व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

या त्रस्त जगात तुम्ही सुरक्षितता अनुभवू शकता!

या त्रस्त जगात तुम्ही सुरक्षितता अनुभवू शकता!

एका खास भाषणाकरता निमंत्रण

या त्रस्त जगात तुम्ही सुरक्षितता अनुभवू शकता!

हे बायबलवर आधारित असलेले भाषण जगभरात २३० पेक्षा अधिक देशांत दिले जाईल. बहुतेक ठिकाणी, हे भाषण रविवार, एप्रिल १५, २००७ तारखेला दिले जाईल. या भाषणातून तुम्हाला काय शिकायला मिळेल? खालील काही विषय विचारात घ्या:

आज सबंध जगात लाखो लोकांना असुरक्षित का वाटते?

सुरक्षिततेची भावना विशेषतः केव्हापासून लोप पावली?

खरी सुरक्षितता कोठे आणि कशी मिळेल?

या महत्त्वाच्या बायबल आधारित भाषणाला उपस्थित राहून या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घ्या. हे भाषण हजारो ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. बहुतेक ठिकाणी हे भाषण यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात दिले जाईल. तुमच्या परिसरातील साक्षीदारांना तुम्हाला भाषणाची नेमकी वेळ व पत्ता सांगण्यास आनंद वाटेल. या समयोचित व प्रोत्साहनपर भाषणाला उपस्थित राहण्याचे आम्ही तुम्हास हार्दिक निमंत्रण देऊ इच्छितो. (w०७ ४/१)