व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नीट विचार करून मित्र निवडा

नीट विचार करून मित्र निवडा

रहस्य ४

नीट विचार करून मित्र निवडा

बायबल काय शिकवते? “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील.”—नीतिसूत्रे १३:२०.

समस्या? आपले मित्र एकतर आपल्याला समाधानी राहण्याचे प्रोत्साहन देऊ शकतात किंवा आपल्याला निरुत्साहित करू शकतात. त्यांच्या मनोवृत्तीचा आणि त्यांच्या बोलण्याचा, जीवनाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनावर नक्कीच परिणाम होतो.—१ करिंथकर १५:३३.

हे आपण बायबलमधील एका उदाहरणावरून पाहू शकतो. कनानची पाहणी करून आलेल्या १२ जणांबद्दल बायबलमध्ये एक अहवाल आहे. परतलेल्या या १२ जणांपैकी १० जणांनी, “जो देश हेरून ते आले होते त्याविषयी इस्राएल लोकांना . . . अनिष्ट बातमी दिली.” आणि उरलेले दोघे जण, कनान देशाविषयी चांगले बोलले. हा देश “अतिशय उत्तम” आहे, असे त्यांनी म्हटले. पण लोकांचे लक्ष या दोघांच्या बोलण्याकडे गेले नाही. त्यांनी त्या दहा हेरांनी सांगितलेल्या गोष्टींवरच विश्‍वास ठेवला. त्यामुळे, “सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि . . . सर्व इस्राएल लोक . . . कुरकुर करू लागले,” असे अहवालात म्हटले आहे.—गणना १३:३०–१४:९.

त्याचप्रमाणे आजही पुष्कळ लोक “कुरकुर करणारे, असंतुष्ट” आहेत. (यहूदा १६) कुठल्याही बाबतीत संतुष्ट नसलेल्या लोकांच्या संगतीत राहून संतुष्ट असणे सोपे नाही.

तुम्ही काय करू शकता? तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये असता तेव्हा कोणत्या गोष्टींवर कायम बोलता याचा जरा विचार करा. तुमचे मित्र नेहमी त्यांच्याजवळ असलेल्या गोष्टींबद्दलचीच बढाई मारत असतात का? तसेच, त्यांच्याजवळ ज्या गोष्टी नाहीत त्याबद्दल सतत कुरकुर करत असतात का? आणि तुम्ही त्यांचे कशा प्रकारचे मित्र आहात? तुम्ही तुमच्या मित्रांना जळवायचा प्रयत्न करता की, त्यांच्याजवळ जे आहे त्यात संतुष्ट राहण्याचे प्रोत्साहन त्यांना देता?

लवकरच जो राजा बनणार होता त्या दाविदाच्या व राजा शौलाचा मुलगा योनाथान याच्या उदाहरणाचा विचार करा. राजा शौलापासून आपला जीव वाचवण्यासाठी दावीद आश्रितासारखा रानात राहात होता. दावीद आपले राजासन बळकावेल, अशी भीती राजा शौलाला होती त्यामुळे तो त्याच्या जिवाचे बरे वाईट करावे म्हणून दाविदाच्या मागे हात धुवून लागला होता. राजा शौलानंतर योनाथानच बहुधा सिंहासनावर बसणार होता. तरीपण तो दाविदाचा जिवाभावाचा मित्र बनला. आपल्याऐवजी देवाने दाविदाला राजा बनवायचे ठरवले आहे, हे योनाथानाने ताडले व त्यामुळे तो आपल्या मित्राच्या बाजूने उभे राहण्यात समाधानी होता.—१ शमुवेल १९:१, २; २०:३०-३३; २३:१४-१८.

तुमचेही मित्र असेच असले पाहिजेत. ते समाधानी व तुमच्या हिताचा विचार करणारे असले पाहिजेत. (नीतिसूत्रे १७:१७) अर्थात, असे मित्र मिळवण्याकरता आधी तुम्ही स्वतः असे गुण दाखवण्याची गरज आहे.—फिलिप्पैकर २:३, ४. (w१०-E ११/०१)

[७ पानांवरील चित्र]

तुमचे मित्र तुम्हाला समाधानी राहण्याचे प्रोत्साहन देतात की तुम्हाला निरुत्साहित करतात?