मला माझ्या पालकांकडून अधिक स्वातंत्र्य कसे मिळवता येईल?
अध्याय ३
मला माझ्या पालकांकडून अधिक स्वातंत्र्य कसे मिळवता येईल?
तुम्ही म्हणता की, सप्ताहांती उशिरापर्यंत घराबाहेर राहण्याएवढे आता तुम्ही मोठे झाला आहात. ते म्हणतात की तुम्ही लवकर घरी आले पाहिजे. तुम्ही म्हणता की चर्चेत असलेला नवीन चित्रपट तुम्हाला पाहायचा आहे. ते म्हणतात की तुम्ही तो पाहू शकत नाही. तुम्ही म्हणता की तुमची काही चांगल्या मुलांसोबत गट्टी जमली आहे आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला फिरायला जायला आवडेल. ते म्हणतात की आधी त्यांना तुमच्या मित्रांना भेटायला आवडेल.
किशोरवयीन असताना, तुमचे पालक जणू तुमचा कोंडमारा करतात असे तुम्हाला वाटेल. असे भासते की, “मला अमुक काही करायचं आहे” या तुमच्या प्रत्येक वाक्यानंतर “नाही, तू ते करू शकत नाहीस,” हे अनिवार्य उत्तर ठरलेलेच असते. तसेच, पालकांच्या ‘शोधक नजरेतून’ तुमच्या जीवनातली एकही गोष्ट निसटत नाही. पंधरा वर्षांची डॉली म्हणते: “मी कुठंय, कधी घरी परतणार हे सगळं माझे बाबा नेहमीच विचारतात. बहुतांश पालक तसं करतात. त्यांना सर्व गोष्टींबद्दल खडा न् खडा माहिती असण्याची काही गरज आहे का? त्यांनी मला जास्त स्वातंत्र्य दिलं पाहिजे.”
युवक अशीही तक्रार करतात की, त्यांचे पालक त्यांचा मान राखत नाहीत. काहीतरी चूक झाली की, त्यांच्यावर भरवसा ठेवण्याऐवजी चौकशी न करता त्यांच्यावर दोष लावला जातो. स्वतःचे निर्णय घेण्याची मुभा देण्याऐवजी त्यांच्याभोवती नियमांचे कुंपण घातले जाते.
‘कष्ट’
तुमचे पालक काहीवेळा तुम्हाला लहान मुलाप्रमाणे वागवतात का? असे असल्यास, काही काळाआधी तुम्ही खरोखरच लहान मूल होता हे लक्षात
ठेवा. तुम्ही असहाय बालक असल्याचे चित्र तुमच्या पालकांच्या मनात अजूनही ताजे आहे आणि ते इतक्या सहजगत्या त्यांना विसरता यायचे नाही. तुम्ही ज्या बालिश चुका करत होता त्या अजूनही त्यांना आठवतात व म्हणून ते तुमचे संरक्षण करू पाहतात—मग तुम्हाला असे संरक्षण हवे असो अगर नसो.तुमचे संरक्षण करण्याची इच्छा अतिशय प्रबळ असते. तुमच्यासाठी अन्न, वस्त्र किंवा निवारा पुरवण्याची चिंता तर असतेच पण त्यासोबत तुम्हाला कसे शिकवावे, कशी तालीम द्यावी आणि होय, तुमचे संरक्षण कसे करावे हे सारे प्रश्नही त्यांना सतावत असतात. त्यांना तुमची केवळ वरपांगी चिंता नसते. तुमच्या संगोपनासाठी ते देवाला जबाबदार आहेत. (इफिसकर ६:४) मग, तुमच्या हितास काही धोका संभावत असल्यास त्यांना चिंता वाटते.
येशू ख्रिस्ताच्या पालकांनाच पाहा. जेरूसलेमला गेल्यावर ते नकळत त्याला मागेच सोडून घरी निघाले. तो बेपत्ता असल्याचे त्यांच्या ध्यानात आल्यावर, ते त्याला खूप प्रयासाने—एवढेच काय तर, संतप्त होऊनही—शोधू लागले! तसेच शेवटी तो त्यांना “मंदिरात . . . लूक २:४१-४८) आता जर येशूने—परिपूर्ण मूल असताना देखील—आपल्या पालकांना चिंतेत पाडले तर तुम्ही तुमच्या पालकांना किती चिंताग्रस्त करू शकता याचा जरा विचार करा!
