विवाहाच्या दिवसानंतर
अध्याय ३
विवाहाच्या दिवसानंतर
१. उपदेशक ४:९, १० मध्ये वर्णिलेला सहकार एखाद्याच्या विवाहित जीवनास फायदेकारक कसा ठरेल?
तुमचा विवाह प्रसंग साजरा झाला व आता तुम्ही व तुमचा सोबती एका नवीन कौटुंबिक घटकाची स्थापना करण्यात गुंतलेले आहात. तुम्हाला पूर्णपणे आनंद प्राप्त झाला आहे का? यापुढे तुम्ही एकटे नाही तर गुपिते ठेविण्यास, तुमच्या आनंदात सहभागी होण्यास आणि तुमच्या समस्यातही समरूप होण्यास कोणी सहचारी तुम्हासोबत आहे. तुम्हाबाबतीत उपदेशक ४:९, १० खरे असल्याचे तुम्हास आढळते का?—“एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमांचे त्याना चांगले फळ प्राप्त होते. त्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल. पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते त्याची दुर्दशा होते.” या प्रकारच्या सहकार्याने तुमचा विवाह बहरत आहे का? दोन जीवांमध्ये ही समरसता उद्भवण्यास सहसा काही वेळेची आणि परिश्रमांची गरज असते. पण दुःखदपणे असेही म्हणावे लागेल की अनेक विवाहात तसे कधीच घडून येत नाही.
२, ३. (अ) विवाहदिनानंतर जीवनातील कोणत्या वास्तवतेस तोंड द्यावे लागते? (ब) कोणाही व्यक्तिने विवाहानंतर ही जुळणी केलीच पाहिजे हे अपेक्षिणे रास्तपणाचे आहे ते का?
२ प्रेमप्रकरणातील कहाणीत पाहता, जे एकमेकांच्या प्रेमात असतात त्यांचे मिलन कसे घडवावे ही समस्या असते. पण त्यानंतर ते समाधानाने राहतात. तथापि, वस्तुस्थितीत, नंतरच्या दैनंदिन जीवनात आनंदी राहणे हेच समस्याप्रधान आव्हान प्रस्तुत करते. विवाहाच्या आनंदी दिवसानंतर लागलेच नित्याच्या जीवनास सुरूवात होते: सकाळी लवकर उठणे, कामावर निघणे, बाजारहाट करणे, स्वयंपाक, भांडी विसळणे, घर स्वच्छ करणे, वगैरे वगैरे.
३ विवाहितांतील नातेसंबंध जुळवून घेण्याची गरज असते. तुम्ही दोघांनीही यासंबंधात अशा काही अपेक्षा आणि कल्पनांसह प्रवेश केलेला असेल ज्या कदाचित तितक्याशा व्यावहारिक आणि यथार्थ नसतील. जेव्हा त्या पुऱ्या होत नाहीत, तेव्हा निराशेच्या धुसमुशीला सुरवातीच्या काही आठवड्यातच सुरवात होते. पण हे आठवणीत असू द्या की, तुम्ही तुमच्या जीवनात एक मोठा बदल करून घेतलेला आहे. तुम्ही यापुढे एकटे नाही किंवा या आधीच्या आयुष्यात ज्या कुटुंबात होता त्यांच्यात नाहीत. आता तुम्ही एका अशा नवीन व्यक्तिच्या सोबतीत आहात जी तुम्हास कदाचित अपरिचीत असताही असे म्हणाल की तिला जाणतो. तुमचा कार्यक्रम नवा बनला आहे, तुमची कामे नवी झाली असतील, अर्थसंकल्प नक्कीच नवा व वेगळा झाला असेल, शिवाय नवे मित्र व आप्तही जुळले असतील. विवाहाचे यश-अपयश आणि समाधान ही तुम्ही त्यात स्वसंतोषाने जुळवून घेण्यावर अवलंबून आहे.
तुम्ही लवचीक आहात का?
४. ही जुळणी करण्यात कोणती शास्त्रवचनीय तत्त्वे साहाय्यक ठरतील? (१ करिंथकर १०:२४; फिलिप्पैकर ४:५)
४ गर्वामुळे, काहींना प्रसंगानुरूप लवचीक बनण्याचे अवघड जाते. पण पवित्र शास्त्र म्हणते, “गर्व झाला की नाश ठेवलेला, मनाचा ताठा अधःपाताचे मूळ आहे.” आपल्या हट्टीपणातच गढणे हे नाशकारक ठरू शकते. (नीतीसूत्रे १६:१८) जो स्वेच्छेने वाकतो व नमते घेऊ इच्छितो अशाची येशूने पुढील शब्दात प्रशंसा केली आहे की, “जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे.” आणि जर कोणी तुम्हाला “एक कोस” नेऊ इच्छितो तर “त्याच्याबरोबर दोन कोस जा.” तसेच जर कोणी जिवलग असलेला वाद करतो तर प्रेषित पौलाने म्हटल्यानुसार “तुम्ही अन्याय का सहन करीत नाही?” (मत्तय ५:४०, ४१; १ करिंथकर ६:७) इतरांसोबत शांती राखण्यास ख्रिश्चन जर एवढे करू शकतो तर, प्रेमात विवाहबद्ध झालेल्या दोन व्यक्ती त्यांच्या नवीन नातेसंबंधात यशस्वी ठरण्यास हवी ती जुळवणूक नक्कीच करु शकतील.
