प्रश्न १
देव कोण आहे?
“ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस, असे त्यांनी जाणावे.”
स्तोत्र ८३:१८, पं.र.भा.
“यहोवा हाच देव आहे असे तुम्ही जाणा; त्यानेच आम्हास निर्माण केले, आणि आम्ही त्याचे आहो.”
स्तोत्र १००:३, पं.र.भा.
“मी यहोवा आहे; हे माझे नाव आहे; आणि दुसऱ्याला मी आपले गौरव देणार नाही, व कोरीव मूर्तीला आपली प्रशंसा देणार नाही.”
यशया ४२:८, पं.र.भा.
“जो कोणी यहोवाच्या नावाला हाक मारेल तो सोडवला जाईल.”
योएल २:३२, पं.र.भा.
“प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्वकाही बांधणारा देवच आहे.”
“आपले डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांना बाहेर आणतो; तो त्या सर्वांना नावांनी हाक मारतो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यांपैकी कोणी उणा पडत नाही.”