‘सहनशील असावे’
‘सहनशील असावे’
‘प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकविण्यात निपुण, सहनशील असावे.’—२ तीमथ्य २:२४.
१. ख्रिस्ती सेवाकार्य करताना, कधीकधी कठोरपणे बोलणारे लोक भेटण्याची शक्यता का नाकारता येत नाही?
तुम्हाला जेव्हा असे लोक भेटतात की जे तुमच्याशी नीट बोलण्यास किंवा तुमचे ऐकून घेण्यासही तयार नसतात, तेव्हा तुम्ही काय करता? शेवटल्या काळाचे वर्णन करताना प्रेषित पौलाने असे भाकीत केले की लोक “निंदक, . . . चहाडखोर, असंयमी, क्रूर,” असतील. (२ तीमथ्य ३:१-५, १२) तुम्हाला सेवाकार्यात भाग घेताना किंवा इतर ठिकाणी असे लोक भेटू शकतात.
२. लोक कठोरपणे बोलतात तेव्हा त्यांच्याशी सूज्ञतेने वागण्याकरता कोणती शास्त्रवचने आपल्याला साहाय्य करू शकतात?
२ पण कठोर शब्दांत बोलणारी प्रत्येक व्यक्ती, चांगल्या गोष्टींबद्दल अजिबातच स्वारस्य बाळगत नाही असे म्हणता येणार नाही. कधीकधी, जीवनातल्या कठीण समस्या व विफलता यांमुळे त्रस्त झालेले लोक, जो समोर दिसेल त्याच्यावर आपला राग काढतात. (उपदेशक ७:७) बरेचजण ज्या वातावरणात राहतात किंवा काम करतात तेथे अशा कठोर भाषेत बोलणे अगदी सर्वसामान्य असते, त्यामुळे त्यांनाही तशाचप्रकारे बोलण्याची सवय झालेली असते. अर्थात या कारणांमुळे ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने, अशाप्रकारचे भाषण चालण्यासारखे आहे असे आपण समजत नाहीत, पण इतरजण असे का वागतात हे समजून घ्यायला मात्र आपल्याला नक्कीच मदत मिळते. मग लोक असे कठोरपणे बोलतात तेव्हा आपण काय करावे? नीतिसूत्रे १९:११ म्हणते: “विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो.” आणि रोमकर १२:१७, १८ आपल्याला असा सल्ला देते: “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. . . . शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.”
३. आपण जो संदेश घोषित करतो त्याच्याशी शांतिप्रिय असण्याचा काय संबंध आहे?
३ जर आपण खरोखर शांतिप्रिय असू, तर हे आपल्या मनोवृत्तीवरून दिसून येईल. आपण ज्याप्रकारे बोलतो, वागतो त्यावरून आणि कदाचित आपल्या चेहऱ्याच्या हावभावांवरून व आपल्या आवाजावरूनही हे प्रकट होईल. (नीतिसूत्रे १७:२७) येशूने आपल्या प्रेषितांना प्रचाराकरता पाठवले तेव्हा त्याने त्यांना असा सल्ला दिला: “घरात जाताना, तुम्हाला शांति असो, असे म्हणा; ते घर योग्य असले तर तुमची शांति त्याला प्राप्त होवो; ते योग्य नसले तर तुमची शांति तुम्हाकडे परत येवो.” (मत्तय १०:१२, १३) आपण जो संदेश लोकांना सांगतो ती एक चांगली बातमी आहे. बायबलमध्ये तिला ‘शांतीची सुवार्ता,’ “देवाच्या कृपेची सुवार्ता,” व ‘राज्याची सुवार्ता’ म्हटले आहे. (इफिसकर ६:१५; प्रेषितांची कृत्ये २०:२४; मत्तय २४:१४) आपला उद्देश लोकांच्या विश्वासांची टीका करण्याचा किंवा त्यांच्या मतांविषयी त्यांच्याशी वाद घालण्याचा नसून देवाच्या वचनातून त्यांना सुवार्ता सांगण्याचा आहे.
४. आपल्याला काही बोलण्याची संधी देण्याआधीच, “मला हे एकण्याची इच्छा नाही” असे घरमालकाने म्हटल्यास आपण काय म्हणू शकतो?