सापडला” तेव्हा, येशूच्या आईने असे उद्गारले, “बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास? तुझा बाप व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो.” (तिरपे वळण आमचे.) (उदाहरणार्थ, तुम्ही घरी किती वाजता परतावे या नेहमीच्याच मतभेदाचा विचार करा. अशाप्रकारचे बंधन तुमच्यावर घालण्यात यावे यात तुम्हाला कदाचित काही कारण दिसत नसेल. पण, तुमच्या पालकांच्या दृष्टिकोनातून तुम्ही कधी विचार केला आहे का? पालकांबद्दल लहान मुलांचे पुस्तक (इंग्रजी) या पुस्तकाच्या शाळकरी लेखकांनी तसे करण्याचा प्रयत्न केला. “मुले योग्य वेळी घरी न परतल्यास पालकांच्या मनात येणाऱ्या कल्पनांची” यादी त्यांनी बनवली. या यादीत ‘मादक पदार्थांचे सेवन, मोटारीच्या अपघातात सापडणे, टवाळकी करणे, अटक होणे, अश्लील चित्रपटांना जाणे, मादक पदार्थांची विक्री करणे, बलात्कार होणे अथवा मारले जाणे, तुरुंगात नेले जाणे व कुटुंबाच्या नावावर कलंक आणणे,’ अशा बाबींचा समावेश होता.
सगळेच पालक असे टोकाचे निष्कर्ष काढणार नाहीत. परंतु, पुष्कळ युवक अशा कृत्यांमध्ये गोवले आहेत हे खरे नाही काय? तेव्हा उशिरापर्यंत बाहेर राहणे व वाईट संगत ठेवणे हानीकारक असू शकते या सूचनेमुळे तुम्हाला चीड यावी का? किंबहुना, येशूच्या पालकांनाही तो कोठे होता हे जाणून घ्यावेसे वाटले!
त्यांचे इतके दडपण का असते
काही युवक असे म्हणतात की, त्यांना हानी पोहंचण्याविषयी त्यांच्या पालकांना वाटणाऱ्या भीतीत संभ्रमविकृतीचे चिन्ह असतात! पण लक्षात असू द्या, की त्यांनी तुम्हाला लहानाचे मोठे करण्यात खूपसा वेळ व भावना देखील खर्ची घातल्या आहेत. मोठे होऊन शेवटी त्यांना सोडून जाण्याचा विचार तुमच्या पालकांना अस्वस्थ करू शकतो. एका पालकाने लिहिले: “माझा एकुलता एक मुलगा आता एकोणीस वर्षांचा आहे, आणि तो घर सोडून जात आहे ही कल्पना देखील मला सहन होत नाही.”
अशाप्रकारे, काही पालक आपल्या मुलांवर दडपण आणतात अथवा त्यांचे अतिशय संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. तथापि, अशावेळी तुम्ही चिडला तर ती एक घोडचूक असेल. एक तरुणी आठवून सांगते: “मी १८ वर्षांची होईपर्यंत आई आणि माझ्यामध्ये फार सलगी होती. . . . [पण] मी मोठी होत गेले तसतशा आमच्यात समस्या निर्माण होऊ लागल्या. मला काहीसं स्वातंत्र्य हवं होतं आणि तिला कदाचित ते आमच्या नातेसंबंधाला धोका ठरेल असं वाटत असावं. मग, ती मला आणखीच ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करू लागली आणि मी मात्र तिच्यापासून दुरावत गेले.”
थोडेफार स्वातंत्र्य ठीक आहे, पण कौटुंबिक नातीगोती तोडून ते मिळवू नका. परस्परांमधील समजूतदारपणा, सहनशीलता व आदर यावर आधारून पालकांसोबतचे नाते तुम्ही प्रौढांप्रमाणे कसे राखू शकता? एक गोष्ट म्हणजे, आदर दाखविल्याने आदर मिळतो. प्रेषित पौलाने एकदा असे स्मरून सांगतिले: “शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड [आदर] धरीत असू.” (तिरपे वळण आमचे.) (इब्री लोकांस १२:९) या आरंभीच्या ख्रिश्चनांचे पालक काही पूर्णपणे निर्दोष नव्हते. पौलाने पुढे म्हटले (वचन १०): “आमच्या देहाच्या बापांना . . . योग्य वाटेल तसे ते करत होते.”—द जेरूसलेम बायबल.
