रक्ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते?
रक्ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते?
दरदिवशी लोकांना अवयवांचे आरोपण, गर्भपात, “मरण्याचा हक्क” यासारख्या आरोग्याच्या नैतिक विषयाला तोंड द्यावे लागते. अशा समस्या तुम्हावर पुढे येऊ नयेत असेच आम्हाला वाटते.
तरीही एक विषय असा आहे जो तुमचे लक्ष आकर्षित करण्याची इच्छा करतो. तो आहे, रक्ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते?
‘रक्त संक्रमणे केवढी सुरक्षित आहेत’ असे कोणीही उचितपणे विचारु शकतो. पण हा, वैद्यकीय विषयापुढे जाणारा विषय आहे. त्याने यहोवाच्या साक्षीदारांना बातम्यांमध्ये आणले आहे. तुम्हाला कधी याचे आश्चर्य वाटले का की, हे, उत्तम औषधोपचारावर विश्वास ठेवणारे नैतिक लोक रक्ताचा स्वीकार करण्यास का नकार देतात?
तुम्हाला हे दिसेलच की, रक्ताचा वैद्यकीय व नैतिक दृष्ट्या वापर, तुम्हाला तुम्हापाशी असणारा तुमचा सर्वात अमोल ठेवा कसा वाचविता येईल, यावर थेटपणे परिणाम करून आहे. तो ठेवा आहेः जीवन.