“लीन जन पृथ्वीचे वतन पावतील”—कसे?
“लीन जन पृथ्वीचे वतन पावतील”—कसे?
‘लीनांना पृथ्वीचे वतन मिळेल’ या येशूच्या आनंददायक प्रतिज्ञेविषयी तुम्हाला कदाचित माहीत असेल. पण आज लोक एकमेकांशी व या पृथ्वीशी ज्याप्रकारे व्यवहार करत आहेत त्यावरून असा विचार मनात येतो, की शेवटी लीन जनांना वतन मिळण्यासारखे या पृथ्वीवर काही राहील का?—मत्तय ५:५; स्तोत्र ३७:११.
यहोवाच्या साक्षीदारांपैकी मिरीयम नावाच्या एकीने बायबल आधारित चर्चा सुरू करण्यासाठी याच प्रश्नाचा उपयोग केला. ज्या मनुष्याशी ती बोलत होती, त्याने उत्तर दिले की ज्याअर्थी येशूने असे वचन दिले त्याअर्थी पृथ्वी ही नक्कीच वतन म्हणून देण्याइतक्या उत्तम स्थितीत राहील; ती ओसाड आणि मानव वस्तीकरता लायक नसलेली पडीक भूमी बनणार नाही.
हे आशावादी मनोवृत्तीने दिलेले उत्तर होते. पण असा आशावाद आपण खरोखर बाळगू शकतो का? नक्कीच बाळगू शकतो कारण ही प्रतिज्ञा पूर्ण होईल हे मानण्याकरता बायबल आपल्याला ठोस कारणे देते. खरे पाहता, या प्रतिज्ञेची पूर्तता ही मानवजातीकरता व पृथ्वीकरता असलेल्या देवाच्या उद्देशांशी निगडीत आहे. आणि देव जो काही संकल्प करतो तो पूर्णही करतो याचे पुरेसे आश्वासन बायबल आपल्याला देते. (यशया ५५:११) तर मग देवाचा मानवजातीकरता सुरवातीला कोणता उद्देश होता आणि हा उद्देश तो कशाप्रकारे वास्तवात उतरवेल?
पृथ्वीकरता देवाचा सार्वकालिक उद्देश
यहोवाने पृथ्वीची निर्मिती एका विशिष्ट उद्देशाने केली होती. “आकाशाचा उत्पन्नकर्ता तोच देव, पृथ्वीचा घडणारा व कर्ता तोच; त्याने तिची स्थापना केली; त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही, तर तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली; हा परमेश्वर म्हणतो, मीच परमेश्वर आहे; अन्य कोणी नव्हे.” (यशया ४५:१८) तर, पृथ्वीची निर्मिती ही मानव वस्तीकरता करण्यात आली होती. तसेच, ही पृथ्वी मानवजातीकरता सार्वकालिक निवासस्थान बनावी असा देवाचा उद्देश होता. ‘त्याने पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापिली आहे की ती कधीहि ढळणार नाही.’—स्तोत्र १०४:५; ११९:९०.
पृथ्वीबद्दल देवाचा उद्देश काय होता हे त्याने पहिल्या मानवी दांपत्याला दिलेल्या आज्ञेवरूनही दिसून येते. आदाम व हव्वा यांस यहोवाने म्हटले: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.” (उत्पत्ति १:२८) आदाम व हव्वा यांच्या सुपूर्द करण्यात आलेली ही पृथ्वी त्यांच्याकरता व त्यांच्या संततीकरता कायमस्वरूपी निवासस्थान असणार होती. कित्येक शतकांनंतर स्तोत्रकर्त्याने असे म्हटले: “स्वर्ग तर परमेश्वराचा आहे, पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे.”—स्तोत्र ११५:१६.
उत्पत्ति २:१६, १७) आदाम व हव्वा यांनी या साध्याच व सुस्पष्ट आज्ञेचे पालन केले तरच त्यांना एदेन बागेत राहू दिले जाणार होते. आणि या आज्ञेचे पालन करून, ते त्यांच्या स्वर्गीय पित्याने त्यांच्याकरता जे काही केले होते त्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करू शकत होते.
