पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जिवंत राहा
पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जिवंत राहा
देवाचा आदर करणाऱ्यांना तो चिरकालिक जीवनाचे अभिवचन देऊन आहे. त्याचे वचन आम्हाला ही खात्री देतेः “नीतीमान पृथ्वीचे वतन पावतील; तिच्यामध्ये ते सर्वदा वास करतील.”—स्तोत्रसंहिता ३७:२९.
तथापि, “नीतीमान” बनायचे आहे तर तुम्हाला त्रैक्याच्या शिक्षणापेक्षा अधिक गोष्टींची माहिती असण्यास हवी. तुम्ही देवाविषयीच्या ज्ञानात प्रगति केली पाहिजे. यासाठी तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक तुम्हाला आवश्यक ती मदत देईल. या पुस्तकात, कोण देव आहे या महत्त्वपूर्ण प्रश्नाचेच उत्तर नाही, तर देवाने दुष्टाईस अनुज्ञा का देऊ केली, मरतेवेळी काय घडते, देवाचे राज्य या पृथ्वीला कसे नंदनवन करील आणि तेथे अनंतकाल जिवंत राहण्यासाठी तुम्हाला काय केले पाहिजे याविषयीची देखील माहिती ते देते.
मोठ्या आकारांची २५६ पृष्ठे असलेल्या या पुस्तकात १५० पेक्षा अधिक बोधप्रद चित्रे सुंदर रंगात आहेत. तुम्हाला प्रत्येकी रु. ३० याप्रमाणे या पुस्तकाच्या प्रती प्राप्त करता येतील. (पुस्तकाची अनुदान किंमत बदलण्याधीन आहे.) आपली मागणी वॉच टावर संस्थेला खाली दिलेल्या एका पत्त्यावर पाठवू शकता.