मुले माझा पिच्छा का सोडत नाहीत?
अध्याय १९
मुले माझा पिच्छा का सोडत नाहीत?
त्या मुलाच्या चालण्यावरूनच दिसते. तणावपूर्ण स्थितीत असल्याने व आत्मविश्वास नसल्याने आपला नवीन परिसर पाहून तो बावरून गेला आहे हे स्पष्ट दिसते. जुने विद्यार्थी लगचेच ओळखतात की तो शाळेत नवीन आला आहे. काही क्षणातच, काही युवक त्याला घेरतात, त्याचे माप काढू लागतात! त्याची कानशीले तापतात आणि जवळच्या आसऱ्याकडे—वसतिगृहाकडे तो धाव घेतो. मागून मुलांचे हसणे त्याला ऐकू येते.
इतरांना त्रास देणे, टिंगल-टवाळी करणे आणि अपमान करणे हे अनेक युवकांचे वेळ घालवण्याचे क्रूर प्रकार आहेत. बायबल काळातही, काही युवकांनी दुष्ट प्रवृत्ती प्रकट केली. उदाहरणार्थ, काही तरुणांनी एकदा संदेष्टा अलीशाला त्रास दिला. त्याच्या स्थानाविषयी तिरस्कार व्यक्त करून ते युवक अनादराने म्हणू लागले: “अरे टकल्या, चालता हो!” (२ राजे २:२३-२५) अशाचप्रकारे आज, अनेक युवकांची इतरांबद्दल अपमानकारक, दुखावणारे भाष्य करण्याची वृत्ती आहे.
“आमच्या नववीच्या वर्गात मी सर्वात ठेंगणा होतो,” असे वर्गामध्ये वाढत्या वयाचे त्रास (इंग्रजी) या पुस्तकाचे एक लेखक आठवून सांगतात. “ज्युनियर कॉलेजमध्ये असताना, वर्गातला सर्वात हुशार आणि ठेंगणा मुलगा असणे हे गणित माझ्यासाठी दुर्दैवाचं ठरलं: जे मला ठेंगणा असल्यामुळे मारत नव्हते ते मला हुशार असल्यामुळे मारायचे. ‘ढापण्या’ या व्यतिरिक्त मला ‘चालता-बोलता शब्दकोश’ आणि अशीच ८०० इतर नावे [बरी वाईट नावे] ठेवली होती.” मुलांचा एकलकोंडेपणा (इंग्रजी) या पुस्तकाचे लेखक यात आणखी भर घालतात: “जी मुले अधू असतात, बोलताना अडखळतात किंवा ज्यांची स्पष्ट शारीरिक अथवा वर्तनातील वैगुण्ये असतात ती इतर मुलांच्या चेष्टेला सहजगत्या बळी पडतात.”
काहीवेळा युवक स्वतःचा बचाव करण्यासाठी, एकमेकांचा अत्यंत वाईट पद्धतीने (बहुधा दुसऱ्या व्यक्तीच्या पालकांबद्दलचे) अपमान करून क्रूरतेची
जणू स्पर्धा ज्यामुळे निर्माण होते अशात सामील होतात. पण, अनेक युवक समवयस्कांच्या त्रासापुढे हतबल होतात. एक युवक आठवून सांगतो की, काही वेळा, सहसोबत्यांकडून थट्टा आणि जाच होत असल्यामुळे तो इतका घाबरून जायचा व दुःखी व्हायचा की ‘उलटी होईल’ की काय असे त्याला वाटायचे. इतर विद्यार्थी त्याला काही अपाय करतील या धास्तीने त्याचे अभ्यासात लक्षच लागत नसे.हसण्यावारी नेण्यासारखे नव्हे
तुम्ही समवयस्कांच्या क्रूरतेचा विषय बनला आहात का? मग, देव या गोष्टीस हसण्यावारी नेत नाही हे जाणून तुम्हाला कदाचित सांत्वन मिळेल. अब्राहामाचा पुत्र इसहाक याचे दूध तोडले त्या दिवशी मोठी मेजवानी ठेवण्यात आली त्या बायबल अहवालाचा विचार करा. अब्राहामाचा मोठा मुलगा, इश्माएल हा इसहाकाला मिळणाऱ्या वारसाचा हेवा बाळगून त्याच्यावर ‘खिदळू लागला.’ तथापि, ही टिंगल मात्र सद्हेतूने केलेली मस्करी नसून ‘छळासमान’ बनली. (गलतीकर ४:२९) यास्तव, त्या टर उडवण्यातील वैरभाव इसहाकाची आई, सारा हिच्या नजरेतून निसटला नाही. आपला पुत्र इसहाक याच्याद्वारे ‘वंश’ किंवा मशीहा उत्पन्न करण्याच्या यहोवाच्या उद्देशाचा अपमान होत असल्याचे तिला समजले. साराने विनंती केल्यावर, इश्माएल व त्याची आई यांना अब्राहामाच्या घरातून घालवून देण्यात आले.—उत्पत्ति २१:८-१४.
