व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाने नेमलेल्या मेंढपाळांचे ऐका

यहोवाने नेमलेल्या मेंढपाळांचे ऐका

“आपल्या अधिकाऱ्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण . . . ते तुमच्या जिवांची राखण करतात.”—इब्री १३:१७.

१, २. यहोवाने स्वतःची तुलना एका प्रेमळ मेंढपाळाशी का केली?

 यहोवा स्वतःची तुलना एका मेंढपाळाशी करतो. (यहे. ३४:११-१४) यावरून, यहोवा नेमका कसा आहे हे समजण्यास आपल्याला मदत मिळते. प्रेमळ मेंढपाळाला याची जाणीव असते की त्याच्या कळपातील मेंढरांचे रक्षण करण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. म्हणून, तो मेंढरांना कुरणांमध्ये आणि पाण्याच्या झऱ्‍यांजवळ नेतो (स्तो. २३:१, २); दिवसरात्र त्यांची राखण करतो (लूक २:८); हिंस्र पशूंपासून त्यांचे संरक्षण करतो (१ शमु. १७:३४, ३५); नवीन जन्मलेल्या कोकरांना आपल्या कवेत घेतो (यश. ४०:११); हरवलेल्यांचा शोध घेतो आणि जखमी झालेल्यांची मलमपट्टी करून त्यांची काळजी घेतो.—यहे. ३४:१६.

प्राचीन काळातील यहोवाचे बहुतेक लोक स्वतः मेंढपाळ आणि शेतकरी होते. त्यामुळे, यहोवाने स्वतःची तुलना एका प्रेमळ मेंढपाळाशी का केली हे त्यांना समजले असावे. त्यांना माहीत होते, की मेंढरे सुदृढ राहावीत म्हणून त्यांची काळजी घेणे व त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याच प्रकारे, लोकांनाही यहोवाच्या मार्गदर्शनाची व संरक्षणाची गरज आहे. (मार्क ६:३४) आध्यात्मिक रीत्या लोकांची चांगल्या प्रकारे काळजी न घेतल्यास व त्यांचे मार्गदर्शन न केल्यास लोकांना त्रास सहन करावा लागतो. ते आध्यात्मिकदृष्ट्या कमजोर होतात आणि नैतिकदृष्ट्या भरकटतात. ते जणू “मेंढपाळावाचून असलेल्या मेंढरांसारखे” होतात. (१ राजे २२:१७) पण, यहोवा मात्र प्रेमळपणे आपल्या लोकांच्या गरजा पूर्ण करतो.

३. या लेखात आपण कशाची चर्चा करणार आहोत?

यहोवा आपल्या काळातही एका मेंढपाळासारखा आहे. कारण, तो आजही त्याच्या मेंढरांसमान लोकांच्या गरजा पूर्ण करत आहे. यहोवा आज कशा प्रकारे त्याच्या मेंढरांचे मार्गदर्शन करत आहे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करत आहे ते आपण पाहू या. तसेच, तो प्रेमळपणे आपल्या मेंढरांची काळजी घेतो तेव्हा मेढरांनी कसा प्रतिसाद दिला पाहिजे तेदेखील आपण पाहू या.

उत्तम मेंढपाळ इतर मेंढपाळांना नेमतो

४. येशू कशा प्रकारे यहोवाच्या मेंढरांची काळजी घेतो?

यहोवाने येशूला ख्रिस्ती मंडळीचे मस्तक म्हणून नेमले आहे. (इफिस. १:२२, २३) येशू उत्तम मेंढपाळ असल्यामुळे तो त्याच्या पित्याप्रमाणेच मेंढरांवर प्रेम करतो व त्यांची काळजी घेतो. येशूने तर “मेंढरांकरता आपला प्राण” देखील दिला. (योहा. १०:११, १४) ख्रिस्ताने दिलेले खंडणी बलिदान मानवजातीकरता खूप मोठा आशीर्वाद आहे. (मत्त. २०:२८) असे आपण का म्हणू शकतो? कारण यहोवाची इच्छा आहे, की “जो कोणी [येशूवर] विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहा. ३:१६.

५, ६. (क) येशूने त्याच्या मेंढरांची काळजी घेण्याकरता कोणाला नेमले आहे, आणि या तरतुदीचा फायदा घेण्यासाठी मेंढरांनी काय केले पाहिजे? (ख) मंडळीतील वडिलांच्या आज्ञेत राहण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण काय आहे?

