परिशिष्ट
डोक्यावर पदर केव्हा व का घेतला पाहिजे?
ख्रिस्ती बहिणीने तिच्या उपासनेच्या वेळी डोक्यावर पदर केव्हा व का घेतला पाहिजे? याविषयावर प्रेषित पौलाने ईश्वरप्रेरणेने काय लिहिले त्याची आपण चर्चा करूया. देवाचा आदर होईल असा उचित निर्णय घेण्याकरता तो आपल्याला मार्गदर्शन पुरवतो. (१ करिंथकर ११:३-१६) पौल तीन गोष्टी सांगतो ज्यांचा आपण विचार केला पाहिजे: (१) कोणती कार्ये करताना ख्रिस्ती स्त्रीने डोक्यावर पदर घेतला पाहिजे, (२) कोणत्या परिस्थितीत तिने डोक्यावर पदर घेतला पाहिजे व (३) या आज्ञेचे पालन करण्यामागचा तिचा हेतू काय असला पाहिजे
कार्ये. पौल दोन कार्यांचा उल्लेख करतो: प्रार्थना व भविष्यवाणी करताना. (वचने ४, ५) प्रार्थना म्हणजे देवाबरोबर बोलणे. आणि आज भविष्यवाणी करणे म्हणजे, कोणताही ख्रिस्ती सेवक देत असलेली बायबल आधारित शिकवण. पण मग पौलाला असे म्हणायचे होते का, की स्त्रीने प्रार्थना करतेवेळी किंवा बायबलमधील सत्य शिकवतेवेळी डोक्यावर पदर घेतला पाहिजे? नाही. कोणत्या परिस्थितीत तिला प्रार्थना करावी लागत आहे किंवा शिकवण द्यावी लागत आहे त्यावर हे अवलंबून आहे की तिने डोक्यावर पदर घेतला पाहिजे किंवा नाही.
परिस्थिती. पौलाने वापरलेल्या शब्दांवरून आपल्याला दोन प्रकारच्या परिस्थितीत स्त्रीने डोक्यावर पदर घेतला पाहिजे हे कळते—कुटुंबात व मंडळीत. पौल म्हणतो: “स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, . . . जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करिते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करिते.” (वचन ३, ५) कुटुंबात, स्त्रीच्या पतीला यहोवाने तिचा मस्तक ठरवले आहे. तिने तिच्या पतीच्या अधिकाराचा आदर केला नाही व यहोवाने त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी स्वतः हाताळण्याचा प्रयत्न केला तर ती त्याचा अपमान करते. उदाहरणार्थ, पती घरात असताना तिला जर एखादा बायबल अभ्यास घ्यावा लागत असेल तर डोक्यावर पदर घेऊन ती त्याच्या अधिकाराचा मान राखेल. तिचा पती कुटुंबाचा प्रमुख असल्यामुळे, त्याचा बाप्तिस्मा झालेला असो अथवा नसो, ती डोक्यावर पदर घेईल. * तिच्या बाप्तिस्मा घेतलेल्या अल्पवयीन मुलाच्या उपस्थितीत तिला प्रार्थना करावी लागणार असेल किंवा शिकवावे लागणार असेल तर तेव्हाही तिने डोक्यावर पदर घेतला पाहिजे. तो मुलगा कुटुंबाचा मस्तक आहे म्हणून नव्हे तर ख्रिस्ती मंडळीत बाप्तिस्मा घेतलेल्या पुरुष सदस्यांवर सोपवलेल्या अधिकाराप्रती आदर दर्शवण्यासाठी ती असे करते.
वचन १६) ख्रिस्ती मंडळीत, बाप्तिस्मा घेतलेल्या पुरुष सदस्यांना मस्तकपद देण्यात आले आहे. (१ तीमथ्य २:११-१४; इब्री लोकांस १३:१७) फक्त पुरुषांनाच वडील व सेवा सेवक म्हणून नियुक्त केले जाते व देवाच्या कळपाची निगराणी करण्याची जबाबदारी सोपवली जाते. (प्रेषितांची कृत्ये २०:२८) परंतु काही वेळा, एखाद्या ख्रिस्ती भगिनीला बाप्तिस्मा घेतलेल्या योग्यताप्राप्त पुरुषाने सहसा पूर्ण केले पाहिजे असे काम करण्यास सांगितले जाईल. जसे की, बाप्तिस्मा घेतलेला योग्यताप्राप्त पुरुष उपस्थित नसल्यामुळे एखाद्या भगिनीला क्षेत्र सेवेची सभा चालवण्यास सांगितले जाईल. किंवा, बाप्तिस्मा घेतलेल्या पुरुषाच्या उपस्थितीत तिला आधीच व्यवस्था केलेला एखादा बायबल अभ्यास चालवावा लागेल. * ही कार्ये खरेतर ख्रिस्ती मंडळीच्या कार्यांचाच एक भाग असल्यामुळे, पुरुष सदस्याला सहसा नेमली जाणारी कार्ये ती करत आहे हे मान्य करण्यासाठी ती डोक्यावर पदर घेईल.
