व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला निवड करण्याचा हक्क आहे

तुम्हाला निवड करण्याचा हक्क आहे

तुम्हाला निवड करण्याचा हक्क आहे

उपाय योजनांकडे पाहण्याचा सध्याचा वैद्यकीय दृष्टीकोण, (त्याला जोखीम/फायदे परिक्षणाचा अभ्यास असे म्हणतात) रक्‍ताच्या उपचाराला टाळण्यात डॉक्टर व रोग्यांचे सहकार्य व्हावयास सुलभता आणीत आहे. एखाद्या विशिष्ट औषधाचे वा शस्त्रक्रियेचे धोके व संभाव्य फायदे अशा मुद्यांचा डॉक्टर मनःपूर्वक विचार करतात. अशा विचारविनिमयात रुग्णही सहभागी होऊ शकतात.

अनेक ठिकाणच्या लोकांना सहज समजेल असे उदाहरण घेऊ या—गळ्यातील गाठींचा दीर्घकालीन दाह (क्रॉनिक टॉन्सिलायटिस्‌). तुम्हाला याचा त्रास झाल्यास बहुधा तुम्ही डॉक्टरांकडे जाल. खरे तर, तुम्ही दोन डॉक्टरांचा सल्ला घेणे पसंद कराल, कारण अनेकदा स्वास्थ्य तज्ञ दुसरे मत घेण्याची शिफारस करतात. पहिले डॉक्टर तुम्हाला शस्त्रक्रियेची शिफारस करतील. ते त्याची रूपरेखाही देतील, म्हणजे हॉस्पिटलमध्ये राहण्याचा अवधी, वेदनांची तीव्रता व खर्च याविषयी माहिती देतील. धोक्याविषयी ते म्हणतील की, सामान्यतः जास्त रक्‍तस्त्राव होत नाही व अशा शस्त्रक्रियेने मृत्यु तर अगदीच विरळ आहेत. परंतु दुसरे मत देणारे डॉक्टर तुम्हाला अँटीबायोटीक उपाययोजना करून पाहण्यास उत्तेजन देतील. ते औषधाचा प्रकार, यशाची शक्यता व खर्चाबद्दल सविस्तर सांगतील. धोक्याविषयी ते म्हणतील की, त्या औषधाने जीवघेणी प्रतिक्रिया फारच थोड्यांना होते.

प्रत्येक कार्यक्षम डॉक्टरने जोखीम व फायद्यांचा विचार बहुधा केला असेल. पण आता जोखीम व संभाव्य फायदे तसेच इतरांपेक्षा तुम्हाला माहीत असलेल्या बाबींचा सखोल विचार तुम्हाला करायचा आहे. (तुमचे भावनात्मक व आत्मिक बळ, कुटुंबाची आर्थिक स्थिती, कुटुंबावरील परिणाम व तुमची स्वतःची नैतिक तत्त्वे अशा बाबींचा विचार तुम्हीच सर्वोत्तम करु शकता.) मग, तुम्ही आपल्या पसंतीची निवड करू शकता. तुम्ही एका उपाय योजनेला सर्व बाजू जाणून होकार देणे, व दुसरीला नकार देणे शक्य आहे.

गळ्यातील गाठींचा दीर्घकालीन दाह तुमच्या मुलाला झाला असल्यासही हेच होईल. प्रत्यक्ष परिणाम सोसणारे व परिणामांशी तोंड देण्यास जबाबदार धरल्या जाणाऱ्‍या तुम्हाला, प्रेमळ पालक या नात्याने जोखीम, फायदे व उपाय योजनांची रुपरेषा दिली जाईल. सर्व बाजूंचा विचार केल्यावर आपल्या आपत्त्याच्या स्वास्थ्याशी व तिच्या वा त्याच्या जीवनाशीही सबंध असलेल्या गोष्टीत तुम्ही स्वतःच्या मान्यतेचा निर्णय घेऊ शकता. त्यातील धोक्यासह त्या शस्त्रक्रियेला तुम्ही कदाचित मान्यता द्याल. इतर पालक त्यातील धोक्यासह अँटीबायोटीक्स उपाययोजनेस पसंती देणे शक्य आहे. डॉक्टर जसे वेगवेगळे सल्ले देतात तसे रोगी वा पालकांना उत्तम वाटणाऱ्‍या गोष्टीत फरक असतो. धोके/फायदे याविषयी मान्यता कळविणे हा एक गृहीत धरलेला महत्त्वाचा भाग आहे.