मेंढरे उत्तम मेंढपाळाला म्हणजे येशू ख्रिस्ताला कसा प्रतिसाद देतात? येशूने म्हटले: “माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतात.” (योहा. १०:२७) उत्तम मेंढपाळाची वाणी ऐकणे म्हणजे सर्व गोष्टींमध्ये त्याच्या मार्गदर्शनाचे पालन करणे. यात त्याने नेमलेल्या आध्यात्मिक मेंढपाळांना सहकार्य देणेही समाविष्ट आहे. पहिल्या शतकात, येशूने त्याच्या अनुयायांचे मार्गदर्शन करण्यासाठी त्याच्या प्रेषितांना व शिष्यांना नेमले. त्याने आपल्या लहान मेंढरांना ‘शिकवण्याची’ व ‘चारण्याची’ जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. (मत्त. २८:२०; योहान २१:१५-१७ वाचा.) जसजसा सुवार्तेचा प्रसार होत गेला, तसतशी शिष्यांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे, मंडळ्यांचे आध्यात्मिक रीत्या मार्गदर्शन करण्यासाठी येशूने प्रौढ ख्रिश्‍चनांची नेमणूक केली.—इफिस. ४:११, १२.

पहिल्या शतकात, इफिसस येथील मंडळीतील वडिलांशी बोलताना पौलाने त्यांना सांगितले, की देवाच्या मंडळीचे पालन करण्यासाठी पवित्र आत्म्याने त्यांना वडील म्हणून नेमले आहे. (प्रे. कृत्ये २०:२८) आजच्या काळातील ख्रिस्ती वडिलांनाही पवित्र आत्म्याद्वारे नेमण्यात आले आहे. असे आपण का म्हणू शकतो? कारण देवाच्या प्रेरित वचनात असलेल्या पात्रतांच्या आधारावर त्यांना नेमण्यात आले आहे. म्हणून, आपण ख्रिस्ती वडिलांच्या आज्ञांचे पालन करतो तेव्हा आपण दोन सर्वश्रेष्ठ मेंढपाळांना म्हणजे यहोवाला आणि येशूला आदर दाखवत असतो. (लूक १०:१६) या सर्वात महत्त्वाच्या कारणामुळेच आपण वडिलांच्या अधीन राहण्याची इच्छा बाळगली पाहिजे. पण, आपण अशी इच्छा का बाळगली पाहिजे याची इतरही कारणे आहेत.

७. यहोवासोबतचा घनिष्ठ नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी वडील कशा प्रकारे मदत करतात?

मंडळीतील वडील थेट शास्त्रवचनांच्या आधारे किंवा शास्त्रवचनांत असलेल्या सिद्धान्तांच्या आधारे प्रोत्साहन आणि सल्ला देतात. बंधुभगिनींच्या जीवनातील प्रत्येक लहानसहान गोष्टीवर नियंत्रण ठेवणे हा यामागचा उद्देश नाही. (२ करिंथ. १:२४) त्याऐवजी, बांधवांना चांगले निर्णय घेता यावेत म्हणून त्यांना शास्त्रवचनांतून मार्गदर्शन देणे आणि मंडळीत शांती व सुव्यवस्था राखण्याचे प्रोत्साहन देणे हा त्यामागचा हेतू आहे. (१ करिंथ. १४:३३, ४०) वडील आपल्या बांधवांच्या “जिवांची राखण करतात.” म्हणजे, ते मंडळीतील प्रत्येकाला यहोवासोबत असलेला घनिष्ठ नातेसंबंध टिकवून ठेवण्यास मदत करू इच्छितात. म्हणूनच, एखादा बंधू किंवा भगिनी चुकीचा निर्णय घेण्याच्या मार्गावर आहे किंवा त्यांनी चुकीचा निर्णय घेतला आहे हे त्यांच्या लक्षात येते, तेव्हा अशांना मदत करण्यासाठी ते लगेच पाऊल उचलतात. (गलती. ६:१, २; यहू. २२) तर मग, आपले मार्गदर्शन करण्यासाठी नेमलेल्यांच्या आज्ञेत राहण्याची ही योग्य कारणे नाहीत का?—इब्री लोकांस १३:१७ वाचा.