५. आपल्या विवाह सोबत्याबद्दल कोणीही भावपूर्ण किंवा अभावात्मक विचार कसे करू शकतो?
५ समाधानी किंवा असमाधानी राहण्याचे अनेक मार्ग चोहोकडे पसरलेले आहेत. तुम्ही कशाबद्दल दक्ष असाल? तुम्ही तुमची दृष्टी सकारात्मक का नकारात्मक गोष्टींवर लावून राहाल? नववधू कदाचित असा विचार करील की, ‘आता आपण विवाहबद्ध झालेले आहोत; मग, मला वेगवेगळ्या रम्य स्थळी घेऊन जाणारा आणि ज्याला मजबरोबर वेळ घालविण्यात मजा वाटे तो माझा प्रेमवीर गेला कुठे? तो त्याच्या चाकोरीला जुंपला. तो मला केवळ गृहीत धरून चालतोय. माझा जिच्याबरोबर परिचय झाला होता ती ही व्यक्ती नाही!’ किंवा कुटुंबाला जे चांगले ते पुरवीत राहण्यासाठी आता तो अधिक मेहनत करीत आहे म्हणून तिजठायी समज आणि त्याची गुणग्राहकता वाढत आहे का? तसेच हा पती हे लक्षात घेत आहे का की, त्याची पत्नी स्वयंपाक करण्यात तसेच स्वच्छता व टापटीप ठेवण्यात मेहनत करीत आहे, ती कधी कधी बरीच थकते आणि आकर्षक दिसावे म्हणून सजावट करण्यासाठी हवा तितका वेळ तिला मिळत नाही? की तो स्वतःशी म्हणतो, ‘मी विवाह करून आणलेली सुंदर तरूणी कोठे आहे? तिला तिचा पती आता मिळाला आहे म्हणून ती तर पार बदलली?’
६. आपला विवाह यशस्वी ठरावा म्हणून जेव्हा पतीपत्नी दोघेही कामे करतात तेव्हा त्याचा त्यांच्या आपसातील नातेसबंधावर कसा परिणाम होतो?
६ दोघांनीही प्रौढ विचारी असावे आणि ही समज बाळगून असावे की विवाहाआधी ज्या सर्व गोष्टी केल्या, त्या करण्यास आता वेळ आणि शक्ती नाही. आता लवचीकपणा दाखविण्याची आणि विवाहास क्रियाशील बनविण्याऱ्या जबाबदारीस पार पाडण्याच्या तीव्र इच्छेस पुरे करण्याची वेळ आहे. एक व्यक्ती विवाहास विस्कळीत करील, म्हणून ते काम यशस्वीरित्या पार पाडण्यास दोघाही व्यर्क्तिची गरज आहे. विवाहास यशस्वी करणे ही देखील एक कर्तबगारी आहे. याचाच अर्थ अडचणी वाटेत असताही कर्तबगारी नेटाने निभावणे. जेव्हा तुम्ही दोघेही या कामगिरीत जुंपता तेव्हा ही कर्तबगारी पुरी करण्यात तुम्हा दोघांचीही संयुक्तता अधिक बहरते. एकाच ध्येयास गाठण्याचे हे संयुक्त उद्दिष्ट तुम्हा दोघास अधिक नजीक आणते व तुमच्या एकात्मतेस अधिक मजबूत करते. ते तुम्हा दोघास एक करते. कालांतराने विवाहाच्या गोडीतील खऱ्या प्रेमाचे कटिबंधन अधिक घट्ट करून इतर सर्व गोष्टींपेक्षा ते अधिक प्रिय बनते आणि अशा एकात्मतेच्या समाधानात आपसात उद्भवणाऱ्या मतभेदांचे निरसन करणे हा एक आनंद बनतो.
७. जेव्हा निर्णय घेणे आहे तेव्हा नमते घेणे केव्हा बरे असते?
७ प्रीती वृद्धींगत होत राहिली की गर्वाचे घर रिकामे होऊ लागते. शिवाय फक्त देण्यातच नव्हे, तर जेव्हा शास्त्रीय तत्त्वच नव्हे तर स्वतःच्या वैयक्तिक वचर्स्वाच्या आहारी जाण्याचा योग समाविष्ट असतो, तेव्हा नमते घेण्यातही आनंद असतो. कदाचित घरकुलाकरता काही वस्तू खरेदी करणे असेल किंवा यंदाची सुट्टी कोठे घालवणार हा प्रश्न असेल. अशावेळी इतरांच्या समाधानाबद्दलही समजूतदारपणा दाखविला तर ते जोडपे प्रेषित पौलाच्या शब्दांची पूर्तता करणारे ठरतील की: “तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पाहा.”—फिलिप्पैकर २:४.
लैंगिकतेबाबत समतोल दृष्टिकोन
८, ९. विवाहातील सलगीबद्दल शास्त्रीय दृष्टिकोन काय आहे?