अशाचप्रकारे, युवक अकसखोर वृत्तीने तुमचा जाच करतात, विशेषतः तुम्ही बायबलच्या दर्जांप्रमाणे जगण्याचा यत्न करताना ते जाच करतात तेव्हा इब्री लोकांस ११:३६) अशी निंदा सहन करण्याच्या धैर्यासाठी त्यांची प्रशंसा केली पाहिजे!
ही हसण्यावारी नेण्याची गोष्ट नाही. उदाहरणार्थ, ख्रिस्ती युवक आपला विश्वास इतरांना सांगण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, यहोवाचे साक्षीदार असलेल्या तरुणांच्या एका गटाने म्हटल्यानुसार: “आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करतो म्हणून शाळेतली मुलं आमचा उपहास करतात आणि म्हणून ते आम्हाला टाकून बोलतात.” होय, प्राचीन काळातील देवाच्या विश्वासू सेवकांप्रमाणे अनेक ख्रिस्ती युवक ‘टवाळकीचा’ त्रास सोसतात. (त्यांनी असे करण्याचे कारण
तथापि, जाच करणाऱ्या व्यक्तींचा पिच्छा कसा सोडवावा याबाबतीत तुम्ही बुचकळ्यात पडला असाल. प्रथम, ही टिंगल का केली जाते त्याचा विचार करा. नीतिसूत्रे १४:१३ येथे बायबल म्हणते, “हसताना देखील हृदय खिन्न असते.” युवकांच्या एखाद्या टोळीने कोणाला छळले तर हशा पिकतो. पण, ते ‘हर्षित चित्ताने आनंद’ करत नसतात. (यशया ६५:१४) बहुधा, त्यांचे हसणे आंतरिक यातनेस झाकून टाकत असते. या धैर्याच्या फुशारकीमागे, हे जाच करणारे मनातल्या मनात म्हणत असावेत: ‘आम्हाला स्वतःबद्दल तर आवड नाही पण दुसऱ्यांना कमी लेखायला आनंद होतो.’
ईर्ष्येमुळे सुद्धा हल्ले होऊ शकतात. योसेफ या किशोराचा बायबल अहवाल लक्षात आणा, तो आपल्या पित्याचा लाडका असल्यामुळे त्याचे स्वतःचे भाऊ त्याच्यावरच उलटले. तीव्र ईर्ष्येने त्यांनी केवळ शिवीगाळच नव्हे तर खून करण्याचा कट रचला! (उत्पत्ति ३७:४, ११, २०) त्याचप्रमाणे आजही, एखादा विद्यार्थी अति हुशार किंवा शिक्षकांचा आवडता असला तर त्यामुळे त्याच्या समवयस्कांच्या मनात ईर्ष्या वाटू शकते. अपमान करून ते जणू त्याला त्याची ‘लायकी दाखवत असतात.’
यास्तव, बहुतेकवेळा उपहासाची कारणे असुरक्षितता, ईर्ष्या आणि कमस्वाभिमान ही असतात. तर मग, असुरक्षितता वाटणाऱ्या कोणा युवकाने आपला स्वाभिमान गमावलेला असल्यास तुम्ही तो का गमवावा?
जाच थांबवणे
“जो पुरुष . . . निंदकांच्या बैठकीत बसत नाही . . . तो धन्य,” असे स्तोत्रकर्ता म्हणतो. (स्तोत्र १:१, २) स्वतःला बचावण्यासाठी उपहासात सामील झाल्याने अपमानाचे चक्र आणखीनच लांबत जाते. “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. . . . तर बऱ्याने वाइटाला जिंक” असा ईश्वरी सल्ला आहे.—रोमकर १२:१७-२१.
