आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवा
आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवा
“तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातांतील बाणांप्रमाणे आहेत.”—स्तोत्र १२७:४.
१, २. मुले “वीराच्या हातातील बाणांप्रमाणे” असतात असे का म्हणता येते?
तिरंदाज हातात धनुष्य घेऊन नेम धरतो. मग धनुष्याच्या दोरीवर बाण चढवून तो दोरी ताणून धरतो. असे करताना त्याच्या स्नायूंवर बराच ताण पडतो, पण तरीसुद्धा तो पुरेसा वेळ लक्ष्याचा वेध घेतो. आणि मग, तो बाण सोडतो! बाण निशाण्यावर लागेल का? या प्रश्नाचे उत्तर, तिरंदाजाचे कौशल्य, वाऱ्याची दिशा आणि बाणाची स्थिती यांसारख्या निरनिराळ्या गोष्टींवर अवलंबून आहे.
२ मुले “वीराच्या हातातील बाणांप्रमाणे” असतात असे शलमोन राजाने म्हटले. (स्तोत्र १२७:४) हे रूपक किती समर्पक आहे ते पाहा. बाण तिरंदाजाच्या धनुष्यावर अगदी थोडा वेळ राहतो. तो निशाण्यावर लागण्यासाठी त्याला तो लगेच सोडून द्यावा लागतो. त्याचप्रकारे आईवडिलांजवळही आपल्या मुलांच्या मनात यहोवाबद्दल खरे प्रेम उत्पन्न करण्यासाठी फार कमी वेळ असतो. पाहता पाहता मुले मोठी होतात आणि काही वर्षांतच ती आईबाबांपासून वेगळी राहू लागतात. (मत्तय १९:५) ती लक्ष्य साधतील का? दुसऱ्या शब्दांत, स्वतंत्रपणे राहू लागल्यानंतर ही मुले पुढेही यहोवावर प्रेम करत व त्याची सेवा करत राहतील का? या प्रश्नांचे उत्तर बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. यांपैकी तीन गोष्टी म्हणजे, आईवडिलांचे कौशल्य, मुले कशाप्रकारच्या वातावरणात लहानाची मोठी होतात आणि मुळात ‘बाण’ अर्थात मूल त्याला किंवा तिला मिळणाऱ्या शिक्षणाला कसा प्रतिसाद देते. या प्रत्येक गोष्टीचे आपण थोडे खोलात शिरून परीक्षण करू. सर्वप्रथम, कुशल पालकांच्या काही वैशिष्ट्यांचा आपण विचार करू या.
कुशल पालक मुलांपुढे चांगला आदर्श ठेवतात
३. आईवडिलांच्या उपदेशाला कृत्यांची साथ का असली पाहिजे?
३ येशूने आईवडिलांकरता एक उत्तम आदर्श ठेवला. तो लोकांना जे काही शिकवायचा त्याप्रमाणे तो स्वतःही वागत असे. (योहान १३:१५) दुसरीकडे पाहता, त्याने परूशी लोकांची निर्भर्त्सना केली कारण ते लोकांना बरेच काही ‘सांगायचे’ पण स्वतः मात्र त्याप्रमाणे ‘आचरण करीत नव्हते.’ (मत्तय २३:३) मुलांना यहोवावर प्रेम करायला प्रवृत्त करण्यासाठी आईवडिलांचे शब्द व कृत्ये एकमेकांस पूरक असली पाहिजेत. उपदेशाला जर कृत्यांची साथ नसेल, तर तो उपदेश दोरी नसलेल्या धनुष्यासारखा, म्हणजे अगदी निरुपयोगी ठरेल.—१ योहान ३:१८.
४. आईवडिलांनी स्वतःला कोणते प्रश्न विचारावेत आणि का?
