तुम्हाला आठवते का?
टेहळणी बुरूज नियतकालिकातील अलीकडील अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? तर मग, पुढील प्रश्नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:
येशूने “तुरुंगातील आत्म्यांना घोषणा” केव्हा केली? (१ पेत्र ३:१९)
असे दिसते, की येशूने त्याच्या पुनरुत्थानाच्या काही काळानंतर दुष्ट आत्म्यांना त्यांच्यावर येणार असलेल्या उचित न्यायदंडाची घोषणा केली.—६/१५, पृष्ठ २३.
लोक मेंढरे आहेत की शेरडे याचा न्याय येशू केव्हा करेल? (मत्त. २५:३२)
मोठ्या संकटादरम्यान, खोट्या धर्मांचा नाश झाल्यानंतर येशू लोकांचा न्याय करण्यासाठी येईल तेव्हा हे घडेल.—७/१५, पृष्ठ ६.
गहू व निदणाच्या दृष्टान्तात उल्लेख केल्याप्रमाणे, अनाचार करणारे केव्हा रडतील व दात खातील? (मत्त. १३:३६, ४१, ४२)
मोठ्या संकटादरम्यान, नाशापासून आपली मुळीच सुटका नाही याची त्यांना जाणीव होईल तेव्हा ते असे करतील.—७/१५, पृष्ठ १३.
विश्वासू व बुद्धिमान दासाबद्दल येशूचे शब्द केव्हा पूर्ण झाले? (मत्त. २४:४५-४७)
इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या वेळी नव्हे, तर १९१४ नंतर येशूच्या शब्दांची पूर्तता होण्यास सुरुवात झाली. १९१९ मध्ये दासाला परिवारावर नेमण्यात आले. या परिवारात ज्यांना आध्यात्मिक अन्न पुरवले जाते त्या सर्व ख्रिश्चनांचा समावेश होतो.—७/१५, पृष्ठे २१-२३.
विश्वासू दासाला येशू आपल्या सर्वस्वावर केव्हा नेमतो?
भविष्यात, मोठ्या संकटादरम्यान जेव्हा विश्वासू दासातील सदस्यांना त्यांचे स्वर्गीय प्रतिफळ मिळेल तेव्हा हे घडेल.—७/१५, पृष्ठ २५.
झाक्सेनहाउसन छळ छावणीतून निघालेल्या लांब अंतराच्या एका पदयात्रेतून जिवंत बचावण्यास २३० यहोवाच्या साक्षीदारांना देवाकडून मिळणाऱ्या सामर्थ्यासोबतच आणखी कशामुळे साहाय्य मिळाले?
उपासमार आणि आजारपणामुळे ते सर्व जण अतिशय अशक्त झालेले होते, तरीसुद्धा त्यांनी सतत एकमेकांना चालत राहण्याचे उत्तेजन दिले.—८/१५, पृष्ठ १८.
इस्राएल लोकांनी यार्देन नदी पार करून अभिवचन दिलेल्या देशात कशा प्रकारे प्रवेश केला याविषयीचा अहवाल आपल्याकरता प्रोत्साहनदायक का आहे?
नदी तुडुंब भरून वाहत होती तरीसुद्धा इस्राएल लोकांना पलीकडे जाता यावे म्हणून यहोवाने पाण्याचा प्रवाह थांबवला. यामुळे इस्राएल लोकांचा देवावरील विश्वास व भरवसा नक्कीच दृढ झाला असेल आणि या अहवालामुळे आपलाही विश्वास दृढ होतो.—९/१५, पृष्ठ १६.
मेंढपाळ व लोकनायकांविषयीची मीखा ५:५ यातील भविष्यवाणी आज कशा प्रकारे पूर्ण होत आहे?
मीखा ५:५ यात उल्लेख केलेले “सात मेंढपाळ व आठ लोकनायक” हे आज मंडळ्यांतील वडिलांना सूचित करतात. देवाच्या लोकांवर भविष्यात होणार असलेल्या हल्ल्यास तोंड देण्याकरता हे वडील आज त्यांना साहाय्य करत आहेत.—११/१५, पृष्ठ २०.