४ एखादा घरमालक आपले ऐकून घेण्याआधीच, “मला हे ऐकण्याची इच्छा नाही” असे म्हणेल. बहुतेक ठिकाणी, घरमालकाने असे म्हटल्यास आपण कदाचित असे म्हणू शकतो, “मला फक्त बायबलमधून हे एक लहानसे वचन तुम्हाला वाचून दाखवायचे होते.” कदाचित याला तो नाही म्हणणार नाही. किंवा कदाचित असे म्हणता येईल: “मला अशा एका काळाबद्दल तुम्हाला सांगायचे होते, जेव्हा कोणत्याही प्रकारचा अन्याय या जगात राहणार नाही आणि सर्व लोक एकमेकांसोबत प्रेमाने नांदतील.” असे म्हटल्यावर जर घरमालकाने लगेच अधिक जाणून घेण्याची इच्छा दाखवली नाही, तर आपण असे म्हणू शकतो: “पण मला वाटतं मी चुकीच्या वेळी आलोय.” घरमालकाचे उत्तर मैत्रीपूर्ण नसले तरीसुद्धा, तो सुवार्ता ऐकण्यास ‘योग्य नाही’ असा निष्कर्ष आपण काढावा का? घरमालकाची प्रतिक्रिया कशीही असो, पण बायबलमधील हा सल्ला आठवणीत असू द्या, ‘प्रभूच्या दासाने सर्वांबरोबर सौम्य, सहनशील असावे.’—२ तीमथ्य २:२४.
जुलमी पण दिशाभूल झालेला
५, ६. शौल येशूच्या अनुयायांशी कशाप्रकारे वागला आणि तो असे का वागत होता?
५ पहिल्या शतकात, शौल नावाचा एक माणूस अतिशय अपमानजनक रितीने बोलणारा व हिंसक म्हणून विख्यात होता. बायबल सांगते की तो “प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्याविषयींचे फूत्कार टाकीत होता.” (प्रेषितांची कृत्ये ९:१, २) नंतर त्याने स्वतः कबूल केले की आपण “पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो.” (१ तीमथ्य १:१३) कदाचित शौलाचे काही नातलग आधीच ख्रिस्ती बनले असतील, पण ख्रिस्ताच्या अनुयायांबद्दल आपल्या मनोवृत्तीविषयी तो असे सांगतो: “त्यांच्यावर अतिशय पिसाळून जाऊन बाहेरच्या नगरापर्यंत देखील मी त्यांचा पाठलाग करीत असे.” (प्रेषितांची कृत्ये २३:१६; २६:११; रोमकर १६:७, ११) पण शौल अशाप्रकारे वागत असताना, ख्रिस्ताच्या शिष्यांनी त्याच्याशी चारचौघांत कधी वाद घालण्याचा प्रयत्न केल्याचा कोठेही उल्लेख नाही.
६ शौल असे का वागत होता? कित्येक वर्षांनी त्याने स्वतः लिहिले: “मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले.” (१ तीमथ्य १:१३) तो एक परुशी होता, त्याला “वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले” होते. (प्रेषितांची कृत्ये २२:३) शौलाचा शिक्षक गमलिएल हा त्यामानाने काहीसा मोठ्या मनाचा असला तरीसुद्धा महायाजक कैफा, ज्याच्यासोबत पौलाचे उठणेबसणे होते, तो मात्र धर्मवेडा होता. कैफा हा येशू ख्रिस्ताचा वध करण्याच्या कारस्थानात जणू नायक होता. (मत्तय २६:३, ४, ६३-६६; प्रेषितांची कृत्ये ५:३४-३९) त्यानंतर कैफाने येशूच्या प्रेषितांनाही मारहाण करवली आणि येशूच्या नावाने प्रचार करू नका असे त्यांना निक्षून सांगितले. स्तेफनाला दगडमार करण्याकरता नेण्याआधी सन्हेद्रिनात भरवण्यात आलेल्या त्या अतिशय तणावपूर्ण सभेचा कैफा स्वतः अध्यक्ष होता. (प्रेषितांची कृत्ये ५:२७, २८, ४०; ७:१-६०) स्तेफनाला दगडमार होताना शौल तेथेच उभे राहून पाहात होता आणि कैफाने त्याला दमिष्कात जाऊन येशूच्या अनुयायांना अटक करून त्यांचे कार्य निष्फळ करण्याकरता नेमले होते. (प्रेषितांची कृत्ये ८:१; ९:१, २) साहजिकच, शौलाचा असा ग्रह होता की आपण देवाकरता आवेश असल्यामुळे असे वागत आहोत, पण मुळात त्याच्याजवळ खरा विश्वास नव्हता. (प्रेषितांची कृत्ये २२:३-५) त्यामुळे येशू हाच खरा मशीहा आहे हे शौल समजून घेऊ शकला नाही. पण दमिष्काच्या वाटेवर जेव्हा पुनरुत्थित येशू चमत्कारिकरित्या शौलाशी बोलला तेव्हा त्याचे डोळे उघडले.—प्रेषितांची कृत्ये ९:३-६.
