देवाकडून मिळणारी श्रीमंती
देवाकडून मिळणारी श्रीमंती
जर तुम्ही देवाला विश्वासू राहिलात तर तो तुम्हाला श्रीमंत बनवेल का? हो, पण तुम्ही ज्या श्रीमंतीचा विचार करता तशा प्रकारची श्रीमंती कदाचित तो तुम्हाला देणार नाही. येशूची आई मरीया हिच्या उदाहरणाचा विचार करा. गब्रीएल देवदूताने तिच्यापुढे प्रगट होऊन तिला सांगितले की, तू देवाची ‘कृपा पावलेली’ स्त्री आहेस व देवाच्या पुत्राला जन्म देशील. (लूक १:२८, ३०-३२) पण मरीया तर श्रीमंत नव्हती. येशूच्या जन्मानंतर तिने “होल्यांचा जोडा किंवा पारव्यांची दोन पिले” यज्ञ म्हणून अर्पण केली. त्याकाळी गरीब लोक अशा प्रकारचे यज्ञार्पण यहोवाला करत असत.—लूक २:२४; लेवीय १२:८.
मरीया गरीब होती म्हणजे तिच्यावर देवाचा आशीर्वाद नव्हता असा याचा अर्थ होतो का? नाही, तिच्यावर देवाचा आशीर्वाद होता. ती जेव्हा तिची नातलग असलेल्या अलीशिबेला भेटायला गेली तेव्हा “अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली; आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू [मरीया] धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य!” (लूक १:४१, ४२) मरीयेला देवाच्या प्रिय पुत्राची पृथ्वीवरील आई होण्याचा बहुमान मिळाला होता.
स्वतः येशू देखील श्रीमंत नव्हता. त्याचे आईवडील गरीब होते, तो गरीब वस्तीत लहानाचा मोठा झाला होता एवढेच नव्हे तर तो पृथ्वीवरील त्याच्या जीवन काळात गरीबच होता. त्याचा शिष्य होण्याची इच्छा बाळगणाऱ्या एकाला त्याने असे म्हटले: “खोकडांस बिळे व आकाशांतल्या पाखरास घरटी आहेत; परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही.” (लूक ९:५७, ५८) पण येशू ख्रिस्ताने पृथ्वीवर येऊन जे केले त्यामुळे त्याचे शिष्य श्रीमंत झाले. प्रेषित पौलाने याविषयी असे लिहिले: “तो . . . तुम्हाकरिता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.” (२ करिंथकर ८:९) येशूने त्याच्या शिष्यांना कोणते धन दिले? आज आपल्याजवळ कोणते धन आहे?
कोणते धन?
श्रीमंत व्यक्तीचा देवापेक्षा धनावर जास्त भरवसा असू शकतो त्यामुळे भौतिक धन सहसा एखाद्याच्या विश्वासाच्या आड येऊ शकते. येशूने म्हटले: “देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण आहे बघा!” (मार्क १०:२३) यावरून स्पष्ट होते की येशूने आपल्या शिष्यांना जे धन देण्याचे वचन दिले ते भौतिक स्वरूपाचे नव्हते.
खरे तर, पहिल्या शतकातील अनेक ख्रिश्चनांची परिस्थिती बेताचीच होती. जन्मापासून पांगळा असलेल्या एका माणसाने जेव्हा पेत्राला पैसे मागितले तेव्हा पेत्राने त्याला म्हटले: “माझ्याजवळ सोनेरुपे काही नाही; पण जे आहे ते तुला देतो; नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग.”—प्रेषितांची कृत्ये ३:६.
याकोब २:५) शिवाय प्रेषित पौलानेही असे म्हटले की “जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन” असलेल्या पुष्कळांना ख्रिस्ती मंडळीचा भाग बनण्यासाठी पाचारण करण्यात आले नव्हते.—१ करिंथकर १:२६.
