व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला उज्ज्वल भविष्य मिळू शकते ते कसे?

तुम्हाला उज्ज्वल भविष्य मिळू शकते ते कसे?

तुम्हाला उज्ज्वल भविष्य मिळू शकते ते कसे?

तुम्हाला उज्ज्वल भविष्य कसे मिळवता येईल? ते मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे, तुम्ही आत्ता जे काही निर्णय घेता त्यांचा पुढे जाऊन काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करण्याची जी विलक्षण क्षमता तुमच्याकडे आहे तिचा उपयोग करणे.

हे खरे आहे की, तुम्हाला आयुष्यभर फायदा होईल असे निर्णय घेणे कदाचित तुम्हाला कठीण जाऊ शकते. असे का? कारण आपल्या अवतीभोवती असणाऱ्‍या लोकांना, त्यांच्या निर्णयांचे लगेच परिणाम हवे असतात. उदाहरणार्थ, बायबलमधील सल्ल्याचे पालन केल्यामुळे कुटुंबातील नाते मजबूत होतात हे कदाचित तुम्हाला ठाऊक असेल. (इफिसकर ५:२२–६:४) पण असे करण्यासाठी कामात, करमणुकीत किंवा मनोरंजनात पूर्णपणे गढून न जाता तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. तुमच्या जीवनातील अनेक पैलूंमध्ये तुम्हाला क्षणिक सुख आणि दीर्घकालीन यशस्वी जीवन यांपैकी एका गोष्टीची निवड करावी लागेल. योग्य मार्ग निवडण्यासाठी लागणारी मदत तुम्हाला कोठून मिळेल? त्यासाठी पुढे सांगितलेली चार पावले तुम्ही उचलू शकता.

१ तुमच्या निर्णयांमुळे होणाऱ्‍या परिणामांचा विचार करा

कोणताही निर्णय घेताना पुढे त्याचे काय परिणाम होतील याचा प्रामाणिकपणे विचार करा. देवाचे वचन असा सल्ला देते: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो.” (नीतिसूत्रे २२:३) निर्णयांच्या परिणामांचा तुम्ही जर प्रामाणिकपणे विचार केला तर तुम्ही चुकीचा निर्णय घेणार नाही. दुसरीकडे पाहता, योग्य निर्णयाच्या दीर्घकालीन फायद्यांचा तुम्ही विचार केला, तर त्या निर्णयानुसार कार्य करण्यास तुम्ही आणखी प्रवृत्त व्हाल.

स्वतःला विचारा: ‘मी घेतलेल्या निर्णयाचा एका वर्षानंतर किंवा १० अथवा २० वर्षांनंतर काय परिणाम होईल? याचा माझ्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होईल? माझ्या निर्णयाचा माझ्या कुटुंबावर आणि जवळच्या लोकांवर काय परिणाम होईल?’ सर्वात मुख्य म्हणजे स्वतःला विचारा: ‘मी जो निर्णय घेईल त्यामुळे देव आनंदी होईल का? त्यामुळे त्याच्याबरोबर असलेल्या माझ्या नातेसंबंधावर काय परिणाम होईल?’ बायबल हे देवाचे प्रेरित वचन आहे, त्यामुळे देवाला कोणत्या गोष्टी स्वीकृत आहेत हे समजण्यास आणि न दिसणारे धोके टाळण्यास बायबल तुम्हाला मदत करू शकते.—नीतिसूत्रे १४:१२; २ तीमथ्य ३:१६.

२ स्वतः निर्णय घ्या

बरेच जण स्वतः निर्णय घेण्यापेक्षा त्यांच्या अवतीभोवती असलेल्या लोकांचे अंधानुकरण करतात. एक विशिष्ट प्रकारची जीवनशैली प्रचलित आहे म्हणून तिचे अनुसरण केल्याने आपण यशस्वी होऊ असे नाही. तेव्हा, तुमच्यासमोर जे अनेक पर्याय आहेत त्यांचे स्वतः परीक्षण करा. नेहाचे * उदाहरण विचारात घ्या. ती म्हणते: “मला लग्न करून सुखी संसार करायचा होता. पण मला माहीत होतं की माझ्या जीवनशैलीमुळे असं होणं शक्य नाही. माझ्या कॉलेजमधले माझे मित्रमैत्रिणी हुशार आणि तरुण होते. पण त्यांनी त्यांच्या खासगी जीवनात नेहमीच चुकीचे निर्णय घेतले. ते सतत नवनवीन बॉयफ्रेन्ड्‌स आणि गर्लफ्रेन्ड्‌स ठेवायचे. त्यांच्याप्रमाणे, माझेही अनेक बॉयफ्रेन्ड्‌स होते. अशा जीवनशैलीमुळे मी भावनिक रीत्या खूप खचून गेले.”

नेहाने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास सुरू केला. ती म्हणते: “साक्षीदारांमध्ये मी अनेक तरुणांना पाहिलं जे आनंदी होते, तसंच ज्यांचं वैवाहिक जीवन सुखी होतं अशी जोडपीही मी पाहिली. माझ्या जीवनशैलीत बदल करणं इतकं सोपं नव्हतं, पण मी हळूहळू बदल केले.” याचा काय परिणाम झाला? नेहा म्हणते: “मला अशा एका व्यक्‍तीशी लग्न करायचं होतं जिचा मी मनापासून आदर करू शकेन. पुढे माझ्यासारखाच धार्मिक विश्‍वास असलेल्या व्यक्‍तीशी माझं लग्न झालं. मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं इतकं सुखी कौटुंबिक जीवन देवानं मला दिलं.”

