ख्रिस्त—भविष्यवाणींचा केंद्रबिंदू
ख्रिस्त—भविष्यवाणींचा केंद्रबिंदू
“येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म आहे.”—प्रकटीकरण १९:१०.
१, २. (क) सा.यु. २९ साली इस्राएल राष्ट्राला कोणता निर्णय घ्यायचा होता? (ख) या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?
सा.यु. २९ सालची गोष्ट आहे. इस्राएलात कोठेही पाहावे तर लोक प्रतिज्ञात मशीहाविषयी बोलताना दिसतात. बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाच्या प्रचार कार्यामुळे लोकांची उत्कंठा शिगेला पोचली आहे. (लूक ३:१५) पण योहानाने स्वतःला ख्रिस्त म्हणवून घेण्यास नकार दिला आहे. उलट नासरेथच्या येशूकडे संकेत करून तो म्हणतो, “मी स्वतः . . . साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.” (योहान १:२०, ३४) पाहता पाहता, लोकांचे लोंढेच्या लोंढे येशूने शिकवलेल्या गोष्टी ऐकण्यास व बरे होण्यास त्याच्या मागे जाऊ लागतात.
२ यानंतरच्या काही महिन्यांत यहोवा आपल्या पुत्राची ओळख पटवून देण्याकरता भरमसाट पुरावे देतो. शास्त्रवचनांचा अभ्यास करून ज्यांनी येशूची कार्ये पाहिली आहेत त्यांच्याजवळ त्याच्यावर विश्वास ठेवण्याकरता ठोस आधार आहे. पण देवाने ज्यांच्याशी करार केला होता त्या यहुदी लोकांपैकी बहुतेक जणांनी येशूवर विश्वास ठेवला नाही. फार कमी लोकांनी कबूल केले की येशू हा ख्रिस्त, देवाचा पुत्र आहे. (योहान ६:६०-६९) त्याकाळी तुम्ही असता तर तुम्ही काय केले असते? येशू मशीहा आहे हे स्वीकारून त्याचा विश्वासू अनुयायी बनण्यास तुम्ही प्रेरित झाला असता का? शब्बाथाचा भंग करण्याचा आरोप येशूवर लावला जातो तेव्हा तो स्वतःविषयी कोणता पुरावा देतो आणि यानंतरही दोनदा आपल्या एकनिष्ठ शिष्यांचा विश्वास बळकट करण्यासाठी तो कोणते पुरावे सादर करतो याविषयी चर्चा करू या.
येशू स्वतः पुरावा देतो
३.स्वतःसंबंधी पुरावा सादर करण्यास येशूला कोणत्या परिस्थितीने भाग पाडले?
३ सा. यु. ३१ सालच्या वल्हांडणाच्या वेळी घडलेली ही घटना आहे. येशू जेरूसलेममध्ये आहे. इतक्यातच त्याने, ३८ वर्षांपासून आजारी असलेल्या एका माणसाला बरे केले आहे. पण त्याने हा चमत्कार शब्बाथ दिवशी केल्यामुळे यहुदी त्याचा छळ करतात. ते त्याच्यावर देवाची निंदा करण्याचा आरोप लावतात आणि त्याने देवाला आपला योहान ५:१-९, १६-१८) याप्रसंगी येशू आपल्या बचावात जे बोलतो त्यात तो तीन जोरदार कारणांचा उल्लेख करतो. ही तीन कारणे कोणत्याही प्रामाणिक मनाच्या यहुद्याला येशूची खरी ओळख पटवून देण्यास पुरेशी होती.
पिता म्हटले म्हणून ते त्याला जिवे मारू पाहतात. (४, ५. योहानाच्या प्रचार कार्याचा काय उद्देश होता आणि त्याने तो कितपत साध्य केला?
४ सर्वप्रथम, येशू आपल्या आधी आलेल्या बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाच्या साक्षीचा उल्लेख करतो. तो म्हणतो: “तुम्ही योहानाकडे पाठवून विचारले व त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे. तो जळता व प्रकाश देणारा दिवा होता, आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष करावयास राजी झाला.”—योहान ५:३३, ३५.
