यशया ५५:१-१३

  • पाणी आणि अन्‍न मोफत घ्या (१-५)

  • यहोवाचा आणि त्याच्या भरवशालायक वचनाचा शोध करा (६-१३)

    • देवाचे मार्ग माणसांच्या मार्गांपेक्षा उंच (८, ९)

    • यहोवाचं वचन पूर्ण झाल्याशिवाय परत येणार नाही (१०, ११)

५५  तहानलेल्या सर्व लोकांनो,+ या आणि पाणी प्या!+ पैसे नसलेले तुम्ही सर्व जण या आणि अन्‍न घ्या! या आणि पैसे न देता द्राक्षारस व दूध+ मोफत घ्या.+  २  जे अन्‍न नाही त्यासाठी तुम्ही पैसे का खर्च करता? आणि ज्यापासून काही समाधान मिळत नाही, त्यावर आपली कमाई का खर्च करता? माझं लक्षपूर्वक ऐका आणि चांगलं ते खा,+म्हणजे चमचमीत अन्‍न खाऊन तुम्हाला आनंद मिळेल.+  ३  माझ्याकडे या आणि माझ्या बोलण्याकडे कान द्या.+ ऐका, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल. मी तुमच्यासोबत सर्वकाळासाठी करार करीन;+मी दावीदला एकनिष्ठ प्रेमाचं जे अभिवचन दिलं, त्यानुसार मी तुमच्यासोबत करार करीन. ते अभिवचन भरवशालायक* आहे.+  ४  पाहा! मी त्याला राष्ट्रांसाठी साक्षीदार बनवलं आहे.+ मी त्याला राष्ट्रांचं नेतृत्व करणारा+ आणि शासक+ म्हणून नेमलं आहे.  ५  बघ! ज्या राष्ट्राला तू ओळखत नाहीस, त्या राष्ट्राला तू बोलावशील. आणि ज्या राष्ट्रातले लोक तुला ओळखत नाहीत, ते तुझ्याकडे धाव घेतील. इस्राएलचा पवित्र देव, तुझा देव यहोवा+ याच्यामुळे असं होईल. कारण तो तुला वैभवशाली करेल.+  ६  जोपर्यंत यहोवाला शोधण्याचा काळ आहे, तोपर्यंत त्याला शोधा.+ तो जवळ आहे तोपर्यंत त्याला हाक मारा.+  ७  दुष्ट माणसाने आपला दुष्ट मार्ग सोडून द्यावा,+आणि वाईट माणसाने आपले वाईट विचार सोडून द्यावेत;त्याने यहोवाकडे परत यावं, म्हणजे तो त्याच्यावर दया करेल,+त्याने आमच्या देवाकडे परत यावं, कारण तो मोठ्या मनाने क्षमा करेल.+  ८  यहोवा म्हणतो: “माझे विचार तुमच्या विचारांसारखे नाहीत,+आणि माझे मार्ग तुमच्या मार्गांसारखे नाहीत.  ९  कारण आकाश जसं पृथ्वीपेक्षा उंच आहे,तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांपेक्षा,आणि माझे विचार तुमच्या विचारांपेक्षा उंच आहेत.+ १०  पाहा! जसा पाऊस आणि बर्फ आकाशातून खाली पडतो,आणि पृथ्वीला भिजवल्याशिवाय, तिच्यातून पीक उत्पन्‍न करून ते वाढवल्याशिवाय;तसंच, पेरणाऱ्‍याला बी आणि खाणाऱ्‍याला भाकर दिल्याशिवाय परत वर जात नाही, ११  तसं माझ्या तोंडून निघालेलं वचन होईल.+ ते माझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय,+आणि ज्या कामासाठी मी ते पाठवलंय,ते पूर्ण केल्याशिवाय माझ्याकडे परत येणार नाही.+ १२  तुम्ही आनंदाने बाहेर निघाल,+आणि तुम्हाला शांतीने परत आणलं जाईल.+ तुमच्यासमोर डोंगर आणि टेकड्या आनंदाने जयघोष करतील,+आणि रानातली झाडं हर्षाने टाळ्या वाजवतील.+ १३  काटेरी झुडपाच्या जागी गंधसरूचं झाड उगवेल,+आणि खाजकुइलीच्या झाडाच्या जागी मेंदीचं झाड उगवेल. यामुळे यहोवाच्या नावाचा गौरव होईल,*+आणि कधीही नष्ट होणार नाही असं सर्वकाळाचं ते चिन्ह होईल.”

तळटीपा

किंवा “विश्‍वसनीय.”
किंवा “यामुळे यहोवाचं नाव होईल.”