८. वडील कशा प्रकारे देवाच्या कळपाचे संरक्षण करतात?

स्वतः एक आध्यात्मिक मेंढपाळ असलेल्या पौलाने कलस्सै येथील बांधवांना असे लिहिले: “ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या.” (कलस्सै. २:८) आपण वडिलांच्या शास्त्रवचनीय सल्ल्याकडे का लक्ष दिले पाहिजे याचे आणखी एक कारण पौलाने दिलेल्या ताकिदीवरून दिसून येते. जे लोक बंधुभगिनींना यहोवापासून दूर नेऊ इच्छितात अशांपासून वडील त्यांचे संरक्षण करतात. प्रेषित पेत्राने खोट्या संदेष्ट्यांविषयी आणि खोट्या शिक्षकांविषयी ताकीद दिली, जे “अस्थिर मनाच्या लोकांना” पाप करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात. (२ पेत्र २:१, १४) आजच्या काळातील वडिलांनीही गरज पडते तेव्हा अशा प्रकारची ताकीद दिली पाहिजे. प्रौढ ख्रिस्ती असल्यामुळे त्यांना जीवनाचा अनुभव आहे. शिवाय, वडील म्हणून नेमले जाण्याआधी त्यांनी दाखवून दिले होते, की त्यांना शास्त्रवचनांची सुस्पष्ट समज आहे आणि जे योग्य आहे ते शिकवण्यास ते पात्र आहेत. (१ तीम. ३:२; तीत १:९) त्यांची प्रौढता, संतुलित दृष्टिकोन आणि बायबल प्रशिक्षित बुद्धी यांमुळे ते कळपाचे कुशलतेने मार्गदर्शन करू शकतात.

प्रेमळ मेंढपाळाप्रमाणे मंडळीतील वडील त्यांच्या अधीन असलेल्यांचे संरक्षण करतात (परिच्छेद ८ पाहा)

उत्तम मेंढपाळ मेंढरांचे पालनपोषण आणि संरक्षण करतो

९. येशू ख्रिस्त आज कशा प्रकारे मंडळीचे मार्गदर्शन आणि पालनपोषण करतो?

यहोवा त्याच्या संघटनेद्वारे जगभरातील सर्व बंधुभगिनींसाठी मुबलक प्रमाणात आध्यात्मिक अन्‍नाची तरतूद करतो. आपल्या प्रकाशनांद्वारे अनेक विषयांवर शास्त्रवचनांतून सल्ला दिला जातो. तसेच, संघटना केव्हाकेव्हा पत्रांद्वारे किंवा प्रवासी पर्यवेक्षकांद्वारे मंडळीतील वडिलांना थेट मार्गदर्शन पुरवते. अशा मार्गांनी, मेंढरांना सुस्पष्ट मार्गदर्शन मिळते.

१०. मंडळीपासून दूर गेलेल्या बंधुभगिनींविषयी वडिलांवर कोणती जबाबदारी आहे?

१० प्रेमळ मेंढपाळांवर मेंढरांचे संरक्षण करण्याची व त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आहे. ज्या बंधुभगिनींचा विश्‍वास कमजोर झाला आहे किंवा ज्यांनी गंभीर पाप केले आहे अशांकडे ख्रिस्ती वडील विशेष लक्ष देतात. (याकोब ५:१४, १५ वाचा.) या बंधुभगिनींपैकी काही जण कदाचित कळपापासून दूर गेले असतील आणि त्यांनी देवाची सेवा करण्याचे थांबवले असेल. अशा वेळी, हरवलेल्या प्रत्येक मेंढराला शोधण्यासाठी आणि मंडळीत परतण्याचा आर्जव करण्यासाठी एक प्रेमळ वडील जमेल तितका प्रयत्न करणार नाही का? नक्कीच करेल! येशूने म्हटले: “या लहानांतील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही.”—मत्त. १८:१२-१४.

मेंढपाळांच्या उणिवांकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे?

११. वडिलांच्या मार्गदर्शनाचे पालन करणे काहींना कठीण का जाऊ शकते?

