखी, अर्थात पश्चात्तापी लोकांविषयी बेपर्वा मनोवृत्ती निर्माण होऊ शकते. खासकरून आपण राज्याचा संदेश घेऊन लोकांच्या घरी जातो तेव्हा वारंवार आपल्याला अनास्थेवाईक, विरोध करणारे किंवा भांडखोर लोक भेटतात तेव्हा अशी मनोवृत्ती निर्माण होऊ शकते. अद्यापही यहोवा या दुष्ट व्यवस्थीकरणातून बऱ्याच लोकांना एकत्रित करू शकतो या गोष्टीचा आपल्याला विसर पडू शकतो. (रोमकर २:४) गांभीर्याने आत्मपरीक्षण केल्यावर जर आपल्याला आढळले की आपल्यात योनाच्या सुरवातीच्या मनोवृत्तीचा काही अंश आहे तर आपण प्रार्थनेकरवी साहाय्य मागून यहोवाचा दृष्टिकोन आत्मसात केला पाहिजे.
१३. यहोवाला आज लोकांबद्दल काळजी आहे असे आपण का म्हणू शकतो?
१३ जे अद्याप यहोवाची सेवा करत नाहीत त्यांच्याविषयीही मत्तय १०:११) उदाहरणार्थ, त्यांच्या प्रार्थनांना प्रतिसाद देऊन तो ‘न्याय करील.’ (लूक १८:७, ८) शिवाय, यहोवा आपल्या सर्व प्रतिज्ञा व उद्देश त्याच्या नियुक्त वेळी पूर्ण करील. (हबक्कूक २:३) निनवेचे लोक पुन्हा दुष्टाई करू लागले तेव्हा जसा यहोवाने त्या शहराचा नाश केला त्याप्रमाणेच तो या पृथ्वीवरूनही सर्व दुष्टाईचा नाश करेल.—नहूम ३:५-७.
त्याला काळजी वाटते आणि तो आपल्या समर्पित लोकांच्या याचना ऐकतो. (१४. यहोवाच्या महान दिवसाची वाट पाहत असताना आपण काय केले पाहिजे?
१४ यहोवाचा महान दिवस येऊन या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करेल तोपर्यंत आपण धीरोदात्तपणे वाट पाहत त्याची इच्छा पूर्ण करण्यात तल्लीन असू का? यहोवाचा दिवस येण्यापूर्वी अद्याप किती प्रमाणात प्रचार कार्य करावयाचे शिल्लक आहे याची पूर्ण कल्पना आपल्याला नाही, पण आपल्याला हे माहीत आहे की राज्याची सुवार्ता सर्व पृथ्वीवर देवाला समाधान वाटेपर्यंत घोषित केली जाईल. आणि यहोवा आपले मंदिर वैभवाने उत्तरोत्तर भरत असताना अद्याप तो ज्या “निवडक वस्तु” आणणार आहे त्यांच्याविषयी निश्चितच आपल्याला आस्था वाटली पाहिजे.—हाग्गय २:७.
आपला दृष्टिकोन आपल्या कृतींवरून स्पष्ट होतो
१५. प्रचार कार्याच्या महत्त्वाची आपली जाणीव कशामुळे वाढू शकते?
१५ कदाचित आपण अशा परिसरात राहत असू जेथे प्रचार कार्याला चांगला प्रतिसाद मिळत नसेल. आणि कदाचित राज्य प्रचारकांची जेथे अधिक गरज आहे त्या ठिकाणी जाऊन राहण्याच्या स्थितीत आपण नसू. अंत येण्याआधी आपल्या क्षेत्रात दहा लोक सापडतील असे समजा. त्या दहा लोकांसाठी शोध घेत राहणे अर्थपूर्ण आहे असे आपण समजतो का? येशूला लोकसमुदायांकडे पाहून “कळवळा आला कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते.” (मत्तय ९:३६) बायबलचा अभ्यास करण्याद्वारे आणि टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांतील लेख वाचण्याद्वारे आपल्याला या जगाची दयनीय स्थिती अधिक चांगल्याप्रकारे समजू शकते. यामुळे साहजिकच सुवार्तेचा प्रचार करण्याच्या गरजेची आपल्याला अधिक जाणीव होईल. शिवाय, ‘विश्वासू व बुद्धिमान दासाकरवी’ पुरवल्या जाणाऱ्या बायबल आधारित साहित्याचा कृतज्ञ मनोवृत्तीने वापर केल्यास, कित्येकदा कार्य करण्यात आलेल्या क्षेत्रातही आपण अधिक प्रभावकारी पद्धतीने प्रचार करू शकतो.—मत्तय २४:४५-४७; २ तीमथ्य ३:१४-१७.
१६. आपण आपल्या सेवाकार्याला अधिक परिणामकारक कसे बनवू शकतो?
