तुमच्या प्रार्थना तुमच्याविषयी काय सांगतात?
तुमच्या प्रार्थना तुमच्याविषयी काय सांगतात?
“तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाति येते.”—स्तो. ६५:२.
१, २. यहोवाचे उपासक पूर्ण भरवशाने त्याला प्रार्थना का करू शकतात?
यहोवा आपल्या विश्वासू सेवकांच्या विनंत्यांकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. तो आपल्या प्रार्थना ऐकतो याबद्दल आपण पूर्ण भरवसा बाळगू शकतो. यहोवाच्या साक्षीदारांपैकी लाखो जणांनी एकाच वेळी देवाला प्रार्थना केली, तरी ‘सध्या व्यस्त आहे’ अशी सूचना त्यांपैकी एकालाही ऐकावी लागणार नाही.
२ देव आपल्या विनवण्या ऐकतो असा भरवसा असल्यामुळेच स्तोत्रकर्त्या दाविदाने लिहिले: “तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाति येते.” (स्तो. ६५:२) यहोवाने दाविदाच्या प्रार्थना ऐकल्या, कारण तो यहोवाचा विश्वासू सेवक होता. तेव्हा, आपणही स्वतःला असे विचारले पाहिजे: ‘मला यहोवावर भरवसा आहे आणि शुद्ध उपासनेला माझ्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व आहे हे माझ्या प्रार्थनांवरून दिसून येते का? माझ्या प्रार्थना माझ्याविषयी काय सांगतात?’
नम्र मनोवृत्तीने यहोवाला प्रार्थना करा
३, ४. (क) देवाला प्रार्थना करताना आपण कोणती मनोवृत्ती बाळगली पाहिजे? (ख) गंभीर पापामुळे “अस्वस्थ करणारे विचार” आपल्याला सतावत असतील तर आपण काय केले पाहिजे?
३ यहोवाने आपल्या प्रार्थना ऐकाव्यात असे आपल्याला वाटत असेल, तर आपण नम्र मनोवृत्तीने प्रार्थना केली पाहिजे. (स्तो. १३८:६) दाविदाप्रमाणे आपणही आपल्या अंतःकरणाचे परीक्षण करण्याची यहोवाला विनंती केली पाहिजे. दाविदाने म्हटले: “हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत [“मला अस्वस्थ करणारे विचार,” NW] जाण. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ति असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालीव.” (स्तो. १३९:२३, २४) पण, नुसतीच अशी विनंती करून चालणार नाही. तर, देव आपले दोष आपल्या लक्षात आणून देतो तेव्हा नम्रतापूर्वक ते स्वीकारून त्याच्या वचनातील सल्ल्याचे आपण पालनही केले पाहिजे. असे केल्यास, यहोवा आपल्याला “सनातन मार्गाने” अर्थात सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्या मार्गाने चालण्यास मदत करेल.
४ आपल्या हातून घडलेल्या एखाद्या गंभीर पापामुळे “अस्वस्थ करणारे विचार” आपल्याला सतावत असतील तर काय? (स्तोत्र ३२:१-५ वाचा.) दोषी विवेकाचा आवाज दाबून टाकण्याचा जर आपण प्रयत्न केला, तर उन्हाळ्यात सुकून जाणाऱ्या झाडाप्रमाणे आपल्याला अगदी क्षीण व दुर्बल झाल्यासारखे वाटू शकते. दाविदाने केलेल्या पापामुळे तो अतिशय खिन्न झाला आणि याचा कदाचित त्याच्या स्वास्थ्यावरही परिणाम झाला असेल. पण देवाजवळ आपले पाप कबूल केल्यामुळे त्याचे मन किती हलके झाले! यहोवाने आपल्या ‘अपराधाची क्षमा केली आहे’ अशी जाणीव झाली तेव्हा दाविदाला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा! देवाजवळ पाप कबूल केल्याने एका व्यक्तीला दोषभावनेपासून सुटका मिळू शकते. यासोबतच ख्रिस्ती वडिलांची मदत घेतल्यामुळे तिला आपले आध्यात्मिक आरोग्यही पुन्हा मिळवण्यास साहाय्य मिळते.—नीति. २८:१३; याको. ५:१३-१६.