पण रक्‍ताच्या वापराविषयी काय म्हणता येईल? वस्तुनिष्ठपणे, सर्व मुद्यांचे परिक्षण करणारा कोणीही, संक्रमणामध्ये मोठे धोके असल्याचे नाकारणार नाही. मॅसेच्युसेटस्‌च्या मोठ्या जनरल हॉस्पिटलमध्ये संक्रमण सेवेचे निर्देशक असलेल्या डॉ. चार्लस्‌ हगिन्स यांनी ही गोष्ट चांगल्या प्रकाराने स्पष्ट केलेली आहे. ते म्हणालेः “रक्‍त कधीही इतके सुरक्षित नव्हते. परंतु ते अटळपणे असुरक्षितच मानले पाहिजे. वैद्यकांमध्ये आपण वापरत असलेल्या वस्तुंमध्ये ते सर्वात जास्त धोकादायक आहे.”—द बोस्टन ग्लोब मॅगजीन, फेब्रुवारी ४, १९९०.

या सबळ कारणास्तव वैद्यकीय कर्मचाऱ्‍यांना सल्ला देण्यात आला आहे कीः “रक्‍ताच्या संक्रमणाच्या बाबतीत जोखीम/फायदे संबंधातील धोक्याचा पुनर्विचार करण्याची व पर्याय शोधण्याची गरज आहे.” (तिरप्या अक्षर वळणाचा प्रकार आमचा.)—पेरिऑपरेटिव्ह रेड सेल्‌ ट्रान्सफ्युजन्‌, नॅशनल इन्स्टिट्युट्‌स्‌ ऑफ हेल्थ कॉन्फरन्स, जून २७-२९, १९८८.

रक्‍त वापरण्याच्या फायद्यांविषयी वा धोक्यांविषयी डॉक्टरांमध्ये मतभेद असू शकतात. कोणी डॉक्टर अनेक संक्रमणे देईल व त्यातील जोखीम पत्करण्याच्या लायकीची ती होती अशी त्यांची खात्री असेल. पण तेच दुसऱ्‍या डॉक्टरांना या जोखीमा असमर्थनीय वाटू शकतील, कारण रक्‍तविरहीत योजनेने त्यांना चांगले परिणाम मिळालेले असतील. सरतेशेवटी, तुम्ही रोगी असाल, वा पालक, निर्णय, तुम्ही करायचा आहे. तुम्ही, का बरे? कारण तुमचे (वा तुमच्या आपत्त्याचे) शरीर, जीवन, नैतिक मूल्ये व सर्वात महत्त्वाचे देवाशी असलेले संबंध त्यामध्ये गोवलेले आहेत.

तुमच्या हक्काला मान्यता मिळते

आज अनेक ठिकाणी रूग्णाला, त्याने कोणती उपाय योजना स्वीकारावी हे ठरविण्याचा, अतिक्रमण न करता येण्यासारखा हक्क आहे. “मान्यता कळविण्याचा कायदा हा दोन पूर्वपक्षांवर आधारीत आहेः पहिला असा की, सुचवलेल्या उपाय योजनेबद्दल आपल्याला मान्य असणारा निर्णय करण्यास पुरेशी माहिती मिळण्याचा हक्क रूग्णाला आहे; व दुसरा असा की, डॉक्टरांचा सल्ला स्वीकारणे वा नाकारण्याची निवड रूग्ण करू शकतो . . . तसेच होय आणि सशर्त होय म्हणण्याचा हक्कही रूग्णाचा आहे अशी दृष्टी न ठेवल्यास मान्यता कळविण्याचा बराचसा तर्काधिष्ठित पायाच नाहीसा होतो.”—इन्फॉर्मड्‌ कंसेंट—लीगल थिअरी ॲण्ड क्लिनिकल प्रॅक्टीस, १९८७. a

आपला हक्क बजावण्याचा प्रयत्न केल्यावर काही रूग्णांना विरोधाला तोंड द्यावे लागले. गळ्यातील गाठी काढून टाकण्याविषयी वा अँटीबायोटीक्स विषयी प्रखर मते असलेल्या मित्राकडून तो कदाचित झाला असेल; किंवा एखाद्या डॉक्टरांना, त्यांच्या सल्ल्याच्या योग्यपणाबद्दल पक्की खात्री असेल त्यामुळे देखील हा विरोध झाला असेल. तसेच कायदेविषयक वा आर्थिक हितसंबंधावर आधारित, इस्पितळाच्या एखाद्या अधिकाऱ्‍याने मतभेद व्यक्‍त केला असेल.

