तुम्ही देवाला तुमच्यासोबत दररोज बोलू देता का?
तुम्ही देवाला तुमच्यासोबत दररोज बोलू देता का?
तुम्ही स्वतःला आरशात कितींदा पाहता? जवळजवळ दररोजच, आणि काही वेळा तर दिवसातून अनेकदा. का बरे? कारण आपण कसे दिसतो याची आपल्याला काळजी असते.
बायबलचे वाचन करण्याची तुलना आरशात पाहण्याशी करता येऊ शकते. (याकोब १:२३-२५) आपण नेमके कसे दिसतो हे पाहण्यास आपल्याला मदत करण्याची ताकद देवाच्या वचनातील संदेशात आहे. तो ‘जीव व आत्मा . . . ह्यांना भेदून आरपार जाणारा’ आहे. (इब्री लोकांस ४:१२) दुसऱ्या शब्दांत, आपण बाहेरून कसे दिसतो व आतून नेमके कसे आहोत यांत तो स्पष्टपणे फरक दाखवतो. आरशात पाहिल्यावर जसे आपल्याला कळते, की आपण आपल्या स्वरूपात नेमकी कोठे सुधारणा केली पाहिजे तसेच आपण स्वतःत कोणते बदल केले पाहिजेत हे देवाच्या वचनातील संदेश आपल्याला दाखवतो.
बायबल आपल्याला, आपल्या आंतरिक स्वरूपातील फक्त खोटच दाखवत नाही तर ती खोट सुधारण्यास मदतही करते. प्रेषित पौलाने याविषयी असे लिहिले: “प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६, १७) बायबलचे वाचन केल्यामुळे मिळणाऱ्या चार फायद्यांपैकी तीन फायद्यांमध्ये, जसे की, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण यांमध्ये आपली मनोवृत्ती आणि आपली कार्ये समाविष्ट आहेत. आपण कसे दिसतो हे पाहण्यासाठी जर आपण वारंवार आरशात बघत असू तर, आपले आंतरिक स्वरूप कसे आहे हे पाहण्यासाठी आपण आणखी नियमितपणे देवाचे वचन बायबल याचे वाचन करण्याची गरज आहे, नाही का?
इस्राएल राष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी यहोशवाला नियुक्त करताना यहोवा देवाने त्याला सांगितले: “नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशःप्राप्ति घडेल.” (यहोशवा १:८) म्हणजे, यशःप्राप्ती मिळण्यासाठी यहोशवाला नित्यनियमाने देवाच्या वचनाचे “रात्रंदिवस” वाचन करणे आवश्यक होते.
नियमित बायबल वाचन केल्याने मिळणारे फायदे पहिल्या स्तोत्रात दाखवून देण्यात आले आहेत. तेथे असे म्हटले आहे: “जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही; पापी जनांच्या मार्गांत उभा राहत नाही; आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.” (स्तोत्र १:१-३) या स्तोत्रात वर्णन केलेल्या माणसासारखे बनायला आपल्यालाही नक्कीच आवडेल.
अनेकांनी, बायबलचे दररोज वाचन करण्याची स्वतःला सवयच लावून घेतली आहे. एका ख्रिस्ती बांधवाला, ते
बायबल दररोज का वाचतात असे विचारले तेव्हा त्यांनी उत्तर दिले: “मी जर दिवसातून कधीही देवाला प्रार्थना करत असेन आणि त्याने माझी प्रार्थना ऐकावी अशी अपेक्षा करत असेन, तर देवाचे वचन दररोज वाचून, तो मला जे सांगतोय ते मी का ऐकू नये बरं? आपल्याला जर एक चांगला मित्र बनायचं असेल तर आपणच नेहमी बोलत राहू का, की समोरच्यालाही बोलायची संधी देऊ?” या बांधवाच्या बोलण्यात तथ्य होते. बायबलचे वाचन करणे हे, देव आपल्याला जे सांगतोय ते लक्षपूर्वक ऐकण्यासारखे आहे. असे केल्याने आपल्याला विविध गोष्टींत देवाचा काय दृष्टिकोन आहे ते कळते.नियमित बायबल वाचनाची सवय ठेवा
तुम्ही कदाचित नियमित रीत्या बायबलचे वाचन करण्यास सुरुवात केली असेल. पण तुमचे संपूर्ण बायबल वाचून झाले आहे का? झाले असेल तर तुम्ही बायबलशी चांगल्या प्रकारे परिचित झाला असाल. पण, सर्वांनाच असे जमले नसेल. त्यांनी कदाचित यापूर्वी संपूर्ण बायबल वाचण्यास सुरुवात केली असेल पण काही दिवसांनंतर त्यांची सवय तुटली असेल. तुमच्या बाबतीत असे झाले आहे का? संपूर्ण बायबलचे वाचन करण्याचे ध्येय तुम्ही कसे गाठू शकता? हे ध्येय गाठण्यासाठी पुढे दोन मार्ग सुचवण्यात आले आहेत.
