तुम्हाला माहीत होते का?
तुम्हाला माहीत होते का?
येशूसोबत ज्या अपराध्यांना वधस्तंभावर खिळण्यात आले होते त्यांनी कोणता अपराध केला होता?
▪ बायबलमध्ये या अपराध्यांना “लुटारू” असे म्हटले आहे. (मत्त. २७:३८; मार्क १५:२७) बायबलच्या काही शब्दकोशांमध्ये सांगितले आहे की बायबलमध्ये विशिष्ट अपराध्यांकरता विशिष्ट शब्द वापरण्यात आले आहेत. क्लेप्टीस हा ग्रीक शब्द चोराला सूचित करतो, जो पकडला जाऊ नये म्हणून गुप्तपणे काम करतो. यहूदा इस्कर्योतविषयी बोलताना हाच शब्द वापरण्यात आला आहे; तो शिष्यांच्या पैशाच्या पेटीतून गुप्तपणे पैसे चोरायचा. (योहा. १२:६) तर दुसरीकडे, लीस्टीस हा ग्रीक शब्द सहसा अशा व्यक्तीला सूचित करतो, जो हिंसेचा वापर करून बळजबरीने इतरांना लुटतो; शिवाय हा शब्द क्रांतिकारी, विद्रोही यांनादेखील सूचित करू शकतो. येशूसोबत ज्या अपराध्यांना मारण्यात आले होते ते या दुसऱ्या प्रकारात मोडतात. खरेतर, त्यांच्यापैकी एकाने असे म्हटल्याचे बायबलमध्ये नमूद आहे: “आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगीत आहो.” (लूक २३:४१) यावरून सूचित होते की ते केवळ चोरीच्या गुन्ह्यासाठी शिक्षा भोगत नव्हते.
त्या दोन लुटारूंप्रमाणेच बरब्बासाठीदेखील लीस्टीस हा शब्द वापरण्यात आला आहे. (योहा. १८:४०) बरब्बा हा केवळ एक साधारण चोर नव्हता हे लूक २३:१९ या वचनातून आणखी स्पष्टपणे दिसून येते. तेथे म्हटले आहे, की तो “शहरात झालेला दंगा व खून ह्यासंबंधात तुरुंगात टाकलेला होता.”
म्हणून येशूसोबत ज्यांना मारण्यात आले होते ते लुटारू असले, तरी त्यांनी विद्रोह केला असल्याची किंवा हत्यादेखील केली असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. काहीही असो, रोमन राज्यपाल पंतय पिलात याच्या दृष्टीत ते अपराधी वधस्तंभावरील मृत्यूस पात्र होते. (w१२-E ०२/०१)