अध्याय बारा
त्यानं देवाकडून मिळणारं सांत्वन अनुभवलं
१, २. एलीया कोणत्या अविस्मरणीय घटनांचा विचार करत असावा?
एलीया त्या मुसळधार पावसात रस्त्यावरून धावत असताना आकाश आणखीनच काळवंडून आलं. इज्रेलला पोहोचण्यासाठी त्याला अजून बरंच अंतर कापायचं होतं. शिवाय, आता काही तो तरुण राहिला नव्हता. पण, “यहोवाचा हात” (पं.र.भा.) त्याच्यावर असल्यामुळं तो न थकता धावतच राहिला. अहाब राजाचा रथ ओढणाऱ्या घोड्यांना नुकतंच पार करून तो पुढं निघून गेला होता! त्याच्या नसानसांतून सळसळणारी ती शक्ती त्यानं पूर्वी कधीच अनुभवली नव्हती.—१ राजे १८:४६ वाचा.
२ पावसात धावणाऱ्या एलीयाचं चित्र तुम्ही डोळ्यांपुढं उभं करू शकता का? पावसाचे सपकारे चेहऱ्यावर घेत आता तो एकटाच त्या रस्त्यावरून धावत होता. कर्मेल डोंगर खूप मागे पडला होता; त्या वादळी पावसात तर तो दिसेनासा झाला होता. एलीयाच्या मनात त्या वेळी कोणते विचार घोळत असतील? त्या दिवशी घडलेल्या अविस्मरणीय घटनांचा तो विचार करत असावा का? खरोखर, यहोवा देवाचा आणि खऱ्या उपासनेचा त्या दिवशी गौरवशाली विजय झाला होता. यहोवानं मोठा चमत्कार करून एलीयाच्या द्वारे बआल उपासनेला जबरदस्त तडाखा दिला होता. बआलाचे ४५० संदेषटे खोटे आहेत हे उघड झालं होतं आणि त्यांचा वध करण्यात आला होता. त्यानंतर, देशाला होरपळून काढणारा साडेतीन वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी एलीयानं यहोवाला प्रार्थना केली होती. आणि पुन्हा एकदा यहोवानं एलीयाची प्रार्थना ऐकून पाऊस पाडला होता!—१ राजे १८:१८-४५.
३, ४. (क) एलीयाच्या आशा कशामुळं पल्लवित झाल्या होत्या? (ख) आपण कोणत्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत?
३ पावसाचं पाणी तुडवत, इज्रेलचं ते तीस किलोमीटरचं अंतर पार करणाऱ्या एलीयाच्या मनात अनेक आशा पल्लवित झाल्या. बआलाच्या संदेष्ट्यांचा वध केल्यानंतर परिस्थिती खऱ्या अर्थानं बदलेल असं त्याला वाटलं. आता तर अहाबाला बदलावंच लागेल! आज जे काही घडलं ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर अहाबापुढं काही पर्यायच नाही; आता तरी तो नक्कीच बआल उपासना सोडून, ईजबेल राणीला आवर घालेल आणि यहोवाच्या सेवकांचा छळ थांबवेल, असं एलीयाला वाटलं असावं.
४ आयुष्यात सगळं काही मनासारखं घडू लागतं तेव्हा साहजिकच आपल्या आशा याको. ५:१७) पण वास्तविक पाहता, एलीयाच्या समस्या अजून संपल्या नव्हत्या; पुढं त्याला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागणार होतं. खरंतर, अवघ्या काही तासांतच त्याची मनःस्थिती एकदम बदलली. तो इतका घाबरला व निराश झाला, की आता मेलेलं बरं असं त्याला वाटू लागलं. पण, त्याला असं वाटण्यासारखं नेमकं काय घडलं होतं? आणि यहोवानं त्याच्या या संदेष्ट्याचा खचलेला विश्वास व धैर्य पुन्हा वाढवण्यासाठी काय केलं? या प्रश्नांची उत्तरं आपण पुढं पाहू या.