८ पवित्र शास्त्र हे लैंगिक समागमाबाबत अस्वाभाविक नाही. तर पद्याच्या भाषेत ते समजावून सांगते की, या समागमामुळे केवळ पती आणि पत्नी ह्यांना परमानंद व्हावा; तसेच ते यावरही अधिक जोर देते की लैंगिक समागम केवळ पती आणि पत्नीच्या हक्काचा आहे. हा उतारा नीतीसूत्रे ५:१५-२१ मध्ये असा सापडतो:
“तू आपल्याच टाक्यातले पाणी पी. आपल्या विहिरीतले वाहते पाणी पी. तुझे झरे बाहेर वाहून जावे का? तुझे जलाचे प्रवाह रस्त्यावरून वाहावे काय? ते केवळ तुझ्यासाठी असोत, तुझ्याबरोबर दुसऱ्यांना त्यांचा उपयोग न घडो. तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त होवो. तरूणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस. रमणीय हरिणी सुंदर रानशेळी याप्रमाणे तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित होवो. माझ्या मुला परस्त्रीने तुझे चित्त का मोहित व्हावे? परक्या स्त्रीला तू का आलिंगन द्यावे? मनुष्याचे मार्ग यहोवाच्या दृष्टीसमोर आहेत आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करितो.”
९ तथापि, विवाहाचे यशापयश केवळ जोडप्याच्या लैंगिक जीवनावरच अवलंबून आहे असे समजणे किंवा नातेसंबंधातील इतर क्षेत्रात काही गंभीर चुका घडल्यास त्यांची भरपाई करण्यास एक साधन म्हणून लैंगिकतेवर सारखा जोर देत राहणेही चुकीचे आहे. पुस्तके, चित्रपट आणि व्यापार क्षेत्रांतून जो लैंगिकतेवर सारखा जोर दिला जातो त्यातील बराचसा भाग कामुक किंवा शृंगारिक भावना जागृत करण्याच्या इराद्याने योजिलेला असतो, तो लैंगिकतेस अतिप्रसिद्धी देतो. तथापि, देवाचे वचन त्या गोष्टींना मान्यता देत नाही तर जीवनाच्या हर कक्षेत इंद्रियदमन राखण्याचे सुचविते. विवाहातही सर्वच बंधने झुगारली तर ती अशा सवया जडवितात ज्या विवाह संबंधास भ्रष्टावितात.—गलतीकर ५:२२, २३; इब्रीयांस १३:४.
१०. विवाहित जोडप्याला लैंगिकतेत सोईचे करून घेण्यास कोणत्या गोष्टी विचारात घेणे बरे?
१० लैंगिकबाबतीत संयम बाळगणे काही वेळा अवघड जाते आणि विवाहानंतर ते साध्य करण्यास वेळ लागतो. हे अज्ञानपणामुळे आणि सोबत्याच्या गरजा ओळखण्यात दिरंगाई करत राहिल्यामुळे घडते. कोणा सन्माननीय विवाहित मित्राबरोबर त्याबद्दलची बोलणी साहाय्यक ठरतील. पुरूष आणि स्त्री यांना केवळ वेगवेगळ्या प्रकारचे घडविलेले आहे एवढेच नसून त्यांच्या भावनाही वेगवेगळ्या असतात. स्त्री सारख्या नाजूक पात्राबद्दल सहानुभूती दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण खोटी शालीनता किंवा खोटी नम्रता किंवा लैंगिकता ही लज्जास्पद आहे, अशी समज बाळगून त्याबद्दल नकारार्थी भावना बाळगणे चुकीचे आहे. तसेच काही पुरुष दाखवतात तशी ती मर्दुमकीची घटनाही असू नये. पवित्र शास्त्र म्हणते, “पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा” आणि “याप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा.” आणि हे करीत असता, पवित्र शास्त्रातील हे तत्त्व यथायोग्य आहे की: “कोणीही आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्यांचेही पाहावे.” दोन्ही बाजूंना जर एकमेकांस आनंदविण्याची प्रेमळ आणि उत्कट इच्छा असली तर उत्तम जुळणी होण्यास मदत होईल.—१ करिंथकर ७:३; १०:२४.
अप्रिय न बनता मतभेदक
११-१३. जेव्हा जेव्हा तक्रारी उद्भवतात तेव्हा मतभेदांचे रूपांतर गंभीर झगड्यात होऊ नये म्हणून, आम्ही काय लक्षात ठेवावे?
११ पृथ्वीवरील कोणत्याही दोन व्यक्ती एकसमान असू शकत नाही. प्रत्येक जन स्पष्टपणे भेददर्शक आहे. मग याचाच अर्थ अशा कोणत्याही दोन व्यक्ती सर्व गोष्टीत एकमत होतील असे नाही. काही जरी गंभीर असल्या तरी बहुतेक मतभेद क्षुल्लक असतात. अशीही काही घरे आहेत ज्यातील मतभेद एवढे विकोपाला जातात की ओरडणे, ढकलाढकली, मारामारी, एकमेकांवर वस्तुची फेकाफेकी यासारख्या गोष्टींना तात्काळ सुरवात होते. आणि मग एखादा सोबती काही आठवड्याकरता घर सोडून जातो, किंवा ते एकमेकांशी बोलणे बंद करतात. तरी अशा घटना न घडताही असहमत दर्शवता येणे शक्य आहे. ते कसे? काही मूलभूत सत्यांना तोंड दिल्याने.