काहीवेळा, हे मनुष्य न्याय करण्यात चुकत होते. तरीही त्यांना त्यांच्या मुलांकडून आदर मिळत असे. तुमच्या पालकांना देखील तो मिळालाच पाहिजे. ते दडपण आणणारे आहेत ही वास्तविकता बंडखोर बनण्याचे निमित्त ठरत नाही. तुम्हाला स्वतःला हवा असलेला आदर आधी त्यांना द्या.
गैरसमज
तुमच्या नियंत्रणापलीकडील परिस्थितींमुळे तुम्ही घरी कधी उशिरा पोहंचलात का? तुमच्या पालकांनी अकांडतांडव केला का? असे गैरसमज होतात तेव्हा आदर मिळवण्याची आणखी एक संधी तुम्हाला मिळते. छोटा येशू प्रामाणिकपणे देवाच्या वचनाची चर्चा काही शिक्षकांसोबत करत असताना लूक २:४९) येशूने येथे दाखवलेली प्रौढता पाहून त्याचे पालक प्रभावित झाले यात शंका नाही. “मृदु उत्तराने” केवळ “कोपाचे निवारण होते” एवढेच नव्हे, तर तुमच्या पालकांकडून आदर मिळवण्यातही मदत मिळू शकते.—नीतिसूत्रे १५:१.
आपल्या चिंताग्रस्त पालकांना भेटला तेव्हा तो कसा वागला हे आठवा. तेव्हा येशूने निंदात्मक भाषण, कुरकूर केली का, किंवा त्याच्या हेतूंचा संशय घेणे किती चुकीचे होते याविषयी त्यांच्यामागे कटकट लावली का? त्याच्या शांत उत्तराकडे लक्ष द्या: “तुम्ही माझा शोध करीत राहिला हे कसे? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?” (कायदेकानून
तुमच्या पालकांच्या मागण्यांप्रती तुम्ही कसा प्रतिसाद देता त्याचा तुम्हाला कसे वागवले जाईल याजशी अधिक संबंध आहे. काही युवक रुसून बसतात, खोटे बोलतात किंवा उघड अवज्ञा करतात. प्रौढांप्रमाणे वागून पाहा. तुम्हाला उशिरापर्यंत घराबाहेर राहायचे असल्यास, लहान मुलांसारखा अट्टाहास अथवा “सगळी दुसरी मुलं उशिरापर्यंत बाहेर असतात” अशी किरकिर करू नका. ॲन्ड्रीया इयगन ही लेखिका असा सल्ला देते: “तुम्हाला काय करायचं आहे त्याविषयी होता होईल तितकं त्यांना [सांगा] म्हणजे एकूण
परिस्थिती त्यांच्या लक्षात येईल. . . . तुम्ही कोठे व कोणाबरोबर जाणार आहात आणि उशिरापर्यंत थांबण्याची का गरज आहे हे सर्व तुम्ही त्यांना सांगितल्यास . . . , ते कदाचित होकार देतील.”किंवा तुमच्या पालकांना तुमच्या मित्रमैत्रिणींची पारख करायची असल्यास लहान मुलासारखी कुरकूर करू नका; अशी पारख तर त्यांनी केलीच पाहिजे. सेवेंटीन या नियतकालिकाने असे सुचवले: “वेळोवेळी तुमच्या मित्रमैत्रिणींना घरी आणा म्हणजे, तुम्ही बिलसोबत चित्रपट पाहायला जात आहात असे सांगता तेव्हा तुमच्या बाबांना दुसऱ्या खोलीतून ‘बिल? कोण बिल?,’ असे ओरडण्याची गरजच पडणार नाही.”
‘अधिक दिले जाईल’
जिम आपला धाकटा भाऊ रॉन याच्याविषयी सांगतो तेव्हा त्याला हसू येते. “आमच्या दोघांमध्ये फक्त ११ महिन्यांचा फरक आहे,” असे तो म्हणतो “पण आमच्या पालकांनी आम्हा दोघांना वेगवेगळ्या पद्धतीनं वागवलं. त्यांनी मला खूप स्वातंत्र्य दिलं. मला घरची मोटार चालवण्याची अनुमती होती. एकदा तर, न्यूयॉर्क शहर फिरून यायला त्यांनी माझ्यासोबत माझ्या धाकट्या भावाला सुद्धा पाठवलं.
