सर्वात मोलाचा वारसा
सर्वात मोलाचा वारसा
आपल्या जीवनाच्या संधीकाळी प्रेषित योहानाने लिहिले: “माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्या कशानेहि होत नाही.”—३ योहान ४.
हा विश्वासू प्रेषित आपल्या आध्यात्मिक मुलांविषयी बोलत होता. तरीपण, पुष्कळ पालकांना या प्रेषितासारखेच वाटेल. आपल्या मुलांना “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” वाढवण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आहे आणि आता आपली मुले मोठी होऊन “सत्यात चालतात” हे पाहून त्यांना आनंद होतो. (इफिसकर ६:४) आपल्या मुलांना सार्वकालिक जीवनाचा मार्ग शिकवणे हाच त्यांच्याकरता सर्वात मोठा वारसा आहे. कारण ईश्वरी भक्ती (ज्याकरता ख्रिश्चनांसाठी असलेल्या यहोवाच्या अपेक्षेप्रमाणे जीवन जगण्याची आवश्यकता आहे) “आताच्या व पुढच्याहि जीवनाचे अभिवचन” धरून आहे.—१ तीमथ्य ४:८.
परिपूर्ण पिता यहोवा, त्याची भीती बाळगून असलेल्या पालकांची फार कदर करतो कारण ते आपल्या मुलांना आध्यात्मिक शिक्षण देण्यासाठी खूप मेहनत घेतात. मुले अशा शिक्षणाला प्रतिसाद देतात तेव्हा आपल्या पालकांसोबत मिळून खरी उपासना करण्यात त्यांना मोठा आनंद मिळतो. अशी मुले मोठी होतात तेव्हा या अनुभवांच्या गोड आठवणी त्यांच्याजवळ जमलेल्या असतात. काहींना ईश्वरशासित सेवा प्रशालेत पहिल्यांदा भाग घेतल्याचे आठवते. * किंवा कदाचित त्यांना तो क्षण आठवतो जेव्हा आपल्या आई किंवा बाबांबरोबर घरोघरच्या कार्यात असताना त्यांनी पहिल्यांदा बायबलचे एखादे वचन वाचले होते. शिवाय पालकांनी त्यांना बायबल कथांचं माझं पुस्तक किंवा थोर शिक्षकाचे ऐका * यातून वाचून दाखवलेल्या गोष्टी ते कसे काय विसरून जातील? गेब्रीएल यांना कालांतराने आवडू लागलेल्या गोष्टीविषयी ते आठवून सांगतात: “मी चार वर्षांचा होतो तेव्हा माझी आई दररोज स्वयंपाक करताना मला गाणी गायची. त्यातलं आठवत असलेलं एक राज्य गीत मला अजूनही फार आवडतं. आणि नंतर, [या गीतामुळे] मला यहोवाच्या सेवेचं महत्त्व पटलं.” गेब्रीएल यांना आठवत असलेले ते सुरेख गीत कदाचित तुम्हाला आठवत असेल. सिंग प्रेझेस टू जेहोवा या गीतपुस्तकातील ते एक गीत आहे व त्याचे शीर्षक आहे, “वर्शिप जेहोवा ड्यूरिंग युथ” (तारुण्यात यहोवाची उपासना करा).
या गाण्याची सुरवात अशी आहे: “बालकांच्या तोंडून देवाने, स्तुती घेतली करवून;/केला येशूचा स्वीकार त्यांनी, आपला आवाज उंचावून.” होय, काही मुलांना मत्तय १८:३, ४) मुलांना यहोवाच्या उपासनेत उचित स्थान आहे. उलट, त्या गीताचे पुढचे बोल असे आहेत: “होय, बालकही गातात देवाची थोरवी.”
येशूचा सहवास लाभला आणि त्यांनी कदाचित गोड, निरागसपणाने त्याला खूष केले असावे. येशूने लहान मुलांच्या शिकाऊ वृत्तीचे उदाहरणही आपल्या शिष्यांना दिले. (घरी, शाळेत आणि इतर ठिकाणी आपल्या उदाहरणीय वर्तनाने अनेक मुलांनी देवाचा आणि आपल्या कुटुंबाचा सन्मान केला आहे. “सत्याची आवड धरणारे ख्रिस्ती पालक” असणे त्यांच्याकरता किती मोठा आशीर्वाद ठरला आहे. (अनुवाद ६:७) देवभीरू पालक त्या देवाचा पक्ष घेतात जो आपल्या प्राणीमात्रांना प्रेमळ पित्याप्रमाणे योग्य मार्गावर चालायला शिकवतो. याचा त्यांना पुष्कळ आशीर्वाद मिळतो. आणि मग ते आपल्या कुटुंबातल्या लहानग्यांना शिकवतात तेव्हा त्यांची मुले “पाळितात आज्ञा तयांची अन् आनंदवितात मन तयांचे”! (यशया ४८:१७, १८) ऑन्हेलिका सध्या यहोवाच्या साक्षीदारांच्या मेक्सिको शाखा दफ्तरात काम करते; ती म्हणते: “माझे पालक नेहमी बायबलची तत्त्वे कृतीत आणण्याचा प्रयत्न करायचे. यामुळे माझं बालपण अत्यंत सुखद होतं. मी आनंदी होते.”