१२ आम्ही सर्वच अपूर्णावस्थेत आहोत, सर्वात कमतरता आहेत आणि इच्छा नसताही कमतरतांचे स्वतः प्रदर्शन होते. प्रेषित पौलास स्वतःला याबद्दलचा अनुभव आला होता: “कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही. करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करितो.” (रोमकर ७:१९) आमच्या प्रथम पालकांपासून आम्ही वारशाने पाप मिळवले आहे. पूर्णता ही आमच्या शक्तीपलिकडील आहे. या करताच “‘मी आपले अंतःकरण पवित्र केले आहे. मी आपल्या पापाचे क्षालन केले आहे’ असे कोण म्हणेल?”—नीतीसूत्रे २०:९; स्तोत्रसंहिता ५१:५; रोमकर ५:१२.
१३ आम्ही आमच्या कमतरतांना ओळखून असतो व नेहमी कारणे देत असतो. मग आमच्या विवाहित सोबत्याच्या चुकांना मान्य करून क्षमा करू शकत नाही? आम्ही पापात आहोत हे तात्काळ कबूल करणार यात संशय नाही, पण एखाद्या विशिष्ट पापाबद्दल आम्ही प्रतिकारक आणि अमान्य करणारे बनतो का? आणि हे मान्य करण्याचे नाकारणे लोकांच्या अंगवळणी पडलेले आहे ही जाणीव राखण्याची समज आम्हास आहे का? मग त्यात आमच्या विवाह सोबत्याचा अंतर्भाव का असेना आम्ही तशी सूट देतो का? “विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो. अपराधांची गय करणे त्याला भूषण आहे.” असे प्रेरित नीतीसूत्रे म्हणते. मग यात काय संशय की तुम्हीही इतरांप्रमाणेच “सुवर्ण नियम” यामधील धर्मतत्त्वास अनुसरण्यास इच्छित असाल. येशूने त्याच्या प्रख्यात डोंगरावरील प्रवचनात तो दिला होता: “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” पुष्कळसे केवळ तोंडाने याचा उच्चार करतात पण थोडकेच पाळतात. प्रांजळपणे तो लागू केल्याने मानवी नातेसंबंधातील किती तरी समस्यांचे निर्मूलन होईल, एवढेच काय पण विवाहितांतील समस्या नाहीशा होतील.—नीतीसूत्रे १९:११; मत्तय ७:१२.
१४, १५. (अ) कोणी आपल्या विवाह सोबत्याची, दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रतिकूल तुलना करतो त्यावेळी त्याचा काय परिणाम होऊ शकतो? (ब) अशी तुलना कोणत्या प्रकरणात काही वेळा अविचारी ठरेल?
१४ आम्हीही एक व्यक्ती आहोत, अशी वागणूक आणि समज द्यावी असे आम्हा प्रत्येकास वाटते. कदाचित आमचे गुण किंवा कर्तृत्व, निष्कृष्ठतेतील ठरवण्यास ज्यावेळी कोणी आमची तुलना कोणा इतरांबरोबर करत असतो, त्यावेळी आमची प्रतिक्रिया कशी असते? सर्वसाधारणपणे आम्हास दुःख होते किंवा त्रागा वाटू लागतो. याच्या परिणामात आम्ही म्हणू: ‘मी ती व्यक्ती नाही; मी मी आहे.’ अशी तुलना तसे पाहता उत्तेजक नसते, कारण आम्हा सर्वास समंजसपणे वागवावे असे वाटत असते.
१५ या मुद्याच्या विवेचनात: तुमची पत्नी जे भोजन तुम्हाकरता तयार करते त्याच्याबद्दल तुम्ही, पती, खरी गुणग्राहकता व्यक्त करता, का नेहमीचीच तक्रार की तुमच्या आईसारखा स्वयंपाक तिला करता येत नाही? पण तुमच्या आईचे लग्न झाले त्या सुरवातीच्या काळात ती कसा स्वयंपाक करत असे हे तुम्हास काय ठाऊक? कदाचित तिजपेक्षा आता तुमच्या पत्नीने चांगला स्वयंपाक केला असेल. तिजवरील नवीन जबाबदाऱ्या ओळखण्यास आणि त्यात वाकबगार होण्याची संधी तर तिला द्या आणि मग पाहा! आणि तुम्ही बायकांनो, तुमची ही नेहमीची तक्रार आहे का की, तुमच्या बापाएवढा लठ्ठ पगार माझा नवरा का घरी आणत नाही? तुमच्या वडिलांचे जेव्हा नवीनच लग्न झाले होते तेव्हा त्यांना काय पगार होता? तरी चला ते तितकेसे नाही. मुख्य गोष्ट ही की तुमच्या पतीला तुम्ही केवढी मदत पुरवीत आहात. सकाळी ते कामावर निघण्याआधीच न्याहारीची वेळेवर तयारी करण्यास लवकर उठता का की, ज्यामुळे त्यांनाही वाटेल की जे काही श्रम ते करतात त्याचे तुम्हालाही मोल आहे व त्यास पाठिंबा देता? दोघांपैकी कोणी, सासरमाहेरचे कोणी आल्यास भांडतात का, किंवा मैत्री कोणाशी ठेवावयाची किंवा मनोरंजन कोणते निवडावयाचे यांवर मतभेद व्यक्त करता? हे आणि याचप्रकारातील इतर मतभेद उद्भवतील हे नक्की! पण तुम्ही ते कसे सोडवाल?
१६. हिंसक झगडे कठीण समस्या सोडवितात या मतात चूक काय आहे?
