व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एकनिष्ठ असणे खरोखरच फायदेकारक आहे का?

एकनिष्ठ असणे खरोखरच फायदेकारक आहे का?

एकनिष्ठ असणे खरोखरच फायदेकारक आहे का?

कार्ल, एक विमा एजंट आहे. * तो येन्सला म्हणतो: “आरोग्य विम्यासाठी तुला खरंच खूप जास्त पैसे भरावे लागत आहेत. पण तू जर माझ्या कंपनीचा विमा घेतलास तर तुला इतके पैसे भरावे लागणार नाही. तू दर महिन्याला, चक्क ९०० रूपये वाचवशील.”

“तुझं म्हणणं बरोबर आहे. पण, खूप वर्षांपासून मी या आरोग्य विमा कंपनीत पैसे भरत आलो आहे. त्यांनी मला खूप मदत केली आहे, त्यामुळे मला त्यांच्याबरोबर इमानदार राहायचं आहे,” असे येन्स म्हणाला.

“इमानदारी चांगला गुण आहे, पण हा इमानदारपणा तुम्हाला किती महागात पडतोय ते पाहा,” असे कार्ल त्याला म्हणतो.

कार्लचे म्हणणे बरोबर होते. इमानदार किंवा एकनिष्ठ राहण्याकरता बरेच पैसे मोजावे लागू शकतात. * शिवाय, त्यात वेळ, शक्‍ती तर खर्च होतेच आणि भावनिक वचनबद्धताही येते. मग, एकनिष्ठ असणे खरोखरच फायदेकारक आहे का?

आचरणापेक्षा वाहवाहच अधिक

जर्मनीतील ॲलएन्सबाख ओपिनियन रिसर्च इन्स्टिट्यूटने घेतलेल्या एका सर्व्हेत ९६ टक्के लोकांनी म्हटले, की आपण एकनिष्ठ असले पाहिजे. ॲलएन्सबाखने १८ ते २४ वयोगटातील लोकांच्या घेतलेल्या दुसऱ्‍या एका सर्व्हेत, तिघांपैकी दोघांचे असे मत आहे, की आजकाल एकनिष्ठता या गुणाची “फॅशन” चालली आहे म्हणजे ते या गुणाला एक चांगला गुण समजतात.

इमानदारपणा किंवा एकनिष्ठतेची वाहवाह करणे एक गोष्ट आहे, पण प्रत्यक्ष जीवनात इमानदारपणा दाखवणे किंवा एकनिष्ठ असणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. उदाहरणार्थ, अनेक युरोपीय देशांत, लग्न झालेली जोडपी किंवा कुटुंबातील सदस्य अनेकदा एकमेकांशी बेईमान असतात. मित्रही बरेचदा एकमेकांशी बेईमान असतात. आणि पूर्वी, मालक-कामगारामध्ये किंवा मग व्यापारी-गिऱ्‍हाईकामध्ये जो इमानदारपणा होता तो आता नाहीसा झाला आहे. असे का?

कधीकधी, आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे, एकनिष्ठता दाखवण्यासाठी लागणाऱ्‍या वचनबद्धतेकरता लोकांजवळ फार कमी वेळ किंवा मानसिक शक्‍ती उरते. ज्यांची गतकाळात इतरांकडून निराशा झाली आहे असे लोक मग कोणाशीही एकनिष्ठ राहायला कचरतात. काही जणांना, आज इकडे तर उद्या तिकडे अशाप्रकारचे जीवन आवडते; कारण मग त्यांना कोणालाही एकनिष्ठा दाखवण्याची गरज पडत नाही.

कारण काहीही असो, एकनिष्ठता या सद्‌गुणाची आचरणापेक्षा वाहवाहच अधिक होते. त्यामुळे आपल्या मनात असे प्रश्‍न येऊ शकतात, की एकनिष्ठ असणे खरोखरच फायदेकारक आहे का? असेल तर, आपण कोणाला आणि कोणकोणत्या मार्गांनी एकनिष्ठ असले पाहिजे? एकनिष्ठ असल्याने कोणते फायदे मिळतात? (w०५ ९/१)

[तळटीपा]

^ परि. 2 या आणि पुढील लेखातील काही नावे बदलण्यात आली आहेत.

^ परि. 5 “इमानदारपणा” व “एकनिष्ठता” हे दोन शब्द नेहमीच, एकाच संदर्भात वापरले जात नाहीत; पण या लेखांत हे शब्द काही ठिकाणी आलटूनपालटून वापरण्यात आले आहेत.

[३ पानांवरील संक्षिप्त आशय]

एकनिष्ठता या सद्‌गुणाची आचरणापेक्षा वाहवाहच अधिक होते