तुम्हाला आठवते का?
तुम्हाला आठवते का?
तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? पुढील प्रश्नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:
• अहरोनाने सोन्याचे वासरू बनवले तेव्हा यहोवाने त्याला शिक्षा का केली नाही?
अहरोनाने मूर्तिपूजेबद्दल असलेल्या देवाच्या नियमाचे उल्लंघन केले होते हे खरे आहे. (निर्ग. २०:३-५) तरीपण, मोशेने अहरोनासाठी देवाला प्रार्थना केली आणि ती प्रार्थना “फार प्रबळ” ठरली. (याको. ५:१६) अहरोनाने अनेक वर्षे विश्वासूपणे यहोवाची सेवा केली होती. सोन्याचे वासरू बनवण्यासाठी लोकांनी जरी अहरोनाला गळ घातली असली, तरी नंतर त्याने दाखवून दिले की त्याचा खरेतर या मूर्तिपूजेला मनापासून पाठिंबा नव्हता. कारण, तो लेवी वंशाच्या सर्व लोकांसह खंबीरपणे यहोवाच्या बाजूने उभा राहिला. (निर्ग. ३२:२५-२९)—५/१५, पृष्ठ २१.
• विवाहसोबती व्यभिचार करतो, तेव्हा त्या परिस्थितीचा सामना करण्यास कोणती गोष्ट एका ख्रिस्ती व्यक्तीला मदत करू शकते?
निर्दोष साथीदार बायबलमधील तत्त्वांनुसार जगण्याचा प्रयत्न करत असल्यास, व्यभिचारी साथीदाराने केलेल्या विश्वासघाताबद्दल त्याने स्वतःला दोष देण्याची गरज नाही. तुम्हाला सांत्वनाची व प्रोत्साहनाची गरज आहे याची यहोवाला जाणीव आहे. तो मंडळीतील बंधुभगिनींद्वारे सांत्वन पुरवू शकतो.—६/१५, पृष्ठे ३०-३१.
• तुम्ही आपल्या मुलांमध्ये वाचनाची आवड कशी निर्माण करू शकता?
प्रेमळ वातावरण आणि आईवडिलांचे उत्तम उदाहरण मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यात साहाय्यक ठरतात. तसेच, त्यांना पुस्तके द्या. त्यांच्याकरता मोठ्याने वाचा. त्यांना बोलू द्या आणि वाचलेल्या गोष्टींची चर्चा करा. मुलांना तुमच्यासाठी वाचायला सांगा आणि प्रश्न विचारण्यास वाव द्या.—७/१५, पृष्ठ २६.