तुम्हाला आठवते का?
तुम्हाला आठवते का?
तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? पुढील प्रश्नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:
• अप्रामाणिकपणे वागण्याच्या प्रवृत्तीचा प्रतिकार करण्यासाठी कोणत्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला मदत करू शकतात?
त्या तीन गोष्टी आहेत: (१) देवाबद्दल हितकारक भय विकसित करा. (१ पेत्र ३:१२) (२) बायबल प्रशिक्षित विवेक विकसित करा. (३) आत्मसंतुष्टतेची भावना विकसित करण्यासाठी खूप परिश्रम घ्या.—४/१५, पृष्ठे ६-७.
• गांभीर्याने देवाची सेवा करण्याचा अर्थ, आपल्या चेहऱ्यावर नेहमी गंभीर भाव असले पाहिजेत किंवा आपण विश्रांती घेऊ नये असा होत नाही असे आपण कसे म्हणू शकतो?
आपण येशूचे उदाहरण विचारात घेऊ शकतो. त्याने आनंददायक वातावरणात इतरांसोबत अन्नाचा आस्वाद घेतला. तो अतिशय गंभीर किंवा कडक स्वभावाचा नव्हता हे आपल्याला माहीत आहे. इतरांना, अगदी लहान मुलांनासुद्धा, त्याच्याजवळ येण्यास आवडायचे.—४/१५, पृष्ठ १०.
• रोमकरांस पत्राच्या ११ व्या अध्यायातील जैतुनाच्या झाडाच्या उदाहरणाद्वारे काय चित्रित करण्यात आले होते?
जैतुनाच्या झाडाचे उदाहरण अब्राहामाच्या संततीच्या दुय्यम भागाविषयी म्हणजे आध्यात्मिक इस्राएलविषयी आहे. यहोवा या लाक्षणिक जैतुनाच्या झाडाच्या मुळासारखा आणि येशू त्या झाडाच्या बुंध्यासारखा आहे. स्वाभाविक यहुद्यांपैकी बहुतेकांनी येशूला नाकारले, तेव्हा त्यांच्या जागी ख्रिस्ती बनलेल्या गैर-यहुदी लोकांचे कलम केले जाऊ शकत होते, आणि अशा प्रकारे अब्राहामाच्या संततीचा दुय्यम भाग बनणाऱ्यांची संख्या पूर्ण होऊ शकत होती.—५/१५, पृष्ठे २२-२५.
• परिपूर्ण मनुष्य येशू याचे संभाव्य वंशज खंडणीचा बाग बनू शकले असते का?
नाही. येशू, कोट्यवधी परिपूर्ण वंशजांचा पिता बनू शकला असता, पण हे संभाव्य वंशज खंडणीचा भाग नव्हते. केवळ येशूचे परिपूर्ण जीवनच आदामाच्या परिपूर्ण जीवनाच्या समतुल्य होते. (१ तीम. २:६)—६/१५, पृष्ठ १३.
• प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३० मध्ये खोट्या शिक्षकांविषयी नमूद असलेल्या ताकिदीचे खरे ख्रिस्ती मनापासून पालन करतात हे ते कशा प्रकारे दाखवू शकतात?
खरे ख्रिस्ती खोट्या शिक्षकांना आपल्या घरात घेत नाहीत किंवा त्यांना अभिवादन करत नाहीत. (रोम. १६:१७; २ योहा. ९-११) ते धर्मत्यागी लोकांची पुस्तके वाचत नाहीत, त्यांचे टीव्ही कार्यक्रम पाहत नाहीत, आणि इंटरनेटवर त्यांनी लिहिलेली माहिती वाचत नाहीत.—७/१५, पृष्ठे १५-१६.