व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय: मोशे—एक आदर्श व्यक्‍ती

कोण होता मोशे?

कोण होता मोशे?

‘मोशे’ हे नाव ऐकताच तुमच्या डोळ्यांसमोर कोणते चित्र उभे राहते? तुम्ही कदाचित म्हणाल . . .

  • एक तान्हे बाळ ज्याला त्याच्या आईने एका बंद टोपलीत ठेवून नाईल नदीत लपवले होते.

  • एक मुलगा जो फारोच्या मुलीचा पुत्र म्हणून इजिप्तमध्ये ऐशआरामात वाढला, पण आपण मुळात इस्राएली आहोत हे तो कधीच नाही विसरला.

  • एक मनुष्य जो ४० वर्षे मिद्यान देशात मेंढपाळ म्हणून राहिला.

  • एक असा मनुष्य जो पेटलेल्या झुडपासमोर यहोवाशी  * बोलला.

  • एक असा पुरूष जो मोठे धाडस करून इजिप्तच्या राजासमोर उभा राहिला व ज्याने इस्राएल लोकांची गुलामगिरीतून सुटका करण्याची मागणी केली.

  • तो मनुष्य ज्याने देवाच्या सांगण्यावरून इजिप्तवर दहा पीडा आणल्या, कारण त्या देशाच्या राजाने खऱ्‍या देवाला आव्हान केले होते.

  • तो मनुष्य ज्याने मोठ्या दिमाखात इस्राएल लोकांना इजिप्तमधून बाहेर आणले.

  • तो मनुष्य ज्याने देवाच्या शक्‍तीने तांबडा समुद्र दुभागला.

  • तो ज्याने इस्राएल लोकांना देवाकडील दहा आज्ञा दिल्या होत्या.

या आणि अशा कितीतरी गोष्टी मोशेने अनुभवल्या होत्या. त्यामुळेच ख्रिस्ती, यहुदी व मुस्लिम धर्मांत या विश्‍वासू मनुष्याला इतके मानाचे स्थान का आहे हे आपण समजू शकतो.

यात कोणतीच शंका नाही, की मोशे हा “भयंकर दरारा” असलेला देवाचा संदेष्टा होता. (अनुवाद ३४:१०-१२) देवाने अनेक पराक्रमी कृत्ये करण्यासाठी त्याचा उपयोग केला. पण, मोशे हा तुमच्याआमच्यासारखाच सर्वसाधारण मनुष्य व देवाच्या इतर संदेष्ट्यांप्रमाणे “आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता.” (याकोब ५:१७) आज तुम्हालाआम्हाला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते तशा अनेक समस्या त्याच्याही वाट्याला आल्या. पण, त्याने यशस्वीपणे त्यांचा सामना केला.

त्याला हे कसे जमले हे तुम्हाला जाणून घ्यायचे का? मोशेने दाखवलेल्या अनेक चांगल्या गुणांपैकी तीन गुणांचे आपण परीक्षण करू या आणि त्याच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो ते पाहू या. (w१३-E ०२/०१)

^ मोशे हा बायबलच्या काळात राहणारा एक मनुष्य होता. बायबलमध्ये सांगितल्यानुसार यहोवा हे देवाचे वैयक्‍तिक नाव आहे.