तुमच्या दैनंदिन कार्यात बायबल वाचनाचा समावेश करा. बायबलचे वाचन करायला तुम्हाला नक्कीच जमेल अशी दिवसातली एक वेळ ठरवा. समजा त्यावेळेला वाचन करताच आले नाही तर इतर कोणत्या वेळेला करणार तेही ठरवा. काही कारणास्तव तुम्हाला, तुम्ही निवडलेल्या वेळेला बायबलचे वाचन करणे शक्य नसेल तर कुठली तरी दुसरी वेळ निवडा; पण बायबलचे वाचन केल्याशिवाय एकही दिवस जाऊ देऊ नका. अशा प्रकारे तुम्ही प्राचीन काळातील बिरुयातील लोकांचे अनुकरण कराल. त्यांच्याविषयी आपण बायबलमध्ये असे वाचतो, की “त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले.”—प्रेषितांची कृत्ये १७:११.
विशिष्ट ध्येय मनात ठेवून वाचन करा. उदाहरणार्थ, तुम्ही जर बायबलचे तीन ते पाच अध्याय दररोज वाचलेत तर तुमचे एका वर्षांत संपूर्ण बायबल वाचून पूर्ण होईल. त्यासाठी पुढील पानावर एक तक्ता दिला आहे. या तक्त्यात दिलेल्या आराखड्यानुसार बायबल वाचन करण्याचा प्रयत्न करा. “तारीख” या मथळ्याखाली, अमूक अध्याय तुम्ही कधी वाचून काढाल ते ठरवा. आणि मग, जसजसे तुमचे ते अध्याय वाचून होतील तसतसे दिलेल्या चौकोनात टीक मार्क करा. यामुळे तुम्हाला तुमची प्रगती दिसून येईल.
संपूर्ण बायबल वाचून झाल्यावरही तुमचे वाचन थांबवू नका. दर वर्षी संपूर्ण बायबल वाचण्यासाठी तुम्ही याच आराखड्याचा उपयोग करू शकता. प्रत्येक वर्षी तुम्ही एका वेगळ्या विभागापासून सुरू करू शकता. पण तुम्हाला जर या आराखड्यानुसार नव्हे तर तुमच्या वेळेनुसार संपूर्ण बायबल वाचून काढायचे असेल तर आराखड्यात दिलेले अध्याय तुम्ही दोन किंवा तीन दिवसांत वाचून काढू शकता.
तुम्ही जेव्हा जेव्हा बायबल वाचाल तेव्हा तेव्हा तुम्हाला जीवनात लागू करता येण्याजोगे नवनवीन मुद्दे आढळतील जे तुम्हाला आधीच्या वाचनाच्या वेळी आढळले नसतील. का बरे? कारण “या जगाचे बाह्यस्वरूप बदलत जात आहे” तसेच आपले जीवन आणि आपली परिस्थिती देखील सतत बदलत असते. (१ करिंथकर ७:३१, पं.र.भा.) तेव्हा, देवाच्या वचनाच्या अर्थात बायबलच्या आरशात दररोज पाहण्याचा ठाम निश्चय करा. अशाने तुम्ही देवाला तुमच्यासोबत दररोज बोलण्याची संधी द्याल.—स्तोत्र १६:८. (w०९ ०८/०१)
[२३ पानांवरील तक्ता/चित्रे]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
१
बायबल वाचन आराखडा
सूचना. खाली नेमून दिलेले अध्याय तुम्ही केव्हा वाचून काढणार त्याची तारीख लिहा. एक विभाग पूर्ण केल्यानंतर त्यांच्या पुढे टीक मार्क करा. तुम्ही एकतर, एकापाठोपाठ बायबल पुस्तकांचे वाचून करू शकता किंवा मग, वेगवेगळ्या भागात विभागलेल्या विषयांनुसार वाचन करू शकता. तुम्ही जर प्रत्येक दिवशी नेमून दिलेले अध्याय वाचलेत तर तुमचे एका वर्षांत संपूर्ण बायबल वाचून होईल.