पण या अद्भुत आशीर्वादाची पूर्णता पाहण्याकरता, आदामाने व हव्वेने तसेच त्यांच्या संततीपैकी प्रत्येकाने यहोवा देवाला अर्थात त्यांचा निर्माणकर्ता व जीवनदाता याला आपला सार्वभौम शासक म्हणून स्वीकारणे व स्वेच्छेने त्याचे आज्ञापालन करणे गरजेचे होते. यहोवाने ही गोष्ट त्यांना अगदी स्पष्टपणे सांगितली होती; त्याने मानवाला अशी आज्ञा केली: “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (आदाम व हव्वा यांनी जाणूनबुजून देवाची आज्ञा मोडली तेव्हा खरे पाहता, ज्याने त्यांना त्यांच्याजवळ असलेले सर्वकाही पुरवले होते त्याच्यावरच त्यांनी पाठ फिरवली. (उत्पत्ति ३:६) अशारितीने, त्यांनी आपले रम्य निवासस्थान फक्त स्वतःकरताच नव्हे तर आपल्या संततीकरताही गमावले. (रोमकर ५:१२) पण पहिल्या दांपत्याने देवाची आज्ञा न पाळल्यामुळे ही पृथ्वी निर्माण करण्यामागे देवाचा जो उद्देश होता तो निष्फळ ठरला का?
देव बदललेला नाही
आपला संदेष्टा मलाखी याच्या माध्यमाने देवाने असे घोषित केले: “मी परमेश्वर बदलणारा नव्हे.” (मलाखी ३:६) या वचनावर भाष्य करताना, फ्रेंच बायबल अभ्यासक एल. फियॉन यांनी म्हटले की यहोवाची ही घोषणा त्याच्या प्रतिज्ञांच्या पूर्णतेशी निगडीत आहे. फियॉन लिहितात, “यहोवा आपल्या विद्रोही लोकांचा सहज सर्वनाश करू शकत होता, पण तो बदलणारा देव नसल्यामुळे, गतकाळात केलेल्या प्रतिज्ञांविषयी सर्व परिस्थितीत तो विश्वासू राहील.” देवाच्या प्रतिज्ञा, मग त्या एखाद्या व्यक्तीला केलेल्या असोत, राष्ट्राला केलेल्या किंवा सबंध मानवजातीला केलेल्या प्रतिज्ञा असोत, तो त्या प्रतिज्ञा विसरणार नाही, तर नियुक्त वेळी त्या पूर्ण करील. “तो आपला करार म्हणजे हजारो पिढ्यांसाठी आज्ञापिलेले आपले वचन सर्वकाळ आठवतो.”—स्तोत्र १०५:८.
पण पृथ्वीविषयी आपल्या मूळ उद्देशांच्या संदर्भात यहोवा बदललेला नाही याची आपण खात्री का बाळगू शकतो? कारण देवाच्या प्रेरित वचनात अर्थात बायबलमध्ये सुरवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला, आज्ञाधारक मानवांना ही पृथ्वी देण्याविषयीच्या देवाच्या उद्देशाचा उल्लेख आढळतो. (स्तोत्र २५:१३; ३७:९, २२, २९, ३४) शिवाय शास्त्रवचनांत यहोवाचा आशीर्वाद मिळालेल्यांचे वर्णन अशाप्रकारे केले आहे, की त्यांपैकी प्रत्येकजण “आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही.” (मीखा ४:४; यहेज्केल ३४:२८) यहोवाने निवडलेले, “घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षाचे मळे लावून त्यांचे फळ खातील.” रानातल्या पशूंसोबतही त्यांचे शांतीपूर्ण नाते असेल.—यशया ११:६-९; ६५:२१, २५.
बायबलमध्ये देवाच्या अभिवचनाविषयीची पूर्वछाया एका वेगळ्या प्रकारे देण्यात आली आहे. राजा शलमोनच्या राज्यात इस्राएल राष्ट्रात काही काळ शांती व सुबत्ता होती. त्याच्या शासनकाळात, “दानापासून बैर-शेब्यापर्यंत सारे यहुदी व इस्राएल आपआपली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्यांच्याखाली शलमोनाच्या सर्व कारकीर्दीत निर्भय राहत होते.” (१ राजे ४:२५) बायबलमध्ये येशूला “शलमोनापेक्षा थोर” असे म्हटले आहे आणि त्याच्या शासनाविषयी सांगताना स्तोत्रकर्त्याने अशी भविष्यवाणी केली: “त्याच्या कारकीर्दीत नीतिमान उत्कर्ष [पावेल]; आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांति [असेल].” तेव्हा, “भूमीत भरपूर पीक [येईल], पर्वतांच्या शिखरांवर ते [डोलेल].”—लूक ११:३१; स्तोत्र ७२:७, १६.
आपल्या वचनानुसार, यहोवा देव आज्ञाधारक मानवांना हे प्रतिज्ञा केलेले वतन केवळ देणारच नाही तर या पृथ्वीचे पूर्वीचे वैभव व सौंदर्य तिला पुन्हा देईल. प्रकटीकरण २१:४ येथे देवाचे वचन आपल्याला सांगते की देवाने वचन दिलेल्या नव्या जगात तो “[लोकांच्या] डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.” खरोखर ते एक परादीस असेल.