१६ काही आधुनिक मानसशास्त्रज्ञ हा दावा करतात की समस्या सोडविण्यास झगडणे हितकारक असते. निराशेची त्यांची कल्पना आहे की ती वाढते, दबाव आणते व अंतास हिंसक भांडणाचे रूप धारण करते. रागाच्या शाब्दिक द्वंद्वयुद्धात बऱ्याच काळचा राग भडकतो आणि अविचाराचे बोल निघतात, आवाज उंचावतात व जे नको ते बाहेर पडते—ही तात्विक पद्धत चालते. हे असे घडेपर्यंत निराशा मनातल्या मनात उकळते आणि मग संधी सापडताच ऊतू जाते. पण विफलतेच्या क्रोधाचा हा स्फोट तुम्हास नको तेही तोंडावाटे बोलू देतो व कायम स्वरूपातील घाव करतो; हा त्यातला मोठा धोका आहे. समोरच्या व्यक्तिस तुम्ही कदाचित एवढ्या करडेपणाने दोषी ठरवता की तुम्हा दोघांमध्ये असे खिंडार पडते की, ज्याचे भगदाड बुजविणे पुढे कधीही साध्य होऊ शकत नाही. नीतीसूत्रे १८:१९ इशारा देते: “दुखविलेल्या भावाची समजूत घालणे मजबूत शहर जिंकण्यापेक्षा अवघड आहे. कलह म्हटले म्हणजे ते दुर्गाच्या अडसरासारखे होत.” पवित्र शास्त्रात जो व्यवहार्य उपदेश सापडतो तो हा आहे: “भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी.”—नीतीसूत्रे १७:१४, RSV.
दळणवळण राखा!
१७. एखाद्याचा अंतर्गत मतभेद उभारण्याऐवजी व स्फोटक प्रमाणापर्यंत मजल पोहचण्याआधी कोणत्या गोष्टी करणे बरे?
१७ मतभेदांना, भांडणांच्या रूपात स्फोट होईपर्यंत मनात घोळवीत राहण्यापेक्षा, जसजसे ते समोर येतात, त्यांची चर्चा करणे बरे! एखादी चूक सतत विचारात घोळवीत बसविण्याने ती प्रत्यक्षात तेवढी नसताही अधिक वाईट असल्याचे दिसू लागेल. याकरता आताच चर्चा करा किंवा विसरून जा. ते सहज कोणी बोलून गेले का? तर जाऊ द्या. चर्चा होणे जरूरी आहे का? तुम्हास संत्रस्त करणारे असे काही तुमच्या सोबत्याने केले आहे का? निर्विकारपणे धिक्कारू नका, तर प्रश्न रूपात मुद्दा मांडा किंवा असे काही सूचित करा की त्यात तो मुद्दा चर्चेस येईल. उदाहरणार्थ: ‘अगं (अहो) ही गोष्ट काही माझ्या लक्षात येत नाही. तू (तुम्ही) माझी मदत करशील (कराल) का?’ असे तुम्ही म्हणू शकाल. मग विचार ऐका. त्या व्यक्तिचा दृष्टिकोन समजण्याचा प्रयत्न करा. नीतीसूत्रे १८:१३ मधील इशारा लक्षात घ्या: “ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.” आम्हाबद्दल जर कोणी चुकीचा निष्कर्ष काढला तर तो आम्हापैकी कोणालाही आवडणार नाही. याचकरता तात्काळ प्रतिक्रिया व्यक्त करण्याऐवजी त्या कृत्यामागील विचार किंवा उद्देश समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला बरा! नीतीसूत्रे २०:५ सल्ला देते तसे करा: “मनुष्याच्या मनातील मसलत खोल पाण्यासारखी असते. तरी समंजस ती बाहेर काढितो.”
१८. अभावात्मक लहरी घालविण्यात कशाचे आम्हास साहाय्य होऊ शकेल?
१८ तुम्ही लहरी आहात का? लहरी व्यक्तिच्या सोबतीत जीवन कंठणे कठीण असते. काही असा युक्तिवाद लढवतात की मेंदूतील रासायनिक घडामोडीवर अवलंबून असल्यामुळे लहरींवर आमचा ताबा नसतो. तसे असो वा नसो पण भावना संसर्गजन्य असतात. आम्हा सभोवतालच्या लोकांकरवी आम्ही एकतर आनंदित होऊ किंवा दुःखित होऊ. संगीत हे आम्हाठायी अनेक प्रकारच्या लहरी उत्पन्न करू शकते. कथाही तेच करू शकतात. जे विचार आम्ही मनात घोळवितो त्यांचा भावनांवर परिणाम होत असतो. जर सर्व वेळ नकारार्थी गोष्टींचाच विचार केला तर आम्ही हताश होणार; इच्छाशक्तिच्या बळाने तुम्ही मनास वास्तविक आशावादी विचार करण्यास भाग पाडू शकता. त्यावर विचार करा. (फिलिप्पैकर ४:८) हे अवघड वाटते तर शारीरिक श्रमाचे काही काम, परिश्रमाचे काम करण्याचे प्रयत्न करा. जसे निदणास खणून काढणे किंवा लाद्या स्वच्छ धुणे; बाहेर पडा आणि जॉगींग करा किंवा लांब फेरफटका मारा किंवा सर्वात उत्तम म्हणजे दुसऱ्या कोणाकरता काही उपयुक्त असे करा की, ज्यामुळे तुमचे लक्ष व शक्ती यांचा दुसरीकडे उपयोग होईल. वाईट लहरीला जोपासत राहण्यापेक्षा चांगली लहर उमलविणे हे उत्तम! आणि त्यातच अधिक आनंद, तुम्हा स्वतःकरिता व तुमच्या सोबत्याकरता आहे!