११ यहोवा आणि येशू परिपूर्ण मेंढपाळ आहेत. पण, त्यांनी मंडळीची काळजी घेण्याची जबाबदारी ज्या मेंढपाळांवर सोपवली आहे ते परिपूर्ण नाहीत. त्यामुळे, वडिलांच्या मार्गदर्शनाचे पालन करणे काहींना कठीण जाऊ शकते. असे बंधुभगिनी कदाचित असा तर्क करतील: ‘तेदेखील आपल्याप्रमाणेच अपरिपूर्ण आहेत. मग, आपण त्यांचा सल्ला का ऐकावा?’ वडील अपरिपूर्ण आहेत, हे खरे आहे. पण, आपण त्यांच्या उणिवांबद्दल आणि चुकांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगला पाहिजे.

१२, १३. (क) प्राचीन काळात जबाबदारीच्या पदावर असलेल्या देवाच्या सेवकांनी कोणत्या चुका केल्या? (ख) जबाबदारीच्या पदावर नेमलेल्यांच्या उणिवा बायबलमध्ये का नमूद करून ठेवण्यात आल्या आहेत?

१२ प्राचीन काळात यहोवाने त्याच्या लोकांचे मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांना नेमले होते त्यांच्यामध्येदेखील उणिवा असल्याचे बायबल मान्य करते. उदाहरणार्थ, इस्राएलचा राजा म्हणून दाविदाचा अभिषेक करण्यात आला होता. पण, तो प्रलोभनाला बळी पडला आणि व्यभिचार व खून यासारखे गंभीर पाप त्याने केले. (२ शमु. १२:७-९) तसेच, प्रेषित पेत्राचाही विचार करा. पहिल्या शतकात, ख्रिस्ती मंडळीत त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती, तरीसुद्धा त्याने गंभीर चुका केल्या. (मत्त. १६:१८, १९; योहा. १३:३८; १८:२७; गलती. २:११-१४) खरेतर, येशूला वगळता आदाम आणि हव्वा यांच्या काळापासून कोणीही मनुष्य परिपूर्ण असा जन्मला नाही.

१३ यहोवाने ज्यांना नेमले होते त्यांच्या उणिवा त्याने बायबलमध्ये नमूद करून का ठेवल्या? आपल्या लोकांचे मार्गदर्शन करण्याकरता यहोवा अपरिपूर्ण मानवांचा उपयोग करू शकतो हे दाखवण्यासाठी त्याने असे केले. खरेतर, आपल्या लोकांचे मार्गदर्शन करण्यासाठी त्याने नेहमीच अपरिपूर्ण मानवांचा उपयोग केला आहे. म्हणून, आज आपल्यामध्ये जे पुढाकार घेतात त्यांच्या उणिवांमुळे आपण त्यांच्याविरुद्ध तक्रार करू नये किंवा त्यांच्या अधिकाराचा अवमान करू नये. आपण अशा बांधवांचा आदर करावा आणि त्यांच्या आज्ञेत राहावे अशी अपेक्षा यहोवा आपल्याकडून करतो.—निर्गम १६:२,  वाचा.

१४, १५. प्राचीन काळात यहोवाने ज्या प्रकारे लोकांपर्यंत सूचना पोचवल्या त्यावरून आपण काय शिकू शकतो?

१४ आज आपल्यामध्ये जे पुढाकार घेत आहेत त्यांच्या आज्ञांचे पालन करणे अत्यंत आवश्‍यक आहे. प्राचीन काळात यहोवाच्या लोकांवर संकटे आली तेव्हा त्याने कशा प्रकारे त्यांचे मार्गदर्शन केले याचा विचार करा. उदाहरणार्थ, इस्राएल लोक प्राचीन इजिप्तमधून बाहेर पडले तेव्हा देवाने त्यांना मोशे आणि अहरोन यांच्याद्वारे सूचना दिल्या. दहाव्या पीडेपासून सुरक्षित राहण्यासाठी, इस्राएल लोकांनी सूचनांचे पालन करणे गरजेचे होते. त्यांना एक खास भोजन करायला आणि बलिदान केलेल्या मेंढराचे रक्‍त दाराच्या चौकटीच्या वरच्या पट्टीला आणि दोन्ही बाजूला लावायला सांगण्यात आले. देवाने स्वतः लोकांशी बोलून त्यांना या सूचना दिल्या का? नाही. यहोवाने मोशेद्वारे इस्राएलमधील वडिलांना या सूचना दिल्या आणि त्यांनी त्या लोकांपर्यंत पोचवल्या. (निर्ग. १२:१-७, २१-२३, २९) अशा प्रकारे, यहोवाने आपल्या लोकांचे मार्गदर्शन करण्यासाठी मोशे व इतर वडिलांचा उपयोग केला. आज तो ख्रिस्ती वडिलांच्या द्वारे आपल्या लोकांचे मार्गदर्शन करत आहे.