उंचावतात. आपल्या समस्या कायमच्या नाहीशा झाल्या आहेत आणि आता सगळं काही चांगलंच घडेल, असं आपल्याला वाटू लागतं. जर एलीयालासुद्धा असं वाटलं असेल, तर आपल्याला त्याचं आश्चर्य वाटू नये; कारण तोही “आपल्यासारख्या” भावना असलेला माणूस होता. (घटनांना अनपेक्षित वळण
५. कर्मेल डोंगरावर घडलेल्या घटना पाहून अहाब यहोवाचा आदर करण्यास शिकला होता का, आणि आपण असं का म्हणू शकतो?
५ अहाब इज्रेलमधील आपल्या राजमहालात पोहोचल्यानंतर जे काही घडलं, त्यावरून त्याला पश्चात्ताप झाला असल्याचं दिसून आलं का? अहवाल म्हणतो: “एलीयाने काय काय केले, तसेच त्याने सर्व संदेषटे तलवारीने कसे वधले हे सगळे अहाबाने ईजबेलीस कळवले.” (१ राजे १९:१) इथं एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? दिवसभरात घडलेल्या घटनांबद्दल ईजबेलीला सांगताना अहाबानं यहोवा देवाचा साधा उल्लेखही केला नाही. उलट, त्या चमत्कारिक घटना “एलीयाने” केल्या असं म्हणून त्यानं हेच दाखवून दिलं, की या गोष्टींकडे त्यानं केवळ एका मानवी दृष्टिकोनातून पाहिलं होतं. यहोवा देवाचा आदर करण्यास अहाब शिकला नव्हता. तसंच, सूड भावनेनं पेटून उठलेल्या त्याच्या बायकोबद्दल काय म्हणता येईल? या सगळ्या गोष्टींविषयी तिची काय प्रतिक्रिया होती?
६. ईजबेलीनं एलीयाला कोणता निरोप पाठवला, आणि त्याचा काय अर्थ होता?
६ अहाबानं ईजबेलीला जे सांगितलं ते ऐकून ती रागानं लालबुंद झाली. तिनं लगेच एलीयाला निरोप पाठवला: “संदेष्ट्यांच्या जिवाच्या गतीसारखी तुझ्या जिवाची गती उद्या याच वेळी केली नाही तर देव माझे तसेच व त्याहूनही अधिक करोत.” (१ राजे १९:२) ही केवळ एक पोकळ धमकी नव्हती! तर बआलाच्या संदेष्ट्यांचा सूड उगवण्यासाठी उद्यापर्यंत आपण एलीयाला ठार मारलं नाही, तर आपण स्वतः मरण पत्करू अशी शपथच तिनं घेतली होती. त्या दिवशी रात्री वादळी पावसात इज्रेलला पोहोचल्यानंतर एलीयानं कदाचित एखाद्या साध्याशा घरात आसरा घेतला असेल. राणीच्या निरोप्यानं त्याला झोपेतून उठवून तिचा निरोप दिला तेव्हा एलीयाची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करा.
एलीयाला भीतीनं व निराशेनं ग्रासलं
७. ईजबेलीनं दिलेल्या धमकीचा एलीयावर काय परिणाम झाला, आणि त्यानं काय केलं?
७ बआल उपासनेविरुद्धची आपली लढाई कायमची संपली आहे असं जर एलीयाला १ राजे १८:४; १९:३.
वाटलं असेल, तर ईजबेल राणीचा तो निरोप ऐकल्यावर त्याच्या सर्व अपेक्षांचा चुराडा झाला असेल. ईजबेलीचा इरादा मुळीच बदलला नव्हता. तिच्या हुकमावरून एलीयाच्या सोबतीच्या अनेक विश्वासू संदेष्ट्यांचा वध करण्यात आला होता आणि आता एलीयाची वेळ आली होती. ईजबेलीच्या धमकीचा एलीयावर काय परिणाम झाला? तो घाबरला आणि “जीव घेऊन पळाला.” ईजबेल किती क्रूरपणे आपली हत्या करेल याचं चित्र त्याच्या डोळ्यांसमोर आलं असेल का? असे विचार सतत मनात घोळू दिल्यामुळेच त्याचं धैर्य खचलं असावं का?—धैर्य टिकवून ठेवायचं असेल, तर ज्या गोष्टींची आपल्याला भीती वाटते त्यांवर आपण आपलं मन केंद्रित करू नये
८. (क) पेत्र आणि एलीया या दोघांचंही धैर्य कशामुळं खचलं? (ख) एलीया आणि पेत्र यांच्या उदाहरणांवरून आपण कोणता धडा शिकतो?