“अनेक अस्थिरोग शास्त्रज्ञ [साक्षीदार] रूग्णांवर शस्त्रक्रिया न करण्याची निवड करतात. कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय उपाय योजनेला नकार देण्याचा हक्क रूग्णाला असल्याचा आमचा विश्‍वास आहे. संक्रमणासारखा उपाय वगळून सुरक्षितपणे शस्त्रक्रिया करणे तांत्रिक दृष्ट्या शक्य असल्यास, तशी निवड अस्तित्वात असली पाहिजे,” असे डॉ. कार्ल एल. नेल्सन म्हणतात.—द जर्नल ऑफ बोन ॲण्ड जॉइन्ट सर्जरी, मार्च १९८६.

दुसऱ्‍यांच्या भावनांची कदर करणारा रूग्ण, एखाद्या उपाय योजनेमध्ये कुशल नसलेल्या डॉक्टरवर ती योजण्यासाठी दबाव आणणार नाही. परंतु डॉ. नेल्सननी नमूद केल्याप्रमाणे सेवेला वाहून घेतलेले अनेक डॉक्टर रूग्णांच्या श्रद्धेशी जुळवून घेतात. एका जर्मन अधिकाऱ्‍याने हा सल्ला दिलाः “यहोवाच्या साक्षीदारांच्या बाबतीत सर्व वैद्यकीय पर्याय आपल्या हाती नाहीत असा विचार करून . . . डॉक्टर मदत देण्याचे नाकारू शकत नाही. त्याला मोकळे असलेले मार्ग कमी झाले असले तरीही मदत करण्याचे त्याचे कर्तव्य आहेच.” (डेर फ्रॉइनआर्टझ्‌, मे-जून १९८३) तसेच इस्पितळे ही काही पैसे कमविण्यासाठी अस्तित्वात नसून भेदभाव न करता लोकांची सेवा करण्यास आहेत. कॅथोलिक धर्मशास्त्रज्ञ रीचर्ड जे. डेव्हाईन म्हणतातः “रूग्णाचे जीवन व स्वास्थ्य जपण्यासाठी हॉस्पिटलने सर्व वैद्यकीय इलाज केले पाहिजेत. त्याच बरोबर त्या वैद्यकीय सेवेद्वारे (त्याच्या) सद्‌विवेकाचा अनादर होणार नाही याची खात्री केली पाहिजे. या व्यतिरिक्‍त खुशामतीपासून ते जबरदस्तीने रक्‍त-संक्रमण करण्यासाठी न्यायालयाचा आदेश मिळविण्यापर्यंत, सर्व प्रकारचा जुलूम त्याने टाळला पाहिजे.”—हेल्थ प्रोग्रेस, जून १९८९.

न्यायालयाऐवजी इतर मार्ग

न्यायालय हे वैद्यकीय प्रश्‍न सोडवण्याची जागा नव्हे, याला अनेक लोक सहमत होतील. तुम्ही अँटीबायोटीक्स औषधाविषयीच्या उपचाराची निवड केली, परंतु तुमच्या गळ्यातील ग्रंथी काढण्याची शस्त्रक्रिया करण्याची जबरदस्ती करण्यासाठी कोणी न्यायालयाकडे गेल्यास तुम्हाला ते कसे वाटेल? कोणा डॉक्टरांना जी सेवा उत्तम वाटते ती देण्याची इच्छा असेल, परंतु तुमच्या मूलभूत हक्कांना तुडवण्यासाठी कायदेशीर समर्थन प्राप्त करण्याचे त्याचे कर्तव्य नाही. आणि पवित्र शास्त्र रक्‍तापासून अलिप्त राहाणे या गोष्टीला व्यभिचार टाळण्याच्या नैतिक पातळीवरच मानत असल्याने, एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीवर रक्‍ताची जबरी करणे हे जबरी समागमासारखे किंवा बलात्कारासारखेच होईल.—प्रे. कृत्ये १५:२८, २९.