◆ इस्राएल लोकांबरोबरच्या देवाच्या व्यवहारांची ऐतिहासिक माहिती तुम्हाला हवी असेल तर ज्या दिवसांपुढे लाल चौकट असेल ते अध्याय वाचा.
● ख्रिस्ती मंडळीची वाढ कशी होत गेली त्याची कालक्रमानुसार माहिती तुम्हाला हवी असेल तर ज्या दिवसांपुढे निळी चौकट आहे ते अध्याय वाचा.
२
मोशेची लिखाणे
तारीख अध्याय □✔
/ उत्पत्ति १-३ □
/ ४-७ □
/ ८-११ □
/ ◆ १२-१५ □
/ ◆ १६-१८ □
/ ◆ १९-२२ □
/ ◆ २३-२४ □
/ ◆ २५-२७ □
/ ◆ २८-३० □
/ ◆ ३१-३२ □
/ ◆ ३३-३४ □
/ ◆ ३५-३७ □
/ ◆ ३८-४० □
/ ◆ ४१-४२ □
/ ◆ ४३-४५ □
/ ◆ ४६-४८ □
/ ◆ ४९-५० □
/ निर्गम ◆ १-४ □
/ ◆ ५-७ □
/ ◆ ८-१० □
/ ◆ ११-१३ □
/ ◆ १४-१५ □
/ ◆ १६-१८ □
/ ◆ १९-२१ □
/ २२-२५ □
/ २६-२८ □
/ २९-३० □
/ ३१-३३ □
/ ३४-३५ □
/ ३६-३८ □
/ ३९-४० □
/ लेवीय १-४ □
/ ५-७ □
/ ८-१० □
/ ११-१३ □
/ १४-१५ □
/ १६-१८ □
/ १९-२१ □
/ २२-२३ □
/ २४-२५ □
/ २६-२७ □
/ गणना १-३ □
/ ४-६ □
/ ७-९ □
/ ◆ १०-१२ □
/ ◆ १३-१५ □
/ ◆ १६-१८ □
/ ◆ १९-२१ □
/ ◆ २२-२४ □
/ ◆ २५-२७ □
/ २८-३० □
/ ◆ ३१-३२ □
/ ◆ ३३-३६ □
/ अनुवाद १-२ □
/ ◆ ३-४ □
/ ५-७ □
/ ८-१० □
/ ११-१३ □
३
/ १४-१६ □
/ ◆ १७-१९ □
/ २०-२२ □
/ २३-२६ □
/ २७-२८ □
/ ◆ २९-३१ □
/ ◆ ३२ □
/ ◆ ३३-३४ □
इस्राएल लोक वचन दिलेल्या देशात प्रवेश करतात
तारीख अध्याय □✔
/ यहोशवा ◆ १-४ □
/ ◆ ५-७ □
/ ◆ ८-९ □
/ ◆ १०-१२ □
/ ◆ १३-१५ □
/ ◆ १६-१८ □
/ ◆ १९-२१ □
/ ◆ २२-२४ □
/ शास्ते ◆ १-२ □
/ ◆ ३-५ □
/ ◆ ६-७ □
/ ◆ ८-९ □
/ ◆ १०-११ □
/ ◆ १२-१३ □
/ ◆ १४-१६ □
/ ◆ १७-१९ □
/ ◆ २०-२१ □
/ रूथ ◆ १-४ □
इस्राएलवर राजांचे राज्य
तारीख अध्याय □✔
/ १ शमुवेल ◆ १-२ □
/ ◆ ३-६ □
/ ◆ ७-९ □
/ ◆ १०-१२ □
/ ◆ १३-१४ □
/ ◆ १५-१६ □
/ ◆ १७-१८ □
/ ◆ १९-२१ □
/ ◆ २२-२४ □
/ ◆ २५-२७ □
/ ◆ २८-३१ □
/ २ शमुवेल ◆ १-२ □
/ ◆ ३-५ □
/ ◆ ६-८ □
/ ◆ ९-१२ □
/ ◆ १३-१४ □
/ ◆ १५-१६ □
/ ◆ १७-१८ □
/ ◆ १९-२० □
/ ◆ २१-२२ □
/ ◆ २३-२४ □
/ १ राजे ◆ १-२ □
/ ◆ ३-५ □
/ ◆ ६-७ □
/ ◆ ८ □
/ ◆ ९-१० □