५ बाप्तिस्मा देणारा योहान “जळता व प्रकाश देणारा दिवा” होता कारण हेरोदने त्याला अन्यायीपणे अटक करण्याआधी मशीहाचा मार्ग तयार करण्याची देवाने दिलेली जबाबदारी त्याने पार पाडली होती. योहान म्हणाला: “त्याने [मशीहाने] इस्राएलास प्रगट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे. . . . आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. मी तर त्याला ओळखीत नव्हतो; तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करावयास पाठविले त्याने मला सांगितले होते की, ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे. मी स्वतः पाहिले आहे व साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.” * (योहान १:२६-३७) योहानाने अगदी स्पष्टपणे येशूची ओळख देवाचा पुत्र, म्हणजेच प्रतिज्ञा केलेला मशीहा म्हणून करून दिली. योहानाची साक्ष इतकी स्पष्ट होती की त्याच्या मृत्यूच्या सुमारे आठ महिन्यांनंतर अनेक प्रांजळ यहुद्यांनी असे कबूल केले: “योहानाने ह्याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे.”—योहान १०:४१, ४२.
६.येशूच्या कार्यांवरून, त्याला देवाचा पाठिंबा आहे याविषयी लोकांची खात्री का पटायला हवी होती?
६ यानंतर येशू, मशीहा या नात्याने आपली ओळख पटवून देण्याकरता दुसरे कारण देतो. आपल्याला देवाचा पाठिंबा आहे हे आपल्या उत्तम कार्यावरून कशाप्रकारे दिसून येते याकडे तो लक्ष वेधतो. तो म्हणतो: “माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे; कारण जी कार्ये सिद्धीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपविले आहे, म्हणजे जी कार्ये मी करितो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठविले आहे.” (योहान ५:३६) हा पुरावा तर येशूचे शत्रू देखील खोटा ठरवू शकत नव्हते कारण त्याने कित्येक चमत्कार केले होते. नंतर काहींनी त्याच्या चमत्कारांच्या संदर्भात असे म्हटले: “आपण काय करीत आहो? कारण तो मनुष्य तर पुष्कळ चिन्हे करितो.” (योहान ११:४७) पण काहीजण चांगली प्रतिक्रिया दाखवतात, ते म्हणतात: “ख्रिस्त येईल तेव्हा तो ह्याने केलेल्या चिन्हांपेक्षा अधिक काय करणार आहे?” (योहान ७:३१) येशू ज्यांना उद्देशून बोलत होता, त्या लोकांजवळ देवाच्या पुत्रात त्याच्या पित्याचे गुण आहेत हे स्वतःहून पाहण्याची उत्तम संधी होती.—योहान १४:९.
७.इब्री शास्त्रवचने कशाप्रकारे येशूविषयी साक्ष देतात?
७ शेवटी येशू एका अशा कारणाचा उल्लेख करतो ज्याला कोणीही खोटे ठरवू शकत नाही. तो म्हणतो: ‘शास्त्रलेख माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत.’ पुढे तो म्हणतो: “तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता; तर माझ्यावर विश्वास ठेवला असता; कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे.” (योहान ५:३९, ४६) अर्थात मोशे हा, ख्रिस्ताविषयी लिहिणारा ख्रिस्तपूर्व काळातील एकटाच साक्षीदार नव्हता; अनेकांनी त्याच्याविषयी लिहिले होते. त्यांच्या लिखाणांत मशीहाकडे संकेत करणाऱ्या शेकडो भविष्यसूचक संदेशांचा व सविस्तर वंशावळींचा समावेश आहे. (लूक ३:२३-३८; २४:४४-४६; प्रेषितांची कृत्ये १०:४३) मोशेच्या नियमशास्त्राविषयी काय? प्रेषित पौलाने लिहिले: “नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहंचविणारे बालरक्षक होते.” (गलतीकर ३:२४) होय, “येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म [किंवा, संपूर्ण उद्देश, आशय] आहे.”—प्रकटीकरण १९:१०.
८.बऱ्याच यहुद्यांनी मशीहावर विश्वास का ठेवला नाही?
८ एवढा पुरावा, अर्थात, योहानाची सुस्पष्ट साक्ष, खुद्द येशूचे अद्भूत चमत्कार व ईश्वरी गुण तसेच शास्त्रवचनांतील असंख्य प्रमाण मिळाल्यावरही येशू हा मशीहा असल्याची तुम्हाला खात्री पटली नसती का? देवावर योहान ५:४२) “जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट” करण्याऐवजी ते “एकमेकांकडून प्रशंसा करून” घेत होते. साहजिकच, आपल्या पित्याप्रमाणेच अशाप्रकारच्या विचारसरणीची घृणा करणाऱ्या येशूचे विचार त्यांना पटत नव्हते!—योहान ५:४३, ४४; प्रेषितांची कृत्ये १२:२१-२३.