८ अर्थात, एलीया हा देवाचा असा एकमेव विश्वासू सेवक नव्हता जो भीतीला बळी पडला. पुढं बऱ्याच काळानंतर, एकदा प्रेषित पेत्राचीसुद्धा अशीच अवस्था झाली होती. येशूच्या सांगण्यावरून तो त्याच्यासोबत पाण्यावर चालू लागला खरा, पण नंतर “वारा पाहून” तो घाबरला; त्याचं धैर्य खचलं आणि तो बुडू लागला. (मत्तय १४:३० वाचा.) एलीया आणि पेत्र या दोघांच्या उदाहरणांवरून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. तो म्हणजे, जर आपल्याला धैर्य टिकवून ठेवायचं असेल, तर ज्या गोष्टींची आपल्याला भीती वाटते त्यांवर आपण आपलं मन केंद्रित करू नये. उलट, आपल्याला आशा आणि बळ देणाऱ्या यहोवा देवाला आपण सतत डोळ्यांपुढं ठेवलं पाहिजे.
“आता पुरे झाले”
९. एलीयाच्या प्रवासाचं आणि त्याच्या मनःस्थितीचं वर्णन करा.
९ एलीया इतका घाबरला की तो दक्षिणपश्चिमेकडील, १५० किलोमीटर दूर असलेल्या बैरशेबा इथं पळून गेला. बैरशेबा हे यहूदाच्या दक्षिण सरहद्दीवर असलेलं एक नगर होतं. तिथं त्यानं आपल्या सेवकाला थांबायला सांगितलं आणि तो एकटाच रानात गेला. अहवाल म्हणतो, की तो “एक दिवसाची मजल चालून” गेला. त्यामुळं आपण कल्पना करू शकतो, की सकाळी सूर्य उगवताच तो निघाला असेल. त्यानं सोबत काही अन्नसामग्रीसुद्धा घेतली नव्हती. निराश, भयभीत झालेला एलीया तळपत्या उन्हात त्या रूक्ष अरण्यातून पायपीट करत चालला होता. दुपारचं ऊन ओसरून सूर्य मावळला तोपर्यंत एलीया अगदीच गळून गेला होता, त्याच्यात काही त्राणच उरले नव्हते. चालून चालून दमलेला एलीया शेवटी एका झुडपाखाली बसला. त्या ओसाड प्रदेशात तितकाच काय तो आसरा होता.—१ राजे १९:४.
१०, ११. (क) एलीयानं यहोवाला केलेल्या प्रार्थनेचा काय अर्थ होता? (ख) एलीयाप्रमाणेच निराश झालेल्या बायबलमधील इतर विश्वासू सेवकांच्या भावनांचं वर्णन करा.
१० एलीयानं अतिशय व्याकूळ होऊन यहोवाला प्रार्थना केली आणि आपल्याला मरण यावं अशी विनवणी केली. “मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही,” असंही तो यहोवाला म्हणाला. एलीयाला माहीत होतं, की आतापर्यंत त्याच्या पूर्वजांच्या अस्तित्वाच्या कोणत्याही खुणा उरल्या नव्हत्या; कबरेत त्यांची माती झाली होती. साहजिकच, कुणासाठी काहीही करणं आता त्यांना शक्य नव्हतं. (उप. ९:१०) या पूर्वजांप्रमाणेच मीसुद्धा काहीच उपयोगाचा नाही, असं एलीयाला वाटलं. म्हणूनच अगदी असाहाय्य होऊन तो म्हणाला: “आता पुरे झाले.” आपल्या जगण्याला काहीच अर्थ नाही असं त्याला वाटलं.