विनंती करण्यासोबतच आभारही माना
५. एखाद्या गोष्टीविषयी खूप चिंता वाटत असल्यास आपण काय केले पाहिजे?
५ आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल खूप चिंता वाटत असेल, तर आपण पौलाच्या या सल्ल्याचे पालन केले पाहिजे: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.” (फिलिप्पै. ४:६) विशेषतः, आपण धोकेदायक परिस्थितीत सापडतो किंवा आपला छळ होतो तेव्हा आपण यहोवाला मदतीसाठी व मार्गदर्शनासाठी कळकळीची विनंती केली पाहिजे.
६, ७. प्रार्थनेत आपण कोणकोणत्या गोष्टींबद्दल देवाचे आभार मानले पाहिजेत?
६ पण, आपल्याला काही हवे असते केवळ तेव्हाच आपण यहोवाला प्रार्थना केल्यास, यावरून आपल्या हेतूंबद्दल काय १ इति. २९:११-१३.
दिसून येईल? पौलाने म्हटले की आपण “आभारप्रदर्शनासह” आपली मागणी देवाला कळवावी. दाविदाप्रमाणे देवाचे आभार मानण्याकरता आपल्याजवळही भरपूर कारणे आहेत. दाविदाने या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या: “हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच; आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच; हे परमेश्वरा; राज्यहि तुझेच; तू सर्वांहून श्रेष्ठ व उन्नत आहेस. धन व मान तुजपासूनच प्राप्त होतात, व तू सर्वांवर प्रभुत्व करितोस; सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहेत; लोकांस थोर करणे व सर्वांस सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे. तर आता आमच्या देवा, आम्ही तुझे आभार मानितो, तुझ्या प्रतापी नामाची स्तुति करितो.”—७ येशूने अन्नाबद्दल, तसेच प्रभूच्या सांज भोजनाच्या प्रसंगी भाकरी व द्राक्षारसाबद्दल देवाचे आभार मानले. (मत्त. १५:३६; मार्क १४:२२, २३) आपणही अशा प्रकारे आभार व्यक्त केले पाहिजेत. त्यासोबतच, यहोवाने “मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुतकृत्यांबद्दल,” त्याच्या “न्याय्य निर्णयांबद्दल” तसेच आज आपल्याला उपलब्ध असलेल्या बायबलमधील त्याच्या वचनाबद्दल किंवा संदेशाबद्दलही आपण यहोवाचे “उपकारस्मरण” केले पाहिजे.—स्तो. १०७:१५; ११९:६२, १०५.
इतरांसाठी प्रार्थना करा
८, ९. आपण आपल्या ख्रिस्ती बांधवांकरता प्रार्थना का केली पाहिजे?
८ आपण स्वतःसाठी तर प्रार्थना करतोच, पण इतरांसाठी, अगदी ज्यांची नावे आपल्याला माहीत नाहीत अशा ख्रिस्ती बांधवांसाठीही आपण प्रार्थना केली पाहिजे. पौलाला कलस्सै येथील सर्व बांधवांची नावे कदाचित माहीत नसतील, तरीही त्याने असे लिहिले: “ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास व तुमची सर्व पवित्र जनांवरील प्रीती, ह्याविषयी ऐकून, आम्ही तुमच्यासाठी जेव्हा प्रार्थना करितो तेव्हा स्वर्गात तुम्हासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा पिता देव ह्याची उपकारस्तुति करितो.” (कलस्सै. १:३, ४) त्याच प्रकारे थेस्सलनीका येथील ख्रिस्ती बांधवांसाठीही पौलाने प्रार्थना केली. (२ थेस्सलनी. १:११, १२) अशा प्रकारच्या प्रार्थना आपल्याविषयी तसेच ख्रिस्ती बंधूभगिनींकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनाविषयी बरेच काही सांगून जातात.