प्रतिज्ञात वतन मिळवायचे कसे?
स्वर्गातून शासन करणाऱ्या एका सरकारच्या देखरेखीखाली या पृथ्वीचे रूपातंर एका रम्य परादिसात केले जाईल. या राज्याचा राजा येशू ख्रिस्त असेल. (मत्तय ६:९, १०) सर्वप्रथम हे राज्य “पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश” करील. (प्रकटीकरण ११:१८; दानीएल २:४४) यानंतर, “शांतिचा अधिपति,” येशू ख्रिस्त या भविष्यसूचक शब्दांची पूर्तता करील: “त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार.” (यशया ९:६, ७) या राज्याच्या शासनात, पुनरुत्थानामुळे पुन्हा जिवंत झालेल्यांसहित कोट्यवधी मानवांना पृथ्वीचे वतन मिळवण्याची संधी मिळेल.—योहान ५:२८, २९; प्रेषितांची कृत्ये २४:१५.
तो अद्भुत वारसा मिळवण्याकरता कोण पात्र असतील? येशूचे शब्द विचारात घ्या: “जे सौम्य ते धन्य, मत्तय ५:५) सौम्य अथवा लीन असण्याचा अर्थ काय होतो? शब्दकोशांत सहसा “लीन” अथवा “सौम्य” या शब्दांचा अर्थ मृदू, विनम्र, आज्ञांकित, शांत किंवा स्वभावाने गरीब असाही दिलेला आढळतो. पण मूळ ग्रीक भाषेत या शब्दाचा अर्थ केवळ या अर्थांपुरताच मर्यादित नव्हता. विल्यम बार्कले यांच्या न्यू टेस्टमेंट वर्डबुक यात म्हटल्याप्रमाणे, या शब्दात “एक मृदुता आहे, पण त्या मृदुतेच्या जोडीला पोलादी शक्ती देखील आहे.” हा शब्द अशा मनोवृत्तीला सूचित करतो की जिच्यायोगे एक व्यक्ती, देवासोबत असलेल्या आपल्या उत्तम नातेसंबंधामुळे, आपल्याविरुद्ध केलेला अन्याय आकसखोर सूडबुद्धी न बाळगता, सहन करू शकते. देवासोबतचा नातेसंबंध त्या व्यक्तीला असे करण्याची ताकद देतो.—यशया १२:२; फिलप्पैकर ४:१३.
कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.” (लीन मनोवृत्तीची व्यक्ती जीवनाच्या सर्व क्षेत्रांत देवाच्या दर्जांचा नम्रपणे स्वीकार करते; स्वतःच्या दृष्टिकोनानुसार किंवा इतरांच्या मतांनुसार वागण्याचा अट्टहास ती धरत नाही. ती यहोवाकडून शिकून घेण्यास तयार असते. स्तोत्रकर्ता दावीद लिहितो: “[यहोवा] नम्र [लीन] जनांस न्यायपथाला लावितो. तो दीनांस आपला मार्ग शिकवितो.”—स्तोत्र २५:९; नीतिसूत्रे ३:५, ६.
पृथ्वीचे वतन पावणाऱ्या ‘लीन जनांपैकी’ तुम्ही एक असाल का? बायबलचा परिश्रमपूर्वक अभ्यास करण्याद्वारे यहोवाबद्दल व त्याच्या इच्छेबद्दल अधिकाधिक ज्ञान घेऊन त्यानुसार आचरण केल्यास तुम्ही देखील पृथ्वीवरील परादीसचे वतन मिळवण्याची व त्यात सर्वकाळ राहण्याची अपेक्षा करू शकता.—योहान १७:३.
[५ पानांवरील चित्र]
देवाने आदाम व हव्वेला दिलेल्या आज्ञेवरून त्याचा पृथ्वीकरता असलेला उद्देश स्पष्ट होतो
[६, ७ पानांवरील चित्र]
शलमोनाच्या शासनातील शांती व सुरक्षिततेवरून प्रतिज्ञात वतनाची पूर्वझलक मिळाली
[चित्राचे श्रेय]
मेंढरे व पाठीमागचे डोंगर: Pictorial Archive (Near Eastern History) Est.; अरबी मृग: Hai-Bar, Yotvata, Israel; शेत नांगरणारा शेतकरी: Garo Nalbandian
[७ पानांवरील चित्र]
एक नीतिमान नवे जग येत आहे—तुम्ही त्यात असाल का?