टीव्ही पाहण्याच्या सवयीवर मला ताबा कसा ठेवता येईल?
अध्याय ३६
टीव्ही पाहण्याच्या सवयीवर मला ताबा कसा ठेवता येईल?
अनेक आबालवृद्धांना टीव्ही पाहण्याचा अतिशय वाईट नाद लागतो. सर्वेक्षणे असे दर्शवतात, की १८ वर्षांचे होईस्तोवर सर्वसामान्य अमेरिकन तरुण व्यक्तीने सुमारे १५,००० तास टीव्ही पाहण्यात घालवले असतील! सतत टीव्हीसमोर बसणारे लोक ती सवय सोडून देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना खरोखरचा नाद लागलेला असतो हे स्पष्ट दिसून येते.
“मी टीव्ही पाहणे कधीच सोडू शकत नाही. तो चालू असतो तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं मला तरी शक्य नाही. मला तो बंद करवत नाही. . . . बंद करायला जातो तेव्हा माझे हात गळून गेल्यासारखे होतात. म्हणून तासन्तास तिथंच बसून राहतो.” एक अप्रौढ युवक? नव्हे, ते इंग्रजीचे प्राध्यापक आहेत! पण युवक सुद्धा टीव्हीचे नादिष्ट असू शकतात. “टीव्ही बंद सप्ताह” पाळण्यास तयार झालेल्या काहींच्या प्रतिक्रिया पाहा:
“मी विषण्ण आहे . . . काही सुचेनासं झालंय.”—बारा वर्षीय सुष्मिता.
“मला नाही वाटत मी ही सवय सोडू शकेन. मला टीव्ही अतिशय आवडतो.”—तेरा वर्षीय लिंडा.
“खूप तीव्र दबाव होता. मला पाहायची इच्छा व्हायचीच. सर्वात कठीण म्हणजे रात्री आठ ते दहाची वेळ.”—अकरा वर्षांचा ललित.
म्हणून “टीव्ही बंद सप्ताह” संपल्यावर बहुतांश युवकांनी आधी टीव्हीकडे धाव घेतली यात काही आश्चर्य नाही. पण ही काही हसण्यावारी घालविण्याची गोष्ट नव्हे, कारण टीव्हीचा हाच नाद भरमसाट संभवनीय समस्यांना आमंत्रण देतो. त्यातील फक्त काहींचा जरा विचार करा:
घसरणारे मार्क: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थने (यु.एस.) असे वृत्त दिले की, अवाजवी प्रमाणात टीव्ही पाहिल्याने “शाळेतील कार्यसिद्धी, विशेषतः वाचन असमाधानकारक” होऊ शकते. साक्षरतेविषयी लबाडी
(इंग्रजी) हे पुस्तक पुढे असा आरोप करते: “मुलांवर टीव्हीचा परिणाम असा होतो, की शिक्षण सुकर, सहज आणि मनोरंजक असावे अशी ते अपेक्षा करू लागतात.” म्हणून टीव्हीचा नाद असणाऱ्याला अभ्यास करणे म्हणजे कदाचित एकप्रकारचे संकटच वाटेल.निकृष्ट वाचन सवयी: एखाद्या पुस्तकाचे पान न् पान कधी वाचून काढले होते त्याची आठवण करून पाहा. पुस्तक विक्रेत्यांच्या पश्चिम जर्मनी संघातील एका प्रवक्त्याने खेदपूर्ण उद्गार काढले: “आपलं राष्ट्र, कामावरून घरी गेल्यावर टीव्हीपुढेच झोपी जाणाऱ्या लोकांचं बनलं आहे. आपल्या वाचनात दिवसानुदिवस खंड पडत चाललाय.” ऑस्ट्रेलियातील एका अहवालात अशाचप्रकारे म्हटले होते: “प्रत्येक तासाच्या वाचनाबदली एक सर्वसामान्य ऑस्ट्रेलियन मुलगा टीव्ही पाहण्यात सात तास घालवत असेल.”