शिष्य याकोबाच्या शब्दांवरून देखील हे कळते की ख्रिस्ती मंडळीत गरीब लोक होते. त्याने लिहिले: “माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; लोकदृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपणावर प्रीति करणाऱ्यांना देऊ केले त्याचे वारीस होण्यास त्याने निवडले आहे की नाही?” (येशूने त्याच्या शिष्यांना जर भौतिक धन दिले नव्हते तर मग कोणते धन दिले होते? स्मुर्णा मंडळीला पाठवलेल्या पत्रात येशूने असे म्हटले: “तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे—तरी तू धनवान आहेस.” (प्रकटीकरण २:८, ९) स्मुर्णातील ख्रिश्चन जरी गरीब होते तरी त्यांच्याजवळ सोन्याचांदीपेक्षा जास्त मौल्यवान असलेले धन होते. देवाशी विश्वासू व एकनिष्ठ असल्यामुळे ते श्रीमंत होते. विश्वास मौल्यवान आहे कारण ‘सर्वांच्या ठायी विश्वास नसतो.’ (२ थेस्सलनीकाकर ३:२) ज्यांच्या ठायी विश्वास नाही ते खरे तर देवाच्या नजरेत गरीब आहेत.—प्रकटीकरण ३:१७, १८.
विश्वासामुळे येणारी श्रीमंती
कोणत्या अर्थाने विश्वास मौल्यवान आहे? देवावर विश्वास ठेवणाऱ्यांना “त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा” फायदा होतो. (रोमकर २:४) येशूने स्वतःचे जीवन अर्पण करून पुरवलेल्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवल्यामुळे त्यांना “आपल्या अपराधांची क्षमा” मिळते. (इफिसकर १:७) शिवाय, ‘ख्रिस्ताच्या वचनामुळे’ प्राप्त होणारी बुद्धी, विश्वास बाळगणाऱ्यांना मिळते. (कलस्सैकर ३:१६) ते विश्वासाने देवाला प्रार्थना करतात तेव्हा त्यांना “बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति” मिळते जी त्यांच्या अंतःकरणाचे व मनाचे रक्षण करते व यामुळे त्यांना समाधान व आनंद मिळतो.—फिलिप्पैकर ४:७.
जे लोक देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे देवावर विश्वास ठेवतात त्यांना वर उल्लेखित सर्व फायद्यांबरोबर सार्वकालिक जीवनाची सुंदर आशाही मिळते. येशूचे पुढील शब्द सर्वपरिचितच आहेत: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) एखादी व्यक्ती जेव्हा देवाचे व त्याच्या पुत्राचे अचूक ज्ञान घेते तेव्हा सार्वकालिक जीवनाची ही मौल्यवान आशा आणखी बळकट बनते कारण येशूने असेही म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे [अर्थात त्यांचे ज्ञान घ्यावे].”—योहान १७:३.
देव देत असलेले आशीर्वाद प्रामुख्याने, आध्यात्मिक स्वरूपाचे असले तरी या आशीर्वादांमुळे आपल्याला भावनात्मक रित्या व शारिरीक रित्याही फायदे होतात. ब्राझीलमधील डॅलिड्यो याच्या उदाहरणाचा विचार करा. देवाच्या उद्देशांबद्दल अचूक ज्ञान मिळण्याआधी तो दारुडा होता. त्याच्या कुटुंबावर याचा खूप वाईट परिणाम झाला. त्याची आर्थिक स्थितीही स्थिर नव्हती. नंतर त्याने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास सुरू केला व यामुळे त्याच्यामध्ये लक्षणीय बदल झाला.
डॅलिड्यो बायबलमधून जे काही शिकला त्यामुळे हानीकारक सवयी सोडून देणे त्याला शक्य झाले. त्याने आध्यात्मिक प्रगती केली. तो म्हणतो: “पूर्वी मी दारू पिण्यासाठी एका बार मधून दुसऱ्या बारमध्ये जात असे. पण आता मी राज्य संदेश सांगण्यासाठी एका घरातून दुसऱ्या घरी जातो.” तो देवाचे वचन सांगणारा पूर्ण वेळचा सेवक बनला. त्याच्यात झालेल्या या बदलामुळे त्याची तब्येत आणि त्याची आर्थिक परिस्थितीही सुधारली. तो म्हणतो: “दारूत जो पैसा मी खर्च करायचो तो पैसा आता मी इतर गरजू लोकांना मदत करण्यासाठी किंवा मला आवश्यक असणाऱ्या वस्तू विकत घेण्यासाठी खर्च करतो.” त्याच्यासारखाच आध्यात्मिक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांबरोबर सहवास ठेवल्याने तो अनेक चांगले मित्र बनवू शकला आहे. देवाची ओळख होण्यापूर्वी त्याने कल्पनाही केली नसेल अशी मानसिक शांती व समाधान डॅलिड्योला आता मिळाले आहे.