७. दमिष्काच्या वाटेवर येशूचा चमत्कारिक दृष्टान्त झाल्यावर शौलाला काय झाले?
७ यानंतर थोड्याच काळानंतर, हनन्या नावाच्या एका शिष्यास शौलाला साक्ष देण्याकरता पाठवण्यात आले. तुम्हाला अशा व्यक्तीकडे प्रचार करायला पाठवले असते, तर तुम्ही जाण्यास उत्सुक असता का? हनन्याच्या मनातही थोडी भीती होती, पण तो शौलाशी अतिशय प्रेमळपणे बोलला. दमिष्काच्या वाटेवर झालेल्या येशूच्या चमत्कारिक दृष्टान्तानंतर शौलाची मनोवृत्ती बदलली होती. (प्रेषितांची कृत्ये ९:१०-२२) कालांतराने त्याला प्रेषित पौल, एक अतिशय आवेशी ख्रिस्ती प्रचारक म्हणून ओळखले जाऊ लागले.
सौम्य पण निर्भय
८. वाईट कृत्ये केलेल्या लोकांबद्दल येशूने आपल्या पित्याची मनोवृत्ती कशाप्रकारे दाखवली?
८ येशू हा देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा आवेशी प्रचारक होता. तो लोकांशी व्यवहार करताना सौम्य पण त्याच वेळी निर्भयी होता. (मत्तय ११:२९) दुष्टाला आपल्या वाईट मार्गातून मागे फिरण्याचा आग्रह करणाऱ्या त्याच्या स्वर्गीय पित्याच्या मनोवृत्तीचे प्रतिबिंब येशूच्या वागणुकीत होते. (यशया ५५:६, ७) पापी जनांशी व्यवहार करताना, त्यांच्या वागणुकीत सुधारणेचे जराही चिन्ह दिसल्यास येशू त्याची दखल घेत असे, आणि अशा व्यक्तींना तो प्रोत्साहन देत असे. (लूक ७:३७-५०; १९:२-१०) इतरांच्या बाह्य स्वरूपावरून त्यांच्याविषयी काही निष्कर्ष काढण्याऐवजी येशूने त्याच्या पित्याच्या दयाळूपणाचे, सोशीकतेचे व सहनशीलतेचे अनुकरण केले व त्यांना पश्चात्ताप करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. (रोमकर २:४) सर्व प्रकारच्या लोकांनी पश्चात्ताप करावा व त्यांचे तारण व्हावे अशी यहोवाची इच्छा आहे.—१ तीमथ्य २:३, ४.
९. यशया ४२:१-४ ही वचने येशूच्या बाबतीत ज्याप्रकारे पूर्ण झाली त्यावरून आपण काय शिकू शकतो?
९ येशू ख्रिस्ताबद्दल यहोवाचा कसा दृष्टिकोन आहे हे शुभवर्तमान लेखक मत्तय याने उद्धृत केलेल्या या भविष्यसूचक शब्दांवरून दिसून येते: “पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडिले आहे; तो मला परमप्रिय आहे; त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; त्याच्यावर मी आपला आत्मा मत्तय १२:१७-२१; यशया ४२:१-४) येशूची वागणूक या भविष्यसूचक शब्दांशी सुसंगत होती; त्याने कधीही मोठमोठ्याने वाद घातले नाहीत. तणावाखाली असतानाही तो सत्याविषयी अशाचप्रकारे बोलला की जेणेकरून प्रामाणिक मनाच्या लोकांनी त्याकडे आकृष्ट व्हावे.—योहान ७:३२, ४०, ४५, ४६.