११ देवाचा एखादा विश्वासू सेवक इतका खचून जाऊ शकतो याचं आपल्याला आश्चर्य वाटावं का? नाही. बायबलमध्ये अशा कितीतरी विश्वासू सेवकांची उदाहरणं आहेत, जे इतके दुःखी झाले होते की आपल्याला मरण आलेलं बरं असं त्यांना वाटलं. रिबका, याकोब, मोशे आणि ईयोब हे त्यांपैकीच काही आहेत.—उत्प. २७:४६; ३७:३५; गण. ११:१३-१५; ईयो. १४:१३.
१२. अगदी निराश वाटल्यास तुम्ही एलीयाचं अनुकरण कसं करू शकता?
१२ आज आपण अतिशय कठीण काळात जगत आहोत. त्यामुळं अनेक जण, अगदी देवाचे विश्वासू सेवकसुद्धा कधीकधी निराश होऊ शकतात. (२ तीम. ३:१) तुम्हाला जर कधी घोर निराशेनं ग्रासलं, तर एलीयाप्रमाणे देवाजवळ आपलं मन मोकळं करा; कारण यहोवा हा “सांत्वनदाता देव” आहे. (२ करिंथकर १:३, ४ वाचा.) यहोवानं एलीयाचं सांत्वन कसं केलं?
यहोवानं आपल्या संदेष्ट्याचा सांभाळ केला
१३, १४. (क) यहोवानं एका देवदूताद्वारे आपल्या संदेष्ट्याबद्दल काळजी कशी दाखवली? (ख) यहोवाला आपल्याबद्दल सर्वकाही, अगदी आपल्या कमतरतासुद्धा माहीत आहेत, हे दिलासादायक का आहे?
१३ ओसाड अरण्यातील झुडपाखाली पडलेल्या आणि मृत्यूची विनंती करणाऱ्या आपल्या प्रिय संदेष्ट्याला पाहून यहोवाला कसं वाटलं असेल? नक्कीच त्याला खूप वाईट वाटलं असेल. कारण, एलीया झोपी गेला तेव्हा यहोवानं आपल्या एका देवदूताला त्याच्याकडे पाठवलं. देवदूतानं अगदी हळुवारपणे स्पर्श करून एलीयाला झोपेतून उठवलं आणि म्हटलं: “ऊठ, हे खा.” देवदूतानं त्याच्या उशाशी ताजी, गरम भाकर आणि पाणी असं साधंसं जेवण ठेवलं होतं. एलीयानं उठून ते खाल्लं, पण त्यानं देवदूताचे आभार मानले का? अहवालात इतकंच सांगितलं आहे, की तो खाऊनपिऊन पुन्हा झोपी गेला. कदाचित तो इतका निराश झाला असेल, की त्याच्यात काही बोलण्याचेही त्राण उरले नसतील. नंतर पुन्हा एकदा, कदाचित पहाटे, देवदूतानं त्याला झोपेतून उठवलं आणि म्हटलं: “ऊठ, हे खा.” पुढं तो एलीयाला म्हणाला: “कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करावयाचा आहे.” देवदूताचे हे शब्द विशेष लक्षात घेण्यासारखे आहेत.—१ राजे १९:५-७.
१४ एलीया नेमका कुठं चालला होता हे यहोवानं देवदूताला प्रकट केलं होतं. शिवाय, एवढा लांबचा प्रवास एलीया स्वतःच्या बळावर करू शकणार नाही, हेसुद्धा स्तोत्र १०३:१३, १४ वाचा.) देवदूतानं पुरवलेल्या अन्नामुळं एलीयाला कशी मदत झाली?
देवदूताला माहीत होतं. खरंच, यहोवाला आपली ध्येयं माहीत आहेत आणि आपल्या कमतरतांची त्याला आपल्यापेक्षा जास्त जाणीव आहे, ही किती दिलासा देणारी गोष्ट आहे! (१५, १६. (क) यहोवानं पुरवलेल्या अन्नामुळं एलीयाला कशी मदत झाली? (ख) आज यहोवा ज्या प्रकारे आपल्या सेवकांचा सांभाळ करतो, त्याची आपण कदर का केली पाहिजे?