१९. कोणी आपल्या विवाह सोबत्याच्या लहरीसोबत समजदारपणे कसा व्यवहार राखील?
१९ तथापि, असेही काही प्रसंग उद्भवतात जेव्हा की त्या घटनांमुळे अतिशय खेद होतो, किंवा खूप आजारी पडता वा क्लेश तुम्हास पछाडतात. किंवा तुमच्या पत्नीच्या बाबतीत पाहता, महिन्याची पाळी आणि गरोदरपणा यांच्यामुळे, शरीरातील ग्रंथीच्या फेरफारात जी उलाढाल होते, त्याचा परिणाम मज्जातंतूवर आणि भावनांवर होत असतो. कोणा एका स्त्रिला पूर्व जाणीव नसता मासिक ऋतुपुर्वीचे त्रास होऊ लागतात. ही महत्त्वाची गोष्ट पतीने लक्षात घेऊन आठवणीत ठेवण्याजोगी आहे, की ज्यामुळे विनाकारण चिडीचिडीचे प्रकार टळतील, व समजूतदारपणा दाखविता येईल. अशा काही खास गोष्टीत पती आणि पत्नी दोघांनीही ओळखले पाहिजे की, स्वभावात बदल का होतात व त्याला उभारक मार्गी प्रतिसाद दिला पाहिजे. “ज्ञान्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते. ते त्याच्या वाणीत भर घालते.” तसेच “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करितो आणि विपत्कालासाठी तो बंधु म्हणून निर्माण झालेला असतो.”—नीतीसूत्रे १६:२३; १७:१७.
२०-२२. (अ) अकारण द्वेषास काट का द्यावी? (ब) आपल्या विवाह सोबत्याठायी सुरक्षिततेची भावना कशी उत्पादित करू शकतो?
२० तुमचा विवाहसोबती हेवा बाळगणारा आहे का? कोणा एकाने त्याच्या ख्यातीबद्दल तसेच विवाहाबद्दलही हेवा बाळगणे रास्त आहे. जसे हृदयाच्या ठोक्यांना ॲड्रीनलीन मिश्रित औषधाने परत चालना मिळते तसेच अंतर्यामी जे आवडीने जतन केलेले असते त्याचे समर्थन करण्यास हेवा हा जीवास प्रोसाहन देतो. हेव्याच्या विरूद्धतेत बेपर्वाई आहे, आणि आमच्या विवाहाच्या बाबतीत आम्ही बेपर्वा नसावे.
२१ पण हेव्यातही असा एक प्रकार आहे जो असुरक्षिततेस उद्युक्त करतो व त्यात कल्पना भर टाकतात. असला असमंजसपणा विवाहास, हेव्याच्या अतिशयोक्तित क्लेशकारक तुरुंग बनवितो की ज्यात विश्वास आणि प्रेम नांदू शकत नाहीत. म्हटले आहे: “प्रीती हेवा करीत नाही,” आणि जर हेवा केला तर “हाडे कुजतात.”—१ करिंथकर १३:४; नीतीसूत्रे १४:३०.
२२ जर हेव्यामुळे तुमच्या सोबत्यापाशी असुरक्षित वाटण्याचे कारण असले तर ते कारण तात्काळ दूर करा. जर तसे काही खरे कारण नसेल तर शब्दांद्वारे किंवा अधिक महत्त्वाचे म्हणजे कृतींद्वारे द्वेष्ट्या व्यक्तिचा आत्मविश्वास तुम्हामध्ये वाढविण्यास जे सर्व काही करता येईल ते हिरीरीने करा. हृदयाचा टप्पा गाठा!
२३. बाहेरील लोकांकडून विवाह समस्या सोडविण्यात मदत घेण्याचा कल कोणा एखाद्याठायी उद्भवला तर कोणत्या गोष्टी विचारात घेणे बरे ठरेल?
२३ विवाहितांमध्ये जे मतभेद उत्पन्न होतात ते सोडविण्यात बाहेरच्या लोकांचा उपयोग होऊ शकतो का? कदाचित होईल, पण विवाहातील दोन्ही सोबती कबूल झाल्याविना त्यांना बोलावू नये. प्रथम “तुझा व तुझ्या शेजाऱ्याचा वाद असला तर तो चालीव. पण इतराच्या गुप्त गोष्टी बाहेर फोडू नको.” (नीतीसूत्रे २५:९) कोणाही नातेवाईकांना मध्यस्ती करण्यास बोलाविण्यात जोखीम असते. ते निपक्षपाती असतील अशी खात्री देता येणार नाही. म्हणूनच अगदी सुज्ञतेत पवित्र शास्त्र म्हणते: “यास्तव पुरूष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील.” (उत्पत्ती २:२४) हेच तत्त्व स्त्रीलाही तिच्या पालकांबद्दल व पतीबद्दल लागू होते. पालकांना किंवा नातेवाईकांना मध्यस्ती करण्यास सांगण्याऐवजी जे कदाचित एका सोबत्याची दुसऱ्याच्या विरूद्धतेत बाजू घेतील, पती आणि पत्नीने एकमेकास जडून राहावे. समस्या उद्भवणारच हे ओळखून दोघांनी तोंड देण्यात सहभागी असावे. सहसोबत्याच्या संमतीविना बाहेरच्यांना मध्यस्ती करण्यास पाचारण करणे दोघांनाही इतरांच्या नजरेत पाडणारे असते. तेच तुम्ही जर उघडपणे, प्रामाणिकतेत आणि प्रेमाने एकमेकांशी बोलणी केली तर तुम्हाला स्वतःच्या अडचणी, सहज सोडवता येतील. इतर कोणा प्रौढ व्यक्तिचा कदाचित केवळ सल्ला देण्यास विचार घेतला जाऊ शकतो, पण अंतीम निर्णय घेणे हे तुम्हा दोघांवरच अवलंबून आहे.