घालीन, तो परराष्ट्रीयांना न्याय कळवील. तो भांडणार नाही व ओरडणार नाही, व रस्त्यावर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही. चेपलेला बोरू तो मोडणार नाही, व मिणमिणती वात तो विझविणार नाही; तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल, आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील.” (१०, ११. (क) परुशी उघडपणे येशूला आपला विरोध व्यक्त करायचे तरीसुद्धा त्याने त्यांच्यापैकी काहींना साक्ष का दिली? (ख) येशू आपला विरोध करणाऱ्यांना कधीकधी कशाप्रकारे उत्तर देत असे, पण त्याने काय केले नाही?
१० आपल्या सेवाकार्यादरम्यान येशू अनेक परूशांशी बोलला. अनेकांनी त्याला शब्दांत पडण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा, त्या सर्वांच्याच मनातले हेतू वाईट आहेत असा येशूने निष्कर्ष काढला नाही. शिमोन नावाच्या एका परुशाची काहीशी टीका करण्याची वृत्ती होती. येशूचे जरा जवळून निरीक्षण करावे, या उद्देशाने त्याने येशूला आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले. येशूने त्याचे आमंत्रण स्वीकारले आणि त्याप्रसंगी उपस्थित असलेल्या लोकांना त्याने साक्ष दिली. (लूक ७:३६-५०) दुसऱ्या एका प्रसंगी, मोठ्या पदावर असलेला निकदेम नावाचा एक परुशी रात्रीच्या अंधारात येशूला भेटण्यास आला. येशूने त्याला दिवसा सर्वांच्या देखत न येता रात्री येण्याबद्दल खडसावले नाही. उलट, विश्वास धरणाऱ्यांना तारण मिळावे म्हणून देवाने आपला पुत्र पाठवण्याद्वारे जे प्रेम दाखवले आहे त्याविषयी येशूने निकदेमाला साक्ष दिली. तसेच देवाच्या व्यवस्थेला अधीन होण्याचे महत्त्व देखील येशूने प्रेमळपणे निकदेमाच्या लक्षात आणून दिले. (योहान ३:१-२१) नंतर जेव्हा येशूबद्दलचे चांगले वृत्त ऐकून इतर परुशांनी त्याची निंदा केली तेव्हा निकदेमाने निर्भयपणे येशूचे समर्थन केले.—योहान ७:४६-५१.
११ आपल्याला पाशात पाडू इच्छिणाऱ्यांची ढोंगी वृत्ती येशूपासून लपलेली नव्हती. विरोधकांनी प्रयत्न केला तरीसुद्धा, त्याने वायफळ वादविवादात पडण्याची चूक केली नाही. योग्य संधी मिळाल्यावर मात्र, तो एखादे तत्त्व, दृष्टान्त किंवा एखादे शास्त्रवचन सांगून त्यांना थोडक्यातच पण प्रभावीपणे उत्तर देत असे. (मत्तय १२:३८-४२; १५:१-९; १६:१-४) कधीकधी, उत्तर देऊनही काही फायदा नाही हे उघड असल्यास, येशू काहीच उत्तर देत नसे.—मार्क १५:२-५; लूक २२:६७-७०.
१२. लोकांनी आरडाओरडा केला तरीसुद्धा येशूने कशाप्रकारे त्यांना मदत केली?
१२ प्रसंगी, दुरात्म्यांच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्ती येशूवर आरडाओरडा करत. अशा प्रसंगी त्याने स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवला आणि देवाने त्याला दिलेल्या शक्तीच्या साहाय्याने पीडित व्यक्तींना मुक्तही केले. (मार्क १:२३-२८; ५:२-८, १५) आपण सेवाकार्य करत असताना, जर लोक चिडले किंवा आरडाओरडा करू लागले तर आपणही येशूसारखाच आपल्या भावनांवर ताबा ठेवून, परिस्थितीला विनम्रपणे व विचारशीलपणे हाताळले पाहिजे.—कलस्सैकर ४:६.