१६ अद्यापही जे बायबलच्या जीवनदायक संदेशाला प्रतिसाद देऊ शकतात अशा लोकांविषयी वाटणाऱ्या काळजीमुळे आपण सेवाकार्यात घरमालकांना वेगवेगळ्या वेळी व पद्धतीने संदेश सादर करण्याचा प्रयत्न करू. आपण जातो त्या वेळी बरेच लोक घरी सापडत नाहीत का? मग कदाचित आपल्या सेवाकार्याच्या वेळा व जागा बदलण्याद्वारे आपण अधिक परिणामकारक सेवा करू शकू. कोळी सहसा अशाच वेळी मासेमारी करायला जातात जेव्हा त्यांना मासे मिळतील. आपल्या आध्यात्मिक मासेमारीच्या कार्यात आपणही हीच नीती अवलंबू शकतो का? (मार्क १:१६-१८) संध्याकाळचे साक्षकार्य तसेच जेथे कायदेशीर परवानगी आहे तेथे टेलिफोनद्वारे साक्षकार्य करून पाहण्यास काय हरकत आहे? काहींना वाहनतळे, ट्रक्स थांबतात ती ठिकाणे, पेट्रोलपंप आणि दुकाने ‘मासेमारीची उत्पादनक्षम ठिकाणे’ असल्याचे आढळले आहे. तसेच अनौपचारिक साक्षकार्य करण्याच्या प्रत्येक संधीचा आपण फायदा उचलतो तेव्हा लोकांबद्दल अब्राहामासारखी मनोवृत्ती असल्याचे आपण प्रदर्शित करतो.
१७. परदेशांत सेवा करणाऱ्या मिशनऱ्यांना व इतरांना आपण कशाप्रकारे प्रोत्साहन देऊ शकतो?
१७ अद्याप लाखो लोकांनी राज्याचा संदेश ऐकलेला नाही. प्रचार करण्यासोबतच, आपण घरी बसून देखील अशा लोकांसाठी आपली काळजी व्यक्त करू शकतो का? देशोदेशी सेवा करणाऱ्या मिशनऱ्यांना अथवा पूर्ण वेळेची सेवा करणाऱ्यांना आपण ओळखतो का? मग, त्यांच्या कार्याविषयी प्रशंसा व्यक्त करणारी पत्रे आपण त्यांना लिहू शकतो. असे करण्याद्वारे आपण लोकांबद्दल काळजी कशी दाखवतो? आपल्या पत्रांतील प्रोत्साहन व प्रशंसा यांमुळे त्या मिशनऱ्यांना आपापल्या नियुक्त ठिकाणी सेवा करण्याची हिम्मत मिळू शकते आणि अशाप्रकारे ते कित्येकांना सत्याचे ज्ञान आत्मसात करण्यास मदत करू शकतात. (शास्ते ११:४०, NW) तसेच आपण मिशनऱ्यांसाठी व इतर देशांत सत्यासाठी भुकेल्या लोकांसाठी प्रार्थना देखील करू शकतो. (इफिसकर ६:१८-२०) आणखी एक मार्ग म्हणजे यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक कार्यासाठी आर्थिक अनुदान देणे.—२ करिंथकर ८:१३, १४; ९:६, ७.
तुम्ही स्थलांतर करू शकता का?
१८. काही ख्रिश्चनांनी आपल्या देशात राज्याच्या कार्यांना बढावा देण्याकरता काय केले आहे?
१८ राज्य प्रचारकांची अधिक गरज असलेल्या ठिकाणी स्थलांतर केलेल्या लोकांना त्यांच्या आत्मत्यागी मनोवृत्तीसाठी अनेक आशीर्वाद मिळाले आहेत. इतर काही साक्षीदारांनी आपल्याच देशात राहून, इतर देशांतून स्थाईक झालेल्या लोकांना आध्यात्मिक मदत देण्याकरता दुसरी भाषा शिकून घेतली आहे. अशा प्रयत्नांमुळे अनेक आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. उदाहरणार्थ, अमेरिकेतील टेक्सस शहरातील चिनी लोकांना मदत करणाऱ्या सात साक्षीदारांनी २००१ सालच्या प्रभूच्या सांज भोजनाच्या प्रसंगी ११४ लोकांचे स्वागत केले. अशा गटांना मदत करणाऱ्यांना दिसून आले आहे, की त्यांची शेते कापणीकरता तयार आहेत.—मत्तय ९:३७, ३८.
१९. राज्य प्रचाराच्या कार्याला बढावा देण्याकरता तुम्ही दुसऱ्या देशात जाण्याचा विचार करत असल्यास प्रथम काय करणे योग्य ठरेल?