यहोवा देवावर विश्वास ठेवल्यामुळे जीवन समृद्ध बनल्याचे आणखी एक उदाहरण आहे, रिनाटो याचे. त्याचा हसरा चेहरा बघितल्यावर आपल्याला असे वाटणारही नाही की त्याच्यावर इतका अन्याय झाला होता. तो जन्मल्याबरोबरच त्याच्या आईने त्याला एका पिशवीत घालून एका बाकड्याखाली सोडून दिले होते. तो अतिशय वाईट अवस्थेत होता. त्याला खूप खरचटले होते, त्याच्या अंगावर जखमा होत्या व त्याची नाळही कापली नव्हती. जवळून जाणाऱ्या दोन स्त्रियांना बाकड्याखाली पिशवीत काहीतरी हलताना दिसले. त्यांना पहिल्यांदा वाटले की कोणीतरी मांजराच्या पिल्लाला सोडून गेले आहे. पण ते नवजात बालक आहे असे पाहिल्यावर त्यांनी तातडीने त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले.
त्या स्त्रियांपैकी एक यहोवाची साक्षीदार होती. तिने त्या बाळाबद्दल रीटाला सांगितले, ती देखील साक्षीदार होती. रीटाने अनेकदा मृत बाळांना जन्म दिला होता व तिला फक्त एक मुलगीच होती. आपल्याला एक मुलगा असावा अशी तिची खूप इच्छा होती म्हणून तिने रिनाटोला दत्तक घ्यायचे ठरवले.
रीटाने रिनाटोला ती त्याची खरी आई नसल्याचे लहानपणीच सांगितले होते. पण तिने प्रेमाने व ममतेने त्याचे पालनपोषण केले व त्याच्या मनात बायबलमधील स्तोत्र. २७:१०.
तत्त्वे बिंबवण्याचा प्रयत्न केला. तो जसजसा मोठा होत गेला तसतशी त्याची बायबलची गोडी वाढत गेली. कोणालाही विश्वास बसणार नाही अशा मार्गाने त्याला वाचवण्यात आले होते याबद्दलही तो कृतज्ञ होता. “माझ्या आईबापांनी मला सोडिले तरी परमेश्वर मला जवळ करील,” हे स्तोत्रकर्ता दाविदाचे शब्द तो जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा तेव्हा त्याचे डोळे भरून येतात.—यहोवाने त्याच्यासाठी जे काही केले त्याबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रिनाटोने २००२ साली बाप्तिस्मा घेतला व पुढच्याच वर्षी तो पूर्ण वेळचा ख्रिस्ती सेवक बनला. त्याचे खरे आईबाबा कोण आहेत हे त्याला अजूनही माहीत नाही व कदाचित कधी माहीतही होणार नाही. पण, यहोवाची ओळख होण्याची व तो एक प्रेमळ व काळजी घेणारा पिता आहे असा विश्वास बाळगण्याची त्याला मिळालेली संधी ही त्याच्यासाठी सर्वात मौल्यवान भेट आहे असे रिनाटोला वाटते.
तुमचे जीवन समृद्ध बनण्यासाठी देवासोबत जवळचा व प्रेमळ नातेसंबंध असावा अशी तुमची मनापासून इच्छा असेल. यहोवा देव आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांच्याशी असा नातेसंबंध जोडायची संधी सर्वांसाठी खुली आहे मग ते गरीब असोत वा श्रीमंत. या नातेसंबंधामुळे आपण भौतिक रित्या श्रीमंत होणार नाही पण आपल्याला आंतरिक शांती व समाधान मिळेल जे या जगातील सर्व पैशाने देखील विकत घेता येणार नाही. “परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही,” हे नीतिसूत्रे १०:२२ मधील शब्द किती खरे आहेत.
यहोवा देव त्याच्याजवळ येणाऱ्या लोकांमध्ये खूप आवड घेतो, तो म्हणतो: “तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांति नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती.” (यशया ४८:१८) योग्य हेतू व मनोवृत्ती बाळगून त्याच्याजवळ येणाऱ्यांना तो भरपूर आशीर्वादाचे वचन देतो: “नम्रता व परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय.”—नीतिसूत्रे २२:४. (w०९ ०९/०१)
[५ पानांवरील संक्षिप्त आशय]
येशूचे पृथ्वीवरील कुटुंब भौतिक रित्या गरीब होते तरी त्यांच्यावर देवाचा विपुल आशीर्वाद होता
[६ पानांवरील चित्र]
देवावर विश्वास ठेवल्यामुळे शांती, समाधान व आनंद मिळतो