उपदेशक ७:९ पुढे म्हणते: “मन उतावळे होऊ देऊन रागावू नको; कारण राग मूर्खांच्या हृदयांत वसतो.” हो, तुम्ही थट्टा मनाला का लावून घ्यावी बरे? तुमच्या अंगकाठीवर कोणी उपहासाने खिदळले किंवा तुमच्या चेहऱ्यावरील वैगुण्यांची टिंगल केली तर मन दुखावते हे मान्य आहे. तथापि, त्या टीका वाईट असल्या तरी द्वेषपूर्ण असतीलच असे नाही. म्हणून एखाद्याने मनात वाईट हेतू न बाळगता—किंवा समजा काहीसा वाईट हेतू बाळगूनही तुमचे मन दुखावले तर खचून जाण्याची काय गरज आहे? जे काही म्हटले जाते ते असभ्य किंवा अनादरणीय नसल्यास, त्यामागील विनोद पाहण्याचा प्रयत्न करा. “हसण्याचा समय,” असतो आणि उगाच केलेल्या थट्टेचा राग मानणे म्हणजे अवाजवी प्रतिक्रिया दाखवल्यासारखे होईल.—उपदेशक ३:४.
परंतु, ही थट्टा क्रूर एवढीच काय तर द्वेषपूर्ण असल्यास काय? उपहास करणाऱ्याला तुम्ही चिडावे असे वाटते, तुम्हाला त्रास होत असल्याचे पाहून त्याला समाधान मिळवायचे असते. प्रत्युत्तर देणे, स्वतःची बाजू मांडू लागणे किंवा रडू लागणे यामुळे त्याला अथवा तिला जाच करत राहण्यास आणखी प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. तुमची अस्वस्थता पाहण्याचे समाधान त्याला का द्यावे बरे? अपमान मनाला लावून न घेण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे शांतपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे होय.
राजा शलमोनाने पुढे म्हटले: “बोललेल्या सर्व शब्दांकडे लक्ष देऊ नको, [“जे सर्व शब्द लोक बोलतात त्यांकडे तू आपले लक्ष लावू नको”—पं.र.भा.] देशील तर कदाचित् तुझा चाकर तुला शिव्याशाप देताना ऐकशील. कारण तूहि इतरांस वारंवार शिव्याशाप दिले हे तुझ्या मनास ठाऊक आहे.” (उपदेशक ७:२१, २२) उपहास करणाऱ्यांच्या बोचक टीकेकडे ‘लक्ष देणे’ याचा अर्थ तुमच्याविषयीच्या त्यांच्या अभिप्रायाबद्दल अतिशय चिंता करणे असे होईल. त्यांचा अभिप्राय खरोखरच महत्त्वाचा आहे का? प्रेषित पौलावर ईर्ष्यायुक्त समवयस्कांनी अनुचित टीका केली पण त्याने उत्तर दिले: “तुमच्याकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्यायनिवाडा व्हावा, ह्याचे मला काहीच वाटत नाही. . . . माझा न्यायनिवाडा करणारा प्रभु आहे.” (१ करिंथकर ४:३, ४) देवासोबत पौलाचे नाते इतके भक्कम होते की अनुचित हल्ल्यांना तोंड देण्यास त्याच्याजवळ आत्मविश्वास आणि आंतरिक शक्ती होती.
तुमचा प्रकाश चमकू देणे
काही वेळा, ख्रिस्ती या नात्याने तुमच्या जीवनपद्धतीचा उपहास करण्यात येईल. खुद्द येशू ख्रिस्ताला अशाप्रकारचा “विरोध” सहन करावा लागला. (इब्री लोकांस १२:३) यहोवाचा संदेश धैर्याने घोषित केल्यामुळे यिर्मया देखील “दिवसभर हसण्याचा विषय” बनला होता. हा जाच इतका निरंतर होता की काही काळासाठी यिर्मया आपली प्रेरणा गमावून बसला होता. “मी त्याचे [यहोवाचे] नाव काढणार नाही, यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही,” असे त्याने ठरवले. तथापि, देवाप्रती व सत्याप्रती असलेल्या प्रीतीने त्याला कालांतराने या भयावर मात करण्यास भाग पाडले.—यिर्मया २०:७-९.