तरीही इन्फॉर्मड्‌ कंसेंट फॉर ब्लड ट्रान्सफ्युजन्‌ (१९८९) मध्ये म्हटले आहे, आपल्या धार्मिक हक्कांमुळे एखादी जोखीम पत्करण्याची एखाद्या रूग्णाची तयारी असल्यास, काही न्यायालये इतकी दुःखी होतात की, ‘संक्रमण होण्यासाठी ते कायद्याला अपवाद काढतात—तुम्ही याला कल्पित कथा म्हणू शकता.” गरोदरपणाची बाब समाविष्ट आहे किंवा मुलांचा चरितार्थ व्हायला हवा अशी सबब सांगून आपल्या म्हणण्याचे ते समर्थन करतील. ते पुस्तक म्हणतेः “या कायद्यासंबंधाने कल्पित कथा आहेत. पण सक्षम प्रौढांना उपाय नाकारण्याचा अधिकार आहे.”

रक्‍ताचे संक्रमण करण्याचा आग्रह धरणारी काही मंडळी, साक्षीदार लोक सर्व उपचार पद्धती नाकारीत नाहीत ही वस्तुस्थिती जाणीत नाहीत. जी धोक्यांनी भरलेली आहे असे तज्ञही सांगतात ती फक्‍त एक उपचार पद्धत आहे, जी ते नाकारतात. सर्वसाधारणपणे, एखाद्या वैद्यकीय समस्येवर वेगवेगळ्या मार्गांनी उपाय करणे शक्य असते. एकात ही जोखीम असते तर दुसऱ्‍यात दुसरी जोखीम असते. कोणती जोखीम पत्करणे हे “तुमच्या हिताचे” आहे हे पिता या नात्याने एखाद्या न्यायालयाला वा डॉक्टरला कळणे शक्य आहे का? ते तुम्हीच ठरवले पाहिजे. त्यांच्याकरता इतर कोणीही निर्णय घेऊ नये यावर यहोवाचे साक्षीदार ठाम आहेत. देवासमक्ष ती त्यांची जबाबदारी आहे.

एखाद्या न्यायालयाने एखादी तिरस्करणीय उपचार पद्धती तुमच्यावर लादल्यास त्याचा तुमच्या सद्‌सद्‌विवेक बुद्धी व जगण्याच्या इच्छेवर काय परिणाम होईल? डॉ. कोनरॅड डेबिंजर यांनी लिहिलेः “रूग्णाच्या सद्‌सद्‌विवेक बुद्धीला डावलणारी, शारीरिक रित्या त्यावर उपचार करण्यासाठी योजलेली परंतु त्याच्या मनाला घातक टोला मारणारी विशिष्ट उपचार पद्धती स्वीकारण्यास रोग्यावर जबरदस्ती करायला लावील तो नक्कीच वैद्यकीय महत्त्वाकांक्षेचा विकृत प्रकार असेल.”—डेर प्रॅक्टीश आर्झट, जुलै १९७८.

मुलांकडे प्रेमळ लक्ष देणे

रक्‍ताबद्दलच्या न्यायालयीन दाव्यात प्रामुख्याने मुले गोवलेली असतात. प्रसंगी, रक्‍तविरहीत उपाय योजावे म्हणून प्रेमळ पालकांनी सादर विनंती केलेली असताना, रक्‍त देण्यासाठी काही वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी कोर्टाचे पाठबळ मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, मुलांशी वाईट वागणूक वा त्यांची हेळसांड यांना प्रतिबंध करणारे कायदे वा न्यायालयीन कृतीशी ख्रिस्ती लोक सहमत असतात. कोणा पालकाने मुलाला क्रुरतेने वागवलेले किंवा त्याला सर्व वैद्यकीय मदतीची मनाई केलेली उदाहरणे कदाचित तुम्ही वाचली असतील. किती दुःखद घटना! हेळसांड केलेल्या मुलाला संरक्षण देण्यासाठी शासनाला मध्ये पडता येते व पडले पाहिजे हे स्पष्ट आहे. तरीही, काळजी करणाऱ्‍या पालकाने उच्च दर्जाच्या रक्‍तविरहीत वैद्यकीय उपचार पद्धतीसाठी केलेल्या विनंतीपेक्षा ते किती वेगळे आहे हे पाहणे सोपे आहे.

