भाग २—तुम्ही व तुमचे समवयस्क
भाग २
तुम्ही व तुमचे समवयस्क
प्रत्येकालाच मित्रमैत्रिणींची गरज असते. परंतु, तरुण असताना तर तुमचा पेहराव, तुमच्या कृती व तुमचे विचार यांवरही पालकांपेक्षा मित्रमैत्रिणींचाच अधिक प्रभाव पडू शकतो. असे असताना, तुमचे मित्र कोण असावेत? शिवाय, तुमच्या जीवनाची घडण त्यांच्या अभिप्रायांवर कितपत आधारित असावी?