मंडळीविषयी बोलताना पौल असे म्हणतो: “कोणी वितंडवादी दिसला तर आपल्यात अशी रीत नाही आणि देवाच्या मंडळ्यातहि नाही.” (पण तेच, उपासनेतील इतर अनेक बाबतीत, एखाद्या भगिनीला डोक्यावर पदर घेण्याची गरज नाही. जसे की, ख्रिस्ती सभांमध्ये उत्तरे देताना, आपल्या पतीबरोबर किंवा इतर कोणत्याही बाप्तिस्मा घेतलेल्या पुरुष सदस्याबरोबर घरोघरच्या सेवा कार्यात भाग घेताना किंवा बाप्तिस्मा न घेतलेल्या तिच्या मुलांचा बायबल अभ्यास घेताना अथवा त्यांच्यासोबत प्रार्थना करताना तिने डोक्यावर पदर घेण्याची गरज नाही. याबाबतीत कदाचित इतर प्रश्न उभे राहतील, आणि एखाद्या बहिणीला याबाबतीत स्पष्ट माहिती नसेल तर * संशोधन केल्यानंतरही जर तिच्या मनात शंका असतील व तिचा विवेक तिला डोक्यावर पदर किंवा ओढणी घेण्यास प्रवृत्त करत असेल तर आदल्या पानावर दाखवलेल्या चित्रानुसार त्यात गैर असे काही नाही.
तिने संस्थेच्या प्रकाशनांमध्ये संशोधन करावे.हेतू. ख्रिस्ती स्त्रीने डोक्यावर पदर घेण्याच्या या आज्ञेचे पालन का केले पाहिजे त्याची दोन कारणे १० व्या वचनात दिली आहेत: “देवदूतांकरिता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकारांचे चिन्ह मस्तकावर धारण करावे हे योग्य आहे.” सर्वात आधी, “अधिकारांचे चिन्ह” या वाक्यांशाचा विचार करा. डोक्यावर पदर घेऊन एक स्त्री हे दाखवते, की मंडळीतल्या पुरुष सदस्यांवर यहोवाने सोपवलेली जबाबदारी तिला मान्य आहे. अशा प्रकारे ती यहोवा देवाबद्दलचे तिचे प्रेम व एकनिष्ठा दाखवते. दुसरे कारण, “देवदूतांकरिता” या शब्दांत आहे. स्त्रीने डोक्यावर पदर घेतल्याने शक्तिशाली आत्मिक प्राण्यांवर याचा काय परिणाम होतो?
स्वर्गात आणि पृथ्वीवर यहोवाच्या संघटनेत, यहोवाच्या अधिकाराचा आदर केला जातो हे पाहून देवदूतांना आनंद होतो. याबाबतीत अपरिपूर्ण मानव गिरवत असलेल्या कित्त्याचा त्यांनाही फायदा होतो. कारण त्यांनाही यहोवाच्या व्यवस्थेच्या अधीन राहावे लागते. पण गत काळात बरेच देवदूत असे करण्यास उणे पडले होते. (यहुदा ६) कदाचित देवदूत पाहतील, की एक ख्रिस्ती स्त्री, मंडळीतल्या एखाद्या बाप्तिस्मा घेतलेल्या पुरुषापेक्षा अधिक अनुभवी, अधिक ज्ञानी व अधिक हुशार असूनही त्याच्या अधिकाराचा ती आदर करते. आणि काही बाबतीत तर, एखादी स्त्री अभिषिक्त असते व ती नंतर ख्रिस्ताच्या सहवारिसांपैकी एक होणार असते. तेव्हा ती नंतर ख्रिस्ताबरोबर स्वर्गात, देवदूतांपेक्षाही उच्च पदावर सेवा व राज्य करेल. आज देवदूतांसाठी हे किती उत्तम उदाहरण आहे! सर्व बहिणींना कोट्यवधी विश्वासू देवदूतांसमोर एकनिष्ठ व आज्ञाधारक वर्तनाद्वारे नम्रपणे अधिनता दाखवण्याचा किती मोठा सुहक्क मिळाला आहे!
^ परि. 2 एक ख्रिस्ती पत्नी, सत्यात असलेल्या तिच्या पतीच्या उपस्थितीत सहसा मोठ्याने प्रार्थना करणार नाही. पण, समजा एखाद्या आजारपणामुळे तिच्या पतीला बोलता येत नसेल तर अशा परिस्थितीत ती मोठ्याने प्रार्थना करू शकते.
^ परि. 1 बाप्तिस्मा न घेतलेल्या पुरुषाच्या उपस्थितीत आधीच व्यवस्था केलेला एखादा बायबल अभ्यास बहिणीला चालवावा लागत असेल तर तेव्हा तिने डोक्यावर पदर किंवा ओढणी घेण्याची गरज नाही.
^ परि. 2 अधिक माहितीकरता कृपया टेहळणी बुरूज जुलै १५, २००२, पृष्ठे २६-२७ आणि टेहळणी बुरूज (इंग्रजी), फेब्रुवारी १५, १९७७, पृष्ठे १२५-१२८ पाहा.