साधारणपणे हे न्यायालयीन दावे इस्पितळातील मुलांवर केंद्रित असतात. मूल तेथे गेले कसे व का? बहुधा, नेहमी उत्तम प्रतीची सेवा मिळण्यासाठी चिंतित पालकांनी मुलाला तेथे आणलेले असते. येशूला जसा मुलांमध्ये रस होता तसे ख्रिस्ती पालक आपल्या मुलांची काळजी घेतात. पवित्र शास्त्र, “आपल्या मुलांचे लालनपालन करणाऱ्‍या दाई”चा उल्लेख करते. यहोवाच्या साक्षीदारांना आपल्या मुलांबद्दल असे अगाध प्रेम असते.—१ थेस्सलनीकाकर २:७; मत्तय ७:११; १९:१३-१५.

स्वाभाविकपणे, सर्व पालक त्यांच्या मुलांच्या सुरक्षा व जीवनावर परिणाम करणारे निर्णय घेतातः घर उबदार ठेवण्यासाठी ते कुटुंब गॅस वापरील की तेल? ते मुलाला मोटारीने दूरच्या प्रवासाला नेतील का? त्याने पोहायला जावे का? अशा बाबतीत जोखीमा असतात—अगदी जीवन-मरणाच्याही. पण, योग्य-अयोग्य ठरवण्याचा पालकाचा अधिकार समाज मानतो, म्हणून त्यांच्या मुलांवर प्रभाव टाकणारे बहुतेक सर्व निर्णय घेण्यात पालकांना सिंहाचा वाटा देण्यात आलेला आहे.

१९७९ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे मांडलेः “परिपक्वता, अनुभव, जीवनाचे बिकट निर्णय घेण्यासाठी लागणाऱ्‍या सूज्ञतेची क्षमता या, मुलात नसलेल्या गोष्टी पालकापाशी आहेत या गृहितांवर कुटुंबाविषयी कायद्याची कल्पना आधारलेली आहे. . . . निव्वळ (एखाद्या वैद्यकीय इलाजाबाबतीत) पालकाच्या निर्णयात जोखीमा आहेत या कारणास्तव निर्णय घेण्याचा अधिकार आपोआप पालकांकडून कोठल्याशा प्रतिनिधीकडे अथवा शासनाच्या अधिकाऱ्‍याकडे येत नाही.”—पॅरहॅम विरूद्ध जे.आर.

त्याच वर्षी न्यूयॉर्कच्या कोर्ट ऑफ अपील्सने निकाल दिलाः “मुलाला पुरेशा वैद्यकीय सेवेपासून वंचित केलेले आहे किंवा नाही हे ठरवण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा, . . . आसपासची सर्व परिस्थिती लक्षात घेता आपल्या मुलाला पालकांनी एखादी स्वीकारार्ह वैद्यकीय उपचार दिला आहे किंवा नाही, हा होय. पालकांनी घेतलेला निर्णय ‘योग्य’ की ‘अयोग्य’ अशा स्वरुपात ही चौकशी करता येणार नाही, कारण वैद्यकशास्त्राची मोठी प्रगती झालेली असली तरी त्याच्या सध्याच्या व्यवहारात क्वचितच असे ठाम निर्णय घेता येतात. तसेच न्यायालयही पर्यायी पालकाची भूमिका घेऊ शकत नाही.”—इन री होफबर.

शस्त्रक्रिया व अँटीबायोटीक्स उपचार पद्धती यांच्यामध्ये निवड करणाऱ्‍या पालकांचे उदाहरण आठवा. प्रत्येक उपचार पद्धतीत विशिष्ट जोखीमा आहेत. जोखीम, फायदे व इतर मुद्यांचा नीट विचार करून त्यानंतर निवड करण्याची जबाबदारी प्रेमळ पालकांची आहे. या संबंधात डॉ. जॉन सॅम्युएल्स यांनी, मुलांवर परिणाम करणाऱ्‍या गाईडस्‌ टू द जज इन मेडिकल ऑर्डर्स अफेक्टींग चिल्ड्रन (वैद्यकीय आदेशांविषयी न्यायाधिशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे) या पुस्तकाचे समालोचन करण्याची सूचना केली. (अनेस्थेसिऑलॉजी न्यूज्‌, ऑक्टोबर १९८९) त्याने घेतलेली भूमिका अशी होतीः

“आपला रूग्ण जगेल की दगावेल हे एखाद्या डॉक्टरने पुरेशा खात्रीने सांगण्याइतकी वैद्यकशास्त्राची प्रगती झालेली नाही. . . . जर कार्यपद्धतीमध्ये निवड करायची असेल—उदाहरणार्थ, डॉक्टरांनी ८० टक्के यशस्वी होणारी कार्यपद्धत सुचविली, पण ती पालकांना पसंत नसेल व फक्‍त ४० टक्के यशाची संभावना असलेल्या कार्यपद्धतीला पालकांचा आक्षेप नसेल—तर डॉक्टरांनी वैद्यकीय दृष्ट्या अधिक धोक्याचा परंतु पालकांच्या दृष्टीने आक्षेपार्ह नसलेला मार्ग घ्यावा.”