आज काही ख्रिस्ती युवकांना अशाचप्रकारची निराशा झाली आहे. थट्टा थांबवण्याच्या चिंतेत काहींनी ते ख्रिश्चन असण्याची वास्तविकता लपवून ठेवली आहे. पण, देवाप्रती असलेले प्रेम अशांना सहसा आपल्या भीतीवर मात करून ‘लोकांसमोर प्रकाश पडू देण्यास’ शेवटी प्रवृत्त करते. (मत्तय ५:१६) उदाहरणासाठी एका किशोरवयीन मुलाने म्हटले: “माझी मनोवृत्ती बदललीय. ख्रिस्ती असणं म्हणजे सगळीकडे वागवावं लागणारं ओझं असं मानण्याऐवजी ती अभिमान वाटण्याजोगी गोष्ट आहे असं मी समजू लागलो.” तुम्ही सुद्धा देवाला जाणून असण्याच्या आणि इतरांना मदत करण्यासाठी तो तुमचा वापर करत असल्याच्या संधीचा “अभिमान” बाळगू शकता.—१ करिंथकर १:३१.
तथापि, नेहमीच इतरांची आलोचना करून किंवा तुम्ही स्वतःला श्रेष्ठ मानत असल्याची छाप पाडून शत्रुत्वास आमंत्रण देऊ नका. तुमच्या विश्वासाबद्दल इतरांना सांगण्याची संधी मिळताच तिचा फायदा घ्या; पण “सौम्यतेने व १ पेत्र ३:१५) उत्तम चालचालणुकीचे नावलौकिक हे शाळेमध्ये असताना तुमच्याकरता सर्वात मोठे संरक्षण ठरेल. इतरांना तुमची धीट भूमिका आवडत नसली, तरी ते विनातक्रार त्याबाबत तुमचा आदर करतील.
भीडस्तपणाने.” (वॅनेस्सा नामक एका मुलीला काही मुली मारत, ढकलत, तिच्या हातातली पुस्तके खाली पाडत असत—हे सर्व त्या भांडण सुरू करण्याच्या उद्देशाने करत होत्या. एकदा तर त्यांनी तिच्या डोक्यावर आणि पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर चॉकलेट मिल्क शेक ओतला. तरीही ती भडकली नाही. कालांतराने, वॅनेस्साला त्या गटाची प्रमुख मुलगी यहोवाच्या साक्षीदारांच्या एका अधिवेशनात भेटली! “मला तू मुळीच आवडायची नाहीस . . . ,” असे पूर्वी दादागिरी करणाऱ्या त्या मुलीने म्हटले. “फक्त एकदाच तुला चिडलेलं पाहायचं होतं मला.” परंतु, वॅनेस्सा इतकी शांत कशी राहते हे शोधून काढण्याच्या जिज्ञासेमुळे तिने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करण्याचे स्वीकारले. “मी जे काही शिकले ते मला अत्यंत आवडलं,” ती पुढे म्हणाली, “आणि उद्या माझा बाप्तिस्मा आहे.”
म्हणून समवयस्कांकडील ‘विरोधामुळे’ तुमचे मन खचू देऊ नका. उचित असते तेव्हा, विनोदबुद्धी दाखवा. दुष्टतेला चांगुलपणाने प्रतिसाद द्या. भांडणतंट्याच्या आगीत तेल ओतू नका म्हणजे जाच करणाऱ्यांना कालांतराने तुमचा उपहास करण्यात इतकासा आनंद वाटणार नाही कारण “सरपण नसल्यामुळे विस्तव विझतो.”—नीतिसूत्रे २६:२०.
चर्चेसाठी प्रश्न
◻ इतरांची क्रूरपणे टर उडवणाऱ्यांबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे?
◻ तरुणांच्या छळणुकीमागे सहसा कोणते कारण असते?
◻ उपहास कमी करण्यासाठी अथवा थांबवण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
◻ इतरजण तुमची थट्टा करत असले, तरी ‘तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू’ देणे महत्त्वाचे का आहे?
◻ शाळेतील हिंसेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलू शकता?
