पेत्र येशूला नाकारतो
आमच्या तरुण मित्रांकरता
पेत्र येशूला नाकारतो
सूचना: मन एकाग्र करता येईल अशा शांत ठिकाणी बसून बायबलच्या या अहवालाचे वाचन करा. शास्त्रवचने वाचताना, या घटनेत तुम्ही देखील आहात अशी कल्पना करा. घटनेतील दृश्ये डोळ्यांपुढे उभी करा. तेथील आवाज ऐका. मुख्य पात्रांच्या भावना अनुभवण्याचा प्रयत्न करा.
दृश्याचे परीक्षण करा.—मत्तय २६:३१-३५, ६९-७५ वाचा.
या घटनेच्या वेळी किती लोक उपस्थित असतील असे तुम्हाला वाटते?
_______
पेत्राला जे लोक प्रश्न विचारत होते ते मित्रभावाने विचारत होते का? की उत्सुकतेपोटी विचारत होते? की रागाने विचारत होते? की दुसऱ्या हेतूने विचारत होते?
_______
पेत्रावर जेव्हा दोषारोप लावला जात होता तेव्हा त्याला कसे वाटले असेल?
_______
पेत्राने येशूला ओळखत असल्याचे का नाकारले? त्याचे येशूवर प्रेम नव्हते का? किंवा काही दुसरे कारण असावे?
_______
आणखी खोलात शिरा.—लूक २२:३१-३४ वाचा; मत्तय २६:५५-५८; योहान २१:९-१७.
पेत्राने जी चूक केली त्यासाठी फाजील आत्मविश्वास कशाप्रकारे कारणीभूत ठरला असावा?
_______
पेत्र थोड्या वेळासाठी अडखळेल हे येशूला माहीत असतानाही त्याने त्याच्यावर विश्वास कसा ठेवला?
_______
पेत्राने येशूला नाकारले तरीपण त्याने इतर शिष्यांपेक्षा अधिक धैर्य कसे दाखवले?
_______
येशूने पेत्राला क्षमा केल्याचे कसे दाखवले?
______
तुम्हाला काय वाटते, येशूने पेत्राला, “माझ्यावर प्रीति करितोस काय?” असे तीन वेळा का विचारले असावे?
______
येशूबरोबर ही चर्चा केल्यानंतर पेत्राला कसे वाटले असावे असे तुम्हाला वाटते? व का?
_______
शिकलेल्या गोष्टींचा अवलंब करा. तुम्ही जे शिकलात ते लिहून काढा. . .
मनुष्याचे भय.
_______
येशूच्या शिष्यांनी चुका केल्या तरीसुद्धा त्याला त्यांच्याबद्दल कळवळा होता.
_______
या अहवालातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात अर्थपूर्ण वाटते? व का?
_______ (w०८ १/१)