१९ राज्य प्रचारकांची अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाऊन राहण्याच्या स्थितीत आपण आहोत असे कदाचित तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला वाटत असेल. अर्थात, सर्वप्रथम “बसून . . . खर्चाचा अंदाज करून” पाहणे शहाणपणाचे आहे. (लूक १४:२८) खासकरून दुसऱ्या देशात जाण्याचा एखाद्या व्यक्तीचा विचार असतो तेव्हा. या विचारात असलेल्यांनी स्वतःला पुढील प्रश्न विचारावेत: ‘मी माझ्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सांभाळू शकेन का? मला योग्य व्हिसा मिळेल का? मला त्या देशाची भाषा आधीच येते का, किंवा ती शिकून घेण्यास मी तयार आहे का? तेथील हवामान व संस्कृतीबद्दल मी विचार केला आहे का? मी त्या देशातील बांधवांकरता एक “सहकारी” ठरण्याऐवजी त्यांच्यावर ओझे तर बनणार नाही?’ (कलस्सैकर ४:१०, ११) तुम्ही ज्या देशात जाऊ इच्छिता तेथे कितपत गरज आहे याची माहिती काढण्याकरता केव्हाही तेथील प्रचाराचे काम पाहणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराशी पत्रव्यवहार करणे उचित आहे. *
२०. एका तरुण ख्रिस्ती बांधवाने दुसऱ्या देशातील सहविश्वासू बांधवांच्या व इतरांच्या हिताकरता कशाप्रकारे स्वतःला वाहून घेतले?
२० जपानमधील राज्य सभागृहांच्या बांधकामात साहाय्य केलेल्या एका बांधवाला दिसून आले की पराग्वे देशात उपासनागृहे निर्माण करण्याकरता कुशल कामगारांची गरज आहे. तो अविवाहित व उत्साही असल्यामुळे त्याने त्या देशात स्थलांतर केले आणि तेथील प्रकल्पावर एकटा पूर्ण वेळेचा सेवक म्हणून आठ महिने कार्य केले. तेथे राहत असताना, त्याने स्पॅनिश भाषा शिकून घेतली आणि अनेक गृह बायबल अध्ययन चालवले. त्या देशात राज्य प्रचारकांची गरज आहे हे त्याने ओळखले. जपानला परतल्यानंतर काही काळातच तो परत पराग्वेला गेला आणि त्याच राज्य सभागृहात लोकांना एकत्रित करण्याकरता हातभार लावला.
२१. यहोवाच्या महान दिवसाची वाट पाहात असताना आपली मुख्य चिंता व आपला दृष्टिकोन कसा असावा?
२१ प्रचार कार्य पूर्णपणे, देवाच्या इच्छेनुसार पार पाडले जाईल याची देव स्वतः खात्री करेल. आज तो शेवटल्या आध्यात्मिक कापणीच्या कार्याला वेग आणत आहे. (यशया ६०:२२) तर मग यहोवाच्या दिवसाची वाट पाहताना आपणही कापणीच्या कार्यात आवेशाने भाग घेऊ व आपला प्रेमळ देव लोकांना ज्या दृष्टिकोनातून पाहतो त्याच दृष्टिकोनातून आपणही पाहण्याचा निर्धार करू.
[तळटीप]
^ परि. 19 ज्या देशात प्रचार कार्यावर बंदी आहे किंवा जेथे कार्यावर निर्बंध आहे अशा देशात स्वतःहून स्थलांतर करणे तुमच्याकरता फायदेकारक ठरणार नाही. असे केल्यामुळे जे राज्य प्रचारक सावधगिरीने तेथे कार्य करत आहेत त्यांच्याकरताही अनावश्यकपणे समस्या निर्माण होऊ शकतात.
तुम्हाला आठवते का?
• यहोवाच्या दिवसाची वाट पाहत असताना आपण लोकांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे?
• सदोममध्ये राहात असलेल्या संभाव्य धार्मिक जनांविषयी अब्राहामाचा कसा दृष्टिकोन होता?
• निनवेच्या पश्चात्तापी लोकांबद्दल योनाचा कसा दृष्टिकोन होता?
• ज्या लोकांनी अद्याप सुवार्ता ऐकलेली नाही अशा लोकांबद्दल आपलाही दृष्टिकोन यहोवासारखाच आहे हे आपण कसे दाखवू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१६ पानांवरील चित्र]
अब्राहामाचा लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यहोवासारखाच होता
[१७ पानांवरील चित्र]
योनाने पश्चात्तापी निनवेकरांबद्दल शेवटी यहोवाचा दृष्टिकोन अवलंबला
[१८ पानांवरील चित्रे]
लोकांबद्दल काळजी वाटत असल्यामुळे आपण वेगवेगळ्या वेळी व पद्धतीने सुवार्ता घोषित करण्याचा प्रयत्न करतो