यहोशवा १५:१-६३
१५ यहूदा वंशाच्या घराण्यांना चिठ्ठ्या टाकून जो प्रदेश वाटून देण्यात आला,+ तो प्रदेश अदोमची+ सीमा, झिनचं ओसाड रान आणि नेगेबच्या दक्षिण टोकापर्यंत पसरलेला होता.
२ त्यांच्या प्रदेशाच्या दक्षिण सीमेची सुरुवात, क्षार समुद्राच्या* दक्षिण टोकाकडे असलेल्या खाडीपासून झाली.+
३ आणि ती सीमा, दक्षिणेकडे असलेल्या अक्राब्बीमच्या+ चढावरून झिनपर्यंत गेली. मग पुढे ती कादेश-बर्ण्याच्या+ दक्षिणेपासून हेस्रोन व अद्दारजवळून कर्काकडे वळली.
४ तिथून ती असमोनच्या+ जवळून इजिप्तच्या ओढ्याकडे+ गेली. आणि शेवटी समुद्रापर्यंत* जाऊन संपली; ही त्यांची दक्षिणेकडची सीमा होती.
५ पूर्वेकडची सीमा, क्षार समुद्राचा* किनारा असून यार्देन नदीच्या मुखापर्यंत होती. आणि उत्तरेकडची सीमा, समुद्राच्या खाडीपासून, म्हणजे यार्देन नदीच्या मुखापासून सुरू होऊन,+
६ पुढे ती बेथ-होग्लापासून+ आणि बेथ-अराबाच्या+ उत्तरेकडून बोहनच्या खडकापर्यंत जात होती; बोहन+ हा रऊबेनचा वंशज होता.
७ ती सीमा पुढे आखोर खोऱ्यातल्या+ दबीरपर्यंत गेली, आणि गिलगालला+ उत्तरेकडे वळली; गिलगाल हे अदुम्मीमच्या चढासमोर, ओढ्याच्या दक्षिणेला आहे. तिथून ती सीमा एन-शेमेश+ झऱ्याजवळून जाऊन शेवटी एन-रोगेलपर्यंत+ गेली.
८ मग ही सीमा ‘हिन्नोमच्या वंशजांच्या खोऱ्यातून’+ यबूसी+ शहराकडे, म्हणजे यरुशलेमच्या+ दक्षिण उतारापर्यंत गेली. तिथून ती सीमा ‘हिन्नोम खोऱ्याच्या’ पश्चिमेकडे आणि रेफाईम खोऱ्याच्या उत्तरी टोकाकडे असलेल्या डोंगरापर्यंत गेली.
९ त्या डोंगरावरून ती नफ्तोहाच्या झऱ्यापर्यंत+ जाऊन, पुढे एफ्रोन डोंगरावर असलेल्या शहरांपासून बालापर्यंत गेली; याला किर्याथ-यारीम+ म्हणूनही ओळखलं जातं.
१० बालापासून वळून ती सीमा पश्चिमेकडे सेईर डोंगराकडे गेली, आणि तिथून यारीम डोंगराच्या, म्हणजे कसालोनच्या उत्तरेकडच्या उतारांकडे गेली; तिथून खाली ती बेथ-शेमेशला+ जाऊन तिम्नाकडे+ निघाली.
११ मग ती सीमा उत्तरेकडे असलेल्या एक्रोनच्या+ उतारांवरून शिक्रोनपर्यंत पोहोचली; पुढे ती बाला डोंगरावरून जाऊन यबनेलपर्यंत गेली; आणि शेवटी समुद्रापर्यंत जाऊन संपली.
१२ यहूदाच्या प्रदेशाची पश्चिम सीमा महासागराचा*+ किनारा होती. यहूदा वंशाच्या घराण्यांना मिळालेल्या प्रदेशाच्या चारही बाजूंना असलेली ही सीमा होती.
१३ यहोशवाने यफुन्नेचा मुलगा कालेब+ याला यहोवाच्या आज्ञेप्रमाणे, यहूदाच्या वंशजांच्या प्रदेशात जमिनीचा वाटा दिला. तो म्हणजे, किर्याथ-अर्बा (अर्बा हा अनाकचा पिता होता); याला हेब्रोन+ असंही म्हणतात.
१४ कालेबने तिथून अनाकच्या+ तीन मुलांना, म्हणजे शेशय, अहीमान आणि तलमय+ या अनाकच्या वंशजांना हाकलून दिलं.
१५ मग तो दबीरच्या+ लोकांविरुद्ध लढण्यासाठी गेला. (दबीरचं पूर्वीचं नाव किर्याथ-सेफर असं होतं.)
१६ कालेब म्हणाला: “जो कोणी किर्याथ-सेफरवर हल्ला करून त्यावर कब्जा मिळवेल त्याचं लग्न मी माझ्या मुलीसोबत, अखसासोबत लावून देईन.”
१७ तेव्हा अथनिएलने+ किर्याथ-सेफरवर कब्जा मिळवला; तो कालेबचा भाऊ कनाज+ याचा मुलगा होता. मग कालेबने आपली मुलगी अखसा+ हिचं अथनिएलसोबत लग्न लावून दिलं.
