छळ
आपला छळ होईल याचं आपल्याला आश्चर्य का वाटत नाही?
आपला छळ होतो तेव्हा आपण यहोवाकडे बळ का मागितलं पाहिजे?
स्तो ५५:२२; २कर १२:९, १०; २ती ४:१६-१८; इब्री १३:६
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
१रा १९:१-१८—एलीया संदेष्ट्याचा छळ होत होता तेव्हा त्याने यहोवाकडे आपलं मन मोकळं केलं, आणि यहोवाने धीर देऊन त्याचं सांत्वन केलं
-
प्रेका ७:९-१५—योसेफच्या भावांनी त्याचा छळ केला. अशा परिस्थितीत यहोवाने त्याला एकनिष्ठ प्रेम दाखवलं, त्याची सुटका केली आणि त्याच्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी त्याचा उपयोग केला
-
कोणकोणत्या मार्गांनी आपला छळ होऊ शकतो?
आपला अपमान किंवा थट्टा केली जाऊ शकते
२इत ३६:१६; मत्त ५:११; प्रेका १९:९; १पेत्र ४:४
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
२रा १८:१७-३५—अश्शूरच्या राजाने पाठवलेला अधिकारी, रबशाके याने यहोवाचा अपमान केला आणि यरुशलेमच्या लोकांची थट्टा केली
-
लूक २२:६३-६५; २३:३५-३७—येशूला धरून नेण्यात आलं आणि तो जेव्हा वधस्तंभावर होता, तेव्हा त्याचा छळ करणाऱ्यांनी त्याचा अपमान केला आणि त्याची निंदा केली
-
नातेवाइकांकडून विरोध होऊ शकतो
आपल्याला अटक करून अधिकाऱ्यांपुढे नेलं जाऊ शकतं
आपल्याला मारहाण केली जाऊ शकते
लोकांचा जमाव आपल्यावर हल्ला करू शकतो
आपल्याला मारून टाकलं जाऊ शकतं
आपला छळ होतो तेव्हा आपण काय केलं पाहिजे?
मत्त ५:४४; प्रेका १६:२५; १कर ४:१२, १३; १पेत्र २:२३
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
प्रेका ७:५७–८:१—एका जमावाने स्तेफनला मारून टाकण्यासाठी त्याच्यावर हल्ला केला, तेव्हा त्याने अशी प्रार्थना केली की यहोवाने त्यांना माफ करावं; त्या लोकांमध्ये तार्स शहराचा शौलसुद्धा होता
-
प्रेका १६:२२-३४—प्रेषित पौलला मारहाण करून त्याचे पाय खोड्यांत अडकवण्यात आले तेव्हाही तो तुरुंगाच्या अधिकाऱ्याशी प्रेमाने वागला. त्यामुळे तो अधिकारी आणि त्याचं संपूर्ण घराणं ख्रिस्ती बनलं
-
पहिल्या शतकातल्या काही ख्रिश्चनांसोबत काय घडलं?
आपला छळ होतो तेव्हा आपण कसा विचार केला पाहिजे?
आपला छळ होतो तेव्हा भविष्याच्या आशेवर विचार केल्यामुळे आपल्याला बळ कसं मिळू शकतं?
आपला छळ होतो तेव्हा आपल्याला लाज का वाटू नये, आपण घाबरून का जाऊ नये किंवा निराश का होऊ नये? तसंच यहोवाची सेवा करायचं आपण सोडून का देऊ नये?
स्तो ५६:१-४; प्रेका ४:१८-२०; २ती १:८, १२
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
२इत ३२:१-२२—सन्हेरीब यरुशलेमवर हल्ला करण्यासाठी मोठं सैन्य घेऊन आला, तेव्हा हिज्कीया राजाने यहोवावर भरवसा ठेवला आणि आपल्या लोकांना बळ दिला; आणि याचं मोठं प्रतिफळ यहोवाने त्याला दिलं
-
इब्री १२:१-३—येशूला अपमान झाल्यासारखं वाटेल अशा पद्धतीने छळ करणाऱ्यांनी त्याचा छळ केला, पण त्यांच्या अशा दुष्ट वागण्यामुळे तो निराश झाला नाही
-
आपला छळ होतो तेव्हा कोणत्या चांगल्या गोष्टी घडू शकतात?
आपण धीराने छळाचा सामना करतो तेव्हा यहोवाला आनंद होतो आणि त्याच्या नावाचा गौरव होतो
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
ईयो १:६-२२; २:१-१०—आपल्यावर आलेल्या भयंकर संकटांच्या मागे खरंतर सैतान आहे हे माहीत नसतानाही ईयोब यहोवाला एकनिष्ठ राहिला; यामुळे सैतान खोटा असल्याचं सिद्ध झालं आणि यहोवाचा गौरव झाला
-
दान १:६, ७; ३:८-३०—यहोवाची आज्ञा मोडण्यापेक्षा हनन्या, मीशाएल आणि अजऱ्या (शद्रख, मेशख आणि अबेद्नगो) एका भयंकर मृत्यूचा सामना करायला तयार झाले; यामुळे मूर्तिपूजा करणाऱ्या नबुखद्नेस्सर राजाने सगळ्यांसमोर मान्य केलं, की यहोवाच सर्वश्रेष्ठ देव आहे
-
छळामुळे इतरांना यहोवाबद्दल शिकायची संधी मिळू शकते
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
प्रेका ११:१९-२१—छळामुळे ख्रिस्ती वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेले, तेव्हा ते आनंदाच्या संदेशाचा दूरदूरपर्यंत प्रचार करत राहिले
-
फिलि १:१२, १३—प्रेषित पौलला या गोष्टीचा आनंद होता, की त्याला तुरुंगात टाकण्यात आल्यामुळे अनेकांना आनंदाचा संदेश ऐकायला मिळाला
-
आपण धीराने छळाचा सामना करतो तेव्हा भाऊबहिणींना बळ मिळू शकतं
यहोवाच्या सेवकांच्या छळासाठी सहसा धर्मगुरू आणि राजकीय पुढारी कसे जबाबदार असतात?
यिर्म २६:११; मार्क ३:६; योह ११:४७, ४८, ५३; प्रेका २५:१-३
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
प्रेका १९:२४-२९—इफिसमध्ये मूर्ती बनवणाऱ्या काही लोकांना असं वाटलं, की ख्रिस्ती लोकांच्या संदेशामुळे त्यांच्या धंद्याचं नुकसान होईल; त्यामुळे त्यांनी ख्रिश्चनांचा छळ केला
-
गल १:१३, १४—ख्रिस्ती बनण्याआधी पौलला (शौलला) आपल्या यहुदी धर्माबद्दल इतका आवेश होता, की त्याने ख्रिश्चनांचा छळ केला
-
यहोवाच्या सेवकांच्या छळामागे मुळात कोणाचा हात आहे?