४ आईवडिलांचा आदर्श इतका महत्त्वाचा का असतो? ज्याप्रमाणे प्रौढजन येशूच्या आदर्शाकडे पाहून देवावर प्रेम करायला शिकू शकतात, त्याचप्रमाणे मुले देखील आपल्या आईवडिलांच्या चांगल्या १ करिंथकर १५:३३) मुलांच्या जीवनात, विशेषतः त्यांच्या जीवनातील सुरुवातीच्या संस्कारक्षम वर्षांत, त्यांचे सर्वात जवळचे व त्यांच्यावर सर्वात जास्त प्रभाव पाडू शकणारे सोबती हे त्यांचे आईवडीलच असतात. म्हणून, आईवडिलांनी स्वतःला हे प्रश्न विचारावेत: ‘मी कशाप्रकारचा सोबती आहे? माझ्या उदाहरणाने मी आपल्या मुलाला चांगल्या सवयी आत्मसात करण्याचे प्रोत्साहन देत आहे का? प्रार्थना व बायबलचा अभ्यास यांसारख्या महत्त्वाच्या कार्यांसंबंधी मी आपल्या मुलांकरता कशाप्रकारचा आदर्श पुरवत आहे?’
उदाहरणाचे अनुकरण करून यहोवावर प्रेम करायला शिकू शकतात. मुलांचे सोबती एकतर त्यांची उन्नती करू शकतात किंवा त्यांना ‘बिघडवू’ शकतात. (कुशल पालक मुलांसोबत प्रार्थना करतात
५. आईवडिलांच्या प्रार्थनांवरून मुलांना काय शिकायला मिळू शकते?
५ तुमची मुले फक्त तुमच्या प्रार्थना ऐकूनही यहोवाबद्दल बरेच काही शिकू शकतात. जेवणाला व बायबल अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही देवाचे आभार मानत असाल, तर या प्रार्थना ऐकून मुले कोणता निष्कर्ष काढतील? कदाचित त्यांतून त्यांना हा धडा मिळेल की यहोवा आपल्या शारीरिक गरजा तृप्त करतो, आणि त्याबद्दल आपण त्याचे आभार मानले पाहिजेत; तसेच तो आपल्याला आध्यात्मिक सत्येही शिकवतो. हे धडे मुलांकरता अतिशय मोलाचे आहेत.—याकोब १:१७.
६. यहोवा आपल्या प्रत्येकाची काळजी घेतो याची आईवडील आपल्या मुलांना कशाप्रकारे जाणीव करून देऊ शकतात?
६ पण जर तुम्ही जेवणाच्या व बायबल अभ्यासाच्या वेळेशिवाय इतर वेळीही तुमच्या कुटुंबासोबत प्रार्थना केली आणि जर तुमच्या कुटुंबासमोर असलेल्या विशिष्ट परिस्थितीविषयी तुम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये उल्लेख केला तर तुम्ही आपल्या मुलांना अजून काहीतरी शिकवू शकता. यहोवा आपल्या कुटंबाचाच एक भाग आहे आणि तो आपल्या प्रत्येकाची काळजी घेतो ही जाणीव तुम्ही आपल्या मुलांना करून देऊ शकाल. (इफिसकर ६:१८; १ पेत्र ५:६, ७) एक पिता म्हणतो: “आमच्या मुलीचा जन्म झाल्यापासूनच आम्ही तिच्यासोबत प्रार्थना करू लागलो. ती जसजशी मोठी झाली तसतसे आम्ही तिच्यावर परिणाम करणाऱ्या निरनिराळ्या गोष्टींविषयी तिच्यासोबत प्रार्थना करत असू. ती लग्न करून सासरी गेली तोपर्यंत एकही दिवस असा गेला नाही, की जेव्हा आम्ही तिच्यासोबत प्रार्थना केली नाही.” तुम्हीसुद्धा आपल्या मुलांसोबत दररोज प्रार्थना करू शकता का? यहोवा फक्त आपल्या शारीरिक व आध्यात्मिक गरजा तृप्त करणाराच नाही, तर तो आपल्या मित्रासारखा आहे आणि आपल्या भावनांचीही तो कदर करतो हे समजून घेण्यास तुम्ही आपल्या मुलांना मदत करू शकता का?—फिलिप्पैकर ४:६, ७.
७. प्रार्थनांमध्ये विशिष्ट गोष्टींचा उल्लेख करण्यासाठी आईवडिलांना काय माहीत असले पाहिजे?