२४, २५. विवाह समस्येचा निर्णय घेण्यात जर गर्वाने हस्तक्षेप केला तर ती व्यक्ती काय करण्याचा संभव असतो?
२४ “आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका,” असा प्रेषित पौलाने उपदेश केला. (रोमकर १२:३) पुढे तोच म्हणतो: “तुम्ही प्रत्येकजण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर मानण्यात पुढाकार घ्या.” (रोमकर १२:१०, NW) काहीवेळा जेव्हा आमच्या गर्वाला दुखावले जाते त्यावेळी आम्ही समजत होतो तेवढे, आम्ही मोठे नाहीत हे प्रतिक्षेपित करण्यात ते मदत करते. संबंध विश्वात सौर ग्रहमाला केवढी लहानशी आहे आणि तिच्यातील पृथ्वी ही त्यातच केवढी छोटीशी आहे तरी या पृथ्वीच्या तुलनेत आम्ही मोठे नाही हे नक्की! यहोवाच्या दृष्टीत “सर्व राष्ट्रे. . . काहीच नाहीत . . . अभाव व शून्यता याहूनही कमी आहेत.” (यशया ४०:१७) हे विचार सर्व गोष्टी ज्याच्या त्याच्या स्थानी राखलेल्या बऱ्या, तसेच अशा महत्त्वाच्या गोष्टीत मतभेद समाविष्ट करू नयेत हे समजण्यात मदत करतात.
२५ काही वेळा विनोदी विचार स्वतः फार गंभीर होण्यापासून दूर राहण्यात आमची मदत करतील. स्वतःकडे पाहून हसू शकणे, हे प्रौढतेचे चिन्ह आहे आणि त्यात जीवनातील अनेक खडबडीत डाग, घटना गुळगुळीत करण्याची क्षमता असते.
“आपले अन्न जलाशयावर सोड”
२६, २७. कोणाचा विवाह सोबती, मतभेदाना शांत विचारांनी मिटवून टाकण्याच्या प्रयत्नांना जर प्रतिसाद देत नाही तर पवित्र शास्त्रातील कोणती धर्मतत्त्वे लागू करावीत आणि का?
२६ समस्या शांत विचारांनी सोडविण्यात तुमच्या विवाह सोबत्याने प्रतिसाद दिला नाही तर काय? पवित्र शास्त्रातील उपदेश पाळा: “वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका.” अनुकरण करण्यास येशू आमचे उदाहरण आहे: “त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही.” ‘जशास तसे’ ही मनुष्यातील सर्व साधारण प्रथा आहे. पण तुम्ही जर हा मार्ग अनुसरला तर तुम्ही इतरांना तुम्हास सुधारण्याचा, तुम्ही काय आहात याची ओळख करून देण्याचा अवसर देता. प्रत्यक्षात ते जसे आहेत तसे तुम्हास वळवू इच्छितात. तसे घडू देणे म्हणजे तुमच्या स्वत्वाला जी भूमिका तुम्ही बाळगून आहात तिला, आणि जी तत्त्वे पाळता, त्यांना काट देण्यासारखे आहे. या उलट येशूचे अनुकरण करा, जो आपल्या स्वत्वात सत्यतेने टिकून राहिला, व सभोवतालच्या कमकुवतांचा त्याने स्वतःवर परिणाम होऊ दिला नाही: “आपण विश्वासू झालो तरी तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतः विरुद्ध वागता येत नाही.”—रोमकर १२:१७; १ पेत्र २:२३; २ तीमथ्य २:१३.
२७ तुम्हाठायी जर चांगले आणि वाईट यांचे परिचक्र थांबविण्याचे बळ असले तर तुम्ही कदाचित चांगल्याच्या चक्राला सुरुवात कराल. “मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते.” (नीतीसूत्रे १५:१) मृदु उत्तर कमकुवताकडून येत नसते तर सामर्थ्यातून बहरत असते, आणि तुमचा विवाहसोबती हे ओळखील. अनेक जरी ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देत असले तरी चांगुलतेने तुम्ही पुढे सरसावणे कदाचित वाईटाला तात्काळ चांगल्या चक्रात बदलील. काही शास्त्रवचने हे सूचित करतात. “जो इतरांना उदारतेने पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल.” “ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल.” “आपले अन्न जलाशयावर सोड; ते बहुत दिवसांनी तुझ्या हाती येईल.” (नीतीसूत्रे ११:२५, NW; लूक ६:३८; उपदेशक ११:१) तुमच्या विवाह सोबत्याकडून चांगुलतेचे पीक आणण्यात कदाचित तुमच्या चांगुलतेस बराच काळ झटावे लागेल. आज बी पेरून त्याची उद्या तुम्ही कापणी करत नाही. तथापि, “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये. कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.”—गलतीकर ६:७-९.
