प्रश्न ५
बायबलमध्ये नेमके काय सांगण्यात आले आहे?
“तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडेल, व तू तिची टाच फोडशील.”
“तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील.”
“तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”
“शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवेल.”
“त्याच्या अंकित सर्वकाही झाले असे जेव्हा होईल तेव्हा, ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल; अशा हेतूने की, देव सर्वांना सर्वकाही व्हावा.”
“अब्राहामाला व त्याच्या संतानाला [जो ख्रिस्त आहे त्याला] ती अभिवचने सांगितली होती. . . . आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहामाचे संतान . . . आहात.”
“जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; आणि तो युगानुयुग राज्य करेल.”
“तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले.”
“त्याने दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो अजगर ह्याला धरले, आणि एक हजार वर्षांपर्यंत त्याला बांधून ठेवले.”