व त्याच्या वचनावर जिला मनापासून प्रेम आहे अशा कोणत्याही व्यक्तीला हे सहज ओळखता आले असते व तिने येशू हाच प्रतिज्ञात मशीहा आहे या गोष्टीवर विश्वास ठेवला असता. पण या प्रेमाचीच मुळात इस्राएली लोकांमध्ये उणीव होती. येशूने आपला विरोध करणाऱ्यांना म्हटले: “मी तुम्हाला ओळखले आहे की, तुमच्या ठायी देवाची प्रीति नाही.” (भविष्यसूचक दृष्टान्ताद्वारे पुष्टी
९, १०. (क) येशूने शिष्यांना चिन्ह दाखवणे समयोचित का होते? (ख) येशूने आपल्या शिष्यांना कोणत्या उल्लेखनीय गोष्टीविषयी शब्द दिला?
९ येशूने आपल्या मशीहा असण्याविषयी वर सांगितल्याप्रमाणे पुरावा सादर केला, त्या गोष्टीला आता एक वर्ष होऊन गेले आहे. सा.यु. ३२ सालचा वल्हांडण सण येऊन गेला आहे. येशूवर ज्यांचा विश्वास होता त्यांच्यापैकी अनेकांनी त्याचे अनुसरण करण्याचे सोडून दिले आहे; कोणी छळामुळे, कोणी भौतिकवादी मनोवृत्तीमुळे तर कोणी जीवनाच्या चिंतामुळे असे केले असावे. शिवाय, लोकांनी येशूला राजा बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने यास नकार दिल्यामुळे काहीजण कदाचित गोंधळून गेले असावेत. त्यांची निराशा झाली असावी. जेव्हा यहुदी धर्मपुढाऱ्यांनी येशूला स्वर्गातून एखादे चिन्ह दाखवण्याचे आव्हान केले तेव्हा त्याने आपले गौरव करण्यासाठी असे कोणतेही चिन्ह दाखवण्यास नकार दिला. (मत्तय १२:३८, ३९) यामुळेही काहीजण गोंधळात पडले असावेत. तसेच, अलीकडेच येशूने आपल्या शिष्यांना अशा काही गोष्टी सांगण्यास सुरुवात केली आहे, की ज्या समजून घेणे त्यांना फार जड जात आहे. आपण “यरुशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जिवे मारले जावे,” असे त्याने त्यांना सांगितले आहे.”—मत्तय १६:२१-२३.
१० आणखी नऊ ते दहा महिन्यांनंतर येशूने “ह्या जगातून पित्याकडे जाण्याची” वेळ आलेली असेल. (योहान १३:१) आपल्या एकनिष्ठ शिष्यांबद्दल येशूला मनापासून काळजी वाटते. म्हणूनच, त्याने विश्वासहीन यहुद्यांना जी गोष्ट देण्यास नकार दिला होता, ती गोष्ट अर्थात स्वर्गातून एक चिन्ह देण्याचा तो त्यांच्यापैकी काहींना शब्द देतो. येशू म्हणतो, “मी तुम्हास खचित सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.” (मत्तय १६:२८) अर्थातच, १९१४ साली मशीहाच्या राज्याची स्थापना होईपर्यंत आपल्या शिष्यांपैकी काहीजण जिवंत राहतील असे तो येथे सुचवत नव्हता. तर आपल्या सर्वात जवळच्या तीन शिष्यांना राज्य शासनातील आपल्या गौरवाची अद्भूत पूर्वझलक दाखवण्याचे त्याच्या मनात होते. या दृष्टान्तालाच रूपांतरण म्हणण्यात आले आहे.
११. रूपांतरण दृष्टान्ताचे वर्णन करा.
११ सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व योहान यांना एका उंच डोंगरावर नेले. कदाचित हे हर्मोन पर्वतावरील एक शिखर असावे. तेथे “त्याचे रूप त्यांच्यादेखत पालटले; त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली.” मोशे व एलीया संदेष्टे देखील शिष्यांना येशूसोबत बोलताना दिसले. ही मत्तय १७:१-६.