/ ◆ ११-१२ □
४
/ १ राजे (पुढे चालू ) ◆ १३-१४ □
/ ◆ १५-१७ □
/ ◆ १८-१९ □
/ ◆ २०-२१ □
/ ◆ २२ □
/ २ राजे ◆ १-३ □
/ ◆ ४-५ □
/ ◆ ६-८ □
/ ◆ ९-१० □
/ ◆ ११-१३ □
/ ◆ १४-१५ □
/ ◆ १६-१७ □
/ ◆ १८-१९ □
/ ◆ २०-२२ □
/ ◆ २३-२५ □
/ १ इतिहास १-२ □
/ ३-५ □
/ ६-७ □
/ ८-१० □
/ ११-१२ □
/ १३-१५ □
/ १६-१७ □
/ १८-२० □
/ २१-२३ □
/ २४-२६ □
/ २७-२९ □
/ २ इतिहास १-३ □
/ ४-६ □
/ ७-९ □
/ १०-१४ □
/ १५-१८ □
/ १९-२२ □
/ २३-२५ □
/ २६-२८ □
/ २९-३० □
/ ३१-३३ □
/ ३४-३६ □
यहुद्यांचे बंदिवासातून परतणे
तारीख अध्याय □✔
/ एज्रा ◆ १-३ □
/ ◆ ४-७ □
/ ◆ ८-१० □
/ नहेम्या ◆ १-३ □
/ ◆ ४-६ □
/ ◆ ७-८ □
/ ◆ ९-१० □
/ ◆ ११-१३ □
/ एस्तेर ◆ १-४ □
/ ◆ ५-१० □
मोशेची लिखाणे
तारीख अध्याय □✔
/ ईयोब १-५ □
/ ६-९ □
/ १०-१४ □
/ १५-१८ □
/ १९-२० □
५
/ २१-२४ □
/ २५-२९ □
/ ३०-३१ □
/ ३२-३४ □
/ ३५-३८ □
/ ३९-४२ □
गीत व व्यावहारिक बुद्धीची पुस्तके
तारीख अध्याय □✔
/ ९-१६ □
/ १७-१९ □
/ २०-२५ □
/ २६-३१ □
/ ३२-३५ □
/ ३६-३८ □
/ ३९-४२ □
/ ४३-४७ □
/ ४८-५२ □
/ ५३-५८ □
/ ५९-६४ □
/ ६५-६८ □
/ ६९-७२ □
/ ७३-७७ □
/ ७८-७९ □
/ ८०-८६ □
/ ८७-९० □
/ ९१-९६ □
/ ९७-१०३ □
/ १०४-१०५ □
/ १०६-१०८ □
/ १०९-११५ □
/ ११६-११९:६३ □
/ ११९:६४-१७६ □
/ १२०-१२९ □
/ १३०-१३८ □
/ १३९-१४४ □
/ १४५-१५० □
/ नीतिसूत्रे १-४ □
/ ५-८ □
/ ९-१२ □
/ १३-१६ □
/ १७-१९ □
/ २०-२२ □
/ २३-२७ □
/ २८-३१ □
/ उपदेशक १-४ □
/ ५-८ □
/ ९-१२ □
/ गीतरत्न १-८ □
संदेष्टे
तारीख अध्याय □✔
/ यशया १-४ □
/ ५-७ □
/ ८-१० □
६
/ यशया (पुढे चालू ) ११-१४ □
/ १५-१९ □
/ २०-२४ □
/ २५-२८ □
/ २९-३१ □
/ ३२-३५ □
/ ३६-३७ □
/ ३८-४० □
/ ४१-४३ □
/ ४४-४७ □
/ ४८-५० □
/ ५१-५५ □
/ ५६-५८ □
/ ५९-६२ □
/ ६३-६६ □
/ यिर्मया १-३ □
/ ४-५ □
/ ६-७ □
/ ८-१० □
/ ११-१३ □
/ १४-१६ □
/ १७-२० □
/ २१-२३ □
/ २४-२६ □
/ २७-२९ □
/ ३०-३१ □
/ ३२-३३ □
/ ३४-३६ □
/ ३७-३९ □
/ ४०-४२ □
/ ४३-४४ □
/ ४५-४८ □
/ ४९-५० □
/ ५१-५२ □
/ विलापगीत १-२ □
