व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परिशिष्ट

येशू ख्रिस्त​—भाकीत केलेला मशीहा

येशू ख्रिस्त​—भाकीत केलेला मशीहा

मशीहाला ओळखण्यास आपल्याला मदत करण्याकरता, यहोवा देवाने अनेक बायबल संदेष्ट्यांना या भाकीत केलेल्या तारणकर्त्याच्या जन्माविषयी, सेवेविषयी आणि मृत्यूविषयी सविस्तर माहिती देण्यास पवित्र आत्म्याने प्रेरित केले. बायबलमधील या सर्व भविष्यवाण्या येशू ख्रिस्तात पूर्ण झाल्या. आश्चर्य वाटावे इतक्या त्या अचूक व सविस्तर होत्या. जसे की, मशीहाचा जन्म आणि त्याचे बालपण यांजशी संबंधित भाकीत घटनांविषयीच्या काही भविष्यवाणींचा आपण विचार करू या.

यशया संदेष्याने भाकीत केले होते, की मशीहा, राजा दावीदाच्या वंशातून येईल. (यशया ९:७) येशू खरोखरच दावीदाच्या वंशातून आला.​—मत्तय १:​१, ६-१७.

देवाचा आणखी एक संदेष्टा मीखा याने असे भाकीत केले, की या बालकाचा जन्म “बेथलेहेम एफ्राथा” येथे होईल व पुढे हे मूल एक शासक बनेल. (मीखा ५:२) येशूच्या जन्माच्या वेळी, इस्राएलात बेथलेहेम नावाची दोन शहरे होती. एक शहर इस्राएलच्या उत्तरेकडील भागात नासरेथजवळ होते तर दुसरे शहर यहुदात जेरुसलेमजवळ होते. जेरुसलेमजवळील बेथलेहेमास पूर्वी एफ्राथा म्हटले जात. भविष्यवाणीत म्हटले त्याप्रमाणे अगदी याच शहरात, येशूचा जन्म झाला.​—मत्तय २:१.

देवाच्या पुत्राला “मिसरातून बोलाविले” जाईल, असेही एका बायबल भविष्यवाणीत म्हटले होते. बाळ असताना येशूला मिसरात अर्थात ईजिप्तमध्ये नेण्यात आले होते. पण हेरोदाच्या मृत्यूनंतर त्याला मिसरातून बाहेर आणण्यात आले. अशाप्रकारे ही भविष्यवाणी पूर्ण झाली.​—होशेय ११:१; मत्तय २:१५.

 पृष्ठ २०० वरील तक्त्यात, “भविष्यवाणी” या मथळ्याखालील शास्त्रवचनांमध्ये मशीहाविषयीची सविस्तर माहिती दिली आहे. कृपया यांची तुलना, “पूर्णता” या मथळ्याखालील शास्त्रवचनांशी करून पाहा. असे केल्याने देवाच्या वचनाच्या सत्यतेवरील तुमचा विश्वास आणखी पक्का होईल.

या शास्त्रवचनांचे परीक्षण करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. ती म्हणजे, भविष्यसूचक शास्त्रवचने, येशूच्या जन्माच्या शेकडो वर्षांआधी लिहिण्यात आली होती. येशूने म्हटले: “मोशेचे नियमशास्त्र, संदेषटे व स्तोत्रे ह्यांत माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे अवश्य आहे.” (लूक २४:४४) तुमच्या बायबलमधून उघडून पाहा​—प्रत्येक भविष्यवाणीची बित्तंबातमी पूर्ण झाली!