७ अर्थात, प्रार्थनांमध्ये विशिष्ट गोष्टींचा उल्लेख करायचा असेल तर तुम्हाला आधी, आपल्या मुलांच्या जीवनात काय चालले आहे, हे माहीत असले पाहिजे. दोन मुलांच्या एका पित्याने काय म्हटले त्याकडे लक्ष द्या: “दर आठवड्याच्या शेवटी मी स्वतःला दोन प्रश्न विचारायचो: ‘या आठवड्यात माझी मुले सर्वात जास्त कशाविषयी विचार करत होती? आणि त्यांच्या लहानशा विश्वात कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या?’” आईवडिलांनो, तुम्हीही स्वतःला अशाप्रकारचे प्रश्न विचारून, मग आपल्या मुलांसोबत प्रार्थना करताना त्या विषयांचा उल्लेख करू शकता का? जर तुम्ही असे केले, तर तुम्ही केवळ त्यांना प्रार्थना ऐकणाऱ्या यहोवा देवाला प्रार्थना करायलाच नाही तर त्याच्यावर प्रेम करायलाही शिकवाल.—स्तोत्र ६५:२.
कुशल पालक नियमित अभ्यास करण्याचे प्रोत्साहन देतात
८. आईवडिलांनी आपल्या मुलांना देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याची सवय लावून घेण्याचे प्रोत्साहन का दिले पाहिजे?
८ बायबल अभ्यासाप्रती आईवडिलांच्या मनोवृत्तीचा मुलांच्या देवासोबतच्या नातेसंबंधावर कसा परिणाम पडू शकतो? कोणत्याही दोन व्यक्तींमधील सख्य वाढण्याकरता व मत्तय २४:४५-४७; नीतिसूत्रे ४:१, २) म्हणूनच, आपल्या मुलांना यहोवासोबत एक टिकाऊ व प्रेमळ नातेसंबंध निर्माण करण्यास मदत करण्यासाठी, आईवडिलांनी त्यांना देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याची सवय लावून घेण्याचे प्रोत्साहन दिले पाहिजे.
ते टिकून राहण्याकरता त्यांनी एकमेकांशी बोलणेच नव्हे तर एकमेकांचे ऐकून घेणेही महत्त्वाचे आहे. यहोवा काय सांगतो हे ऐकण्याचा एक मार्ग म्हणजे ‘विश्वासू दासाने’ पुरवलेल्या प्रकाशनांच्या साहाय्याने बायबलचा अभ्यास करणे. (९. मुलांना नियमित अभ्यासाची सवय लावण्यास साहाय्य कसे केले जाऊ शकते?
९ नियमित अभ्यासाची सवय लावण्याकरता मुलांना कशाप्रकारे साहाय्य केले जाऊ शकते? पुन्हा एकदा, आईवडिलांचे उदाहरणच सर्वात परिणामकारक ठरते. तुमची मुले नियमितपणे तुम्हाला आपल्या वैयक्तिक बायबल वाचनाचा अथवा अभ्यासाचा आनंद घेताना पाहतात का? कदाचित मुलांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यातच तुमचा सगळा वेळ जात असेल. वाचन आणि अभ्यास करण्यासाठी सवड कुठून मिळणार असे कदाचित तुम्हाला वाटत असेल. पण स्वतःला हा प्रश्न विचारा, ‘माझी मुले मला नियमितपणे टीव्ही पाहताना बघतात का?’ तर मग, वैयक्तिक अभ्यासाच्या बाबतीत त्यांच्यासमोर उत्तम आदर्श ठेवण्याकरता तुम्ही यातला काही वेळ देऊ शकाल का?
१०, ११. आईवडिलांनी बायबलमधील विषयांवर आधारित कौटुंबिक चर्चा नियमितरित्या का आयोजित केल्या पाहिजेत?
१० यहोवा जे सांगतो ते ऐकायला मुलांना साहाय्य करण्याचा आणखी एक व्यावहारिक मार्ग म्हणजे बायबल आधारित विषयांवर नियमित कौटुंबिक चर्चा करणे. (यशया ३०:२१) पण काहीजण असा विचार करतात, की ‘जर आईवडील दर आठवडी मुलांना मंडळीच्या सभांना नेत असतील, तर मग पुन्हा कौटुंबिक अभ्यासाची काय गरज?’ कौटुंबिक अभ्यास घेण्यामागे बरीच चांगली कारणे आहेत. यहोवाने मुलांना शिकवण्याची मुख्य जबाबदारी आईवडिलांवर सोपवली आहे. (नीतिसूत्रे १:८; इफिसकर ६:४) कौटुंबिक बायबल अभ्यासामुळे मुलांना हे शिकण्यास मदत मिळते, की उपासना केवळ सार्वजनिक ठिकाणी औपचारिक पद्धतीनेच करावयाची गोष्ट नसून, ती कुटुंबाच्या खासगी जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे.—अनुवाद ६:६-९.
