व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तो ‘सर्व मानवजातीची मने ओळखतो’

तो ‘सर्व मानवजातीची मने ओळखतो’

देवाच्या जवळ या

तो ‘सर्व मानवजातीची मने ओळखतो’

२ इतिहास ६:२९, ३०

आपल्यापैकी कोणी असा आहे का, की जो जीवनातील हालअपेष्टांमुळे व समस्यांमुळे अगदी पस्त झाला नाही? कधीकधी आपल्याला वाटेल, की आपल्या अगदी खोल मनात होणाऱ्‍या वेदना खरोखरच कोणीही समजू शकत नाही. पण, आपल्या भावना समजू शकणारा कोणीतरी आहे. तो आहे यहोवा देव. दुसरा इतिहास ६:२९, ३० येथील शलमोनाच्या शब्दांतून आपण बरेच सांत्वन मिळवू शकतो.

इ.स.पू. १०२६ साली, जेरुसलेमच्या मंदिराच्या उद्‌घाटन प्रसंगी राजा शलमोनाने देवाला एक प्रार्थना केली. कदाचित दहा मिनिटांच्या या प्रार्थनेदरम्यान शलमोनाने यहोवा हा, एकनिष्ठ, प्रतिज्ञा पूर्ण करणारा, प्रार्थना ऐकणारा देव म्हणून त्याची स्तुती केली.—१ राजे ८:२३-५३; २ इतिहास ६:१४-४२.

या प्रार्थनेत शलमोनाने देवाला त्याच्या उपासकांची मागणी ऐकण्याची विनंती केली. (वचन २९) शलमोन अनेक समस्यांचा उल्लेख करतो (वचन २८); तरीपण, प्रत्येक उपासकाला ज्याचे त्याचे ‘क्लेश किंवा दु:ख’ माहीत असते. एक व्यक्‍ती कदाचित कुठल्यातरी एका समस्येमुळे दुःखी असेल तर दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या मनावर कसलेतरी ओझे असेल.

पण देवाला भिऊन वागणाऱ्‍यांना त्यांच्या मनावर असलेले ओझे एकट्यानेच उचलण्याची गरज नाही. प्रार्थना करतेवेळी, शलमोन कदाचित अशा एका उपासकाचा विचार करत असावा जो “आपले हात पसरून” यहोवाला कळकळीने प्रार्थना करत असावा. * शलमोनाला कदाचित त्याचा पिता दावीद याने अगदी दुःखात असताना: “तू आपला भार परमेश्‍वरावर टाक,” असे म्हटल्याचे आठवले असावे.—स्तोत्र ५५:४, २२.

मदतीसाठी यहोवाला केलेली विनवणी तो ऐकतो का? शलमोनाने यहोवाला अशी विनंती केली: “तू स्वर्गातील आपल्या निवास स्थानातून ऐक, त्यांना क्षमा कर; प्रत्येकाचे मन ओळखून त्याच्या सर्व वर्तनाप्रमाणे त्यास फळ दे.” (वचन ३०) ‘प्रार्थना ऐकणाऱ्‍या’ यहोवाला, समूह यानात्याने व प्रत्येक व्यक्‍ती यानात्याने आपल्या उपासकांची काळजी आहे, हे शलमोनाला ठाऊक होते. (स्तोत्र ६५:२) आपल्याला हवी असलेली मदत यहोवा देतो. पूर्ण अंतःकरणाने यहोवाकडे परतणाऱ्‍या पातक्याचे अपराधही तो क्षमा करतो.—२ इतिहास ६:३६-३९.

पश्‍चात्ताप करणाऱ्‍या पातक्यांची विनंती यहोवा नक्की ऐकेल, अशी शलमोनाला खात्री का आहे? “कारण सर्व मानवजातीची मने ओळखणारा केवळ तूच आहेस,” असे शलमोन त्याच्या प्रार्थनेत पुढे म्हणतो. प्रत्येक विश्‍वासू उपासकाचे काय दुःख आहे, किंवा त्याच्या मनात चाललेली घालमेल केवळ यहोवालाच चांगल्या प्रकारे माहीत असल्यामुळे, या उपासकाची त्याला काळजी वाटते.—स्तोत्र ३७:४.

शलमोनाने केलेल्या प्रार्थनेतून आपणही बरेच सांत्वन मिळवू शकतो. आपल्या बरोबरच्या लोकांना कदाचित आपल्या आंतरिक भावना, अर्थात आपले “क्लेश” किंवा आपले “दु:ख” पूर्णपणे समजणार नाही. (नीतिसूत्रे १४:१०) पण यहोवा आपले मन जाणतो आणि त्याला आपली खूप काळजी आहे. प्रार्थनेद्वारे त्याच्यापुढे मन मोकळे केल्यावर आपले मन हलके होते. यहोवावर “तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो,” असे बायबल आपल्याला सांगते.—१ पेत्र ५:७. (w१०-E १२/०१)

[तळटीप]

^ बायबल काळांत लोक प्रार्थना करताना, आकाशाकडे बघून ‘आपले हात पसरत’ असत.—२ इतिहास ६:१३.