/ ३-५ □
/ यहेज्केल १-३ □
/ ४-६ □
/ ७-९ □
/ १०-१२ □
/ १३-१५ □
/ १६ □
/ १७-१८ □
/ १९-२१ □
/ २२-२३ □
/ २४-२६ □
/ २७-२८ □
/ २९-३१ □
/ ३२-३३ □
/ ३४-३६ □
/ ३७-३८ □
/ ३९-४० □
/ ४१-४३ □
/ ४४-४५ □
/ ४६-४८ □
/ दानीएल १-२ □
/ ३-४ □
/ ५-७ □
/ ८-१० □
/ ११-१२ □
७
/ होशेय १-७ □
/ ८-१४ □
/ योएल १-३ □
/ आमोस १-५ □
/ ६-९ □
/ ओबद्या/योना □
/ मीखा १-७ □
/ नहूम/हबक्कूक □
/ सफन्या/हग्गय □
/ जखऱ्या १-७ □
/ ८-११ □
/ १२-१४ □
/ मलाखी १-४ □
येशूचे जीवन व सेवा यांचे अहवाल
तारीख अध्याय □✔
/ मत्तय १-४ □
/ ५-७ □
/ ८-१० □
/ ११-१३ □
/ १४-१७ □
/ १८-२० □
/ २१-२३ □
/ २४-२५ □
/ २६ □
/ २७-२८ □
/ मार्क ● १-३ □
/ ● ४-५ □
/ ● ६-८ □
/ ● ९-१० □
/ ● ११-१३ □
/ ● १४-१६ □
/ लूक १-२ □
/ ३-५ □
/ ६-७ □
/ ८-९ □
/ १०-११ □
/ १२-१३ □
/ १४-१७ □
/ १८-१९ □
/ २०-२२ □
/ २३-२४ □
/ योहान १-३ □
/ ४-५ □
/ ६-७ □
/ ८-९ □
/ १०-१२ □
/ १३-१५ □
/ १६-१८ □
/ १९-२१ □
/ प्रेषितांची कृत्ये ● १-३ □
/ ● ४-६ □
/ ● ७-८ □
/ ● ९-११ □
८
/ प्रेषितांची कृत्ये (पुढे चालू ) ● १२-१४ □
/ ● १५-१६ □
/ ● १७-१९ □
/ ● २०-२१ □
/ ● २२-२३ □
/ ● २४-२६ □
/ ● २७-२८ □
पौलाची पत्रे
तारीख अध्याय □✔
/ रोमकर १-३ □
/ ४-७ □
/ ८-११ □
/ १२-१६ □
/ १ करिंथकर १-६ □
/ ७-१० □
/ ११-१४ □
/ १५-१६ □
/ २ करिंथकर १-६ □
/ ७-१० □
/ ११-१३ □
/ गलतीकर १-६ □
/ इफिसकर १-६ □
/ फिलिप्पैकर १-४ □
/ कलस्सैकर १-४ □
/ १ तीमथ्य १-६ □
/ २ तीमथ्य १-४ □
/ तीत/फिलेमोन □
/ इब्री लोकांस १-६ □
/ ७-१० □
/ ११-१३ □
इतर प्रेषितांची व शिष्यांची लिखाणे
तारीख अध्याय □✔
/ याकोब १-५ □
/ १ पेत्र १-५ □
/ २ पेत्र १-३ □
/ १ योहान १-५ □
/ २ योहान/३ योहान/यहुदा □
/ प्रकटीकरण १-४ □
/ ५-९ □
/ १०-१४ □
/ १५-१८ □
/ १९-२२ □
सर्वात आधी, ठिपक्यांच्या रेषेवर कापा
नंतर, दोन्ही पाने एकावर एक ठेवून घडी घाला
[२२ पानांवरील चित्र]
बायबल वाचण्यासाठी तुम्ही दररोज काही वेळ बाजूला ठेवू शकता का?