२८. पवित्र शास्त्रातील नीतीसूत्रे पुस्तकात, सौख्यानंदातील विवाहित जीवनात साहाय्यक ठरतील अशी कोणती धर्मतत्त्वे सापडतात व कशी?
२८ विवाहित जोडप्याने स्वतःस विचारावेत आणि चर्चा करावी अशी काही शास्त्रवचने व प्रश्न:
नीतीसूत्रे १४:२९: “ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धीवान होय, उतावळ्या स्वभावाचा माणूस मुर्खता प्रकट करतो.” यावर विचार करण्यास वेळ दिला तर तुम्हाला ही उमज होणार नाही का की क्रोधिष्ठ होण्याजोगे कोणतेच उचित कारण नसते?
नीतीसूत्रे १७:२७: “जो मित भाषण करितो त्याच्या अंगी शहाणपण असते. ज्याची वृत्ती शांत तो समंजस असतो.” तुम्ही तुमची वृत्ती शांत ठेवता का, व जे शब्द तुमच्या विवाह सोबत्याला चिडीस आणतील त्यांना टाळता का?
नीतीसूत्रे २५:११: “रूपेरी करंड्यात सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय.” काही शब्द कोणा प्रसंगी योग्य तर तेच दुसऱ्या प्रसंगी चुकीचे ठरतील. तर योग्य प्रसंगी समयोचित शब्द बोलण्यास तुम्ही तेवढे समजदार आहात का?
नीतीसूत्रे १२:१८: “कोणी असा असतो की तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो. परंतु सुज्ञांची जिव्हा सर्वकाळ टिकेल.” काहीही बोलण्याआधी माझ्या शब्दांचा माझ्या विवाह सोबत्यावर काय परिणाम होईल याचा कधी अंमळ थांबून विचार केला का?
नीतीसूत्रे १०:१९: “फार वाचळता असली म्हणजे पापाला तोटा नाही पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवितो तो शहाणा.” काही वेळा रागात असलो तर आम्ही नको ते बोलतो व त्याचा नंतर आम्हाला पस्तावा होतो. असे होऊ न देण्याबद्दल तुम्ही दक्ष असता का?
नीतीसूत्रे २०:३: “भांडणापासून दूर राहणे हे मनुष्याला भूषणावह आहे. पण प्रत्येक मूर्ख इसम कलह करीत राहतो.” वाद कलह करण्यास दोघांची गरज असते. मग तुम्ही तितकेसे प्रौढ आहात का की तो थांबवाल?
नीतीसूत्रे १०:१२: “द्वेष कलह उत्पन्न करतो. प्रीती सर्व अपराधावर झाकण घालते.” तुम्ही वारंवार जुनी भांडणे उकरून काढता, किंवा तुमच्या विवाह सोबत्यावर तुमचे एवढे प्रेम आहे की भांडणे कायमचे विसरला?
नीतीसूत्रे १४:९, “न्यू इंग्लिश बायबल” “मुर्खाला अपराध करणे म्हणजे थट्टा वाटते, परंतु समेटाचा अर्थ काय होतो याचे सरळास ज्ञान असते.” तुमच्या विवाहात सवलती न देण्यात व शांतीचा पाठलाग कधीच न करणारे एवढे गर्विष्ठ तुम्ही आहात का?
नीतीसूत्रे २६:२०: “सरपण नसल्यामुळे विस्तव विझतो.” तुम्ही वाद थांबवू शकता का किंवा माझेच ते खरे असे वाटते?
इफिसकर ४:२६: “तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये.” तुम्ही मतभेदांना सतत मनात घोळविता का आणि त्यामुळे स्वतःच्या तसेच तुमच्या विवाह सोबत्याच्याही दैन्यावस्थेत अधिक भर टाकता का?
२९. सौख्यानंदातील विवाहित जीवन टिकविण्याच्या प्रयत्नात असता कोणत्या मूलतत्त्वाकडे लक्ष द्यावे?
२९ सुज्ञ बोल जर अनुसरले तरच त्यांच्या करवी फायदा होतो. त्याचा प्रयोग करून पाहा. त्याचप्रमाणे तुमचा सोबती जे सुचवितो त्याचा प्रयोग करण्यास आपखुषीने तयार असा. त्यामुळे भागते का ते पाहा. जर काही चूक असेल तर दोष कोणास देणार? त्याला तितकेसे महत्त्व नाही. तर सर्व गोष्टी सुरळीत करणे याला अधिक महत्त्व आहे. लवचीक असा, मतभेद हवेत उडवा, बोला आणि स्वतः त्याबद्दलची गंभीर दखल घेणे टाळा. दळणवळण चालू ठेवा! जर तुम्ही तुमच्या सोबत्यावर स्वतःसारखे प्रेम करता तर विवाहाच्या नातेसंबंधात सुधारणा करणे आणि त्याला अधिक आनंदी बनविणे तितकेसे अवघड जाणार नाही—मत्तय १९:१९.
[अभ्यासाचे प्रश्न]