११ शिवाय, उत्तमरित्या घेतलेला कौटुंबिक अभ्यास आईवडिलांना मुलांच्या विश्वात डोकावण्याची, आध्यात्मिक व नैतिक गोष्टींसंबंधी त्यांचे काय विचार आहेत हे जाणून घेण्याची संधी देतो. उदाहरणार्थ, मुले अद्याप लहान असल्यास आईवडील महान शिक्षकाकडून शिका * (इंग्रजी) यांसारख्या प्रकाशनांचा उपयोग करू शकतात. बायबल अभ्यासाकरता तयार केलेल्या या पुस्तकाच्या जवळजवळ प्रत्येकच परिच्छेदात मुलांना संबंधित विषयावर आपले मत व्यक्त करता येण्याजोगे प्रश्न विचारले आहेत. या पुस्तकात उल्लेख केलेल्या शास्त्रवचनांवर तर्क करण्याद्वारे आईवडील मुलांना ‘चांगले आणि वाईट समजण्याकरता’ आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करण्यास शिकवू शकतात.—इब्री लोकांस ५:१४.
१२. आईवडील मुलांच्या गरजांनुरूप कौटुंबिक अभ्यास कसा जुळवून घेऊ शकतात आणि याबाबतीत तुम्हाला कोणत्या पद्धती विशेष परिणामकारक असल्याचे आढळले आहेत?
१२ तुमची मुले मोठी होतात तसतसा तुम्ही हा कौटुंबिक नीतिसूत्रे २३:१५.
अभ्यास त्यांच्या गरजांनुरूप जुळवून घेऊ शकता. एका जोडप्याच्या किशोरवयीन मुलींनी शाळेत आयोजित केलेल्या डांसला जाण्याची परवानगी मागितली तेव्हा त्यांनी त्यांना कशाप्रकारे आपल्या तर्कबुद्धीचा वापर करण्यास मदत केली ते पाहा. मुलींचे वडील सांगतात: “आम्ही मुलींना सांगितले की पुढच्या कौटुंबिक अभ्यासादरम्यान आपण एक प्रात्यक्षिक करू या. त्यात आम्ही, म्हणजे आई व बाबा मुलांची भूमिका घेऊ आणि मुले म्हणजे त्या दोघी आईवडील बनतील. दोघींपैकी एकजण आई तर दुसरी बाबा बनू शकते, पण शाळेतील डांसेसविषयी मार्गदर्शन देण्याकरता त्या विषयावर संशोधन मात्र त्या दोघींनी मिळून करावे.” याचा काय परिणाम झाला? ते पुढे सांगतात: “आमच्या मुलींनी पालकांची भूमिका किती जबाबदारपणे हाताळली आणि डांसला जाणे का योग्य ठरणार नाही हे आम्हाला (म्हणजे मुलांना) बायबलच्या आधारावर किती सुरेखपणे समजावून सांगितले ते पाहून आम्ही खरेच थक्क झालो. शिवाय डांसला जाण्याऐवजी, बायबलच्या विरोधात नसलेल्या दुसऱ्या कोणकोणत्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत याविषयी त्यांनी सुचवलेले पर्याय ऐकूनही आम्हाला त्यांचे खूप कौतुक वाटले. यामुळे आम्हाला त्यांच्या मनातले विचार आणि त्यांच्या इच्छा जाणून घेण्याची एक चांगली संधी मिळाली.” खरेच, कौटुंबिक अभ्यास नियमित व अर्थपूर्ण रित्या घेण्याकरता चिकाटीची आणि कल्पकतेची गरज आहे. पण यादृष्टीने केलेले सर्व प्रयत्न निश्चितच सार्थक ठरतील.—शांतीपूर्ण वातावरण तयार करा
१३, १४. (क) आईवडील घरात शांतीपूर्ण वातावरण कसे निर्माण करू शकतात? (ख) आईवडील आपल्या हातून चूक झाल्याचे कबूल करतात तेव्हा कोणता चांगला परिणाम घडू शकतो?