“पण, रॉनच्या बाबतीत गोष्ट वेगळीच होती,” असे जिम पुढे म्हणतो. “त्याला अधिक स्वातंत्र्य दिलंच जात नव्हतं. तो मोठा झाल्यावर त्याला गाडी शिकवावी याकडेही पप्पांनी कधी जास्त लक्ष दिलं नाही. तसेच भेटीगाठी करण्याचे वय झाल्यावरही आईपप्पा त्याला अनुमती देत नव्हते.”
पक्षपात? नाही. जिम स्पष्टीकरण देतो: “रॉन बेजबाबदार होता. तो पुढाकार घेत नसे. त्याला नेमून दिलेलं काम तो बहुतेकवेळा करायचा नाही. मी माझ्या पालकांना कधीच उलट उत्तर देत नव्हतो, पण रॉन मात्र त्यांचं म्हणणं पटलं नाही की लगेच बोलून दाखवायचा. याचा उलट परिणाम त्यालाच भोगावा लागायचा.” येशूने मत्तय २५:२९ येथे असे म्हटले: “ज्या कोणाजवळ आहे त्याला [अधिक] दिले जाईल व त्याला भरपूर होईल; आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.”
तुम्हाला अधिक स्वातंत्र्य आणि जबाबदारी हवी आहे का? मग स्वतःला मत्तय २१:२८, २९) तुमच्या पालकांना हे पटवून द्या की, त्यांनी कोणतीही गोष्ट करायला सांगितली, मग ती कितीही क्षुल्लक असली, तरी तुम्ही ती करणारच.
जबाबदार व्यक्ती असल्याचे शाबीत करा. तुमचे पालक तुम्हाला जी कामे नेमून देतात ती गांभिर्याने पार पाडा. येशूच्या दृष्टान्तातील युवकाप्रमाणे होऊ नका. त्याच्या पित्याने त्याला, “मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर,” असे सांगितल्यावर तो म्हणाला, “जातो महाराज,” पण तो “गेला नाही.” (“मी जबाबदारी घेऊ शकतो हे मी माझ्या पालकांना दाखवून दिलं,” असे जिम सांगतो. “ते मला बँकेत, पाण्याचे अथवा वीजेचे बील भरायला, सुपरमार्केटमध्ये खरेदी करायला पाठवायचे. आणि आईला पुढे नोकरीसाठी घराबाहेर पडावं लागलं तेव्हा मी कुटुंबासाठी स्वयंपाकसुद्धा बनवू लागलो.”
पुढाकार घेणे
तुमच्या पालकांनी तुम्हाला अशी कामे सोपवलीच नसतील तर काय? विविध कार्यांसाठी पुढाकार घेऊ लागा. सेवेंटीन नियतकालिक म्हणते: “एखाद्या वेळेस तुम्ही स्वयंपाक करणार असं तुमच्या घरच्यांना सांगा, आणि तुम्ही सर्वकाही सांभाळणार म्हणजे, काय बनवायचे ते ठरवणे, किराणा मालाची यादी करणे, हिशोब, खरेदी, स्वयंपाक, आवराआवर हे सर्व तुम्ही स्वतःच करणार असे आपल्या पालकांना सांगा.” पण, स्वयंपाक करण्याची तुमची खुबी नसल्यास, आजूबाजूला जरा नजर टाका आणि दुसरे एखादे काम करता येण्यासारखे आहे का ते पाहा. भांडी घासायची असल्यास, झाडून काढायचे असल्यास, किंवा खोली आवरायची असल्यास कामाला लागण्यासाठी तुमच्या पालकांकडून तशी आज्ञा मिळण्याची गरज नाही.