१५ अहवाल म्हणतो: “त्याने उठून ते अन्नपाणी सेवन केले; त्या अन्नाच्या बळावर चाळीस दिवस व चाळीस रात्री चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहचला.” (१ राजे १९:८) सुमारे सहाशे वर्षांपूर्वी मोशनं आणि पुढं जवळजवळ हजार वर्षांनंतर येशूनं केलं, त्याप्रमाणे एलीयानंसुद्धा ४० दिवस आणि ४० रात्री उपवास केला. (निर्ग. ३४:२८; लूक ४:१, २) देवदूतानं दिलेल्या त्या अन्नामुळं एलीयाच्या सगळ्या समस्या नाहीशा झाल्या नाहीत; पण, चमत्कारिक रीत्या तो ४० दिवस व ४० रात्री अन्नपाण्याशिवाय प्रवास करू शकला. दिवसामागून दिवस, जवळजवळ दीड महिना त्या ओसाड अरण्यातून पायपीट करणाऱ्या वयस्क एलीयाची तुम्ही कल्पना करू शकता का?
१६ आजसुद्धा यहोवा आपल्या सेवकांचा सांभाळ करतो. अर्थात, चमत्कारिक रीत्या अन्न पुरवण्याद्वारे नव्हे, तर एका अतिशय महत्त्वाच्या मार्गानं, म्हणजेच आध्यात्मिक रीत्या तो आपलं पोषण करतो. (मत्त. ४:४) देवाच्या वचनातून तसंच बायबल आधारित प्रकाशनांतून त्याच्याबद्दल शिकण्याद्वारे त्याची सेवा करत राहण्याचं बळ आपल्याला मिळतं. या आध्यात्मिक अन्नामुळे आपल्या सगळ्याच समस्या कदाचित नाहीशा होणार नाहीत. पण, ज्या समस्यांचा आपण स्वतःच्या ताकदीवर सामना करू शकत नाही, त्यांना तोंड देण्याचं बळ आपल्याला या आध्यात्मिक अन्नामुळं नक्कीच मिळू शकतं. शिवाय, यामुळं पुढं आपल्याला “सार्वकालिक” जीवनसुद्धा मिळेल.—योहा. १७:३.
१७. एलीया कुठं गेला, आणि ते ठिकाण इतकं महत्त्वाचं का होतं?
१७ जवळजवळ ३२० किलोमीटर चालल्यानंतर एलीया शेवटी होरेब (सीनाय) पर्वतावर पोहोचला. बायबलच्या इतिहासात या ठिकाणाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. फार पूर्वी या ठिकाणी यहोवा देव, जळणाऱ्या झुडपातून एका देवदूताद्वारे मोशेसोबत बोलला होता. पुढं याच ठिकाणी यहोवानं इस्राएल राष्ट्रासोबत नियमशास्त्राचा करार केला होता. तिथं पोहोचल्यानंतर एलीयानं एका गुहेत आसरा घेतला.
यहोवा आपल्या संदेष्ट्याला सांत्वन आणि बळ देतो
१८, १९. (क) देवदूतानं एलीयाला कोणता प्रश्न विचारला, आणि एलीयाची काय प्रतिक्रिया होती? (ख) एलीयाच्या निराशेची कोणती तीन कारणं दिसून येतात?
१८ होरेब पर्वतावर एलीयाला यहोवाचा शब्द किंवा “वचन” प्राप्त झालं. कदाचित एका देवदूताद्वारे यहोवा त्याच्याशी बोलला. देवदूतानं त्याला एक साधा प्रश्न विचारला: “तू येथे कशासाठी आलास?” त्यानं नक्कीच खूप प्रेमानं हा प्रश्न विचारला असावा, कारण त्यानंतर एलीयानं आपल्या भावना अगदी मोकळेपणानं व्यक्त केल्या. त्यानं १ राजे १९:९, १०) एलीया जे काही बोलला त्यातून तो निराश होण्याची कमीतकमी तीन कारणं दिसून येतात.
