विश्वासामुळे आजारी व्यक्ती बरी होऊ शकते का?
विश्वासामुळे आजारी व्यक्ती बरी होऊ शकते का?
आजारी पडल्यावर आपण आराम मिळण्याकरता व बरे होण्याकरता मार्ग शोधत असतो. तुम्हाला कदाचित बायबलमधून हे माहीत झाले असेल, की येशू ख्रिस्ताने सर्व प्रकारच्या आजाऱ्यांना बरे करून अनेक व्याधीग्रस्तांना आराम दिला. हे त्याने कसे केले? बायबल म्हणते, की हे त्याने ‘देवाच्या सामर्थ्याने’ केले. (लूक ९:४२, ४३; प्रेषितांची कृत्ये १९:११, १२) तेव्हा, आजारी असलेले केवळ त्यांच्या विश्वासामुळे नव्हे तर देवाच्या पवित्र आत्म्यामुळे बरे झाले. (प्रेषितांची कृत्ये २८:७-९) म्हणूनच, आजारी लोकांनी बरे होण्याकरता आपला विश्वास दाखवला पाहिजे, अशी येशूने त्यांच्याकडून अपेक्षा केली नाही.
तुमच्या मनात मग असा प्रश्न येईल, की: ‘असे चमत्कार केवळ गतकाळात जमा झाले की येशूने केलेले चमत्कार भविष्यात पुन्हा होतील? वेदनादायक किंवा बरा न होणारा आजार असलेल्यांसाठी काय आशा आहे?’
बायबल सांगते की येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांना जसे चमत्कारिकरीत्या बरे केले तशाचप्रकारे तो देवाच्या नव्या धार्मिक जगात आपल्या शक्तीद्वारे पुन्हा चमत्कारिकरीत्या आजारी लोकांना बरे करेल. कोणताही फेथ हिलर आजपर्यंत जे करू शकला नाही, म्हणजे सर्व प्रकारचे आजार आणि मृत्यू कायमचा नाहीसा करू शकला नाही ते देव कसे आणि केव्हा करणार आहे हे तुमच्या भागातील यहोवाच्या साक्षीदारांना तुम्हाला दाखवायला आनंद वाटेल. होय, देव “मृत्यु कायमचा नाहीसा” करेल.—यशया २५:८.