यहोशवा १६:१-१०

  • योसेफच्या मुलांना मिळालेला वारसा (१-४)

  • एफ्राईमला मिळालेला वारसा (५-१०)

१६  योसेफच्या वंशजांना+ चिठ्ठ्या टाकून जो प्रदेश वाटून दिला होता,+ त्याची सीमा यरीहोजवळ असलेल्या यार्देनपासून सुरू होऊन, यरीहोच्या पूर्वेकडे असलेल्या झऱ्‍यांच्या बाजूने, यरीहोच्या समोर असलेल्या ओसाड रानातून बेथेलच्या+ डोंगराळ प्रदेशात गेली. २  तिथून ती लूजजवळ असलेल्या बेथेलपासून अटारोथपर्यंत गेली; ही अर्की लोकांची सीमा आहे. ३  पुढे ती पश्‍चिमेकडे यफलेटी लोकांच्या प्रदेशाच्या सीमेवरून, खालच्या बेथ-होरोनच्या+ सीमेपर्यंत आणि गेजेरपर्यंत+ गेली. आणि शेवटी समुद्रापर्यंत जाऊन संपली. ४  अशा प्रकारे योसेफचे वंशज,+ म्हणजे मनश्‍शे आणि एफ्राईम यांनी आपल्या हिश्‍शाची जमीन घेतली.+ ५  एफ्राईमच्या वंशजांच्या घराण्यांना वारशात मिळालेल्या जमिनीची पूर्वेकडची सीमा, अटारोथ-अद्दारपासून+ वरच्या बेथ-होरोनपर्यंत,+ ६  आणि पुढे समुद्रापर्यंत होती. उत्तरेकडच्या मिखमथाथपासून+ ही सीमा फिरून पूर्वेकडे तानथ-शिलोपर्यंत जाऊन यानोहाकडे गेली. ७  मग पुढे ती यानोहापासून, अटारोथ आणि नारा इथून यरीहो+ आणि यार्देनपर्यंत गेली. ८  तप्पूहाकडून+ ती पुढे पश्‍चिमेकडे असलेल्या कानाह ओढ्याकडे गेली आणि शेवटी समुद्रापर्यंत जाऊन संपली.+ हा प्रदेश एफ्राईम वंशाला त्यांच्या घराण्यांप्रमाणे मिळालेला वारसा आहे. ९  यासोबतच, मनश्‍शेच्या प्रदेशातही एफ्राईम वंशजांसाठी काही शहरं आणि वस्त्या वेगळ्या ठेवण्यात आल्या होत्या,+ त्यासुद्धा त्यांना मिळाल्या. १०  पण त्यांनी गेजेरमध्ये राहणाऱ्‍या कनानी लोकांना मात्र हाकलून दिलं नाही.+ म्हणून कनानी लोक आजही एफ्राईमच्या लोकांसोबत राहत आहेत;+ आणि ते एफ्राईमचे गुलाम आहेत.+

तळटीपा