म्हटलं: “सेनाधीश देव परमेश्वर याजविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे; कारण इस्राएल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेषटे तलवारीने वधले; मीच काय तो एकटा उरलो आहे; आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत.” (१९ पहिलं म्हणजे, आपण आजवर जी काही सेवा केली ती व्यर्थ गेली, असं एलीयाला वाटलं. खरंतर, त्यानं आपल्या आयुष्यात यहोवाच्या पवित्र नावाला आणि त्याच्या उपासनेला सर्वाधिक महत्त्व दिलं होतं. अशा प्रकारे, त्यानं कितीतरी वर्षं मोठ्या आवेशानं यहोवाची सेवा केली होती. पण, इतकं सगळं करूनही दिवसेंदिवस परिस्थिती आणखीनच बिकट होत होती. लोक अजूनही अविश्वासूपणे वागत होते, यहोवाविरुद्ध बंड करत होते; आणि देशात खोटी उपासना सर्रासपणे केली जात होती. एलीयाच्या निराश होण्याचं दुसरं कारण म्हणजे, त्याला अगदी एकाकी वाटत होतं. “मीच काय तो एकटा उरलो आहे,” असं तो म्हणाला; जणू देशात यहोवाची सेवा करणारा त्याच्याशिवाय आणखी कुणीच उरला नव्हता, असं त्याला वाटलं. आणि तिसरं कारण म्हणजे, तो घाबरला होता. त्याच्यासोबतच्या इतर अनेक संदेष्ट्यांचा वध करण्यात आला होता आणि आता आपलाही वध केला जाईल याची त्याला पक्की खातरी होती. या भावना बोलून दाखवणं कदाचित एलीयाला सोपं गेलं नसेल. पण, त्यानं आपल्या अहंकाराला आड येऊ दिलं नाही किंवा आपल्या भावना व्यक्त करण्यास त्यानं संकोच केला नाही. प्रार्थनेत यहोवाजवळ मन मोकळं करण्याद्वारे एलीयानं यहोवाच्या सर्व विश्वासू सेवकांसाठी एक उत्तम उदाहरण मांडलं.—स्तो. ६२:८.
२०, २१. (क) होरेब पर्वतावर एलीयानं कोणकोणत्या घटना पाहिल्या? (ख) यहोवानं ज्या प्रकारे आपलं सामर्थ्य प्रकट केलं त्यावरून एलीयाला काय शिकायला मिळालं?
२० एलीयानं आपल्या मनातल्या चिंता आणि भीती व्यक्त केल्यानंतर यहोवानं काय केलं? यहोवाच्या दूतानं त्याला गुहेच्या तोंडापाशी उभं राहण्यास सांगितलं. पुढं काय होणार आहे याची एलीयाला काहीएक कल्पना नव्हती. तरीसुद्धा त्यानं देवदूताचं ऐकलं. एकाएकी सोसाट्याचा वारा वाहू लागला. वाऱ्याचा आवाज नक्कीच कानठळ्या बसवणारा असेल; कारण त्यामुळं डोंगर आणि खडक अक्षरशः दुभंगले! त्या जोरदार वाऱ्यात आपले डोळे झाकणाऱ्या आणि आपला जड, केसाळ अंगरखा आवरणाऱ्या एलीयाची तुम्ही कल्पना करू शकता का? मग, भूकंपामुळं जमीन हादरू लागली तेव्हा एलीयाला आपला तोलही सांभाळावा लागला असेल. आणि या सगळ्यातून तो सावरतो न सावरतो तोच मोठा अग्नी प्रकट झाला; त्याच्या भयानक उष्णतेपासून वाचण्यासाठी एलीया थोडा मागे गेला असेल.—१ राजे १९:११, १२.
२१ यहोवानं आपलं विलक्षण सामर्थ्य प्रकट करण्यासाठी ज्या तीन नैसर्गिक शक्तींचा उपयोग केला, त्या तीनही शक्तींत यहोवा नव्हता, याची आठवण अहवाल आपल्याला करून देतो. एलीयाला माहीत होतं, की यहोवा हा बआलाप्रमाणे दंतकथेतील निसर्गदैवत नाही. बआल हा, “ढगांवर स्वारी करणारा” किंवा पाऊस आणणारा देव आहे, १ राजे ८:२७) मग, यहोवानं या निरनिराळ्या नैसर्गिक शक्तींतून आपलं सामर्थ्य प्रकट केल्यामुळं एलीयाला कशी मदत झाली? हे आठवणीत आणा, की एलीया घाबरला होता. पण, यहोवानं अशा प्रकारे आपली शक्ती प्रकट केल्यामुळे एलीयाला एक गोष्ट शिकायला मिळाली. ती म्हणजे, विश्वातला सगळ्यात शक्तिशाली देव, यहोवा आपल्या बाजूनं आहे; तेव्हा, आपण अहाबाला किंवा ईजबेलीला घाबरण्याचं काहीच कारण नाही!—स्तोत्र ११८:६ वाचा.
