मीखा २:१-१३

  • दुसऱ्‍यांवर अत्याचार करणाऱ्‍यांचा धिक्कार (१-११)

  • इस्राएलला एकतेत आणलं जातं (१२, १३)

    • देशात लोकांचा गोंगाट (१२)

 “जे दुसऱ्‍यांचं नुकसान करण्याचे कट रचतात,जे बिछान्यावर पडल्या-पडल्या दुष्ट योजना करतात, त्यांचा धिक्कार असो! पहाट होताच ते त्या योजना पूर्ण करतात,कारण त्यांच्या हातात तसं करण्याची ताकद असते.+  २  ते शेतांची हाव धरतात आणि ती बळकावतात;+घरांचा लोभ धरतात आणि ती ताब्यात घेतात;ते एखाद्याची फसवणूक करून त्याचं घर,+आणि त्याचा वारसा हिरावून घेतात.  ३  म्हणून यहोवा म्हणतो: ‘आता मी या घराण्याविरुद्ध एक असं संकट आणीन,+ ज्यातून तुम्ही वाचू शकणार नाही.*+ तुम्ही पुन्हा कधी गर्विष्ठपणे चालणार नाही,+ कारण ती संकटाची वेळ असेल.+  ४  त्या दिवशी लोक तुमच्याबद्दल एक म्हण वापरतील,आणि ते तुमच्यासाठी मोठ्याने शोक करतील.+ ते म्हणतील: “आम्ही पूर्णपणे उद्ध्‌वस्त झालो आहोत!+ त्याने आमच्या लोकांचा हिस्सा आमच्याकडून काढून परक्यांना दिला आहे.+ त्याने आमची शेतं विदेश्‍यांना दिली आहेत.”  ५  त्यामुळे यहोवाच्या मंडळीत जमीन वाटून देण्यासाठी,मोजायची दोरी ताणून धरायला तुमच्यामध्ये कोणी नसेल.  ६  ते घोषणा करतात, “प्रचार थांबवा! या गोष्टींबद्दल प्रचार करू नका;आमचा अपमान होणार नाही!”  ७  हे याकोबच्या घराण्या, तू म्हणतोस: “यहोवा* उतावीळ झाला आहे का? हे सगळं त्यानेच केलंय का?” माझ्या शब्दांमुळेच नीतीने चालणाऱ्‍यांचं भलं होत नाही का?  ८  पण अलीकडे माझेच लोक शत्रूंसारखे उठले आहेत;जे युद्धावरून परत येणाऱ्‍यांसारखे न घाबरता चालतात,त्यांचे मौल्यवान दागिने तुम्ही उघडपणे हिसकावून घेता.  ९  माझ्या लोकांच्या स्त्रियांना तुम्ही त्यांच्या सुंदर घरांमधून बाहेर काढता;त्यांच्या मुलांपासून तुम्ही माझं वैभव कायमचं हिरावून घेता. १०  उठा आणि चालते व्हा, हे आराम करायचं ठिकाण नाही. कारण अशुद्धतेमुळे+ देशाचा नाश, खूप दुःखदायक नाश होणार आहे.+ ११  जर एखादा माणूस व्यर्थ गोष्टींमागे चालून आणि फसवणूक करून, असं खोटं बोलला: “मी तुम्हाला द्राक्षारसाबद्दल आणि मद्याबद्दल प्रचार करीन,” तर असाच प्रचारक या लोकांना आवडेल!+ १२  हे याकोब, मी नक्कीच तुझ्या सर्व लोकांना गोळा करीन;मी इस्राएलच्या उरलेल्यांना नक्कीच जमा करीन.+ मेंढवाड्यातल्या मेंढरांप्रमाणे, मी त्यांना एकतेत ठेवीन,ते कुरणातल्या* कळपासारखे असतील;+तिथे लोकांचा गोंगाट असेल.’+ १३  राजा त्यांच्यापुढे जाऊन भिंतीला खिंडार* पाडेल,ते खिंडार मोठं करतील आणि फाटकातून बाहेर पडतील.+ त्यांचा राजा त्यांच्यापुढे चालेल,यहोवा त्या सर्वांचं नेतृत्व करेल.”+

तळटीपा

शब्दशः “तुम्ही तुमच्या माना काढणार नाही.”
किंवा “यहोवाची पवित्र शक्‍ती.”
किंवा “गुरं चारण्याच्या जमिनीवरच्या.”
किंवा “भगदाड.”