यशया ४७:१-१५

  • बाबेलचा नाश (१-१५)

    • ज्योतिष्यांचा परदाफाश (१३-१५)

४७  हे बाबेलच्या कुमारी,खाली ये आणि धुळीत बस!+ हे खास्द्यांच्या मुली,राजासनावरून उठून खाली जमिनीवर बस!+ कारण पुन्हा कधीच लोक तुला नाजूक आणि लाडावलेली म्हणणार नाहीत.  २  जातं घे आणि धान्य दळ. आपल्या चेहऱ्‍यावरची ओढणी काढून टाक. आपला झगा वर घेऊन कमरेला खोच, आणि पाय उघडे कर. नद्या ओलांडून जा.  ३  तुझी नग्नता उघडी होईल,तुझी लाज सगळ्यांना दिसून येईल. मी सूड उगवीन,+ आणि कोणताही माणूस मला अडवू शकणार नाही.*  ४  “आम्हाला सोडवणारा,इस्राएलचा पवित्र देव आहे. त्याचं नाव सैन्यांचा देव यहोवा असं आहे.”+  ५  हे खास्द्यांच्या मुली! तिथेच गुपचूप बसून राहा आणि काळोखात जा.+ यापुढे लोक तुला ‘राज्यांची राणी’ म्हणणार नाहीत.+  ६  माझा राग माझ्या लोकांवर भडकला.+ मी माझ्या लोकांना अपवित्र होऊ दिलं,+आणि त्यांना तुझ्या हाती दिलं.+ पण तू त्यांच्यावर दया केली नाहीस.+ उलट, तू म्हाताऱ्‍या लोकांवरही जड ओझं लादलंस.+  ७  तू म्हणालीस: “मी कायम राणी राहीन.”+ तू या गोष्टींकडे लक्ष दिलं नाहीस;तुझ्या कामांचा काय परिणाम होईल याचा तू विचार केला नाहीस.  ८  हे चैनबाजी करणारी स्त्री,+ मी काय म्हणतो ते ऐक. हे निश्‍चिंत बसलेली स्त्री, तू आपल्या मनात असा विचार करतेस: “मीच सगळ्यात महान; माझ्यासारखं दुसरं कोणीच नाही.+ मी कधीच विधवा होणार नाही,माझी मुलं मी कधीच गमावणार नाही.”+  ९  पण या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी, अचानकपणे तुझ्या बाबतीत घडतील:+ तू तुझी मुलं गमावशील आणि विधवा होशील. या गोष्टींचा तुला जबरदस्त तडाखा बसेल.+ कारण तू* भूतविद्येची अनेक कामं केलीस आणि शक्‍तिशाली मंत्र फुंकलेस.+ १०  तू तुझ्या दुष्ट कामांवर भरवसा ठेवलास. तू म्हणालीस: “मला कोणीही बघत नाही.” तुझ्या बुद्धीने आणि ज्ञानाने तुला बहकवलंय. तू मनात म्हणतेस: “मीच सगळ्यात महान; माझ्यासारखं दुसरं कोणीच नाही.” ११  पण तुझ्यावर संकट येईल,आणि तुझे कुठलेही मंत्र ते थांबवू शकणार नाहीत.* तुझ्यावर विपत्ती कोसळेल; आणि तुला ती टाळता येणार नाही. तू कधी कल्पनाही केली नसेल, असा नाश तुझ्यावर अचानक येईल.+ १२  तर आता, तू तरुणपणापासून मोठ्या मेहनतीने जी भूतविद्येची कामं आणि मंत्रतंत्र करत आलीस,+ ती खुशाल कर. कदाचित त्यांपासून तुला काहीतरी फायदा होईल;आणि लोकांच्या मनात तू कदाचित दहशत निर्माण करू शकशील. १३  तू तुझ्या असंख्य सल्लागारांचा सल्ला घेऊन थकून गेली आहेस. आता त्यांनी उठावं आणि तुला वाचवावं,ते आकाशांची पूजा करतात,* ताऱ्‍यांचा अभ्यास करतात,+आणि तुझ्या बाबतीत काय घडेल याविषयीचं ज्ञान ते तुला नवचंद्राच्या दिवशी देतात. १४  पण बघ! ते भुशासारखे आहेत. ते आगीत भस्म होतील. ते स्वतःला आगीच्या ज्वालांपासून वाचवू शकणार नाहीत. या ज्वाला ऊब घेण्यासाठी असलेल्या निखाऱ्‍यांसारख्या नाहीत,किंवा जवळ बसता येईल अशा शेकोटीच्या आगीसारख्याही नाहीत. १५  ज्या मंत्रतंत्र करणाऱ्‍यांसोबत मिळून तू तरुणपणापासून बरीच मेहनत केलीस,त्या तुझ्या लोकांची अशीच अवस्था होईल;ते भटकत राहतील आणि त्यांची वेगवेगळ्या दिशांना पांगापांग होईल.* तुला वाचवण्यासाठी कोणीही नसेल.+

तळटीपा

किंवा कदाचित, “आणि मी कोणावर दयामाया करणार नाही.”
किंवा कदाचित, “तू जरी.”
किंवा “मंत्रतंत्राने ते कसं दूर करावं हे तुला कळणार नाही.”
किंवा कदाचित, “आकाशाचे भाग करतात; ज्योतिषी.”
शब्दशः “आणि आपापल्या प्रदेशात जातील.”