असे ख्रिस्ती मान्य करतात की, आपल्या आध्यात्मिक वारशाची उत्तम काळजी घेणे फायद्याचे आहे. कदाचित तुम्ही खरी ख्रिस्ती मूल्ये जोपासणाऱ्या कुटुंबात वाढत असलेले तरुण आहात. तसे असल्यास, तेच गीत तुम्हाला पुढे आर्जवते: “अहो ख्रिस्ती तरुणांनो, ठेवा मार्ग सरळ आपुला.” एक दिवस येईल जेव्हा तुम्हाला स्वतःचे निर्णय घ्यावे लागतील म्हणून आता “शिका तारुण्यात यहोवावर विसंबून राहणे./नाही प्रसिद्धीसाठी झटणे.”
प्रसिद्धी मिळवण्याला तुम्ही चुकून जीवनात प्राधान्य दिले तर, तुम्हाला मिळालेले सर्व शिक्षण व्यर्थ ठरेल आणि तुमच्या भविष्याचा सत्यानाश होईल. प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात तुम्ही सतर्कपणा गमावून बसाल. काहीजण अशांसोबत मैत्री करून बसले आहेत जे वरवर पाहता चांगले, इतकेच नव्हे तर, आकर्षक वाटतात पण ख्रिस्ती दर्जांबद्दल कसलीही कदर बाळगत नाहीत. यंग पीपल आस्क—हाऊ कॅन आय मेक रिअल फ्रेंड्स? या व्हिडिओतील मुख्य पात्र तारा हिच्याबाबतीत असेच घडले. खऱ्या उपासनेची कदर नसलेल्यांसोबत संगती केल्याने, त्या गाण्यात म्हटल्याप्रमाणे, तारासारखे कोणत्याही तरुण ख्रिश्चनाला नंतर हे अनुभवायला मिळेल की, “नीती बिघडते वाईट संगतीने.” चांगल्या सवयी अंगवळणी पडायला अनेक वर्षे लागतात पण घालवायला एक क्षणही लागत नाही.
एक गोष्ट स्पष्ट आहे की, ईश्वरी भयाचा मार्ग वाटतो तितका सोपा नाही. पण गाण्यात पुढे म्हटल्याप्रमाणे, “तारुण्यात तुम्ही देवाला स्मरले,/अन् केली यहोवाची सेवा आत्म्याने व खरेपणाने,” तर खरे यश नक्की नीतिसूत्रे २७:११.
तुमच्याच वाट्याला येईल. तसेच “मोठे व्हाल तुम्ही जसजसे, होईल अधिक आनंद प्राप्त तुम्हाला तसतसा.” यहोवाच्या प्रेमळ छायेत राहून त्याच्या नजरेत जे योग्य ते करण्यापासून तुम्ही कशामुळेही परावृत्त होणार नाही याचा तुम्हाला अधिकाधिक प्रत्यय येईल. एक प्रौढ, ईश्वरी व्यक्ती बनण्याचा हाच मार्ग आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, ख्रिस्ती घरात संगोपन झाल्याने “देवाचे मन हर्षित” करण्याची संधी तुम्हाला मिळते. एका मानवाला यापेक्षा आणखी कोणता बहुमान मिळू शकतो?—त्यामुळे, युवकांनो, हे नेहमी ध्यानात ठेवा की, यहोवाकडून आणि आपल्या ख्रिस्ती पालकांकडून मिळणारे प्रशिक्षण फार मोलाचे आहे. त्यांच्या प्रेमाने तुम्हाला यहोवाच्या नजरेत योग्य ते करत राहण्यास प्रेरणा मिळत राहो. येशू ख्रिस्ताप्रमाणे आणि विश्वासू तरुण तीमथ्याप्रमाणे, तुम्ही आपल्या स्वर्गीय पित्याचे व पार्थिव मातापिताचे मन आनंदित कराल. शिवाय, तुम्ही स्वतः कधी पालक बनला तर या लेखात आधी उल्लेखलेल्या ऑन्हेलिकाशी तुम्ही कदाचित सहमत असाल; ती म्हणते: “मला कधी मूल झालेच तर यहोवाबद्दल त्याच्या मनात बालपणापासूनच प्रेम उत्पन्न करण्याचा व तेच त्याचा मार्गदर्शक प्रकाश बनवण्याचा मी कसोशीने प्रयत्न करेन.” निश्चितच, अनंतकालिक जीवनाकडे नेणारा सरळ मार्ग हाच सर्वात मोलाचा वारसा आहे!
[तळटीपा]
^ परि. 4 बायबल शिक्षण कार्यक्रमाचा हा भाग यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांमध्ये चालवला जातो आणि त्यात अबालवृद्ध सहभागी होऊ शकतात.
^ परि. 4 उल्लेखित प्रकाशने यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित केलेली आहेत.