९ अभिषिक्त ख्रिश्चनांसाठी तसेच त्यांच्या ‘दुसऱ्या मेंढरांतील’ साथीदारांसाठी जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा देवाच्या संघटनेबद्दल आपल्याला आस्था आहे हे दिसून येते. (योहा. १०:१६) पौलाने ‘सुवार्तेचे रहस्य उघडपणे बोलता यावे’ म्हणून आपल्यासाठी प्रार्थना करण्याची सहख्रिस्ती बांधवांना विनंती केली. (इफिस. ६:१७-२०) आपण अशा प्रकारे आपल्या ख्रिस्ती बांधवांकरता प्रार्थना करतो का?
१०. इतरांकरता प्रार्थना केल्यामुळे आपल्यावर कोणता प्रभाव पडू शकतो?
१० इतरांसाठी प्रार्थना केल्याने त्यांच्याप्रती आपली मनोवृत्तीही बदलू शकते. एखादा बंधू किंवा बहीण कदाचित आपल्याला तितकी आवडत नसेल. पण त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केल्यास आपण तिचा द्वेष करणे कसे शक्य आहे? (१ योहा. ४:२०, २१) आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्तींसाठीही प्रार्थना करणे आपल्याकरता उन्नतीकारक आहे आणि असे केल्यामुळे आपल्या बांधवांसोबत ऐक्याने राहण्याचे प्रोत्साहन आपल्याला मिळते. शिवाय, अशा प्रकारच्या प्रार्थनांवरून आपण ख्रिस्ताच्या प्रीतीचे अनुकरण करत आहोत हे दिसून येते. (योहा. १३:३४, ३५) ही प्रीती देवाच्या आत्म्याच्या फळाचा एक भाग आहे. आपण पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना करतो का? या आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ, अर्थात प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता व इंद्रियदमन यांसारखे गुण प्रदर्शित करण्यास साहाय्य करण्याची आपण यहोवाला विनंती करतो का? (लूक ११:१३; गलती. ५:२२, २३) अशी प्रार्थना करत असल्यास, आपण देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालतो हे आपल्या शब्दांतून व कृतींतून दिसून येईल.—गलतीकर ५:१६, २५ वाचा.
११. इतरांना आपल्याकरता प्रार्थना करायला सांगणे उचित आहे असे आपण का म्हणू शकतो?
२ करिंथ. १३:७) अशा प्रकारच्या नम्र प्रार्थनांमुळे यहोवाचे मन आनंदित होते आणि त्यांवरून आपल्याठायी योग्य मनोवृत्ती असल्याचे दिसून येते. (नीतिसूत्रे १५:८ वाचा.) प्रेषित पौलाप्रमाणेच आपणही इतरांना आपल्याकरता प्रार्थना करण्याची विनंती करू शकतो. पौलाने लिहिले: “आमच्यासाठी प्रार्थना करीत राहा; सर्व बाबतींत चांगले वागण्याची आमची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला आहे अशी आमची खातरी आहे.”—इब्री १३:१८.
११ आपल्या मुलांना परीक्षेच्या वेळी कॉपी करण्याचा मोह होतो असे लक्षात आल्यास आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे आणि त्यासोबतच त्यांनी प्रामाणिकपणे वागावे व कोणतीही चुकीची गोष्ट करू नये म्हणून त्यांना बायबलमधून सल्लाही दिला पाहिजे. पौलाने करिंथ येथील ख्रिस्ती बांधवांना असे सांगितले: “आम्ही देवाजवळ अशी प्रार्थना करितो की, तुम्ही काही वाईट करू नये.” (आपल्या प्रार्थना आणखीही बरेच काही सांगतात
१२. आपल्या प्रार्थनांचे मुख्य विषय कोणते असले पाहिजेत?
१२ आपण यहोवाचे आनंदी व उत्साही साक्षीदार आहोत हे आपल्या प्रार्थनांवरून दिसून येते का? आपल्या विनंत्या प्रामुख्याने देवाची इच्छा पूर्ण करणे, राज्याच्या संदेशाचा प्रचार करणे, यहोवाचे सार्वभौमत्व सिद्ध केले जाणे आणि त्याचे नाव पवित्र केले जाणे यांसारख्या विषयांवर केंद्रित असतात का? येशूने शिकवलेल्या आदर्श प्रार्थनेवरून दिसून येते त्याप्रमाणे हे आपल्या प्रार्थनांचे मुख्य विषय असले पाहिजेत. त्या प्रार्थनेची सुरुवातच येशूने या शब्दांनी केली: “हे आमच्या स्वर्गांतील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.”—मत्त. ६:९, १०.