३ निर्णय घेताना पुढचा विचार करा

निर्णयांचे लगेच परिणाम मिळाले पाहिजेत अशी सर्वसामान्य विचारसरणी टाळण्यासाठी, भविष्यात तुम्हाला नेमके काय हवे आहे हे तुमच्या मनात स्पष्ट असले पाहिजे आणि ते मिळवण्याची योजनाही असली पाहिजे. (नीतिसूत्रे २१:५) फक्‍त ७०-८० वर्षांच्या जीवनाचाच विचार करू नका, तर बायबलमध्ये सांगितलेल्या अनंतकाळच्या जीवनाचा विचार करा! देवाच्या नवीन जगात या पृथ्वीवर तुम्ही मृत्यु नसलेले जीवन जगाल.

बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, देवाने सर्व मानवांना अनंतकाळाचे जीवन देण्यासाठी येशूच्या खंडणी बलिदानाची तरतूद केली आहे. (मत्तय २०:२८; रोमकर ६:२३) मानवांसाठी आणि पृथ्वीसाठी असणारा देवाचा उद्देश लवकरच पूर्ण होईल. जे लोक देवावर प्रेम करतात अशांना पृथ्वीवरील नंदनवनात अनंतकाळचे जीवन जगण्याची संधी मिळेल. (स्तोत्र ३७:११; प्रकटीकरण २१:३-५) निर्णय घेताना तुम्ही जर दीर्घ पल्ल्याचा विचार केला तर तुम्हालाही हे जीवन मिळू शकेल.

४ ध्येये मिळवण्यासाठी पावले उचला

उज्ज्वल भविष्य मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? खऱ्‍या देवाचे ज्ञान घेण्यापासून सुरुवात करा. (योहान १७:३) बायबलचे खरे ज्ञान घेतल्यामुळे, देवाने भविष्याबद्दल दिलेली अभिवचने काल्पनिक नाहीत, तर खरी आहेत यावरील तुमचा भरवसा आणखी पक्का होईल. तुमचा विश्‍वास पक्का असेल तर देवाला आनंदित करण्यासाठी तुम्ही जीवनात कोणतेही बदल करण्यास तयार असाल.

महेशचे उदाहरण विचारात घ्या. तो म्हणतो: “वयाच्या १२ व्या वर्षापासूनच मी दारूच्या आणि ड्रग्सच्या आहारी गेलो. मी एका टोळीचा सदस्य होतो आणि ३० वर्षंही जगेन की नाही अशी शंका मला होती. माझ्यातील रागामुळे आणि निराशेमुळे मी बऱ्‍याचदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मला जगायचं तर होतं, पण आशेचा एकही किरण दिसत नव्हता.” महेश कॉलेजमध्ये होता तेव्हा त्याच्या टोळीतील एका साथीदाराने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्याच्या मित्रामुळे महेशनेही बायबल अभ्यास सुरू केला.

महेश बायबलमधून जे काही शिकला त्यामुळे त्याचा जीवनाबद्दलचा दृष्टिकोन बदलला. तो म्हणतो, “भविष्यात पृथ्वीचं रूपांतर नंदनवनात होईल, आणि त्यात मानव शांतीपूर्ण आणि चितांमुक्‍त जीवन जगतील हे मी शिकलो. मला असंच भविष्य हवं होतं. त्यामुळे मी यहोवाबरोबर चांगला नातेसंबंध जोडण्याचं ध्येय ठेवलं. देवाला आनंदी करण्याची माझी इच्छा तर होती, पण नेहमीच तसं करणं मला जमत नव्हतं. बायबलचा अभ्यास सुरू केल्यानंतरही मी काही वेळा बेसुमार दारू प्यायलो आणि एका मुलीत गुंतलो.”

यावर महेशने कशी मात केली आणि आपली जीवनशैली बदलण्यास त्याला कशी मदत मिळाली? तो म्हणतो: “माझ्या बायबल शिक्षकानं मला नेहमी बायबल वाचण्याचं आणि अशा लोकांशी सहवास राखण्याचं प्रोत्साहन दिलं जे देवाला आनंदी करू इच्छितात. माझ्या टोळीतील मित्र अजूनही माझ्यावर प्रभाव टाकत आहेत हे माझ्या लक्षात आलं. माझ्यासाठी माझे मित्रच सर्वकाही होते, पण तरीसुद्धा मी त्यांच्यासोबत असलेलं माझं नातं पूर्णपणे तोडून टाकलं.”

महेशने छोटीछोटी ध्येये ठेवली आणि जीवनात महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य दिले. यामुळे देवाच्या स्तरांनुसार जीवन जगण्याचे मोठे ध्येय तो गाठू शकला. तुम्हीही जीवनात ध्येये ठेवू शकता. तुम्हाला कोणते मोठे ध्येय गाठायचे आहे आणि ते गाठण्यासाठी तुम्ही कोणती छोटी ध्येय ठेवली आहेत ते एका कागदावर लिहून काढा. ही ध्येये गाठण्यास तुम्हाला मदत करतील अशा लोकांशी त्यांबद्दल बोला आणि तुम्ही ती ध्येये गाठत आहात की नाही ते पाहण्यास त्यांना सांगा.

देवाबद्दल शिकण्यासाठी आणि त्याचे मार्गदर्शन आपल्या जीवनात लागू करण्यासाठी लगेच पावले उचला. देवाबद्दल आणि त्याच्या वचनाबद्दल आपल्या मनात प्रेम उत्पन्‍न करा. जी व्यक्‍ती देवाच्या तत्त्वांचे पालन करते तिच्याबद्दल देवाचे वचन असे म्हणते की जे काही ती व्यक्‍ती हाती घेते ते “सिद्धीस जाते.”—स्तोत्र १:१-३. (w१२-E ०५/०१)

[तळटीप]

^ परि. 8 या लेखातील नावे बदलण्यात आली आहेत.