१३ तिरंदाज शांत हवामानात बाण मारतो तेव्हा तो निशाण्यावर लागण्याची जास्त शक्यता असते. त्याचप्रकारे, आईवडिलांनी कुटुंबात शांतीपूर्ण वातावरण निर्माण केल्यास मुले यहोवावर प्रेम करायला शिकण्याची जास्त शक्यता आहे. याकोबाने लिहिले: “शांति करणाऱ्यासाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.” (याकोब ३:१८) तर, आईवडील घरात अशाप्रकारचे शांतीपूर्ण वातावरण कसे काय निर्माण करू शकतात? विवाहित जोडप्याने आपले वैवाहिक बंधन मजबूत ठेवण्याची गरज आहे. जे पतीपत्नी एकमेकांवर मनापासून प्रेम करतात व एकमेकांचा आदर करतात ते आपल्या मुलांना इतरांवर व विशेषतः यहोवावर प्रेम करायला व त्याचा आदर करायला अधिक चांगल्याप्रकारे शिकवू शकतात. (गलतीकर ६:७; इफिसकर ५:३३) जेथे प्रेम व आदर असतो तेथे शांती आपोआपच येते. आणि ज्या पतीपत्नींचे एकमेकांशी शांतीपूर्ण संबंध असतात त्यांना कुटुंबात निर्माण होणारे मतभेद मिटवणे अधिक सोपे जाते.
१४ अर्थात, ज्यात कोणताही दोष नाही असा सध्याच्या परिस्थितीत तरी कोणताही विवाह, किंवा कोणतेही कुटुंब नाही. कधीकधी आईवडीलही आपल्या मुलांशी वागताना पवित्र आत्म्याचे फळ प्रदर्शित करण्यास चुकतात. (गलतीकर ५:२२, २३) पण असे घडते तेव्हा आईवडिलांनी काय करावे? जर त्यांनी आपली चूक कबूल केली तर मुलांच्या मनातला त्यांच्याविषयीचा आदर कमी होईल का? प्रेषित पौलाच्या उदाहरणावर विचार करा. तो अनेकांकरता एक आध्यात्मिक पिता होता. (१ करिंथकर ४:१५) तरीपण आपल्या हातूनही चुका होतात, हे त्याने उघडपणे कबूल केले. (रोमकर ७:२१-२५) असे केल्यामुळे, त्याच्याविषयीचा आदर कमी होण्याऐवजी त्याची नम्रता व प्रामाणिकपणा पाहून उलट आपल्याला त्याच्याविषयी जास्त आदर वाटतो. पौलाच्या व्यक्तिमत्त्वात काही उणिवा असूनही तो करिंथ येथील मंडळीला आत्मविश्वासाने असे लिहू शकला, की “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीहि माझे अनुकरण करणारे व्हा.” (१ करिंथकर ११:१) तुम्हीही आपल्या चुका कबूल केल्या तर तुमची मुले बहुधा तुमच्या उणिवांकडे दुर्लक्ष करतील.
१५, १६. आईवडिलांनी आपल्या मुलांना ख्रिस्ती बंधूभगिनींवर प्रेम करायला का शिकवले पाहिजे आणि हे कशाप्रकारे केले जाऊ शकते?
१५ मुले यहोवावर प्रेम करायला शिकतील अशाप्रकारचे वातावरण निर्माण करण्याकरता आईवडील आणखी काय करू शकतात? प्रेषित योहानाने लिहिले: “मी देवावर प्रीति करितो, असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीति करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीति करिता येणे शक्य नाही.” (१ योहान ४:२०, २१) त्याअर्थी, जेव्हा तुम्ही आपल्या मुलांना त्यांच्या ख्रिस्ती बंधू भगिनींवर प्रेम करायला शिकवता तेव्हा खरे तर तुम्ही त्यांना देवावर प्रेम करायला शिकवत असता. आईवडिलांनी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे, ‘मंडळीविषयी बोलताना मी सहसा इतरांना उत्तेजन मिळेल अशाप्रकारे बोलतो का? की माझे बोलणे सहसा टीकात्मक स्वरात असते?’ या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कसे मिळवता येईल? तुमची मुले सभांविषयी व मंडळीतल्या सदस्यांविषयी कशाप्रकारे बोलतात हे लक्षपूर्वक ऐका. त्यांच्या अभिप्रायांतून कदाचित तुम्हाला तुमच्या विचारांचे पडसाद ऐकू येतील.