[१५५ पानांवरील संक्षिप्त आशय]
या धैर्याच्या फुशारकीमागे, हे जाच करणारे मनातल्या मनात म्हणत असावेत: ‘आम्हाला स्वतःबद्दल तर आवड नाही पण दुसऱ्यांना कमी लेखायला आनंद होतो’
[Box on page 152]
बदडले जाण्याचे मी कसे टाळू शकतो?
‘शाळेला येताना तुम्ही जीव मुठीत धरून येता.’ असे अनेक विद्यार्थी म्हणतात. पण, सोबत एखादे हत्यार बाळगणे मूर्खपणाचे आहे आणि ते आपत्तीस आमंत्रण आहे. (नीतिसूत्रे ११:२७) मग, तुम्ही स्वतःचे संरक्षण कसे करू शकता?
धोक्याची ठिकाणे ओळखा व ती टाळा. काही शाळांमध्ये दालन, जिना, आणि लॉकर रूम्स ही खरोखरच संकटाची ठिकाणे आहेत. तसेच ही वसतिगृहे, मारामाऱ्या आणि अंमली पदार्थांचे सेवन करण्याची ठिकाणे म्हणून इतकी कुप्रसिद्ध असतात की त्या सुविधा उपभोगण्याऐवजी अनेक युवकांना गैरसोयच परवडते.
संगतीबद्दल सावध राहा. बहुतेकवेळा असे घडते की, एखादा युवक मात्र चुकीच्या टोळीसोबत संगत राखत असल्याने मारामारीत सापडतो. (नीतिसूत्रे २२:२४, २५ पाहा.) अर्थात, तुमच्या शाळासोबत्यांशी बेपर्वाईने वागल्याने एकतर तुम्ही एकटे पडाल किंवा ते तुमच्याशी वैरभाव राखू लागतील. तुम्ही मित्रत्वाने व विनयशीलतेने त्यांच्याशी व्यवहार केल्यास ते सहसा तुमच्या मागे लागणार नाहीत.
मारामाऱ्यांपासून काढता पाय घ्या. “एकमेकांना उद्देश स्पष्ट करावयाला भाग” पाडू नका. (गलतीकर ५:२६, तळटीप, NW) तुम्ही जिंकला तरी, तुमचा विरोधक कदाचित दुसऱ्या सामन्यासाठी थांबून राहील. यास्तव, भांडण होऊ नये म्हणून प्रथम समजावण्याचा प्रयत्न करा. (नीतिसूत्रे १५:१) बोलण्याने काहीच साध्य झाले नाही, तर मारामारीच्या ठिकाणाहून काढता पाय घ्या—नाहीतर पळ काढा. लक्षात असू द्या, की “मृत सिंहापेक्षा जिवंत श्वान बरा.” (उपदेशक ९:४) शेवटला पर्याय म्हणून, स्वतःचे संरक्षण आणि स्वतःला बचावण्याकरता उचित असलेली सर्व पावले उचला.—रोमकर १२:१८.
तुमच्या पालकांशी बोला. युवक “आपल्या शाळेतील धास्तींबद्दल पालकांना क्वचितच सांगतात कारण पालक त्यांना डरपोक समजतील किंवा दादागिरी करणाऱ्यांचा विरोध न केल्याबद्दल रागावतील अशी भीती त्यांच्या मनात असते.” (मुलांचा एकलकोंडेपणा, इंग्रजी) तथापि, बहुतेकवेळा पालकांनी मध्ये पडल्यानेच त्रास थांबवला जाऊ शकतो.
देवाला प्रार्थना करा. शारीरिक नुकसान होण्यापासून तुमचे संरक्षण होईल अशी हमी देव देत नाही. पण, अशा भांडणांना तोंड देण्यासाठी धैर्य आणि वातावरण थंडावण्यासाठी आवश्यक बुद्धी तो देऊ शकतो.—याकोब १:५.
[१५१ पानांवरील चित्र]
अनेक युवक समवयस्कांकडील छळवणुकीचे बळी आहेत
[१५४ पानांवरील चित्र]
तुम्हाला त्रास होत असल्याचे पाहून उपहास करणाऱ्याला समाधान मिळवायचे असते. प्रत्युत्तर देणे किंवा रडू लागल्यामुळे आणखी जाच करत राहण्यास प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे
[१५६ पानांवरील चित्र]
टिंगल होत असताना विनोदबुद्धी दाखवण्याचा प्रयत्न करा