भाग ९ ची प्रस्तावना
या भागात आपण काही लहान मुलांबद्दल, संदेष्ट्यांबद्दल, आणि राजांबद्दल शिकणार आहोत. त्यांनी यहोवावर उल्लेखनीय विश्वास दाखवला. अराम देशात राहणाऱ्या एका लहान इस्राएली मुलीला विश्वास होता, की यहोवाचा संदेष्टा नामानला बरं करू शकतो. अलीशा संदेष्ट्याला यहोवावर पूर्ण भरवसा होता, की तो त्याला शत्रू राष्ट्राच्या सैन्यापासून वाचवेल. महायाजक यहोयादाने आपल्या जिवाची पर्वा न करता, लहान यहोआशला त्याची दुष्ट आजी अथल्या हिच्यापासून वाचवलं. अश्शूरी सैन्याने हिज्कीया राजाला धमकी दिली तेव्हा तो घाबरला नाही. कारण यहोवा यरुशलेमला अश्शूरी सैन्यापासून वाचवेल असा त्याचा भरवसा होता. योशीया राजाने देशात चाललेली मूर्तिपूजा बंद केली. तसंच, यहोवाच्या मंदिराची दुरुस्ती करून खरी उपासना करण्यासाठी लोकांचं मार्गदर्शन केलं.
या विभागात
पाठ ५१
योद्धा आणि एक लहान मुलगी
एक लहान इस्राएली मुलगी आपल्या मालकिणीला यहोवाच्या चमत्कारिक शक्तीबद्दल सांगते.
पाठ ५२
यहोवाची आगीची सेना
‘त्यांच्या सैनिकांपेक्षा आपल्याकडे जास्त सैनिक आहेत,’ हे अलीशाच्या सेवकाला कसं दिसतं?
पाठ ५४
यहोवा योनाशी सहनशीलतेने वागला
देवाच्या एका संदेष्ट्याला मासा का गिळतो? त्याचा जीव कसा वाचतो? यहोवाने त्याला कोणती गोष्ट शिकायला मदत केली?
पाठ ५५
यहोवाच्या देवदूताने हिज्कीयाचं रक्षण केलं
यहूदाच्या शत्रूंना वाटलं होतं की यहोवा त्याच्या लोकांना वाचवू शकत नाही. पण हा त्यांचा गैरसमज होता.
पाठ ५६
योशीयाचं देवाच्या नियमांवर प्रेम होतं
योशीया आठ वर्षांचा असताना तो यहूदाचा राजा झाला. त्याने लोकांना यहोवाची उपासना करायला मदत केली.