व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ०७

बायबल यहोवाबद्दल काय शिकवतं?

बायबल यहोवाबद्दल काय शिकवतं?

तुम्ही यहोवा देवाबद्दल विचार करता तेव्हा तुमच्या मनात काय येतं? कदाचित तुम्ही म्हणाल की तो खूप महान आहे आणि आपल्यापासून खूप दूर कुठेतरी आहे. काहींना वाटतं की देव म्हणजे नुसतीच एक अद्‌भुत शक्‍ती. देव एक व्यक्‍ती आहे किंवा त्याला भावना आहेत असं त्यांना वाटत नाही. पण बायबल आपल्याला काय सांगतं? देवाचं वचन बायबल, आपल्याला त्याच्या सुंदर गुणांबद्दल माहिती देतं. ते सांगतं की त्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि त्याला आपली काळजी आहे.

१. आपण देवाला का पाहू शकत नाही?

“देव अदृश्‍य आहे.” (योहान ४:२४) यहोवाचं आपल्यासारखं हाडामांसाचं शरीर नाही. तो अदृश्‍य आहे आणि स्वर्गात राहतो. म्हणून आपण त्याला पाहू शकत नाही.

२. यहोवाचे काही सुंदर गुण कोणते आहेत?

आपण यहोवाला पाहू शकत नाही. पण त्याच्याबद्दल जाणून घेतल्यावर, आपण त्याच्यावर प्रेम करू लागतो. कारण तो एक खरीखुरी व्यक्‍ती आहे आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर गुण आहेत. बायबल म्हणतं: “यहोवा न्यायप्रिय आहे, तो आपल्या एकनिष्ठ सेवकांना सोडून देणार नाही.” (स्तोत्र ३७:२८) तो “दयाळू आणि खूप कृपाळू आहे.” खासकरून ज्यांना दुःख सोसावं लागतं, त्यांच्याशी तो दयाळूपणे वागतो. (याकोब ५:११) “यहोवा दुःखी लोकांच्या जवळ असतो; निराश असलेल्यांना तो वाचवतो.” (स्तोत्र ३४:१८, तळटीप) तसंच, बायबल सांगतं की आपल्या वागण्या-बोलण्यामुळे यहोवा एकतर खूश होतो किंवा दुःखी होतो. एखादी व्यक्‍ती जाणून-बुजून वाईट वागते, तेव्हा त्याला दुःख होतं. (स्तोत्र ७८:४०, ४१) पण जेव्हा एखादी व्यक्‍ती योग्य ते करते, तेव्हा त्याला खूप आनंद होतो.​—नीतिवचनं २७:११ वाचा.

३. यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे हे तो कसं दाखवतो?

यहोवाचा सगळ्यात प्रमुख गुण म्हणजे प्रेम. बायबलमध्ये तर म्हटलंय की प्रेम हा फक्‍त देवाचा गुण नाही, तर देव स्वतःच “प्रेम आहे.” (१ योहान ४:८) यहोवा आपल्याबद्दल प्रेम कसं दाखवतो, हे आपल्याला बायबलमधून कळतं. पण, त्याने निर्माण केलेल्या गोष्टींमधूनही त्याचं प्रेम दिसून येतं. (प्रेषितांची कार्यं १४:१७ वाचा.) उदाहरणार्थ, त्याने आपल्याला कसं बनवलंय याचा विचार करा. त्याने आपल्याला अशा प्रकारे बनवलंय की आपण सुंदर रंग पाहू शकतो, सुरेल संगीत ऐकू शकतो आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेऊ शकतो. त्याची इच्छा आहे की आपण जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यावा.

आणखी जाणून घेऊ या

यहोवा महान आणि आश्‍चर्यकारक गोष्टी करण्यासाठी कशाचा वापर करतो, हे जाणून घेऊ या. तसंच यहोवाच्या सुंदर गुणांबद्दल आपल्याला बायबलमधून काय समजतं, हेही पाहू या.

४. पवित्र शक्‍ती​—देवाची क्रियाशील शक्‍ती

जसं आपण हातांनी काम करतो, तसं यहोवा वेगवेगळी कार्यं करण्यासाठी त्याची पवित्र शक्‍ती वापरतो. बायबल सांगतं की पवित्र शक्‍ती या विश्‍वातली सगळ्यात ताकदवान शक्‍ती आहे. पण काहींना वाटतं की पवित्र शक्‍ती एक व्यक्‍ती आहे. लूक ११:१३ आणि प्रेषितांची कार्यं २:१७ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • जे देवाकडे पवित्र शक्‍ती मागतात, त्यांच्यावर तो ती ‘ओततो,’ असं बायबलमध्ये म्हटलंय. मग पवित्र शक्‍ती एक व्यक्‍ती असू शकते का? जर ती एक व्यक्‍ती नाही, तर मग काय आहे? आणि तुम्हाला असं का वाटतं?