१३, १४. आपल्या प्रार्थनांतून आपल्याबद्दल काय दिसून येते?
१३ आपल्या प्रार्थनांतून आपले हेतू, आस्था आणि इच्छा-आकांक्षा प्रकट होतात. आपण मुळात कशा प्रकारची व्यक्ती आहोत हे यहोवाला चांगले माहीत आहे. नीतिसूत्रे १७:३ म्हणते: “रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदये पारखितो.” आपल्या मनात काय आहे हे यहोवा पाहू शकतो. (१ शमु. १६:७) सभांविषयी, सेवाकार्याविषयी तसेच मंडळीतील बंधुभगिनींविषयी आपल्या भावना काय आहेत ते तो जाणतो. ख्रिस्ताच्या ‘बंधूंविषयी’ आपण कशा प्रकारे विचार करतो हे त्याला माहीत आहे. (मत्त. २५:४०) आपण ज्या गोष्टींकरता प्रार्थना करतो त्या आपल्याला खरोखरच हव्या आहेत, की आपण केवळ सवयीने काही शब्दांचा पुनरुच्चार करतो हे यहोवा ओळखतो. येशूने म्हटले: “तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका, आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते.”—मत्त. ६:७.
१४ आपण प्रार्थनेत जे व्यक्त करतो त्यावरून आपण यहोवावर कितपत विसंबून राहतो हे देखील दिसून येते. दाविदाने यहोवाला म्हटले “तू माझा आश्रय, वैऱ्यापासून लपण्यास बळकट दुर्ग, असा होत आला आहेस. तुझ्या मंडपात मी सर्वकाळ राहीन; मी तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय घेईन.” (स्तो. ६१:३, ४) देव ‘आपल्यावर त्याचा मंडप विस्तृत करतो’ तेव्हा आपण सुरक्षितता व त्याची प्रेमळ काळजी अनुभवतो. (प्रकटी. ७:१५) आपल्या विश्वासाची परीक्षा घेणाऱ्या कोणत्याही प्रसंगाला तोंड देताना प्रार्थनेद्वारे यहोवाच्या जवळ येणे आणि तो आपल्या “पक्षाचा आहे” हा भरवसा बाळगणे खरोखरच किती दिलासादायक आहे!—स्तोत्र ११८:५-९ वाचा.
१५, १६. मंडळीतील सेवेचे विशेषाधिकार प्राप्त करण्याच्या आपल्या इच्छेबद्दल कोणती गोष्ट समजण्यास प्रार्थना आपल्याला मदत करू शकते?
१५ आपल्या हेतूंबद्दल प्रामाणिकपणे यहोवाला प्रार्थना केल्यास, ते किती प्रांजळ आहेत हे समजण्यास आपल्याला मदत होईल. उदाहरणार्थ, जर आपण ख्रिस्ती मंडळीत जबाबदारीच्या पदावर सेवा करण्यास उत्सुक असू, तर यामागे इतरांना मदत करण्याची आणि राज्याशी संबंधित कार्यांना आपल्याकडून होईल तितका हातभार लावण्याची नम्र इच्छा आहे का? की आपल्याला “अग्रगण्य होण्याची” किंवा इतरांवर ‘प्रभुत्व करण्याची’ इच्छा आहे? (३ योहान ९, १०; लूक २२:२४-२७ वाचा.) आपल्या मनात चुकीच्या इच्छा असल्यास, आपण यहोवा देवाला प्रामाणिकपणे प्रार्थना करतो तेव्हा त्या आपल्या लक्षात येतील आणि आपल्या मनात त्या मुळावण्याअगोदर त्यांमध्ये बदल करण्यास आपल्याला साहाय्य मिळेल.
