यहोशवा १२:१-२४

  • यार्देनच्या पूर्वेकडे हरवण्यात आलेले राजे (१-६)

  • यार्देनच्या पश्‍चिमेकडे हरवण्यात आलेले राजे (७-२४)

१२  इस्राएली लोकांनी यार्देन नदीच्या पूर्वेकडे असलेला देश, म्हणजे आर्णोन खोऱ्‍यापासून*+ वर हर्मोन डोंगरापर्यंतचा+ आणि पूर्वेकडचा सगळा अराबा+ प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. त्यांनी त्या देशातल्या ज्या राजांना हरवलं त्यांपैकी एक राजा म्हणजे, २  हेशबोनमध्ये राहणारा अमोरी लोकांचा राजा सीहोन.+ तो आर्णोन खोऱ्‍याच्या सीमेवर असलेल्या अरोएर+ शहरातून राज्य करायचा. त्याचं राज्य आर्णोन+ खोऱ्‍याच्या मध्य भागापासून, यब्बोक खोऱ्‍याच्या संपूर्ण प्रदेशापर्यंत आणि गिलादच्या अर्ध्या प्रदेशापर्यंत पसरलेलं होतं. यब्बोक खोरं ही अम्मोनी लोकांच्या प्रदेशाचीही सीमा होती. ३  सीहोन राजा हा पूर्वेकडे असलेल्या अराबाच्या प्रदेशावरसुद्धा राज्य करायचा. हा प्रदेश किन्‍नरेथ सरोवरापासून*+ अराबा समुद्रापर्यंत, म्हणजे क्षार समुद्रापर्यंत;* तसंच पूर्वेकडच्या बेथयशिमोथपर्यंत आणि दक्षिणेकडच्या पिसगाच्या+ उतारांपर्यंत पसरलेला होता. ४  इस्राएली लोकांनी आणखी एका राजाचा प्रदेश ताब्यात घेतला; तो राजा म्हणजे बाशानचा राजा ओग.+ हा राजा उरलेल्या रेफाई+ लोकांपैकी असून, अष्टरोथ आणि एद्रई इथे राहायचा. ५  त्याचं राज्य हर्मोन डोंगराचा प्रदेश, सलका, आणि गशूरी व माकाथी+ यांच्या सीमेपर्यंतचा संपूर्ण बाशानचा+ प्रदेश; तसंच हेशबोनचा राजा सीहोन+ याच्या राज्याच्या सीमेपर्यंत असलेल्या गिलादचा अर्धा प्रदेश यांवर होतं. ६  यहोवाचा सेवक मोशे आणि इस्राएली लोक यांनी या राजांना हरवलं होतं.+ त्यानंतर यहोवाचा सेवक मोशे याने त्या राजांचा देश रऊबेन आणि गादच्या वंशांना, तसंच मनश्‍शेच्या अर्ध्या वंशाला वाटून दिला होता.+ ७  यहोशवा आणि इस्राएली लोक यांनी यार्देन नदीच्या पश्‍चिमेकडे असलेल्या राजांना हरवलं. मग यहोशवाने त्यांचा प्रदेश इस्राएली लोकांना त्यांच्या वंशांच्या हिश्‍शांप्रमाणे वाटून दिला.+ हा प्रदेश लबानोनच्या+ खोऱ्‍यातल्या बाल-गादपासून,+ सेईरजवळ+ असलेल्या हालाक डोंगरापर्यंत+ पसरलेला होता. ८  त्यात डोंगराळ भाग, उतार, ओसाड रान, शेफीला, अराबा आणि नेगेब+ असे प्रदेश होते. आणि त्यांत हित्ती, अमोरी,+ कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी+ लोक राहायचे. ज्या राजांना हरवण्यात आलं होतं, ते राजे म्हणजे:  ९  यरीहोचा राजा;+ बेथेलच्या बाजूला असलेल्या आय शहराचा राजा;+ १०  यरुशलेमचा राजा; हेब्रोनचा राजा;+ ११  यर्मूथचा राजा; लाखीशचा राजा; १२  एग्लोनचा राजा; गेजेरचा राजा;+ १३  दबीरचा+ राजा; गेदेरचा राजा; १४  हर्माचा राजा; अरादचा राजा; १५  लिब्नाचा+ राजा; अदुल्लामचा राजा; १६  मक्केदाचा+ राजा; बेथेलचा+ राजा; १७  तप्पूहाचा राजा; हेफेरचा राजा; १८  अफेकचा राजा; लशारोनचा राजा; १९  मादोनचा राजा; हासोरचा राजा;+ २०  शिम्रोन-मरोनचा राजा; अक्षाफचा राजा; २१  तानखचा राजा; मगिद्दोचा राजा; २२  केदेशचा राजा; कर्मेलमधल्या यकनामचा+ राजा; २३  दोरच्या डोंगराळ भागातला+ दोरचा राजा; गिलगालमधला गोयीमचा राजा; २४  आणि तिरसाचा राजा; असे एकूण ३१ राजे.

तळटीपा

म्हणजे, मृत समुद्र.
म्हणजे, गनेसरेत सरोवर किंवा गालील समुद्र.