व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? पुढील प्रश्‍नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:

एखादा ख्रिश्‍चन भावनिकरीत्या किंवा आध्यात्मिकरीत्या खचून गेला असेल तर तो काय करू शकतो?

सर्वप्रथम, आपण का खचून गेलो आहोत याचे नेमके कारण शोधणे आवश्‍यक आहे. वेळोवेळी आपण आपल्या सवयींची व आपल्याजवळ असलेल्या वस्तूंची पाहणी केली आणि अनावश्‍यक भार ठरू शकणाऱ्‍या अशा सर्व गोष्टी मार्गातून काढून टाकल्या तर आपल्याला बराच फायदा होईल. आपल्या स्वतःच्या परिस्थितीनुसार आपण जीवनात वास्तविक ध्येये ठेवू शकतो. आपल्या आध्यात्मिक आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आपण नियमितरीत्या प्रार्थना व मनन केले पाहिजे.—८/१५, पृष्ठे २३-६.

यहोवाचे साक्षीदार १,४४,००० हा आकडा शब्दशः आहे असे का समजतात?

प्रेषित योहानाला १,४४,००० जणांच्या गटाविषयी सांगितल्यानंतर त्याने “मोठा लोकसमुदाय” पाहिला जो, “कोणाला मोजता आला नाही.” (प्रकटीकरण ७:४, ९) १,४४,००० ही संख्या लाक्षणिक असती तर या दोन वचनातील फरक उठून दिसला नसता. येशूने, आपल्याबरोबर राज्य करणाऱ्‍यांना ‘लहान कळप’ असे संबोधले. (लूक १२:३२)—९/१, पृष्ठ ३०.

इस्राएली लोक रक्‍त वाहू न दिलेला मृत प्राणी परक्याला का विकू शकत होते?

परका किंवा उपरी मनुष्य नियमशास्त्राच्या अधीन नव्हता. त्यामुळे इस्राएलांना असे प्राणी त्यांना देण्याची अथवा विकण्याची परवानगी होती. (अनुवाद १४:२१) पण यहुदी मतानुसारी बनलेली व्यक्‍ती नियमशास्त्राच्या कराराधीन असल्यामुळे तिने अशा प्राण्याचे रक्‍त खाल्ले नसते. (लेवीय १७:१०)—९/१५ पृष्ठ २६.

बायोमिमेटिक्स म्हणजे काय आणि ख्रिश्‍चनांसाठी तो आस्थेचा विषय का असू शकतो?

बायोमिमेटिक्स म्हणजे निसर्गातील रचनांची नक्कल करणारे शास्त्र. उदाहरणार्थ, राईट बंधूंनी मोठ्या पक्षांच्या उड्डाणाचे निरीक्षण करून पहिल्या विमानाची रचना केली. अशाप्रकारे, बायोमिमेटिक्स ख्रिस्ती व्यक्‍तीला निर्माणकर्त्याची स्तुती करण्यास प्रवृत्त करू शकते.—१०/१, पृष्ठ ९.

त्याला सुखलोकात उचलून नेण्यात आले, असा ज्याचा उल्लेख दुसरे करिंथकर १२:२-४ मध्ये करण्यात आला आहे तो मनुष्य कोण होता?

पौलाने आपल्या प्रेषित असण्याविषयी प्रतिवाद सादर केल्यानंतर लगेच हा अहवाल वाचायला मिळतो. बायबलमध्ये आणखी कोणत्याही व्यक्‍तीला असा अनुभव आल्याचे सांगितलेले नाही आणि या ठिकाणी पौल आपल्याला त्याविषयी सांगतो. त्याअर्थी पौलालाच हा दृष्टान्त झाला असल्याची शक्यता आहे.—१०/१५, पृष्ठ ८.

येशूठायी असे कोणते गुण होते ज्यामुळे त्याला देवाने निवडलेला आदर्श नेता म्हणता येईल?

येशू परिपूर्णरित्या विश्‍वासू राहिला. त्याचे वर्तन प्रामाणिक व नेक होते. येशू देवाला पूर्णतः समर्पित होता. त्याला लोकांविषयी कळकळ होती व तो खपण्यास तयार होता.—११/१, पृष्ठे ६-७.

हजार वर्षांच्या राजवटीदरम्यान दुरात्मे कोठे असतील?

ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीदरम्यान त्यांनाही सैतानाबरोबर अथांग डोहात टाकले जाईल, असा आपण तर्कशुद्ध निष्कर्ष काढू शकतो. (प्रकटीकरण २०:१-३) उत्पत्ति ३:१५ मध्ये सर्पाचे डोके फोडण्याविषयी भाकीत करण्यात आले होते; या डोके फोडण्यामध्ये ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीदरम्यान सैतानाला अथांग डोहात टाकणे समाविष्ट आहे. त्याच्या संततीत दुष्ट देवदूत किंवा दुरात्मे समाविष्ट आहेत. दुष्ट आत्म्यांनी अथांग डोहाविषयी अत्यंत भय दाखवले आहे यावरून हेच सूचित होते, की त्यांच्यावर येणाऱ्‍या बंदीची त्यांना जाणीव आहे. (लूक ८:३१)—११/१५, पृष्ठे ३०-१.

नशा चढली आहे हे लोकांच्या लक्षात येईल इतके न पिण्याची एखादी व्यक्‍ती काळजी घेत असली तरी, मद्ययुक्‍त पेये पिण्याबाबत तिने सावधगिरी का बाळगली पाहिजे?

काही व्यक्‍तींमध्ये, मद्याचे बरेच प्याले प्यायल्यानंतरही नशा चढली आहे हे अजिबात दिसून येत नाही. पण ही सवय हळूहळू, वाढत वाढत, त्या व्यक्‍तीचे मद्यावर अवलंबित्व निर्माण होऊ शकते आणि शेवटी ती “मद्यपानासक्‍त” बनते. (तीत २:३) येशूने असा इशारा दिला: “तुम्ही संभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी . . . ह्‍यांनी तुमची अंतःकरणे भारावून” जातील. (लूक २१:३४, ३५) एक व्यक्‍ती नशा चढेपर्यंत मद्य पीत नसली तरीसुद्धा शारीरिकरित्या, तसेच आध्यात्मिकरित्या तिला गुंगी व आळस येऊ शकतो.—१२/१, पृष्ठे १९-२१.