नाहीसे झालेले कौटुंबिक जीवन: एका ख्रिस्ती स्त्रीने लिहिले: “टीव्ही अति पाहिल्यामुळं . . . मी एकटी पडले आणि मला दुरावल्यासारखं वाटायचं. जणू [माझं] कुटुंब मला परकं झालं होतं.” टीव्हीमुळे आपल्या कुटुंबासोबत कमी वेळ घालवत असल्याचे तुम्हाला आढळते का?
आळस: काहींना असे वाटते, की टीव्ही पाहण्यातील अक्रियाशीलतेमुळेच “[एखादा युवक] कदाचित अशी अपेक्षा करू लागेल की, [त्याच्या] सर्व गरजा काहीही प्रयास न करता पुरवल्या जातील आणि जीवनाबद्दलचा दृष्टिकोन ऐतखाऊ व्यक्तीसारखा बनेल.”
अहितकर प्रभावांशी संपर्क: केबल टीव्हीच्या काही नेटवर्क्समुळे घरात पोर्नोग्रॅफीचा प्रवेश होतो. तसेच या नियमित कार्यक्रमांमुळे कार अपघात, स्फोट, भोसकणे, गोळीबार आणि कराटे अशा या गोष्टी सतत मनात भरवल्या जातात. एका अंदाजानुसार, संयुक्त संस्थानांतील एका तरुण व्यक्तीने १४ वर्षांची होईस्तोवर टीव्हीवर १८,००० लोकांची कत्तल पाहिलेली असते आणि मग हाणामारी व मोडतोडीचे दृश्य तर निराळेच.
विल्यम बेल्सन या ब्रिटीश संशोधकाला असे आढळले, की टीव्हीचे हिंसक कार्यक्रम पाहणाऱ्या मुलांची “गंभीर प्रकारच्या हिंसेत गोवले जाण्याची” अधिक शक्यता होती. टीव्हीतील हिंसेमुळे, “शिवीगाळ आणि अपशब्द वापरणे, खेळताना चिडणे, दुसऱ्या मुलाला हिंसात्मक धमकी देणे,
भिंतींवर घोषवाक्ये लिहिणे, [आणि] खिडक्या फोडणे” अशा गोष्टी करण्यासही प्रवृत्त केले जाऊ शकते असा दावा देखील त्यांनी केला. अशा गोष्टींचा तुमच्यावर काहीएक परिणाम होणार नाही असे तुम्हाला वाटत असले, तरीही बेल्सन यांच्या अभ्यासानुसार टीव्हीतील हिंसा पाहिल्यामुळे हिंसेप्रती “[त्या] मुलाची जाणीवपूर्वक मनोवृत्ती काही बदलली” नाही. पण, हिंसाचाराच्या नियमित आहारामुळे हिंसाचाराविरुद्धचे अप्रबुद्ध निर्बंध स्पष्टतः नाहीसे होत होते.परंतु, ‘हिंसा ज्यांना प्रिय आहे अशांचा द्वेष करणाऱ्या’ देवाबरोबरील नातेसंबंधावर, टीव्हीतील हिंसकता पाहण्याच्या नादाचा कसा परिणाम होऊ शकतो हे अधिक चिंतेचे आहे.—स्तोत्र ११:५, सुबोध.
टीव्ही पाहण्यावर मला ताबा कसा ठेवता येईल?