१६ आईवडील आपल्या मुलांना मंडळीतल्या बंधूभगिनींवर प्रेम करायला कशाप्रकारे साहाय्य करू शकतात? पीटर हे दोन किशोरवयीन मुलांचे पिता आहेत. ते सांगतात: “आमची मुले लहान होती तेव्हापासूनच आम्ही आध्यात्मिकरित्या प्रौढ बंधुभगिनींना घरी जेवायला बोलवण्याची प्रथा पाळली आहे. त्यांच्यासोबत मौजमजा करण्याच्या कितीतरी गोड आठवणी आमच्याजवळ आहेत. आमची मुले यहोवावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या सहवासात लहानाची मोठी झाली आहेत आणि आता देवाची सेवा करणे हा जगण्याचा सर्वात आनंददायक मार्ग आहे याची त्यांना खात्री पटली आहे.” पाच मुलींचे पिता डेनिस म्हणतात, “आम्ही आमच्या मुलींना मंडळीतल्या अनुभवी पायनियर्ससोबत मैत्री करण्याचे प्रोत्साहन दिले. आणि जेव्हाही शक्य होईल तेव्हा आम्ही प्रवासी पर्यवेक्षकांना व त्यांच्या पत्नींना पाहुणचार दाखवण्याचा प्रयत्न केला.” मंडळी ही आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहे अशा दृष्टीने विचार करायला तुम्ही देखील आपल्या मुलांना साहाय्य करू शकता का?—मार्क १०:२९, ३०.
मुलांची जबाबदारी
१७. कोणता निर्णय शेवटी मुलांना स्वतः घ्यावा लागेल?
१७ पुन्हा एकदा तिरंदाजाच्या उदाहरणाकडे वळू या. हा तिरंदाज कितीही निपुण असला तरीसुद्धा, जर बाणच वाकडा झालेला असेल तर तो निशाण्यावर लागणार नाही. अर्थात, आईवडील आपल्या मुलांच्या चुकीच्या विचारसरणीत बदल करण्याकरता परीश्रम करण्याद्वारे वाकडा बाण सरळ करण्याचा प्रयत्न करू शकतात. पण शेवटी, आपण या जगाच्या प्रभावापुढे झुकणार की यहोवाला आपले ‘मार्ग सरळ’ करू देणार हे मुलांना स्वतः ठरवावे लागेल.—नीतिसूत्रे ३:५, ६, सुबोध भाषांतर; रोमकर १२:२.
१८. मुलाच्या निर्णयाचा इतरांवर कसा परिणाम होऊ शकतो?
१८ आईवडिलांवर आपल्या मुलांना यहोवाच्या “शिस्तीत व शिक्षणात” वाढवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे हे खरे आहे. पण मूल मोठे होऊन कशाप्रकारची व्यक्ती बनते हा निर्णय घेणे त्या मुलावरच अवलंबून आहे. (इफिसकर ६:४) तेव्हा मुलांनो, स्वतःला हा प्रश्न विचारा, ‘माझ्या आईवडिलांनी पुरवलेले प्रेमळ प्रशिक्षण मी स्वीकारणार का?’ जर तुम्ही ते स्वीकारले, तर तुम्ही जीवनाचा सर्वात उत्तम मार्ग स्वीकाराल. यामुळे तुमच्या आईवडिलांना खूप आनंद होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही यहोवाचे मन आनंदित कराल.—नीतिसूत्रे २७:११. (w०७ ९/१)
[तळटीप]
^ परि. 11 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.
तुम्हाला आठवते का?
• प्रार्थना व बायबल अभ्यासाच्या बाबतीत आईवडील मुलांसमोर चांगला आदर्श कशाप्रकारे ठेवू शकतात?
• आईवडील घरात शांतीपूर्ण वातावरण कसे निर्माण करू शकतात?
• मुलांसमोर कोणता निर्णय आहे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा इतरांवर कशाप्रकारे प्रभाव पडतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२९ पानांवरील चित्र]
वैयक्तिक अभ्यासाच्या बाबतीत तुम्ही आपल्या मुलांसमोर चांगला आदर्श ठेवत आहात का?
[३० पानांवरील चित्र]
कुटुंबातल्या शांतीपूर्ण वातावरणामुळे आनंदात भर पडते