असं त्याचे उपासक मानायचे. अर्थात, या काल्पनिक बआल दैवतानं त्यांची घोर निराशा केली होती. पण याच्या अगदी उलट, यहोवा हा निसर्गात दिसणाऱ्या सर्व अद्भुत शक्तींचा उगम आहे. खरंतर, त्यानं जे काही निर्माण केलं आहे त्यापेक्षा तो कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे; इतका श्रेष्ठ की, स्वर्गांतही तो सामावू शकत नाही! (२२. (क) देवाच्या नजरेत एलीया अतिशय मौल्यवान आहे याचं आश्वासन देवदूतानं कसं दिलं? (ख) एलीयाशी बोलणारा देवदूत कोण असावा? (तळटीप पाहा.)
२२ अग्नी प्रकट होऊन गेल्यानंतर अगदी सामसूम झालं. मग, एलीयानं एक “शांत, मंद वाणी” ऐकली. देवदूताच्या त्या वाणीमुळं एलीयाला पुन्हा एकदा आपल्या भावना व्यक्त करण्याचं प्रोत्साहन मिळालं. * यामुळं एलीयाचं मन किती हलकं झालं असेल! पण, देवदूतानं पुढं जे म्हटलं त्यावरून एलीयाला नक्कीच आणखी दिलासा मिळाला असेल. यहोवानं त्या देवदूताद्वारे त्याला आश्वासन दिलं, की तो त्याची मनापासून कदर करतो. यहोवानं हे कसं केलं? इस्राएलमधून बआल उपासना नाहीशी करण्यासाठी तो पुढं काय करणार होता हे त्यानं एलीयाला सांगितलं. यावरून दिसून येतं, की एलीयानं जी सेवा केली होती ती मुळीच व्यर्थ गेली नव्हती; कारण बआल उपासनेविरुद्ध कारवाई करण्याचा यहोवाचा उद्देश अजूनही बदलला नव्हता. शिवाय, हा उद्देश पूर्ण करण्यासाठी यहोवा पुढंही एलीयाचा संदेष्टा या नात्यानं उपयोग करणार होता; आणि म्हणूनच, यहोवानं त्याला काही विशिष्ट सूचना देऊन परत पाठवलं.—१ राजे १९:१२-१७.
२३. एलीयाच्या एकटेपणाच्या भावना दूर करण्यासाठी यहोवानं काय केलं?
२३ पण, मग एलीयाला वाटणाऱ्या एकटेपणाच्या भावनांबद्दल काय? त्या दूर १ राजे १९:१८) मुळात, एलीया एकटा नव्हताच! त्या हजारो विश्वासू लोकांनी बआलाची उपासना करण्यास साफ नकार दिला होता हे ऐकून एलीयाला खरंच किती दिलासा मिळाला असेल! त्या सर्व लोकांना या कठीण काळात, आपल्या विश्वासू व एकनिष्ठ उदाहरणामुळं उत्तेजन मिळेल हे जाणून एलीयाला नक्कीच फार बरं वाटलं असेल! ‘शांत, मंद वाणीनं’ देवदूताद्वारे बोलणाऱ्या यहोवा देवाचे शब्द ऐकून एलीयाला एक नवी उमेद मिळाली असावी, यात शंका नाही.