कुटुंबात
१३. काहीजण कधीकधी यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करणाऱ्या कौटुंबिक सदस्याला विरोध का करतात?
१३ येशूच्या अनुयायांनी सहनशील असण्याची गरज कधीकधी कौटुंबिक वर्तुळात प्रकर्षाने जाणवते. बायबलमधील सत्याने जो मनापासून प्रभावित झाला आहे, अशा व्यक्तीला साहजिकच असे वाटते, की माझ्या कुटुंबियांनीही बायबलमधील सत्याचा स्वीकार करावा. पण येशूने सांगितल्याप्रमाणे कदाचित कौटुंबिक सदस्य विरोध करत असतील. (मत्तय १०:३२-३७; योहान १५:२०, २१) यामागे अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, बायबलमधील शिक्षण आपल्याला प्रामाणिक, जबाबदार व आदरशील व्यक्ती बनवते हे खरे असले तरीही, शास्त्रवचनांत आपल्याला असेही शिकवले जाते की कोणत्याही परिस्थितीत आपण मानवापेक्षा आपल्या निर्माणकर्त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. (उपदेशक १२:१, १३; प्रेषितांची कृत्ये ५:२९) आपण यहोवाशी एकनिष्ठ असल्यामुळे कदाचित आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला असे वाटू शकते की त्याचा अधिकार कमी लेखला जात आहे व तो याबद्दल मनात राग बाळगू शकतो. अशा परिस्थितीला तोंड देताना, येशूच्या सहनशीलतेचे अनुकरण करणे विशेषकरून महत्त्वाचे आहे!—१ पेत्र २:२१-२३; ३:१, २.
१४-१६. आपल्या कुटुंबातील सदस्यांचा पूर्वी विरोध करणाऱ्या काहींच्या वागणुकीत कशामुळे बदल घडून आला?
१४ यहोवाची सेवा करत असलेल्यांपैकी बऱ्याचजणांनी जेव्हा बायबलचा अभ्यास सुरू केला व आपल्या जीवनात १ पेत्र २:१२.
बदल करण्यास सुरूवात केली, तेव्हा त्यांच्या विवाह सोबत्याकडून किंवा दुसऱ्या कुटुंबियाकडून त्यांना विरोध सहन करावा लागला. या विरोध करणाऱ्यांनी कदाचित यहोवाच्या साक्षीदारांबद्दल इतरांकडून प्रतिकूल अभिप्राय ऐकले असतील आणि कुटुंबातल्या एका सदस्याने यहोवाच्या साक्षीदारांशी संबंध ठेवल्यास, कुटुंबावर याचा वाईट परिणाम होईल अशी त्यांना भीती वाटत असेल. मग त्यांच्या मनोवृत्तीत बदल कशामुळे घडून आला? बऱ्याच उदाहरणांवरून दिसून येते की बायबलचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीची चांगली वागणूक पाहिल्यामुळे असे घडले. सत्यात असलेली ही व्यक्ती ख्रिस्ती सभांना नेमाने उपस्थित राहण्याद्वारे, कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष न करता ख्रिस्ती सेवाकार्यात सहभाग घेण्याद्वारे आणि अपमान करण्यात आला तेव्हासुद्धा सहनशीलतेने वागण्याद्वारे—बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्याचे पालन करत राहिली व यामुळे काही उदाहरणांत, कुटुंबाकडून होणारा विरोध हळूहळू कमी झाला.—१५ विरोध करणाऱ्या व्यक्तीने कदाचित पूर्वधारणा किंवा गर्व यामुळेही बायबलमधील स्पष्टीकरण ऐकून घेण्यास पूर्वी नकार दिला असावा. संयुक्त संस्थानांतील एका माणसाच्या बाबतीत असेच घडले. तो सांगतो की एकेकाळी त्याला आपल्या देशाविषयी खूप अभिमान होता. एकदा त्याची पत्नी अधिवेशनाला गेली असताना तो स्वतःचे सामान घेऊन घर सोडून निघून गेला. दुसऱ्या प्रसंगी, त्याने घरातून पिस्तुल नेली व मी आत्महत्या करेन अशी धमकी दिली. त्याच्या अशा विचित्र वागणुकीबद्दल तो तिच्या धर्माला दोष देत असे. पण ती प्रयत्नपूर्वक