चमत्कारिक घटना रात्रीच्या वेळी घडली असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ती अधिकच सजीव वाटली असेल. पेत्राने तर येशू, मोशे व एलीया या तिघांसाठी तीन तंबू बांधण्याचेही सुचवले, इतकी ती घटना जिवंत वाटली. पण पेत्राचे बोलणे संपते न संपते तोच एका तेजस्वी मेघाने त्यांच्यावर सावली केली आणि त्या मेघातून त्यांना अशी वाणी ऐकू आली: “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याविषयी मी संतुष्ट आहे; ह्याचे तुम्ही ऐका.”—१२, १३. रूपांतरण दृष्टान्ताचा येशूच्या शिष्यांवर कसा परिणाम झाला व का?
१२ अलीकडेच पेत्राने येशूविषयी, तो ‘ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र’ असल्याची साक्ष दिली होती. (मत्तय १६:१६) पण स्वतः देवाला आपल्या अभिषिक्त पुत्राविषयी, तो कोण आहे व त्याची काय भूमिका आहे याविषयी साक्ष देताना शिष्यांनी ऐकले तेव्हा ते किती रोमांचित झाले असतील याची कल्पना करा! रूपांतरण दृष्टान्ताच्या अनुभवाने पेत्र, याकोब व योहान यांचा विश्वास अतिशय मजबूत झाला आहे! या मजबूत विश्वासाच्या साहाय्याने आता ते भविष्यात त्यांच्याकरता जे काही राखून ठेवले आहे त्यास तोंड देण्याकरता व भावी खिस्ती मंडळीत जी महत्त्वाची भूमिका ते बजावणार आहेत त्याकरता सुसज्ज आहेत.
१३ रूपांतरणाच्या दृष्टान्ताची शिष्यांच्या मनावर अमिट छाप पडते. जवळजवळ ३० वर्षांपेक्षा जास्त काळ उलटल्यानंतर पेत्र असे लिहितो: “[येशूला] देवपित्यापासून सन्मान व गौरव मिळाले; तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की, ‘हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.’ त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली.” (२ पेत्र १:१७, १८) योहानावरही या घटनेचा विलक्षण प्रभाव पडला. ६० वर्षांपेक्षा जास्त काळानंतर कदाचित याच दृष्टान्ताच्या संदर्भात तो असे लिहितो: “आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे . . . होते.” (योहान १:१४) पण रूपांतरणाचा दृष्टान्त हा येशूने आपल्या अनुयायांना दिलेला शेवटला दृष्टान्त नव्हता.
देवाच्या एकनिष्ठ जनांकरता आणखी ज्ञानाचा प्रकाश
१४, १५. प्रेषित योहान कोणत्या अर्थाने येशू येईपर्यंत राहणार होता?
१४ आपल्या पुनरुत्थानानंतर येशू गालील समुद्राकाठी शिष्यांसमोर प्रकट होतो. तेथे तो पेत्राला सांगतो: “मी येईपर्यंत त्याने [योहानाने] राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय?” (योहान २१:१, २०-२२, २४) प्रेषित योहान इतर प्रेषितांपेक्षा जास्त काळ जगेल असे या शब्दांवरून सूचित होते का? अशी शक्यता नाकारता येत नाही, कारण तो यानंतर आणखी जवळजवळ ७० वर्षे यहोवाची विश्वासूपणे सेवा करतो. पण येशूच्या बोलण्याचा अर्थ केवळ इतकाच नव्हता.
१५ “मी येईपर्यंत” हे शब्द आपल्याला ‘मनुष्याचा पुत्र त्याच्या राज्यात येण्याविषयी’ येशूने जे सांगितले होते त्याची आठवण करून देतात. (मत्तय १६:२८) येशू येईपर्यंत योहान राहतो, तो या अर्थाने की कालांतराने त्याला, राज्य शासन मिळालेल्या येशूच्या आगमनाचा एक भविष्यसूचक दृष्टान्त दिला जातो. योहानाच्या जीवनाच्या शेवटल्या काळात, पात्म बेटावर हद्दपारीत असताना त्याला प्रकटीकरण व ‘प्रभूच्या दिवसादरम्यान’ घडणार असलेल्या घटनांची अद्भूत भविष्यसूचक चिन्हे दिली जातात. या चमत्कारिक दृष्टान्तांमुळे योहान इतका भारावून जातो की “होय; मी लवकर येतो,” असे येशू म्हणतो तेव्हा योहान उद्गारतो: “आमेन! ये, प्रभू येशू ये.”—प्रकटीकरण १:१, १०; २२:२०.