१८ आपल्या नवऱ्याच्या घरी जात असताना तिने नवऱ्याकडे असा आग्रह धरला, की त्याने तिच्या वडिलांकडून जमीन मागून घ्यावी. ती गाढवावरून उतरली,* तेव्हा कालेबने तिला विचारलं: “तुला काय हवंय?”+
१९ ती म्हणाली: “मला एक आशीर्वाद द्या. तुम्ही मला दक्षिणेकडे* जमिनीचा तुकडा दिलाय; आता मला गुल्लोथ-माईमसुद्धा* द्या.” म्हणून मग त्याने तिला वरचं गुल्लोथ आणि खालचं गुल्लोथ दिलं.
२० यहूदाच्या वंशाला त्यांच्या घराण्यांनुसार मिळालेला वारसा पुढीलप्रमाणे होता:
२१ यहूदा वंशाला, दक्षिणेकडे अदोमच्या सीमेजवळ+ मिळालेली शहरं म्हणजे: कब्सेल, एदेर, यागूर,
२२ कीना, दीमोना, अदादा,
२३ केदेश, हासोर, इथनान,
२४ जीफ, टेलेम, बालोथ,
२५ हासोर-हदत्ता, करीयोथ-हस्रोन (म्हणजे हासोर),
२६ अमाम, शमा, मोलादा,+
२७ हसरगदा, हेष्मोन, बेथ-पलेत,+
२८ हसर-शुवाल, बैर-शेबा,+ बिजोथा,
२९ बाला, ईयीम, असेम,
३० एल्तोलाद, कसील, हर्मा,+
३१ सिक्लाग,+ मदमन्ना, सनसन्ना,
३२ लबावोथ, शिलहीम, अईन आणि रिम्मोन;+ अशी एकूण २९ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या.
३३ शेफीलामधली+ शहरं म्हणजे: अष्टावोल, सरा,+ अष्णा,
३४ जानोह, एन-गन्नीम, तप्पूहा, एनाम,
३५ यर्मूथ, अदुल्लाम,+ सोखो, अजेका,+
३६ शारईम,+ अदीथईम, गदेरा आणि गदेरोथईम;* अशी एकूण १४ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या.
३७ सनान, हदाशा, मिग्दल-गाद,
३८ दिलान, मिस्पे, यकथेल,
३९ लाखीश,+ बसकाथ, एग्लोन,
४० कब्बोन, लहमाम, किथलीश,
४१ गदेरोथ, बेथदागोन, नामा आणि मक्केदा;+ अशी एकूण १६ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या.
४२ लिब्ना,+ एथेर, आशान,+
४३ इफताह, अष्णा, नेझिब,
४४ कईला, अकजीब आणि मारेशा; अशी एकूण नऊ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या.
४५ एक्रोन आणि त्याच्या आसपासची नगरं व वस्त्या;
४६ एक्रोनच्या पश्चिमेकडे आणि अश्दोदच्या आसपासचा सगळा प्रदेश आणि त्यातल्या सगळ्या वस्त्या.
४७ अश्दोद+ आणि त्याच्या आसपासची नगरं आणि वस्त्या; गाझा+ आणि इजिप्तच्या ओढ्यापर्यंतची सगळी नगरं आणि वस्त्या; तसंच महासागराच्या* जवळचा प्रदेश.+
४८ आणि डोंगराळ भागातली शहरं, म्हणजे: शामीर, यत्तीर,+ सोखो,
४९ दन्ना, किर्याथ-सन्ना (म्हणजे दबीर),
५० अनाब, एष्टमो,+ अनीम,
५१ गोशेन,+ होलोन आणि गिलो;+ अशी एकूण ११ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या.
५२ अरबस्तान, दुमा, एशान,
५३ यानीम, बेथ-तप्पूहा, अफेका,
५४ हुमटा, किर्याथ-अर्बा (म्हणजे हेब्रोन)+ आणि सियोर; अशी एकूण नऊ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या.
५५ मावोन,+ कर्मेल, जीफ,+ यूटा,
५६ इज्रेल, यकदाम, जानोह,
५७ काइन, गिबा आणि तिम्ना;+ अशी एकूण दहा शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या.
५८ हलहूल, बेथ-सूर, गदोर,
५९ माराथ, बेथ-अनोथ आणि एल्तकोन; अशी एकूण सहा शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या.
६० किर्याथ-बाल (म्हणजे किर्याथ-यारीम)+ आणि राब्बा; अशी एकूण दोन शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या.
६१ ओसाड रानातली शहरं म्हणजे: बेथ-अराबा,+ मिद्दीन आणि सखाखा,
६२ निबशान, क्षार शहर व एन-गेदी;+ अशी एकूण सहा शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या.
६३ यहूदाचे लोक यरुशलेममध्ये राहणाऱ्या यबूसी+ लोकांना मात्र हाकलून देऊ शकले नाहीत.+ त्यामुळे यबूसी लोक आजही यहूदाच्या लोकांसोबत यरुशलेममध्ये+ राहत आहेत.
तळटीपा
^ म्हणजे, मृत समुद्र.
^ म्हणजे, महासागर, भूमध्य सुमद्र.
^ म्हणजे, मृत समुद्र.
^ म्हणजे, भूमध्य समुद्र.
^ किंवा कदाचित, “ती गाढवावर बसलेली असताना, लक्ष वेधून घेण्यासाठी तिने टाळी वाजवली.”
^ किंवा “नेगेबकडे.”
^ म्हणजे, “पाण्याचे झरे.”
^ किंवा कदाचित, “गदेरा आणि त्याचे मेंढवाडे.”
^ म्हणजे, भूमध्य समुद्र.