पण टीव्ही म्हटले की तो मुळातच वाईट असतो असा याचा अर्थ होत नाही. वान्स पॅकार्ड हे लेखक सांगतात: “अमेरिकेतील टीव्हीवरील पुष्कळसे कार्यक्रम लाभदायक असू शकतात . . . सहसा, सायंकाळच्या वेळी कमालीचे छायाचित्रण असलेले निसर्गाविषयीचे कार्यक्रम दाखवले जातात—वटवाघूळ, बीव्हर्स, गव्यांपासून ते ब्लोफिशसारख्या प्राण्यांच्या जीवनाविषयी दाखवले जाते. सार्वजनिक टीव्हीवरून थक्क करून सोडणारे बॅले, ऑपेरा आणि चेंबर संगीत दाखवले जाते. टीव्हीतून महत्त्वपूर्ण घटनांविषयी अतिशय उत्कृष्टपणे दाखवले जाते . . . कधीकधी टीव्हीतून उद्बोधक नाट्य प्रस्तुती केल्या जातात.”
नीतिसूत्रे २५:२७.) तसेच हानीकारक कार्यक्रम बंद करून टाकण्यासाठी तुमच्याजवळ आत्मसंयम नाही असे दिसून आल्यास, “कोणत्याही गोष्टीचे वर्चस्व माझ्यावर होऊ देणार नाही,” हे प्रेषित पौलाचे शब्द लक्षात ठेवणे केव्हाही चांगले. (१ करिंथकर ६:१२, NT इझी-टू-रीड व्हर्शन) तर मग, टीव्हीच्या गुलामीतून सुटका मिळवून तुम्ही टीव्ही पाहण्यावर आळा कसा घालू शकता?
तथापि, एखादी चांगली गोष्ट अति झाल्यासही हानी होऊ शकते. (पडताळालिंडा नील्सन या लेखिकेचे असे निरीक्षण आहे की: “ध्येय जोपासल्याने आत्मसंयम निर्माण होतो.” प्रथम, आपल्या सद्य सवयींचे परीक्षण करा. एका आठवड्याकरता, तुम्ही कोणते कार्यक्रम पाहता आणि टीव्हीपुढे दररोज किती वेळ घालवता ते पाहा. घरी आल्या आल्या तुम्ही टीव्ही सुरू करता का? बंद केव्हा करता? प्रत्येक आठवड्यामध्ये किती कार्यक्रम “पाहिलेच-पाहिजेत” असे आहेत? परिणाम पाहून तुम्ही चक्रावून जाल.
ईयोब १२:११) म्हणून बुद्धी वापरून (पालकांच्या सल्ल्यासह) कोणते कार्यक्रम खरोखरच पाहण्याजोगे आहेत हे तपासा. काहीजण, आपण कोणते कार्यक्रम पाहणार हे आधीच ठरवून केवळ त्याच कार्यक्रमांपुरता टीव्ही सुरू करतात! इतरजण आणखी कडक पावले उचलतात आणि शाळा-असलेल्या-दिवशी-टीव्ही-बंद असे नियम किंवा दररोज-एक-तास अशा मर्यादा घालतात.
मग तुम्ही आतापर्यंत कोणते कार्यक्रम पाहात आला आहात याचे बारकाईने परीक्षण करा. “जीभ अन्नाची रुचि घेते, तसा कान शब्दाची पारख करीत नाही काय?” असा प्रश्न बायबल करते. (पण कोपऱ्यात शांत बसून राहिलेल्या टीव्हीमुळे देखील मोह वाटत असला तर? एका कुटुंबाने अशाप्रकारे या समस्येचे निरसन केले: “टीव्हीचा अडथळा होऊ नये म्हणून आम्ही तो तळघरात ठेवतो . . . त्यामुळे घरात आल्या आल्या तळघरामध्ये जाऊन टीव्ही लावायचा मोह जरा कमीच होतो. नाहीतर काही पाहण्यासाठी खास तिथं चक्कर टाकावी लागते.” आपला टीव्ही कपाटात ठेवणे किंवा त्याचे कनेक्शन काढून ठेवणे देखील तितकेच परिणामकारक असू शकते.
