व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख१

बायबलचा संदेश

यहोवा देवाला राज्य करायचा अधिकार आहे. त्याची राज्य करायची पद्धत सगळ्यात चांगली आहे. पृथ्वी आणि माणसांसाठी असलेला त्याचा संकल्प पूर्ण होईल.

इ.स.पू. ४०२६ नंतर

यहोवाच्या राज्य करायच्या अधिकारावर आणि पद्धतीवर ‘सापाने’ प्रश्‍न उपस्थित केला. यहोवाने एक ‘संतती’ किंवा “बीज” उत्पन्‍न करायचं अभिवचन दिलं. ही संतती शेवटी सापाला म्हणजे सैतानाला चिरडेल. (उत्पत्ती ३:१-५, १५, तळटीप) पण यहोवाने लोकांना सापाच्या प्रभावाखाली स्वतःवर राज्य करायला वेळ दिला आहे.

इ.स.पू. १९४३

यहोवा अब्राहामला सांगतो, की अभिवचन दिलेली ‘संतती’ त्याच्या वंशजांपैकी एक असेल.—उत्पत्ती २२:१८.

इ.स.पू. १०७० नंतर

यहोवा दावीद राजाला आणि मग त्याच्या मुलाला, म्हणजे शलमोनला खातरी देतो, की अभिवचन दिलेली ‘संतती’ त्यांच्या वंशातून येईल.—२ शमुवेल ७:१२, १६; १ राजे ९:३-५; यशया ९:६, ७.

इ.स. २९

दावीदच्या राजासनाचा वारस असलेला येशू हा अभिवचन दिलेली ‘संतती’ आहे, हे यहोवा स्पष्ट करतो.—गलतीकर ३:१६; लूक १:३१-३३; ३:२१, २२.

इ.स. ३३

लोकांना येशूला ठार मारायला लावून सैतान थोड्या काळासाठी ‘संततीला’ इजा पोहोचवतो. पण यहोवा येशूला स्वर्गातल्या जीवनासाठी पुन्हा उठवतो आणि त्याच्या परिपूर्ण जीवनाचं मूल्य स्वीकारतो. त्यामुळे आदामच्या वंशजांना पापांची क्षमा आणि सर्वकाळाचं जीवन मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.—उत्पत्ती ३:१५; प्रेषितांची कार्यं २:३२-३६; १ करिंथकर १५:२१, २२.

इ.स. १९१४ च्या आसपास

येशू सापाला म्हणजे सैतानाला पृथ्वीवर फेकून देतो. आणि त्याच्यावर काही काळ तिथेच राहायचं बंधन घालतो.—प्रकटीकरण १२:७-९, १२.

भविष्यात

येशू सैतानाला १,००० वर्षांसाठी कैद करेल आणि मग त्याचा नाश करेल, म्हणजे लाक्षणिक अर्थाने त्याचं डोकं ठेचेल. पृथ्वीसाठी आणि माणसांसाठी असलेला यहोवाचा सुरुवातीचा संकल्प पूर्ण होईल. त्याच्या नावावर लावलेला कलंक पुसला जाईल आणि राज्य करायची त्याची पद्धत योग्य आहे हे सिद्ध होईल.—प्रकटीकरण २०:१-३, १०; २१:३, ४.