रक्‍ताच्या वैद्यकीय वापरामधील दृष्टोत्पत्तीस आलेले अनेक प्राणघातक धोके लक्षात घेता, तसेच उपाय योजनेचे अनेक परिणामकारक पर्यायी मार्ग असल्याने, रक्‍त संक्रमण टाळण्यातच कमी जोखीम असण्याची शक्यता नाही का?

स्वाभाविकपणे, मुलाला शस्त्रक्रियेची गरज असल्यास ख्रिस्ती लोक अनेक मुद्यांचा नीट विचार करतात. प्रत्येक शस्त्रक्रियेमध्ये—ती रक्‍तासह असो किंवा रक्‍ताविना—जोखीमा असतात. यामध्ये कोणता सर्जन खात्रीशीर हमी देऊ शकतो? साक्षीदारांच्या मुलांवर रक्‍ताविना शस्त्रक्रिया करून कुशल डॉक्टरांना सुयश मिळाल्याचे त्या पालकांना माहीत असेल. या कारणास्तव, डॉक्टर वा हॉस्पिटलच्या अधिकाऱ्‍यांची पसंती वेगळी असली तरी दबावपूर्ण व वेळ घेणाऱ्‍या न्यायालयीन झगड्याला कारणीभूत होण्यापेक्षा, त्यांनी प्रेमळ पालकांचे सहकार्य करावे हे समंजसपणाचे नव्हे काय? किंवा जेथील अधिकारी वर्ग असे रूग्ण हाताळण्यात अनुभवी आहेत व तयार आहेत अशा हॉस्पिटलमध्ये पालक आपल्या मुलाला नेऊ शकतील. आपण आधी पाहिल्याप्रमाणे “कायदेशीर वैद्यकीय व अवैद्यकीय ध्येये साध्य करण्यास” रक्‍ताविना असणाऱ्‍या कार्यपद्धती कुटुंबाची मदत करीत असल्याकारणाने त्या दर्जेदार सेवा असण्याची अधिक शक्यता आहे.

[तळटीपा]

a पृष्ठ ३०-१ वरील पुरवणीमध्ये पुनर्मुद्रित वैद्यकीय लेखः “रक्‍तः कोणाची निवड व कोणाचा सद्‌सद्‌विवेक” पहा.

[१८ पानांवरील चौकट/चित्रं]

कायद्याच्या जबाबदारीतून मुक्‍त करणे

‘काही डॉक्टर व रुग्णालये रक्‍त देण्यासाठी न्यायालयाचा हुकूम आणण्यात इतके तत्पर का असतात?’ असा प्रश्‍न तुम्हाला पडणे साहजिक आहे. काही कमी अधिक झाल्यास जबाबदार धरले जाण्याची भीती हे यामागील सर्वसाधारण कारण आहे.

यहोवाचे साक्षीदार रक्‍तविरहीत उपाय योजना करवून घेण्याची निवड करतात तेव्हा अशा काळजीचे कारण नाही. अमेरिकेमधील आल्बर्ट आईन्स्टाईन कॉलेज ऑफ मेडिसिनचे एक डॉक्टर लिहितातः “डॉक्टर व इस्पितळांना जबाबदारीतून मुक्‍त करणारा अमेरिकन मेडिकल असोशिएशनच्या फॉर्मवर बहुतेक [साक्षीदार] तत्परतेने स्वाक्षरी करतात. ते मेडिकल अलर्ट (कार्ड) आपणापाशी बाळगतात. योग्यरित्या स्वाक्षरी केलेला, तारीख घातलेला तसेच ‘रिफ्युझल टू अक्सेप्ट ब्लड प्रॉडक्ट’ फॉर्म हा संमतीवजा करार असून कायद्याच्या दृष्टीने बंधनकारक आहे.”—अनेस्थेसीऑलॉजी न्यूज, ऑक्टोबर १९८९.