गंमत म्हणजे, “टीव्ही बंद सप्ताह” पाळलेल्या युवकांना त्याचा ‘त्रास’ झाला असतानाही त्यांना टीव्हीच्या बदली काही सकारात्मक पर्याय सापडले. एका मुलीने असे आठवून सांगितले: “मला आईसोबत गप्पा मारण्याची संधी मिळाली. आणि तिच्याशी बोलू की टीव्ही पाहू अशी माझी द्विधा मनःस्थिती नसल्यामुळे तिच्याकडून पुष्कळशा गोष्टी शिकण्यासारख्या
आहेत असं मला जाणवलं.” आणखी एका मुलीने वेगवेगळ्या पाककृती करून पाहिल्या. जेसन नावाच्या एका तरुणाला “टीव्ही पाहण्याऐवजी बागेत जाण्यात” किंवा फिशींगला जाण्यात, वाचन करण्यात किंवा समुद्रकिनारी जाण्यात मजा असू शकते हे आढळले.वायंटचा (“मला टीव्हीचा नाद होता” ही पुरवणी पाहा) अनुभव दाखवतो की, “प्रभूच्या कामात सर्वदा पुष्कळ” करणे हे टीव्ही पाहण्यावर नियंत्रण ठेवण्याकरता आणखी एक सूत्र आहे. (१ करिंथकर १५:५८) देवाच्या समीप गेल्याने, सध्या उपलब्ध असलेल्या उत्तम प्रकाशनांकरवी बायबलचा अभ्यास केल्याने आणि देवाच्या कार्यात मग्न राहिल्याने टीव्हीचा नाद सोडण्याकरता तुम्हाला मदत मिळू शकते. (याकोब ४:८) हे खरे की, टीव्ही पाहण्यावर निर्बंध म्हणजे काही आवडते कार्यक्रम चुकवावे लागतील. पण, तुम्हाला दिवस न् रात्र टीव्ही लावायची आणि त्याचे गुलाम असल्यासारखे हरएक कार्यक्रम पाहत बसण्याची काय गरज आहे? (पाहा १ करिंथकर ७:२९, ३१.) प्रेषित पौलाप्रमाणे स्वतःच्याबाबतीत जरा कडक राहणे उत्तम; त्याने एकदा असे म्हटले: “मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो.” (१ करिंथकर ९:२७) टीव्हीचा गुलाम असण्यापेक्षा हे बरे नव्हे का?
चर्चेसाठी प्रश्न
◻ काही युवकांना टीव्ही पाहण्याचा नाद लागतो असे का म्हटले जाऊ शकते?
◻ अति टीव्ही पाहण्याचे संभवनीय हानीकारक परिणाम कोणते आहेत?
◻ टीव्ही पाहण्यावर निर्बंध घालण्याचे काही मार्ग कोणते आहेत?
◻ टीव्ही पाहण्याऐवजी तुम्ही आणखी काय करू शकता?
[२९५ पानांवरील संक्षिप्त आशय]
“मी विषण्ण आहे . . . काही सुचेनासं झालंय.”—बारा वर्षीय सुष्मिता, “टीव्ही बंद सप्ताह” मधील एक सहभागी
[Box on page 292, 293]
‘मला टीव्हीचा नाद होता’—मुलाखत
मुलाखत घेणारा: तुला टीव्हीचं वेड लागलं तेव्हा तू किती वर्षांचा होतास?
वायंट: दहा वर्षांचा असेन. शाळेवरून घरी येतो न येतो तोच मी टीव्ही सुरू करायचो. सुरवातीला, मी कार्टुन्स आणि लहान मुलांचे कार्यक्रम पाहायचो. मग बातम्या आल्या . . . की किचनमध्ये जाऊन काहीतरी खायचो. त्यानंतर, पुन्हा टीव्ही पाहायला जायचो आणि मला झोप लागेपर्यंत पाहातच बसायचो.
मुलाखत घेणारा: पण मग मित्रांसोबत वेळ घालवायला तुला सवड मिळायची का?
वायंट: टीव्हीच माझा मित्र.