१६. आपण सतत आपल्या विश्वासास मजबूत करत राहावे हे महत्त्वाचे का आहे?
१६ पहिल्या शतकात राहणाऱ्या प्रांजळ व्यक्तींनी येशू मशीहा आहे हे स्वीकारून त्याच्यावर विश्वास ठेवला. पण त्यांच्या सभोवती असलेले अविश्वासी लोक, त्यांच्यावर
सोपवलेले कार्य आणि त्यांच्यासमोर असलेल्या परीक्षा, हे सर्व लक्षात घेतल्यास या विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींचा विश्वास मजबूत केला जाण्याची त्याकाळी अतिशय गरज होती. येशूने आपल्या मशीहा असण्याविषयी भरपूर पुरावा दिला; तसेच आपल्या एकनिष्ठ अनुयायांना प्रोत्साहन देण्याकरता त्याने भविष्यसूचक दृष्टान्तांद्वारे त्यांना ज्ञानाचा प्रकाश पुरवला. आज आपण ‘प्रभूच्या दिवसात’ बऱ्याच दूरपर्यंत येऊन पोचलो आहोत. लवकरच ख्रिस्त, सैतानाच्या सबंध दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करून देवाच्या लोकांची सुटका करेल. आपणही, आपल्या आध्यात्मिक आरोग्याकरता यहोवाने पुरवलेल्या सर्व तरतुदींचा पुरेपूर फायदा घेऊन आपला विश्वास बळकट केला पाहिजे.अंधकार व क्लेशातून बचाव
१७, १८. पहिल्या शतकात येशूचे अनुयायी व ज्यांनी देवाच्या उद्देशाचा विरोध केला त्यांच्या परिस्थितीत कोणता फरक होता आणि या प्रत्येक गटाला कशाप्रकारच्या भविष्याला तोंड द्यावे लागले?
१७ येशूच्या मृत्यूनंतर शिष्य त्याच्याविषयी साक्ष देण्याची त्याची आज्ञा मोठ्या धैर्याने पाळतात; “यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत” ते येशूविषयी साक्ष देतात. (प्रेषितांची कृत्ये १:८) वेळोवेळी त्यांच्याविरुद्ध छळाची लाट उसळते, तरीसुद्धा, यहोवा या नवोदित ख्रिस्ती मंडळीला आध्यात्मिक ज्ञानाच्या व अनेक नव्या शिष्यांच्या रूपात आशीर्वाद देतो.—प्रेषितांची कृत्ये २:४७; ४:१-३१; ८:१-८.
१८ दुसरीकडे पाहता, जे सुवार्तेचा विरोध करतात त्यांची स्थिती दिवसेंदिवस अंधकारमय होते. नीतिसूत्रे ४:१९ म्हणते, “दुर्जनांचा मार्ग अंधकारासारखा आहे. त्याला कशाची ठेच लागते हे त्यांस कळत नाही.” सा.यु. ६६ साली रोमी सैन्य जेरूसलेमला वेढा घालतात तेव्हा हा ‘अंधकार’ अधिकच वाढतो. काही कारण नसताना, रोमी सैन्य तात्पुरती माघार घेतात व पुन्हा सा.यु. ७० साली परततात; यावेळी ते शहराचा संपूर्ण नाश करतात. जोसीफस या यहुदी इतिहासकारानुसार, दहा लाख पेक्षा जास्त यहुद्यांना ठार मारले जाते. पण विश्वासू ख्रिस्ती बचावतात. का? कारण रोमी सैन्य तात्पुरती माघार घेतात तेव्हा येशूच्या आज्ञेनुसार ते पळ काढतात.—लूक २१:२०-२२.
१९, २०. (क) सध्याच्या व्यवस्थीकरणाचा अंत जवळ येत असता, देवाच्या लोकांना भयभीत होण्याचे कारण का नाही? (ख) १९१४ पर्यंतच्या दशकांत यहोवाने आपल्या लोकांना कोणते उल्लेखनीय ज्ञान प्रकट केले?