यहोवा पवित्र शक्‍तीद्वारे महान आणि आश्‍चर्याच्या गोष्टी करतो. स्तोत्र १०४:३० आणि २ पेत्र १:२०, २१ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • यहोवाने आजपर्यंत कोणकोणत्या गोष्टी करण्यासाठी त्याच्या पवित्र शक्‍तीचा वापर केला आहे?

५. यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वात बरेच सुंदर गुण आहेत

मोशे हा देवाचा एक सेवक होता. त्याने बरीच वर्षं विश्‍वासूपणे देवाची सेवा केली होती. पण तरी त्याला आपल्या निर्माणकर्त्याला आणखी चांगल्या प्रकारे जाणून घ्यायची इच्छा होती. म्हणून तो देवाला म्हणाला: “मला तुझे मार्ग दाखव. म्हणजे मला तुझी ओळख होईल.” (निर्गम ३३:१३) तेव्हा यहोवाने त्याला आपल्या काही गुणांबद्दल सांगितलं. निर्गम ३४:४-६ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • यहोवाने मोशेला स्वतःच्या कोणत्या गुणांबद्दल सांगितलं?

  • तुम्हाला यहोवाचे कोणते गुण सगळ्यात जास्त आवडतात?

६. यहोवाला आपली काळजी आहे

जुन्या काळात देवाचे लोक, म्हणजे इब्री लोक इजिप्तमध्ये गुलाम होते. त्यांचं दुःख आणि त्रास पाहून यहोवाला कसं वाटलं? ऑडिओ क्लिप ऐका आणि ती ऐकत असताना आपल्या बायबलमध्ये पाहा. किंवा मग निर्गम ३:१-१० वाचा. त्यानंतर खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • आपलं दुःख पाहून यहोवाला कसं वाटतं, याबद्दल या अहवालातून काय शिकायला मिळतं?​—७ आणि ८ वचनं पाहा.

  • आपल्याला मदत करायची यहोवाला खरंच इच्छा आहे आणि त्याच्याजवळ ती ताकदही आहे, असं तुम्हाला वाटतं का? आणि तुम्हाला असं का वाटतं?

७. सृष्टीतून यहोवाचे गुण दिसून येतात

यहोवाने निर्माण केलेल्या गोष्टींतून आपल्याला त्याच्या गुणांबद्दल बरंच काही शिकायला मिळतं. व्हिडिओ पाहा. त्यानंतर रोमकर १:२० वाचा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • यहोवाने बनवलेल्या गोष्टींमधून तुम्हाला त्याचे कोणते गुण दिसून येतात?

काही जण म्हणतात: “देव एक व्यक्‍ती नाही तर फक्‍त एक शक्‍ती आहे, जी सगळीकडे आहे.”

  • तुम्हाला काय वाटतं?

  • तुम्हाला असं का वाटतं?

थोडक्यात

यहोवा एक अदृश्‍य व्यक्‍ती आहे. त्याच्यात बरेच सुंदर गुण आहेत. त्याचा एक प्रमुख गुण म्हणजे प्रेम.

उजळणी

  • आपण यहोवाला का पाहू शकत नाही?

  • पवित्र शक्‍ती काय आहे?

  • यहोवाचे काही गुण कोणते आहेत?

ध्येय

हेसुद्धा पाहा

यहोवाच्या चार खास गुणांबद्दल माहिती घेऊन त्याला आणखी चांगल्या प्रकारे जाणून घ्या.

“देव कसा आहे?” (टेहळणी बुरूज क्र. १ २०१९)

यहोवा सृष्टीतल्या कणाकणात नाही असं का म्हणता येईल हे जाणून घ्या.

“देव सृष्टीतल्या कणाकणात म्हणजे सर्वव्यापी आहे का?” (वेबसाईटवरचा लेख)

बायबलमध्ये पवित्र शक्‍तीची तुलना देवाच्या हातांशी का केली आहे ते पाहा.

“पवित्र शक्‍ति क्या है?” (वेबसाईटवरचा लेख)

देवाला आपली काळजी आहे हे मानणं एका आंधळ्या माणसाला कठीण गेलं. त्याचं मत कसं बदललं हे पाहा.

“आता मीसुद्धा इतरांना मदत करू शकतो” (टेहळणी बुरूज क्र. १ २०१६)