यशया ३१:१-९
३१ मदतीसाठी खाली इजिप्तकडे जाणाऱ्यांचा धिक्कार असो!+
ते घोड्यांवर विसंबून राहतात;+युद्धाचे रथ असंख्य आणि घोडेस्वार* पराक्रमी आहेत,म्हणून ते त्यांच्यावर भरवसा ठेवतात.
पण इस्राएलच्या पवित्र देवाकडे मात्र ते पाहत नाहीत,आणि ते यहोवाला शोधत नाहीत.
२ पण तोही बुद्धिमान आहे,तो त्यांच्यावर संकट आणेल.
तो आपले शब्द मागे घेणार नाही.
तो दुष्टांच्या घराण्यावर उठेल,आणि दुष्टांना मदत करणाऱ्यांच्या विरोधात उभा राहील.+
३ इजिप्तचे लोक तर फक्त मानव आहेत, ते काही देव नाहीत;त्यांचे घोडे हाडामांसाचे आहेत, ते काही अदृश्य शक्ती नाहीत.+
यहोवा जेव्हा आपला हात उगारेल,तेव्हा मदत करणारा प्रत्येक जण अडखळेल,आणि मदत घेणाराही खाली पडेल;त्या सगळ्यांचा एकाच वेळी नाश होईल.
४ कारण यहोवाने मला असं सांगितलं आहे:
“जसा तरुण सिंह आपल्या शिकारीसाठी गुरगुरतो,आणि त्याला पळवून लावण्यासाठी मेंढपाळांच्या टोळीला जरी बोलावण्यात आलं,तरी त्यांच्या आवाजाला तो घाबरत नाही,त्यांचा आरडाओरडा ऐकून तो मागे हटत नाही,तसा सैन्यांचा देव यहोवा सियोन डोंगरासाठी आणि तिच्या टेकडीसाठी युद्ध करायला खाली येईल.
५ झडप घालणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे, सैन्यांचा देव यहोवा लगेच येऊन यरुशलेमचं रक्षण करेल.+
तो तिचं संरक्षण करेल आणि तिला वाचवेल.
तो तिच्यावर दया करेल आणि तिची सुटका करेल.”
६ “हे इस्राएलच्या लोकांनो! तुम्ही ज्या देवाविरुद्ध निर्लज्जपणे बंड केलंय, त्याच्याकडे परत या.+
७ त्या दिवशी, प्रत्येक जण आपल्या पापी हातांनी बनवलेली सोन्या-चांदीची व्यर्थ आणि निरर्थक दैवतं टाकून देईल.
८ अश्शूरी लोक तलवारीने मारले जातील, पण माणसाच्या तलवारीने नाही;ते तलवारीला बळी पडतील, पण मनुष्याच्या तलवारीला नाही.+
तलवारीच्या भीतीने ते पळ काढतील,आणि त्यांच्या तरुणांकडून सक्तीची मजुरी करून घेतली जाईल.
९ त्यांचा खडक घाबरून नाहीसा होईल,आणि झेंडा पाहून त्यांच्या अधिकाऱ्यांचा थरकाप उडेल.”
ज्याची आग* सियोनमध्ये आणि भट्टी यरुशलेममध्ये आहे,तो यहोवा असं म्हणाला आहे.