उन्हाळ्यात किंवा सप्ताहांती पुष्कळ युवक अर्ध-वेळेची नोकरी करतात. तसे असल्यास, तुम्ही पैशांची बचत व नीट हाताळणी करण्यात कार्यक्षम असल्याचे सिद्ध केले आहे काय? तुमच्या खोलीच्या व खाण्यापिण्याच्या खर्चाला काही हातभार लावण्यास तुम्ही स्वेच्छेने तयारी दाखवली आहे काय? (तुमच्या क्षेत्रात भाड्याच्या खोलीचे चालू दर विचारल्यावर तुम्हाला कदाचित आश्चर्यच वाटेल.) असे केल्याने तुम्हाला वरच्या खर्चाकरता कदाचित कमी पैसे असतील, पण तुम्ही प्रौढ लोकांप्रमाणे पैसे हाताळता हे पाहून तुमचे पालक निश्चितच तुम्हाला अधिक स्वातंत्र्य देतील.
बोळ्याने दूध पिण्याचे सोडा
पालक आपले भरवशाचे मित्र, सल्ला आणि उपदेशाचे समृद्ध उगम असले पाहिजेत. (पडताळा यिर्मया ३:४.) असे असले तरी, प्रत्येक किरकोळ निर्णयासाठी तुम्ही त्यांच्यावर विसंबून असावे असा याचा अर्थ होत नाही. तुमच्या ‘ज्ञानेंद्रियांचा’ वापर केल्यानेच निर्णय घेण्याच्या स्वतःच्या क्षमतेबद्दल तुम्हाला आत्मविश्वास लाभतो.—इब्री लोकांस ५:१४.
यास्तव, क्षुल्लक आपत्तीची चाहूल लागताच पालकांकडे पळत जाण्याऐवजी मनातल्या मनात गुंत्याची उकल करण्याचा प्रयत्न करा. बाबींविषयी ‘उतावळे’ अथवा चंचल होण्याऐवजी, प्रथम “ज्ञानाचा उमज” होऊ देण्याचा बायबलचा सल्ला अनुसरा. (यशया ३२:४) बायबल तत्त्वे गोवली असल्यास विशेषतः थोडेसे संशोधन करा. शांतपणे साधकबाधक विचार केल्यावर मगच तुमच्या पालकांकडे जा. ‘पप्पा, मी आता काय करू?’ किंवा ‘आई, तू काय केलं असतं गं?’ नेहमी असेच म्हणण्याऐवजी परिस्थिती समजावून सांगा. मग परिस्थितीबद्दल तुम्ही काय तर्क केला आहे तो त्यांना सांगा. त्यानंतर त्यांचे मत काय आहे ते विचारा.
आता तुमच्या पालकांना, तुम्ही लहान मुलाप्रमाणे नव्हे तर प्रौढाप्रमाणे बोलत असल्याचे दिसेल. तुम्ही प्रौढ व्यक्ती बनत आहात व तुम्हाला थोडेफार स्वातंत्र्य दिले पाहिजे हे सिद्ध करण्याच्या दिशेने तुम्ही महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. तुमचे पालक तुम्हाला नक्कीच प्रौढाप्रमाणे वागणूक देऊ लागतील.
चर्चेसाठी प्रश्न
◻ बहुतेकवेळा पालक आपल्या मुलांचे संरक्षण करण्यास व ते कोठे आहेत हे जाणण्यासाठी इतके चिंताग्रस्त का असतात?
◻ तुम्ही तुमच्या पालकांना आदर द्यावा हे इतके महत्त्वाचे का आहे बरे?
◻ तुमच्या पालकांचे गैरसमज दूर करण्याचे उत्तम मार्ग कोणते असू शकतात?
◻ तुमच्या पालकांचे कायदेकानून पाळूनही तुम्ही अधिक स्वातंत्र्य कसे प्राप्त करू शकता?
◻ तुम्ही जबाबदार असल्याचे तुमच्या पालकांना सिद्ध करून दाखवण्याचे काही मार्ग कोणते आहेत?
[२९ पानांवरील संक्षिप्त आशय]
“मी कुठंय, कधी घरी परतणार हे सगळं माझे बाबा नेहमीच विचारतात. . . . त्यांना सर्व गोष्टींबद्दल खडा न् खडा माहिती असण्याची काही गरज आहे का?”
[२७ पानांवरील चित्र]
तुमचे पालक तुम्हाला बंधनात ठेवत असल्यासारखे वाटते का?
[३० पानांवरील चित्र]
गैरसमज होतात तेव्हा शांत राहणे हा आदर मिळवण्याचा एक मार्ग आहे