करण्यासाठी यहोवानं दोन गोष्टी केल्या. पहिली म्हणजे, एलीयानंतर संदेष्टा म्हणून कार्य करण्यासाठी यहोवानं त्याला अलीशाचा अभिषेक करण्यास सांगितलं. हा तरुण पुरुष, पुढं अनेक वर्षं एलीयाचा सोबती आणि मदतनीस म्हणून कार्य करणार होता. खरंच, यहोवानं किती व्यावहारिक मार्गानं एलीयाला मदत पुरवली! दुसरी गोष्ट म्हणजे, यहोवानं एलीयाला असं काहीतरी सांगितलं जे ऐकून त्याला नक्कीच खूप आनंद झाला असेल. यहोवानं म्हटलं: “पाहा, इस्राएलांपैकी सात हजारांनी बआलमूर्तीपुढे गुडघे टेकले नाहीत व त्यातल्या एकानेही आपल्या मुखाने त्याचे चुंबन घेतले नाही.” (देवाच्या वचनातील मार्गदर्शनानुसार चालल्यास, बायबल आपल्यासाठी त्या ‘शांत, मंद वाणीसारखं’ ठरू शकतं
२४, २५. (क) आपण यहोवाची “शांत, मंद वाणी” कशा प्रकारे ऐकू शकतो? (ख) यहोवानं दिलेलं सांत्वन एलीयानं स्वीकारलं असं आपण का म्हणू शकतो?
२४ निसर्गातील अद्भुत शक्ती पाहून एलीयाप्रमाणे आपणसुद्धा भारावून जाऊ शकतो. कारण, खरोखर सृष्टीतून आपल्या निर्माणकर्त्याची अफाट शक्ती अगदी स्पष्टपणे दिसून येते. (रोम. १:२०) आपल्या विश्वासू सेवकांना मदत करण्यासाठी यहोवा आजही आपल्या अमर्याद शक्तीचा उपयोग करण्यास उत्सुक आहे. (२ इति. १६:९) पण, आज यहोवा प्रामुख्यानं त्याच्या वचनाद्वारे म्हणजेच बायबलद्वारे आपल्याशी बोलतो. (यशया ३०:२१ वाचा.) जर आपण त्याच्या वचनातील मार्गदर्शनानुसार चाललो, तर एकाअर्थी बायबल आपल्यासाठी त्या ‘शांत, मंद वाणीसारखं’ ठरू शकतं. यहोवा त्याच्या मौल्यवान वचनाद्वारे आपल्याला स्वतःमध्ये सुधारणा करण्यास मदत करतो. तसंच, त्याद्वारे तो आपल्याला धीर देतो आणि त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे याचं आश्वासन देतो.
२५ यहोवानं होरेब पर्वतावर एलीयाचं सांत्वन केलं तेव्हा त्यानं ते स्वीकारलं का? हो, नक्कीच! कारण, खोट्या उपासनेविरुद्ध ठामपणे उभा राहिलेला हा धाडसी, विश्वासू संदेष्टा पुन्हा मोठ्या आवेशानं कार्य करू लागला. आपणसुद्धा “शास्त्रापासून मिळणाऱ्या” सांत्वनाचा, म्हणजेच देवाच्या प्रेरित वचनातून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा स्वीकार केल्यास आपल्यालाही एलीयासारखा विश्वास दाखवणं नक्कीच शक्य होईल.—रोम. १५:४.
^ परि. 22 या ठिकाणी, ‘शांत, मंद वाणीनं’ बोलणारा देवदूत, आणि १ राजे १९:९ मध्ये उल्लेख केलेला देवदूत एकच असावा. कशावरून? १५ व्या वचनात त्याचा उल्लेख “यहोवा” (पं.र.भा.) असा करण्यात आला आहे. यावरून, अरण्यात इस्राएल लोकांचं मार्गदर्शन करणाऱ्या देवदूताची आपल्याला आठवण होते. त्याच्याबद्दलसुद्धा यहोवानं म्हटलं होतं: “त्याच्या ठायी माझे नाव आहे.” (निर्ग. २३:२१) मग, एलीयाशी बोलणारा देवदूत मानवपूर्व अस्तित्वातला येशू असावा का? आपण अगदी ठामपणे असं म्हणू शकत नसलो, तरी एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे; ती म्हणजे, पृथ्वीवर येण्याआधी येशूनं देवाचा “शब्द,” म्हणजेच यहोवाच्या वतीनं काही खास संदेश कळवणारा म्हणून कार्य केलं होतं.—योहा. १:१.