व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ४

सैतानाचं ऐकल्यामुळे काय झालं?

सैतानाचं ऐकल्यामुळे काय झालं?

आदाम आणि हव्वाने देवाची आज्ञा मोडली आणि त्यामुळे ते मेले. उत्पत्ती ३:६, २३

हव्वाने सापाचं ऐकलं आणि फळ खाल्लं. मग तिने ते आदामला दिलं आणि त्यानेही ते खाल्लं.

त्यांनी जे केलं ते चुकीचं होतं; ते पाप होतं. त्यामुळे देवाने त्यांना नंदनवनातून बाहेर काढलं.

एदेन बागेतून बाहेर निघाल्यावर त्यांचं आणि त्यांच्या मुलांचं जीवन खूप कठीण झालं. ते म्हातारे झाले आणि शेवटी मेले. मेल्यानंतर ते स्वर्गात किंवा नरकात, कुठेही गेले नाहीत. त्यांचं जीवन संपलं होतं.

मेलेले लोक मातीत मिळतात; त्यांचं जीवन संपतं. उत्पत्ती ३:१९

आपण सगळेच आदाम आणि हव्वाची मुलं आहोत आणि म्हणून आपणही मरतो. मेलेले लोक काहीच पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत आणि काही करूही शकत नाहीत.—उपदेशक ९:५, १०.

लोकांनी मरावं अशी यहोवा देवाची मुळीच इच्छा नव्हती. लवकरच तो मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करणार आहे. त्यांनी त्याचं ऐकलं, म्हणजेच त्याच्या आज्ञा पाळल्या तर ते कायम जगू शकतील.