१५ बायबल इतिहासातील अशा इतर प्रसंगांविषयी तुम्ही विचार करू शकता, जेव्हा यहोवाने मानवांद्वारे किंवा देवदूतांद्वारे जीवनदायक सूचना दिल्या होत्या. या सर्वच प्रसंगी, देवाने त्याच्या लोकांना सूचना देण्यासाठी इतरांना नेमले. ते देवाच्या नावाने बोलायचे आणि संकटाच्या वेळी काय करावे हे लोकांना सांगायचे. तर मग, आपण कल्पना करू शकतो, की हर्मगिदोनाच्या वेळी यहोवा असेच काहीतरी करेल. अर्थातच, आज यहोवाचे किंवा त्याच्या संघटनेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ज्या वडिलांना नेमण्यात आले आहे त्यांनी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करू नये म्हणून अतिशय सावध असले पाहिजे.

“एक कळप, एक मेंढपाळ”

१६. आपण कोणती “वाणी” लक्ष देऊन ऐकली पाहिजे?

१६ यहोवाचे लोक ‘एकच मेंढपाळाच्या’ म्हणजे येशू ख्रिस्ताच्या अधीन “एक कळप” आहेत. (योहा. १०:१६) येशूने म्हटले होते, की तो “युगाच्या समाप्तीपर्यंत” आपल्या शिष्यांसोबत असेल. (मत्त. २८:२०) आज तो स्वर्गात राजा या नात्याने कार्य करत आहे. आणि सैतानाच्या जगाचा नाश होण्याअगोदर ज्या ज्या घटना घडतील त्यांवर त्याचे पूर्णपणे नियंत्रण आहे. तेव्हा, देवाच्या संघटनेत आपण सुरक्षित व ऐक्यात कसे राहू शकतो? याचे उत्तर बायबल आपल्याला देते: “हाच मार्ग आहे; याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल.” ही “वाणी” काय आहे? यहोवा बायबलमधून आपल्याला ज्या गोष्टी शिकवतो; तसेच त्याने व येशूने नेमलेल्या मेंढपाळांद्वारे आपल्याला मिळणारे मार्गदर्शन या ‘वाणीत’ समाविष्ट आहे.—यशया ३०:२१; प्रकटीकरण ३:२२ वाचा.

एकटे पालक असलेल्या कुटुंबांचे हानिकारक संगतीपासून संरक्षण करण्यासाठी वडील खूप मेहनत घेतात (परिच्छेद १७, १८ पाहा)

१७, १८. (क) देवाच्या लोकांना कोणता धोका आहे? (ख) पुढील लेखात आपण कशाची चर्चा करणार आहोत?

१७ “सैतान हा गर्जणाऱ्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो,” असे बायबल सांगते. (१ पेत्र ५:८) एखाद्या हिंस्र व भुकेल्या पशूप्रमाणे सैतान बेसावध असलेल्यांवर व कळपापासून दूर गेलेल्यांवर हल्ला करण्याची संधी शोधत आहे. आपण कळपाच्या व आपल्या “जिवांचा मेंढपाळ व संरक्षक” यहोवा याच्या अगदी जवळ का राहिले पाहिजे याचे हे आणखी एक कारण आहे. (१ पेत्र २:२५) मोठ्या संकटातून बचावणाऱ्‍यांविषयी प्रकटीकरण ७:१७ म्हणते: “कोकरा [येशू] त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांजवळ नेईल; आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील.” खरेच, यापेक्षा अद्‌भुत अभिवचन कोणतेही असू शकत नाही!

१८ आध्यात्मिक मेंढपाळ या नात्याने मंडळीच्या वडिलांची किती महत्त्वाची भूमिका आहे याची आतापर्यंत आपण चर्चा केली. तेव्हा प्रत्येक वडिलाने स्वतःला असे विचारले पाहिजे, येशूच्या मेंढरांना मी योग्य वागणूक देत आहे याची खात्री मी कशी बाळगू शकतो? याविषयी पुढील लेखात चर्चा करण्यात येईल.