१६ ख्रिस्ती पत्नींना कदाचित आपल्या पतीने मंडळीत सेवा सेवक व पुढे वडील म्हणून सेवा करावी अशी मनस्वी इच्छा असेल. या बहिणी आपली ही इच्छा आपल्या वैयक्तिक प्रार्थनेत व्यक्त करू शकतात. आणि त्यासोबतच आपल्या उत्तम आचरणाद्वारे ते इतरांसाठी एक चांगले उदाहरण बनण्याचा प्रयत्न करू शकतात. हे महत्त्वाचे आहे, कारण एका पुरुषाकडे मंडळीत कशा दृष्टिकोनाने पाहिले जाते हे बऱ्याच अंशी त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या वागण्याबोलण्यावरही अवलंबून असते.
इतरांच्या वतीने चारचौघांत प्रार्थना करणे
१७. वैयक्तिक प्रार्थना एकांतात करण्याचे कोणते फायदे आहेत?
१७ कधीकधी येशू आपल्या पित्याला प्रार्थना करण्यासाठी लोकांच्या गर्दीपासून दूर एकांतात निघून जायचा. (मत्त. १४:१३; लूक ५:१६; ६:१२) आपणही वेळोवेळी अशा प्रकारे एकांतात प्रार्थना करणे गरजेचे आहे. शांत वातावरणात व शांत मनस्थितीत प्रार्थना केल्यास, आपण यहोवाच्या दृष्टीने योग्य व आध्यात्मिक दृष्ट्या आपल्याकरता हितकारक ठरतील असे निर्णय घेण्याची जास्त शक्यता आहे. पण एकांतात प्रार्थना करण्यासोबतच येशूने अनेकदा चारचौघांतही प्रार्थना केली. आपण चारचौघांत प्रार्थना करतो तेव्हा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत यावर विचार करणे योग्य ठरेल.
१८. मंडळीच्या वतीने प्रार्थना करताना बांधवांनी कोणत्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
१८ आपल्या सभांमध्ये विश्वासू पुरुष मंडळीच्या वतीने प्रार्थना करतात. (१ तीम. २:८) अशा प्रार्थनांच्या शेवटी, इतर बंधुभगिनींना “आमेन” म्हणजेच “असेच होवो” असे म्हणता आले पाहिजे. पण त्यासाठी प्रार्थनेत जे म्हटले जाते त्याच्याशी सर्वांनी सहमत असणे आवश्यक आहे. येशूने शिकवलेल्या आदर्श प्रार्थनेत, ऐकणाऱ्यांना धक्का बसेल किंवा त्यांच्या भावना दुखावल्या जातील असे काहीही त्याने म्हटले नाही. (लूक ११:२-४) तसेच, त्याच्या श्रोत्यांपैकी प्रत्येकाच्या वैयक्तिक गरजांचा किंवा समस्यांचा त्याने एकेक करून प्रार्थनेत उल्लेख केला नाही. वैयक्तिक गरजा व समस्यांबद्दल चारचौघांत नव्हे तर वैयक्तिक रीत्या केलेल्या प्रार्थनेत उल्लेख केला जाऊ शकतो. शिवाय, इतरांच्या वतीने चारचौघांत प्रार्थना करताना आपण गोपनीय माहितीचा समावेश न करण्याचीही काळजी घेतली पाहिजे.
१९. प्रार्थना केली जात असताना आपण कशा प्रकारे वागावे?