१९ आपली परिस्थिती आज तशीच आहे. येऊ घातलेले मोठे संकट सैतानाच्या सबंध दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करेल. पण देवाच्या लोकांनी भयभीत होण्याचे कारण नाही कारण येशूने वचन दिले आहे: “पाहा! युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्तय २८:२०) आपल्या सुरुवातीच्या शिष्यांच्या विश्वासाला पुष्टी देण्याकरता आणि येणाऱ्या भविष्याकरता त्यांच्या मनाची तयारी करण्याकरता येशूने त्यांना मशीही राजा म्हणून त्याला मिळणार असलेल्या स्वर्गीय गौरवाची पूर्वझलक दाखवली. आजच्या काळाविषयी काय? १९१४ साली ती पूर्वझलक एक वस्तुस्थिती बनली. या वस्तुस्थितीने देवाच्या लोकांच्या विश्वासाला किती मोठ्या प्रमाणात पुष्टी दिली आहे! यहोवाच्या लोकांना एका अद्भूत भविष्याची प्रतिज्ञा व त्या वस्तूस्थितीविषयी उत्तरोत्तर ज्ञानाचा प्रकाश मिळाला आहे. आजच्या अंधकारमय जगात “धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा आहे.”—नीतिसूत्रे ४:१८.
२० एकोणीसशे चौदाच्या आधीपासूनच, अभिषिक्त ख्रिश्चनांच्या एका लहानशा गटाला प्रभूच्या परतण्याविषयी महत्त्वाच्या सत्यांचे आकलन होऊ लागले होते. उदाहरणार्थ, येशूचे परत येणे अदृश्य असेल हे त्यांनी ओळखले; येशूच्या स्वर्गारोहणाच्या वेळी शिष्यांना सा.यु. ३३ साली दिसलेल्या दोन देवदूतांनी हे सुचवले होते. येशू वर जात प्रेषितांची कृत्ये १:९-११.
असताना मेघाने त्याला शिष्यांच्या दृष्टिआड केल्यानंतर देवदूतांनी म्हटले: “हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच, तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले, तसाच येईल.”—२१. पुढील लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?
२१ येशूचे परत जाणे केवळ त्याच्या एकनिष्ठ अनुयायांनी पाहिले. रूपांतरणाच्या दृष्टान्ताप्रमाणेच याची जाहिरात करण्यात आली नाही; सर्वसामान्य जगाला काही विशेष घडल्याचा गंधही नव्हता. राज्य शासन हाती घेऊन ख्रिस्त परतेल तेव्हाही असेच घडणार होते. (योहान १४:१९) केवळ त्याच्या विश्वासू अभिषिक्त शिष्यांना त्याची शाही उपस्थिती ओळखता येणार होती. पुढील लेखात आपण पाहणार आहोत की येशूच्या उपस्थितीविषयीच्या ज्ञानामुळे त्यांच्यावर किती उल्लेखनीय प्रभाव पडला; व यामुळे कशाप्रकारे येशूच्या राज्याच्या पृथ्वीवर प्रजेतील लाखो सदस्यांना एकत्र आणण्यात आले.—प्रकटीकरण ७:९, १४.
[तळटीप]
^ परि. 5 येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी केवळ योहानानेच देवाचा आवाज ऐकला. येशू ज्यांना उद्देशून बोलत होता त्या यहुद्यांविषयी त्याने असे म्हटले, की त्यांनी “[देवाची] वाणी कधीही ऐकली नाही व त्याचे स्वरूपहि पाहिले नाही.”—योहान ५:३७.
तुम्हाला आठवते का?
• शब्बाथाचा नियम भंग करण्याचा व देवाची निंदा करण्याचा येशूवर आरोप लावण्यात आला तेव्हा त्याने आपण मशीहा असल्याचा कोणता पुरावा सादर केला?
• येशूच्या सुरुवातीच्या शिष्यांना रूपांतरणाच्या दृष्टान्तामुळे कशाप्रकारे फायदा झाला?
• आपण येईपर्यंत योहान राहील असे येशूने कोणत्या अर्थाने म्हटले?
• कोणती पूर्वझलक १९१४ साली एक वस्तूस्थिती बनली?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१० पानांवरील चित्रे]
आपण मशीहा असल्याचा येशूने पुरावा दिला
[१२ पानांवरील चित्र]
रूपांतरणाचा दृष्टान्त विश्वासाला पुष्टी देणारा होता
[१३ पानांवरील चित्र]
योहान येशू ‘येईपर्यंत’ राहणार होता