मुलाखत घेणारा: म्हणजे तुला खेळायला वेळच नव्हता?
वायंट: [हसत] माझ्यात खेळायची क्षमताच नाही. मी दिवस न् रात्र टीव्हीच पाहत बसायचो म्हणून त्या क्षमतांना वाव मिळालाच नाही. बास्केटबॉल तर विचारूच नका. आणि जिम क्लासमध्ये तर सहसा माझा नंबर लागायचाच नाही. पण मला वाटतं, मी या क्षमतांना आणखी थोडा वाव द्यायला हवा होता—तोरा मिरवता आला असता म्हणून नाही तर निदान मी थोडीफार मजा तरी लुटली असती.
मुलाखत घेणारा: तुझ्या मार्कांविषयी काय?
वायंट: व्याकरणात कसेबसे मार्क मिळवले. मी रात्री उशिरापर्यंत जागून अगदी शेवटल्या घटकेला गृहपाठ करायचो. पण अभ्यासाच्या अशा निकृष्ट सवयी लागल्यामुळं हायस्कूलमध्ये मला अवघडच गेलं.
मुलाखत घेणारा: टीव्ही पाहण्याचा तुझ्यावर परिणाम झालाय का?
वायंट: हो तर. काहीवेळा मी लोकांमध्ये असतो तेव्हा बोलण्याचालण्यात सामील होण्याऐवजी मी फक्त त्यांच्याकडे पाहत राहतो—एखादा टीव्ही टॉक शो पाहत असल्यासारखा. लोकांसोबत असं संभाषण करता आलं असतं तर बरं झालं असतं असं वाटतं.
मुलाखत घेणारा: निदान ह्या संभाषणात तरी तू चांगलाच बोललास. तू आता नक्कीच हा नाद सोडला असणार.
वायंट: हायस्कूलमध्ये गेल्यावर मी टीव्हीचा नाद हळूहळू सोडून दिला. . . . मी साक्षीदार युवकांशी संगत ठेवू लागलो आणि आध्यात्मिक प्रगती करू लागलो.
मुलाखत घेणारा: पण याचा तुझ्या टीव्ही पाहण्याशी काय संबंध?
वायंट: आध्यात्मिक गोष्टी मला अधिक मूल्यवान वाटू लागल्या तसं पुष्कळसे कार्यक्रम, ख्रिश्चनांकरता इष्ट नव्हते हे मला जाणवू लागलं. तसंच, बायबलचा अधिक अभ्यास करावा आणि ख्रिस्ती सभांची तयारी करावी याचीही गरज भासू लागली. म्हणजे, टीव्ही बंद करणं भागच होतं. पण, ते तसं सोपं नव्हतं. शनिवार सकाळचे कार्टुन्स मला खूप आवडायचे. पण काय झालं की, मंडळीतल्या एका ख्रिस्ती बांधवाने मला शनिवारी सकाळी घरोघरच्या प्रचारासाठी बोलावलं. त्यामुळे मग शनिवार सकाळच्या टीव्हीचं वेड सुटलं. मग हळूहळू मी टीव्ही पाहण्याचं कमी करायला शिकलो.
मुलाखत घेणारा: पण आज काय?
वायंट: आज सुद्धा, जर टीव्ही सुरू असला, तर माझ्याने काहीच काम होत नाही. म्हणून सहसा मी टीव्ही बंदच ठेवतो. खरं म्हणजे, काही महिन्यांपूर्वी माझा टीव्ही नादुरुस्त झाला आणि तो दुरुस्त करून घ्यायचं मी मनावर घेतलेलंच नाहीय.
[२९१ पानांवरील चित्र]
काहींना टीव्हीचा अतिशय वाईट नाद लागलेला असतो
[२९४ पानांवरील चित्र]
टीव्ही आड जागी ठेवण्यात येतो तेव्हा तो सुरू करण्याचा मोह क्वचितच होतो