१९ आपल्या वतीने प्रार्थना केली जात असताना आपण देवाबद्दल आदरयुक्त “भय” दाखवले पाहिजे. (१ पेत्र २:१७) काही गोष्टी इतर वेळी किंवा इतर ठिकाणी योग्य असल्या, तरी ख्रिस्ती सभेदरम्यान त्या गोष्टी करणे योग्य ठरणार नाही. (उप. ३:१) उदाहरणार्थ, प्रार्थना करताना सर्व उपस्थितांना एकमेकांच्या हातात हात घालून किंवा हात धरून उभे राहण्यास सांगणे. ही गोष्ट बांधवांपैकी किंवा आपले विश्वास न मानणाऱ्या नवीन लोकांपैकी काही जणांना खटकू शकते किंवा यामुळे त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते. काही पतीपत्नी प्रार्थनेदरम्यान इतरांचे लक्ष न वेधता एकमेकांचे हात धरत असतील, पण ते एकमेकांना बिलगून उभे राहिल्यास, पाहणाऱ्यांना ही गोष्ट अडखळणाचे कारण ठरू शकते. यहोवाला आदर दाखवण्याऐवजी हे जोडपे एकमेकांवर असलेल्या प्रेमावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे असा पाहणाऱ्यांचा ग्रह होण्याची शक्यता आहे. तेव्हा, यहोवाबद्दल मनःपूर्वक आदर दाखवून आपण ‘जे काही करतो ते सर्व देवाच्या गौरवासाठी’ करू या आणि इतरांचे लक्ष विचलित होईल, किंवा त्यांना धक्का बसेल अथवा अडखळण ठरेल अशा प्रकारे वागण्याचे टाळू या.—१ करिंथ. १०:३१, ३२; २ करिंथ. ६:३.
कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करावी?
२०. रोमकर ८:२६, २७ या वचनांचा अर्थ स्पष्ट करा.
२० काही वेळा, आपल्या वैयक्तिक प्रार्थनांत काय म्हणावे हे आपल्याला कळत नाही. पौलाने लिहिले: “आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही; पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करितो; पण अंतर्यामे पारखणाऱ्याला [देवाला] त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे.” (रोम. ८:२६, २७) यहोवाने बायबलच्या लेखकांना अनेक प्रार्थना नमूद करण्याची प्रेरणा दिली. या देवप्रेरित प्रार्थनांतील शब्द आपण आपल्या प्रार्थनेत वापरतो, तेव्हा आपणच त्या विनंत्या करत आहोत असे मानून यहोवा आपल्याला त्यांचे उत्तर देतो. देव आपल्याला चांगल्या प्रकारे जाणतो. तसेच, त्याच्या आत्म्याद्वारे त्याने बायबल लेखकांकडून ज्या गोष्टी लिहून घेतल्या आहेत त्यांचा अर्थही त्याला माहीत आहे. म्हणून, पवित्र आत्मा आपल्यासाठी “मध्यस्थी” करतो म्हणजेच आपल्या वतीने बोलतो तेव्हा यहोवा आपल्या विनंत्यांचे उत्तर देतो. जसजसे आपण देवाच्या वचनाचा अधिकाधिक अभ्यास करू तसतसे प्रार्थनेत काय बोलावे हे आपल्याला सहज सुचेल.
२१. पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?
२१ तर आतापर्यंत आपण पाहिल्याप्रमाणे, आपल्या प्रार्थना खरोखरच आपल्याविषयी खूप काही सांगतात. उदाहरणार्थ, यहोवासोबत आपला किती जवळचा नातेसंबंध आहे आणि त्याच्या वचनाशी आपण कितपत परिचित आहोत हे आपल्या प्रार्थनांवरून दिसते. (याको. ४:८) पुढील लेखात आपण बायबलमध्ये नमूद असलेल्या काही प्रार्थनांचे व प्रार्थनापूर्वक मनोवृत्तीने व्यक्त केलेल्या विचारांचे परीक्षण करू या. अशा प्रकारचे परीक्षण केल्यामुळे आपल्या प्रार्थनांवर कोणता प्रभाव पडेल?
तुमचे उत्तर काय असेल?
• देवाला प्रार्थना करताना आपण कोणती मनोवृत्ती बाळगली पाहिजे?
• आपल्या बंधुभगिनींसाठी आपण प्रार्थना का केली पाहिजे?
• आपल्या प्रार्थना आपल्याविषयी व आपल्या हेतूंविषयी काय प्रकट करू शकतात?
• प्रार्थना केली जात असताना आपण कशा प्रकारे वागावे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[४ पानांवरील चित्र]
तुम्ही नियमितपणे यहोवाची स्तुती करता व आभार मानता का?
[६ पानांवरील चित्र]
प्रार्थनेच्या वेळी आपली वागणूक नेहमी यहोवाला आदर देणारी असली पाहिजे