बायबलच्या सल्ल्याचे पालन करत राहिली. ती यहोवाची साक्षीदार बनल्यानंतर तब्बल वीस वर्षांनी तो देखील यहोवाचा साक्षीदार बनला! अल्बेनिया येथे एका मुलीने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करून बाप्तिस्मा घेतला तेव्हा तिची आई खूप चिडली. १२ वेळा या आईने आपल्या मुलीचे बायबल नष्ट केले. एके दिवशी तिच्या मुलीने टेबलावर ठेवलेले नवे कोरे बायबल तिने उचलले, तेव्हा ते नेमके मत्तय १०:३६ हे वचन असलेल्या पानावर उघडले. हे वचन वाचल्यावर यातील शब्द आपल्याबद्दलच आहेत अशी या आईला जाणीव झाली. तिची मुलगी इटलीला एका अधिवेशनाकरता इतर साक्षीदारांसोबत जाणार होती तेव्हा, आपल्या मुलीबद्दल काळजी वाटत असल्यामुळे ती बोटीपर्यंत तिला सोडायला आली. बंधूभगिनींचे आपसांतले प्रेम, त्यांचे एकमेकांना बिलगणे, एकमेकांशी हसतखेळत वागणे तिने पाहिले तेव्हा तिचे मन हळूहळू बदलू लागले. या घटनेच्या काही काळानंतरच तिने बायबलचा अभ्यास करण्याची तयारी दर्शवली. आज ती अशा इतरजणांना मदत करते की जे सुरूवातीला विरोध करतात.
१६ आणखी एक उदाहरण, एका पतीचे आहे. त्याची पत्नी राज्य सभागृहाकडे जात असताना तो हातात चाकू घेऊन, तिला शिव्याशाप देत आला व त्याने तिला अडवले. तिने शांतपणे त्याला म्हटले, “असं करा, तुम्ही राज्य सभागृहात येऊन स्वतःच पाहा.” तो खरच राज्यसभागृहात आला आणि नंतर एक ख्रिस्ती वडील बनला.
१७. ख्रिस्ती कुटुंबात कधीकधी वातावरण तंग झाल्यास, कोणता शास्त्रवचनीय सल्ला उपयोगाचा ठरू शकतो?
१७ तुमच्या घरात सर्वजण खरे ख्रिस्ती असले तरीसुद्धा, कधीकधी असे प्रसंग येतात की जेव्हा कुटुंबातले वातावरण अतिशय तंग होते आणि मानवी अपरिपूर्णतेमुळे कधीकधी तर आपण कठोर शब्दांत एकमेकांशी बोलू लागतो. प्राचीन इफिस मंडळीतल्या सर्व ख्रिश्चनांना देण्यात आलेला हा सल्ला लक्ष देण्याजोगा आहे: “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत.” (इफिसकर ४:३१) इफिसमधील ख्रिश्चनांच्या अवतीभवती असणारे वातावरण, त्यांची स्वतःची अपरिपूर्णता आणि त्यांच्या पूर्वीच्या जीवनशैलीचा त्यांच्यावर प्रभाव होता. मग कोणती गोष्ट त्यांना परिवर्तन करण्यास मदत करू शकत होती? त्यांना “आपल्या मनोवृत्तीत नवे” बनणे अगत्याचे होते. (इफिसकर ४:२३) देवाच्या वचनाचा अभ्यास केल्यामुळे, त्याचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडावा यावरती मनन केल्यामुळे, सहख्रिस्ती बांधवांसोबत संगती केल्यामुळे आणि मनःपूर्वक प्रार्थना केल्यामुळे देवाच्या आत्म्याचे फळ त्यांच्या जीवनात अधिक पूर्णपणे प्रकट होऊ शकत होते. असे केल्यामुळे ते ‘एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू होण्यास, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी त्यांना क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा करण्यास’ शिकू शकत होते. (इफिसकर ४:३२) इतरजण कसेही वागले तरीसुद्धा, आपण मात्र सहनशील असले पाहिजे व दयाळूपणे, सहानुभूतीने व क्षमाशीलपणे वागले पाहिजे. कधीही ‘वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड’ आपण करू नये. (रोमकर १२:१७, १८) देवाचे अनुकरण करून इतरांवर मनापासून प्रेम करण्याचा मार्ग नेहमी योग्य असतो.—१ योहान ४:८.