होय, विनंतीपूर्वक मागणी केलेली रक्‍तविरहीत उपचारपद्धती देण्यात डॉक्टर व इस्पितळांवर जबाबदारी पडणार नसल्याबद्दल, यहोवाचे साक्षीदार सहकार्याच्या भावनेने कायदेशीर आश्‍वासन देतात. वैद्यकीय तज्ञांनी सुचविल्यानुसार, प्रत्येक साक्षीदार एक वैद्यकीय दस्ताऐवजाचे कार्ड बाळगतो. त्याचे दरवर्षी नूतनीकरण होते व त्यावर त्या व्यक्‍तीची तसेच साक्षीदारांची, जे बहुधा त्याचे जवळचे नातेवाईक असतात, त्यांची सही असते.

अशा या दस्तऐवजावर पसंतीदर्शक भाष्य करणाऱ्‍या निकालाला, मार्च १९९० मध्ये कॅनडातील ऑन्टारिओच्या सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरलेः “डॉक्टरांसोबतच्या करारावर लेखी बंधन घालण्यासाठी कार्ड धारकाला घेता येणाऱ्‍या रास्त भूमिकेचे हे कार्ड हे लेखी निवेदन आहे.” प्राध्यापक डॅनिएल अँडरसन यांनी मेडिसिंस्क एटिक (१९८५) मध्ये लिहिलेः “आपण यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक असून आपल्याला कोणत्याही परिस्थितीत रक्‍त नको असल्याचे ठाम विधान रूग्णाने केले असल्यास, रूग्णाच्या स्वायत्ततेचा आदर करण्यासाठी या इच्छेचा असा आदर केला पाहिजे, जणू ती तोंडानेच व्यक्‍त केली गेली आहे.”

साक्षीदार, इस्पितळाला मान्यता कळविण्याचा फॉर्मही भरतील. फ्रीबर्ग, जर्मनीमधील एका इस्पितळामध्ये वापरल्या जाणाऱ्‍या एका फॉर्ममध्ये उपचाराबद्दल रूग्णाला दिलेल्या माहितीचे वर्णन डॉक्टरांना देता येईल अशी जागा असते. मग, डॉक्टर व रूग्णाच्या सह्‍यांच्या आधी त्या फॉर्ममध्ये म्हटले आहेः “यहोवाच्या साक्षीदारांच्या धार्मिक गटाचा सभासद या नात्याने, माझ्या शस्त्रक्रियेच्या दरम्यान परकीय रक्‍त वा रक्‍त-घटक वापरण्यास माझा साफ नकार आहे. रक्‍तस्रावाच्या समस्येमुळे योजलेल्या व जरुरीच्या या कार्यपद्धतीत अधिक धोका असल्याची मला जाणीव आहे. विशेषतः त्याबद्दल संपूर्ण स्पष्टीकरण मिळाल्यावर, मी विनंती करतो की, परकीय रक्‍त वा रक्‍त-घटक न वापरता ही गरजेची शस्त्रक्रिया करण्यात यावी.”—हर्झ क्रईसलाउफ, ऑगस्ट १९८७.

वस्तुतः रक्‍तविरहीत उपाय योजनेत कमी धोका असण्याचा संभव आहे. पण येथे मुद्दा असा की, जे करण्यास वैद्यकीय अधिकारी वचनबद्ध आहेत तेच म्हणजे बरे होण्यास लोकांना मदत करण्यात, पुढची पावले टाकणे शक्य व्हावे या कारणासाठी कोणत्याही अनावश्‍यक काळजीतून, साक्षीदार त्यांना आनंदाने मुक्‍त करतात. डॉ. ॲन्जेलॉस ए. कॅम्बोरिस यांनी “यहोवाच्या साक्षीदारांवरील पोटाच्या मोठ्या शस्त्रक्रिया” या लेखात दाखवल्याप्रमाणे असे दिसते की, या सहकार्याने सर्वांना फायदा होतोः

“शस्त्रक्रियेपूर्वीचा करार सर्जनने बंधनकारक मानावा व शस्त्रक्रियेच्या दरम्यान वा नंतर कोणतीही परिस्थिती उत्पन्‍न झाली तरी करारानुरुपच वागावे. [त्यामुळे] आपल्या शल्यशास्त्रीय उपायांबद्दल रूग्णाची सकारात्मक तयारी होते व सर्जनचे ध्यान कायदेविषयक व तत्त्वज्ञानाच्या मुद्यांऐवजी शल्यशास्त्रीय व तांत्रिक मुद्यांकडे वळते व अशारितीने त्याला रूग्णाचे हित जपता येते व उत्कृष्टपणे काम करता येते.”—द अमेरिकन सर्जन, जून १९८७.

