टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) फेब्रुवारी २०१४
या अंकात ४५ व्या स्तोत्रातील रोमांचक घटनांविषयी सांगितलेले आहे. यहोवा कशा प्रकारे आपल्या गरजा पुरवणारा, आपला संरक्षक आणि आपला मित्र आहे हे समजण्यासदेखील हा अंक आपल्याला मदत करेल.
वैभवशाली राजा ख्रिस्त याचा जयजयकार करा!
स्तोत्र ४५ यात वर्णन केलेल्या रोमांचक घटनांचा आज आपल्याशी काय संबंध आहे?
कोकऱ्याच्या लग्नाविषयी आनंद करा!
वधू कोण आहे, आणि ख्रिस्त तिला लग्नासाठी कशा प्रकारे तयार करत आहे? कोकऱ्याच्या लग्नाच्या आनंदात कोणकोण सहभागी होतील?
सारफथच्या विधवेला तिच्या विश्वासाचे प्रतिफळ मिळाले
सारफथच्या विधवेच्या मुलाचे पुनरुत्थान तिच्या जीवनातील अशी घटना होती जिच्यामुळे देवावरील तिचा विश्वास खूप भक्कम झाला. तिच्याकडून आपण काय शिकू शकतो?
यहोवा—आपल्या गरजा पुरवणारा व आपले संरक्षण करणारा
आपला स्वर्गातील पिता यहोवा याच्याबद्दल तुमच्या मनातील कदर वाढवा. आपल्या गरजा पुरवणाऱ्या आणि आपले संरक्षण करणाऱ्या यहोवा देवासोबतचा नातेसंबंध आणखी घनिष्ठ कसा करता येईल हे जाणून घ्या.
यहोवा—आपला सर्वात चांगला मित्र
यहोवाचे चांगले मित्र असलेले अब्राहाम आणि गिदोन यांच्या उदाहरणांकडे लक्ष द्या. यहोवाचे मित्र बनण्यासाठी आपण कोणत्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत?
वाचकांचे प्रश्न
पहिल्या शतकातील यहुदी कोणत्या आधारावर मशीहाची “वाट पाहत” होते?
“यहोवाची सुंदरता” पाहत राहणे
प्राचीन इस्राएलातील दावीद राजाने खऱ्या उपासनेबद्दल यहोवाने जी व्यवस्था केली होती त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपण खऱ्या उपासनेत आनंद कसा मिळवू शकतो?
आपल्या संग्रहातून
विश्वासाला पुष्टी देणाऱ्या अविस्मरणीय चित्रपटाची शताब्दी
पहिल्यांदा “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” प्रदर्शित करण्यात आला त्या गोष्टीला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. हा चित्रपट, बायबल देवाचे वचन आहे यावर लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी तयार करण्यात आला होता.