सर्व ख्रिश्चनांकरता सल्ला
१८. दुसरे तीमथ्य २:२४ यातील सल्ला इफिस मंडळीच्या वडिलाकरता समर्पक का होता आणि तो कशाप्रकारे सर्व ख्रिश्चनांकरता उपयोगाचा ठरू शकतो?
१८ ‘सहनशील असण्याचा’ सल्ला सर्व ख्रिश्चनांकरता आहे. (२ तीमथ्य २:२४) पण मुळात हा सल्ला तीमथ्याला देण्यात आला होता. इफिस येथे मंडळीचा वडील या नात्याने सेवा करत असताना हा सल्ला त्याच्याकरता अतिशय समर्पक होता. त्या मंडळीतले काहीजण आपली मते अतिशय उघडपणे व्यक्त करत होते आणि खोट्या शिकवणुकी पसरवत होते. मोशेच्या नियमशास्त्राचा खरा उद्देश पूर्णपणे ओळखता न आल्यामुळे ते विश्वास, प्रीती आणि उत्तम विवेकाचे महत्त्व समजू शकले नाहीत. ख्रिस्ताच्या शिकवणुकींचे मर्म व सुभक्तीचे महत्त्व समजून न घेता, गर्विष्ठपणे निव्वळ शब्दांवर वाद घातल्यामुळे त्यांच्यामध्ये भांडणे होऊ लागली. ही समस्या सोडवण्याकरता तीमथ्याला एकीकडे शास्त्रवचनातील सत्याला खंबीरपणे धरून राहायचे होते आणि त्याच वेळेस आपल्या बांधवांशी सौम्यतेने व्यवहार करायचा होता. आधुनिक काळातील वडिलांप्रमाणे त्याला या गोष्टीची जाणीव होती की कळप त्याच्या मालकीचा नव्हता; तसेच, बांधवांशी व्यवहार करताना ख्रिस्ती प्रीती व एकतेची वृद्धी होईल अशाच प्रकारे वागले पाहिजे याचीही त्याला जाणीव होती.—इफिसकर ४:१-३; १ तीमथ्य १:३-११; ५:१, २; ६:३-५.
१९. ‘नम्रतेचा अवलंब’ करणे आपल्या सर्वांकरता महत्त्वाचे का आहे?
१९ देव आपल्या लोकांना ‘नम्रतेचा अवलंब’ करण्याचा आग्रह करतो. (सफन्या २:३) ‘नम्रता’ याकरता असलेला मूळ इब्री शब्द अशा मनोवृत्तीस सूचित करतो, की ज्यामुळे एक व्यक्ती आपले नुकसान झाले तरीसुद्धा, उत्तेजित न होता आणि सूडबुद्धीने न वागता, धीरोदात्तपणे ते सहन करते. आपण यहोवाकडे मनःपूर्वक प्रार्थना करू या, की त्याने आपल्याला कठीण परिस्थितीतही सहनशीलतेने वागण्यास आणि आपण त्याचे लोक आहोत हे नेहमी आठवणीत ठेवून, इतरांशी योग्य व्यवहार करण्यास मदत करावी. (w०५ ५/१५)
तुम्हाला काय शिकायला मिळाले?
• तुम्हाला कठोरपणे बोलणारी व्यक्ती भेटल्यास कोणती शास्त्रवचने तुम्हाला मदत करू शकतील?
• शौलाने इतके जुलूम का केले?
• येशूचे उदाहरण आपल्याला सर्व प्रकारच्या लोकांशी योग्य व्यवहार करण्यास कशाप्रकारे मदत करू शकते?
• कुटुंबात संभाषण करताना सहनशील असल्यामुळे कोणते फायदे मिळू शकतात?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२० पानांवरील चित्र]
ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्यास कुटुंबियांकडून होणारा विरोध कालांतराने कमी होऊ शकतो
[२१ पानांवरील चित्र]
ख्रिस्ती नेहमी प्रीती व एकतेत वृद्धी होईल अशाप्रकारे वागतात