[१९ पानांवरील चौकट]

“वैद्यकीय तंत्राचा फाजील वापर हा सध्याच्या स्वास्थ्य सेवेच्या वाढलेल्या खर्चातील मोठा भाग होय. . . . यात रक्‍त संक्रमणाचा वाटा, त्यावरील खर्च व त्यात संभावित असणारे धोके यामुळे मोठ्या स्वरुपाचा आहे. याच्याच अनुषंगाने, अमेरिकन जॉइन्ट कमिशन ऑन अक्रेडिटेशन ऑफ हॉस्पिटल्स्‌ने रक्‍त संक्रमणाला ‘मोठे प्रमाण, मोठा धोका व चूक होण्याचा अधिक संभव’ या गटात जमेस धरले.”—“ट्रान्सफ्युशन,” जुलै-ऑगस्ट १९८९.

[२० पानांवरील चौकट]

अमेरिकाः व्यक्‍तीची स्वायत्तता, संबंधित व्यक्‍तीने स्वतःच्या भवितव्याबद्दल निर्णय घ्यावेत ही नैतिक कल्पना, रूग्णाच्या मान्यता कळविण्याच्या गरजेच्या मुळाशी आहे. रूग्णाच्या मान्यतेविना केलेली वैद्यकीय कृती ही मारझोडीचा गुन्हा ठरते. हीच गोष्ट मान्यता मिळविण्याचा कायदेशीर आधार ठरते.”—“इन्फॉर्मड्‌ कन्सेन्ट फॉर ब्लड ट्रान्सफ्युशन,” १९८९.

जर्मनीः “मदत करणे व जीवन जपणे या तत्त्वापेक्षा रूग्णाच्या आत्म-निर्णयाचा हक्क अधिक महत्त्वाचा आहे. परिणामी, रूग्णाच्या इच्छेविरूद्ध रक्‍त संक्रमण नाही.”—हर्झ क्रेईसलाउफ,” ऑगस्ट १९८७.

जपानः “वैद्यकीय विश्‍वात ‘अनिबंध’ असे काही नाही. आधुनिक वैद्यकशास्त्र सर्वोत्तम आहे असा डॉक्टरांचा विश्‍वास आहे व तो ते मार्ग अनुसरतात. परंतु, ‘अनिबंध’ म्हणून प्रत्येक तपशीलाची जबरदस्ती त्यांनी रूग्णावर करू नये. रूग्णालाही निवडीचे स्वातंत्र्य असलेच पाहिजे.”—“मिनामी निहॉन शिंबुन,” जून २८, १९८५.

[२१ पानांवरील चौकट]

डॉ. लॉरेन्स एस फ्रॅन्केल म्हणतातः “[यहोवाच्या साक्षीदारांच्या] कुटुंबात जवळीक व प्रेम मला आढळून आले. मुले सुशिक्षित, प्रेमळ व आदर करणारी आहेत. . . . वैद्यकीय दृष्ट्या केल्याच पाहिजे अशा गोष्टींना अनुसरण्याची बहुधा तीव्रता दिसून येते. अनुसरण्याची ही तीव्रता, त्यांच्या श्रद्धांच्या अनुषंगाने शक्य असेल तेवढा वैद्यकीय हस्तक्षेप स्वीकारण्याचा प्रयत्न ते करतात.”—डिपार्टमेंट ऑफ पेडिआट्रिक्स्‌, एम. डी. ॲन्डरसन हॉस्पिटल ॲण्ड ट्यूमर इन्स्टिट्युट, हस्टन, यु.. एस. ए., १९८५.

[२२ पानांवरील चौकट]

“योग्य वैद्यकीय निर्णयाची जागा व्यावसायिक अट्टाहासाने घेणे विरळ नव्हे याची मला भीती वाटते,” असे डॉ. जेम्स एल. फ्लेचर, ज्युनिअर, म्हणतात. “‘आज सर्वोत्तम’ समजले जाणारे उपाय उद्या बदलले जातात वा टाकाऊ झाल्याचे समजले जातात. मग, ‘एक धार्मिक पालक’ आणि आपली उपाय योजना अत्यंत महत्त्वाची आहे असे समजणारा हट्टी डॉक्टर यापैकी अधिक धोकादायक कोण?”—“पेडिॲट्रिक्स्‌,” ऑक्टोबर १९८८.